शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

रुप बिलोरी ऐना

By admin | Updated: September 13, 2014 14:38 IST

‘सगळं ऋतुचक्रच बदललं आहे.’ गेल्या काही वर्षांत सातत्याने हे वाक्य कानी पडतं आहे. खरंच तर आहे ते! श्रावणसरी बरसायच्या तर ऊन भाजून काढतं व ऑक्टोबर हिट जाणवायची, तर पाऊस झोडपून काढतो. असं असलं तरी पावसातलं सृष्टीचं देखणेपण मात्र बदलत नाही. मग पाऊस कधी का पडेना, त्या पावसातलं हे सृष्टिसौंदर्य.

- भैरवनाथ डवरी

 
ऋतुचक्रानुसार एकापाठोपाठ एक असे सहा ऋतू अवनीमातेच्या मंचकावर येतात. आपापलं अद्वितीय असं सादरीकरण  करतात. संपूर्ण सृष्टीतल्या चराचरांना अनोख्या शिदोरीचं गाठुडं दान करून निघून जातात. प्रत्येक ऋतूच्या सादरीकरणाला कविवर्य मंगेश पाडगावकरांनी एकेक सोहळा अशी उपमा बहाल केलीय. त्यांच्या प्रगल्भ प्रतिभेच्या कुंचल्यातून अतिशय  सुंदर पद्यपंक्तींची निर्मिती झाली आहे. ते म्हणतात :
सहा ऋतूंचे सहा सोहळे 
येथे भान हरावे
या जन्मावर, या जगण्यावर
शतदा प्रेम करावे
सहा ऋतूंतला पावसाळा एक ऋतू. काळ्या-निळ्या रंगांच्या शाली पांघरलेल्या डोंगरटेकड्या. या डोंगरटेकड्यांच्या माथ्यावरून विविध प्रकारची रूपे दाखवत मेघांचे काफिले सरकत असतात. आकाशावर निळ्या-काळ्या मेघांनी छत्र धरलेलं असतं. धरेवर अंधारसावल्या पसरतात. पाण्यानं थबथबलेले हे मेघ धुवाधारपणे कोसळत असतात. कधी कधी  अचानक त्यांचं धुवाधार कोसळणं थांबतं. या कोसळंण्याचं नि अचानक थांबण्याचं कविवर्य मंगेश पाडगावकरांनी पल्लेदार प्रतिभाशक्तीच्या जोरावर अत्यंत भावुक वर्णन केलंय. ते म्हणतात :
वाट इथे स्वप्नातील संपली जणू
थांबवितो धाराही सावळा घणू
काही वेळा हा कोसळ धरेवर रंगपंचमी खेळतो. त्याच्या या आगळ्यावेगळ्या रंगपंचमीच्या खेळानं  ओढे, ओहोळ, नद्यासुद्धा रंगभरल्या पाण्यानं   भरभरून वाहू लागतात. ओढे तर अक्षरश: नद्यांच्या प्रेमात पडतात आणि बेभान होऊन सरितांच्या भेटीसाठी कडेकपारीतून उड्या घेत धावत असतात. जाताना दगडगोट्यांशी कानकोष्टी करीत पुढे-पुढे जात असतात. तसेच त्यांच्या भेटीसाठी आतुरतेने वळवळणार्‍या लेकुरवाळ्या वेलींना आलिंगन देत बेधुंदपणे पुढे-पुढे जात असतात. कडेकपारीतून बेधुंदपणे उड्या घेताना ते कशाचीही तमा करीत नाहीत. भले त्यांच्या तीरावर युद्ध जरी जुंपले, तरीही ते त्याची तमा करीत नाहीत. उंचावरून त्यांचं कोसळणं अत्यंत विलोभनीयच. धारोष्ण दुधासारख्या पांढर्‍याशुभ्र रंगांचं  फेसाळलेलं पाणी, त्यातून उसळणार्‍या इवल्या-इवल्या जलबिंदूंशी वार्‍याच्या झुळकीनं साधलेली जवळीक यांमुळे परिसरावर पांघरलेली धुक्याची शाल. किती अप्रूप वाटावे या सोहळ्याचे? सूर्यनारायणालाही हा अद्वितीय सोहळा पाहण्याचा मोह आवरता येत नाही. ढगाआडून सूर्यनारायणही चोरट्या नजरेचा कटाक्ष या विहंगम दृश्यावर  टाकतो आणि मग काय इथल्या परिसराला इंद्रधनू गुंफून टाकतो. हा विलोभनीय सोहळा पाहिला, की
डोंगरमाथ्यावरूनी वाहतो,
खळखळ  निर्झर
झुळझुळ मंजूळ गाण्याने त्याच्या
दुमदुमतो परिसर
या पद्यपंक्ती आपसूकच ओठावर येतात. श्रावणातील या सोहळ्याचा मनमुरादपणे आनंद लुटण्यासाठी माणसांचं लटांबर  फेसाळलेल्या पांढर्‍याशुभ्र धबधब्यांकडे धाव घेत असतं. खोल दर्‍यांमध्ये उंच डोंगरमाथ्यावरून कोसळणारं पांढरंशुभ्र पाणी. धबधब्यातून झुळकन- सुळकन इकडून तिकडे इवले इवले पाण्याचे थेंब बरोबर वाहून नेणारी वार्‍याची झुळूक, मध्येच डोकावणार्‍या सूर्यप्रकाशामुळे धबधब्याच्या आवारात अचानक अवतरणारा इंद्रधनू  पाहून सारे जण भरभरून निसर्गाचे गोडवे गाऊ लागतात. हळूहळू निळेसावळे मेघ गगनाच्या गाभार्‍यातून पायउतार होऊ लागतात. 
रंगमि२िँं१्रूँं१त पाणी नितळ होऊ लागतं. खळखळ वाहणारे निर्झर हळूहळू गतिमंद होऊ लागतात. सर्वांग चुंबणारा वाराही अवखळ होऊ लागतो आणि निळ्यासावळ्या मेघांची जागा पांढुरके ढग घेऊ लागतात. डोंगरमाथी काळीनिळी दिसू लागतात. पठार-उतारावरील आणि भातखाचरांतील प्रत्येक वाफा हिरवीकंच वस्त्रं परिधान करतो. धरणीमाता हिरवागार जरतारी शालू नेसून नटते. पावसाचा कोसळ हळूहळू कमी होऊन धरेवर श्रावणाचं नव रूंपडं अवतरतं नभांगणात ऊन-पावसाची जलक्रीडा सुरू होते. ही तर श्रावणातील खासियतच म्हणा ना!  ओल्या पिवळ्या रेशीमधारांचा सडा नभांगणात शिंपला जातो. हे अद्वितीय रूप पाहून बालकवींच्या प्रतिभेला कंगोरे फुटले तर नवल काय?  ‘श्रावणमास’ या कवितेत त्यांच्या प्रतिभेच्या जिवंत  झर्‍याच्या उमाळ्यातून उमललेल्या शब्दफुलाची सुरेख गुंफण करीत ते म्हणतात,
श्रावणमासी हर्ष मानसी,
हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे,
क्षणात फिरूनी ऊन पडे
ऊन-पावसाच्या या संमिश्र जलक्रीडेतूनच जन्म होतो तो सप्तरंगी इंद्रधूनचा! निळ्याशार नभोमंडपास कुणी मंगल तोरण बांधले असावे, असा प्रश्न उभारतो. ओल्या पिवळ्या उन्हात तजेलदार दिसणारी हिरवीपिवळी शेते. हिरवेकंच डोंगर नि दर्‍या. हिरवेपण पिऊन जरतारी शालू नेसून यौवनसुंदरी बसली आहे, असा भास झाल्यावाचून राहत नाही. मराठी महिन्यांप्रमाणे श्रावण हा पाचव्या क्रमांकाचा महिना.
पृथ्वीला पाचवा महिना लागला आहे, असा ेष येथे साधायचा आहे. म्हणूनच हे लावण्य पाहून ‘हे रूप बिलोरी ऐना, पृथ्वीला पाचवा महिना?’ अशा मोजक्या शब्दांत केलेलं वर्णन प्रतिभेच्या पल्लेदारपणाची अनुभूती सहज देऊन जातं. लहानपणी शालेय जीवनात अभ्यासलेल्या या पद्यपंक्तींचं स्मरण झालं, की मनमयूर डोलू लागतो. अगदी आभ्राच्छादित आकाशाच्या छताखाली जसा मोर थुई थुई नाचतो तसं. असं ताजमहालाबद्दल म्हटलं जातंय. अगदी नेमकं तसंच श्रावण महिन्याबद्दल म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.  सूर्य पश्‍चिम क्षितिजाकडे कलू लागतो आणि मग काय? निळ्यासावळ्या ढगांआडून डोक्यावर ओलं पिवळं ऊन. काळ्या ढगांना लगडलेल्या चमचमत्या  चंदेरी कडांच्या  झालरी. क्षितिजावर टेकलेला लालबुंद सूर्यगोल. नवजात पिलांच्या ओढींन घरट्याकडे झेपावणारी सोनेरी, रुपेरी, मखमली रंगांच्या पंखातली पाखरं. हिरवाकंच रानमेवा फस्त करून, रवंथ करून फेसाळलेलं तोंड घेऊन, गळ्यातील घुंगुरमाळांच्या तालावर, पिलांच्या ओढीनं गोठय़ाकडे परतणारी गुरंढोरं. त्यांच्या मागून पाव्यातून  ‘श्रावणराग ’ आळविणारा आपला बळीराजा, काय ग्रामीण बाज हा !
सांज खुले सोन्याहूनि पिवळे हे पडले ऊन,
चहुकडे लुसलुसित बहरल्या हिरवळी छान   
या पद्यपंक्तींची हुबेहूब अनुभूती येते. सौंदर्याची मुक्त हातांनी भरभरून उधळण करणार्‍या धरणीमातेबद्दल बळीराजासह सर्वांसाठी कृतज्ञतेनं म्हणावसं वाटतं,
समुद्रवसने देवी । पर्वत: स्तनमण्डले ।
विष्णुपत्नीं नम:त्सुभ्यं । पादस्पर्शं क्षमस्व मे ।
(लेखक मराठी साहित्याचे अभ्यासक आहेत.)