शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

रोमायण

By admin | Updated: September 19, 2015 14:54 IST

रोम साम्राज्यात 50,000 मैल लांबीचं फरसबंदी रस्त्यांचं जाळं होतं. अडीच लाख मैल लांबीचे रस्ते सांभाळले गेले. रस्ते असूनही वेशीच्या आत वाहनांना बंदी होती. रस्ते सरकारी असूनही पुलांसाठी टोल होता. या ऐल-पैल रस्त्यांनी सरहद्दी कवेत घेतल्या, कोन्याकोप:याला वचकात ठेवलं आणि 500 वर्षे रोमन साम्राज्याचा एकसंधपणा घडवला, टिकवला आणि वाढवला.

- डॉ. उज्‍जवला दळवी
 
रात्री निजानीज झाल्या झाल्या त्याने घोडा भरधाव सोडला. वाटेतल्या प्रत्येक डाकबंगल्यापाशी नवा, ताज्या दमाचा घोडा घेऊन त्याने दौड चालू ठेवली. त्याच्या जिवावर उठलेल्या जुलमी सम्राटाला जाग येण्यापूर्वीच त्याने कित्येक कोसांचं अंतर पार केलं. सम्राटाने ओलीस ठेवून घेतलेला कॉन्स्टंटाईन इ.स. 305 मध्ये प्राणसंकटातून बचावला. 306 साली तो स्वत:च रोमचा प्रभावशाली सम्राट बनला.’ 
कॉन्स्टंटाईनला ते पलायन जमलं कारण त्याला रोमन साम्राज्यातल्या रस्त्यांचे आराखडे पाठ होते. त्याकाळच्या रोम साम्राज्यात सुमारे 50,000 मैल लांबीचं फरसबंदी रस्त्यांचं जाळं होतं. कुठेही जरा खुट्ट झालं तर रोमन सैन्य वेगाने तिथे पोचू शकत असे. त्या निश्चिंतीमुळे प्रजाजन निर्धास्त राहू शकत. मात्र त्या सा:या रस्त्यांची धाव साम्राज्याच्या सीमेपर्यंतच होती.
रोमन रस्ता
रस्त्यांचा मुख्य वापर सैन्यासाठीच असल्याने ते बांधायचं कामही सैनिकांवरच सोपवलेलं होतं. ‘सैनिकांच्या नसत्या उचापती टाळायच्या असतील तर त्यांना बांधकामात गुंग ठेवावं’, असं ऑगस्टसचं धोरण होतं. सेनेच्या तुकडय़ांत भूमिती उत्तम जाणणारे वास्तुशिल्पविशारद आणि त्यांच्यासोबत जमिनीची पाहणी करणारे, मोजमापं घेणारे, जमीन सपाट करणारे वगैरेंचा ताफा असे. प्रत्येक जवानाच्या हत्त्यारांमध्ये ढाल-तलवार-भाल्यासोबत कोयता-कुदळ-फावडं ह्यांचाही समावेश सक्तीने केला जाई. मोजून-मापून-आखून, एकमेकांशी काटकोनात जुळणारे, लांबसडक रस्ते बांधले जात. सरळ जाणारा रस्ता आठ फूट (आठ रोमन पेस) आणि वळणदार रस्ता सोळा फूट रु ंदीचा असावा असा दंडक होता. मोजमापाप्रमाणो लांब रुंद खोल खड्डा खणून त्यात ठिक:या, गोटे, रेती वगैरेंची वर्पयत भर घालून दोन्ही बाजूंनी उतरता, काँक्रीटवर फरसबंदी केलेला रस्ता बांधला जाई. त्याच्यावरून पाण्याचा निचरा सहज होई. फारशी डागडुजीही लागत नसे. बांधकाम इतकं भक्कम असे की त्यांच्यापैकी काही रस्ते अजूनही सध्याच्या गाडीवाटांखाली आधार देताहेत.
वाटेतल्या अडथळ्यांना वळसा घालण्याऐवजी त्यांच्यावर मात करून सरळसोट रस्ते बांधणं हे रोमनांचं ब्रीद होतं. त्यासाठी त्यांना अभियांत्रिकी करामती कराव्या लागल्या. त्यांनी डोंगरांतून बोगदे काढले. वेगवेगळ्या नद्यांवर दगडी-लाकडी किंवा काँक्र ीटचे नऊशेहून अधिक अनेकखांबी किंवा कमानदार पूलही बांधले. तांत्रिकदृष्टय़ा प्रगत असल्यामुळे त्यांच्यापैकी बरेचसे पूल अजूनही वाहतूक पेलताहेत. पण धोरणाचा अतिरेक होऊन रोमनांनी डोंगरावरचे रस्तेही वळणावळणाचे न करता ताठेताठ उभे चढवले. काही काळाने त्या हट्टातले दोष ध्यानात येऊन त्यांनी पद्धत बदलली. 
रस्ते सेनेने सेनेसाठी बांधलेले असले तरी त्यांच्यामुळे संस्कृती आणि व्यापारउदीम यांचाही सर्वदूर प्रसार झाला. बांधून झालेल्या रस्त्याची देखभाल करायचं काम मात्र नगरपालिकेवर सोपवलेलं असे. साम्राज्याच्या कायद्यानुसार हिंडणं-फिरणं हा नागरिकांचा हक्क होता. एखाद्या तालेवाराच्या वाडीबाहेरचा वहिवाटीचा रस्ता खराब झाला तर वाटसरूंना त्या तालेवाराच्या वाडीतून बिनदिक्कत चालत जायचा अधिकार लाभे. त्यामुळे तो तालेवारही रस्तादुरु स्तीत जातीने लक्ष घालत असे. साहजिकच बांधकामासाठी देणग्याही मिळत. 
त्या काळात रोमन घोडय़ांचे नाल ठोकलेले नसत. ते खुरांना बांधलेले असत. रस्त्यांच्या फरशांमधल्या फटींत ते अडकत. म्हणून मुख्य रस्त्याच्या कडेने खास वेगळी घोडेवाट बनवलेली असे. घोडेवाटा, कच्च्या गाडीवाटा, खाणींमधल्या अरु ंद वाटा असे सगळे मिळून सुमारे अडीच लाख मैल लांबीचे रस्ते रोमन साम्राज्यात सांभाळले गेले. 
प्राचीन रोमन मैलखांब
खुद्द रोममध्येच 29 फरसबंदी रस्ते एकवटत. त्या केंद्रापाशी एक पंचधातूचं सुवर्णमंडित शिल्प होतं. रोमन साम्राज्यातले हजारो रस्ते त्या शिल्पाच्या दिशेने जात. म्हणूनच ' All roads lead to Rome’ अशी म्हण पडली. सगळ्या फरसबंदी रस्त्यांवर, दर हजार पावलांवर मैलाचे दगड किंवा खांब होते. ‘हजार पावलं’ म्हणजे लॅटिनमध्ये millia passum त्यावरूनच mile आणि मैल हे शब्द आले. प्रत्येक मैलखांबाच्या पायशिलेवर तिथून रोमच्या मध्यार्पयतचं अंतर नोंदलेलं असे. आसपासचे रस्ते आणि चौरस्ते यांचा ढोबळ आराखडाही काढलेला असे. त्या नोंदीची इतिहासकारांना फार मदत झाली.  
रस्ते-वाटा-सडका असूनही शहराच्या वेशीच्या आत वाहनं वापरायला बंदी होती. शहरात माल घेऊन येणा:या गाडय़ाही रात्रीच्या ठरावीक वेळेपुरत्याच वेशीच्या आत येऊ शकत. गरीब-श्रीमंत सारेच पायी पायी चालत जात. फक्त सरकारी अधिका:यांना आणि देवीची उपासना करणा:या तपस्विनींना वाहनातून जायची परवानगी होती. 
गावाबाहेरच्या रस्त्यांवर मात्र सैन्याखेरीज राजकीय शिष्टमंडळं, व्यापारी यांचीही वर्दळ असे. मातब्बर मंडळी पालख्यांत झोपून किंवा बंदिस्त रथांत बसून प्रवास करी. बाकीचे लोक साध्या गाडय़ांतून, घोडय़ांवरून किंवा पायी पायी जात. सर्वसामान्यांसाठी आताच्या बससारखी चारचाकी स्टेज-कोचचीही सोय होती. त्यातून सामानासुमानासकट नऊदहा माणसं जाऊ शकत. एकूण वजनाला ठरावीक सरकारी मर्यादा होती. त्या गाडीला घोडे, खेचरं किंवा बैलही जोडले जात. शेतकरी-धनगरांचा माल दुचाकी, फळकुटय़ा खेचर-गाडय़ांतून जाई. गाडय़ांच्या लाकडी चाकांची झीज टाळायला त्यांना लोखंडी धावा बसवलेल्या असत. सरकारी रस्ते असले तरी त्यांच्या, विशेषत: पुलांच्या वापरासाठी मोठा टोल द्यावा लागे. कर परवडत नसल्यामुळे कुणीही कारणाशिवाय प्रवासाच्या फंदात पडत नसे.  
सरकारी आणि खासगी पोस्टही त्याच राजमार्गावरून जाई. डाकगाडय़ांचे घोडे बदलायला वाटेत डाकबंगले  असत. कॉन्स्टंटाईनने पळून जाताना त्याचाच फायदा घेतला. सरकारी पत्रपेटीचीच बैठक करणारी दोनचाकी हलकी घोडागाडी वेगाने जाई. पण अतिमहत्त्वाचे खलिते मात्र दिवसभरात 500 मैल जाणा:या घोडेस्वाराकडेच सोपवले जात. श्रीमंतांचं खासगी पोस्ट गुलामांमार्फत खास गाडीने जाई. शेलक्या पोस्टावर लुटारू-शत्रूंचा डोळा असल्यामुळे बापडय़ा पोस्टमनांना ‘रात्रंदिन युद्धाचा प्रसंग’ असे. 
दूरचा प्रवास करताना सैन्याच्या तुकडय़ा आपला शिध्याचा गाडा सोबत घेऊन जात. अंमलदारांसाठी सरकारी विश्रंतिगृहं असत. तिथे प्रवेश मिळवायला ओळखपत्र दाखवावं लागे. धनिकांच्या खान-पान-आरामाची वेगळी पण उत्तम व्यवस्था असे. सामान्यांसाठी मात्र भामटय़ांच्या खाणावळीत खायला कोंडा, निजेला धोंडा आणि संगतीला गुंडा अशी सोय असे. अंथरूण मिळालंच तर त्यासोबत ढेकूण-उवा-पिसवांचा गडगंज खजिनाही लाभे. 
रोमन नौसेनेच्या संरक्षणाखाली रोमनांचा आणि मांडलिक ग्रीकांचाही सागरी व्यापार दांडगा होता. वल्हवणा:यांच्या दोन-तीन मजली रांगा हे ग्रीक जहाजांचं वैशिष्टय़ होतं. पण रोमन रस्त्यांमुळे खुष्कीचं दळणवळण कित्येक पटींनी अधिक महत्त्वाचं झालं होतं.
रोमन साम्राज्य ब्रिटनपासून इजिप्तर्पयत आणि स्पेन-पोर्तुगालपासून तुर्कस्तानापर्यंत ऐसपैस पसरलेलं होतं. त्याच्या ऐल ते पैल रस्त्यांनी त्याच्या सरहद्दी कवेत घेतल्या, कोन्याकोप:याला वचकात ठेवलं. त्याच दीर्घबाहूंच्या विळख्याने पाचशे वर्षात त्या साम्राज्याचा एकसंधपणा घडवला, टिकवला आणि वाढवला.
 
पेशाने वैद्यकीय डॉक्टर असलेल्या लेखिका गेली तीस वर्षे सौदी अरेबिया आणि त्याआधी इंग्लंडमध्ये 
वास्तव्याला होत्या. ‘जेनेटिक्स कशाशी खातात?’ 
आणि ‘सोन्याच्या धुराचे ठसके’ 
ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. 
मानवाचा ‘प्रवास’ हा गेली दोन दशके त्यांच्या वाचनाचा, 
संशोधनाचा विषय आहे.)
ujjwalahd9@gmail.com