शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

सुटका

By admin | Updated: March 26, 2016 20:40 IST

मराठी पांढरपेशा मध्यमवर्गाइतका घाबरट, दुटप्पी आणि दुतोंडी वर्ग मी जगात कुठेही पाहिला नाही. मलाही माझे शहर सुटल्यावरच जगण्याची तालीम मिळाली. आपण कुणी विशेष, शुध्द आहोत आणि जग सामान्य, खोटे आहे, हा खोटा माज होता; तो प्रवास केल्याने आटोक्यात आला.

- सचिन कुंडलकर
 
 
पूर्वीच्या जगण्यामध्ये आमच्या आजूबाजूला मद्यपान आणि मांसाहार या गोष्टींबद्दल कितीतरी मजेशीर वातावरण होते. त्या गोष्टी काहीतरी वाईट किंवा भयंकर आहेत अशी काहीतरी भावना. पण सगळेजण दोन्ही गोष्टी भरपूर प्रमाणत करत असत. अगदी आमच्या सोवळ्या सदाशिव पेठेतसुद्धा. 
फरक हा होता की कोणतीही गोष्ट करताना तारतम्य बाळगून करणो हे भारतात कधी शिकवले  जात नाही आणि त्यामुळे संकोच आणि अपराध भावना. यामुळे काळ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये बांधून दारूच्या बाटल्या किंवा चिकन घरी येत असे. मांसाहार करण्याचे अंतिम टोक म्हणजे चिकन खाणो असे. त्यापलीकडे आमच्यातले कोणी गेल्याचे मला आठवत नाही. काळ्या प्लास्टिकच्या पिशव्यांचे प्रयोजन मला कधी कळले नाही. सगळेच काळ्या पिशव्यांमधून काय आणतात हे सगळ्यांना माहिती असेल तर मग चोरून आणि लाजून आणि ‘आम्ही नाही त्यातले’ असे म्हणण्याचे प्रयोजन कसे साध्य होणार असा मला प्रश्न पडत असे. 
बरे धार्मिक भावना वगैरे असे काही असेल तर ते सगळे भुक्कड थोतांड होते. आमच्या घरात पार्टी असली की सगळे एकजात स्टीलच्या पेल्यामधून दारू पीत आणि आम्हा लहान मुलांना आम्ही कसे औषधच पीत आहोत असे सांगत. काही वेळाने आपापल्या बरळणा:या आणि आउट झालेल्या नव:यांना एक एक पतिव्रता आत नेऊन झोपवत असे आणि आम्ही मुले घाबरून आपापली जेवणाची पाने साफ करत हा प्रकार पाहत असू. 
मला आमच्या बिचा:या आईवडिलांच्या पिढीची सतत दया येत राहते ती यामुळे की आमच्या आजूबाजूची सगळी सुशिक्षित पांढरपेशा पिढी संकोचत आणि घाबरण्यात जगली. दारू पिणो आणि मांसाहार करणो यात चांगलेही काही नाही आणि वाईटसुद्धा काही नाही. प्रत्येकाच्या जगण्याचा तो एक वैयक्तिक प्रश्न असावा. पण दिवसा सगळ्यांसमोर ‘आम्ही कसे सोवळ्यातले शाकाहारी’ असे मिरवायचे आणि रविवारी दारे-खिडक्या बंद करून आत तंगडय़ा तोडत ग्लासवर ग्लास दारू रिचवायची. असे करताना जो एक ओशाळ आनंद मिळेल तेवढा घ्यायचा, कारण सतत आपल्याला कोण काय म्हणोल याची भीती. सगळा समाज या भीतीत राहत असे. मला नव्या जगात जगताना आजच्या काळातील सुट्टय़ा कुटुंबव्यवस्थेत आणि मोठय़ा शहरांमध्ये आश्वासक हे वाटते की कुणीही कुणाला काहीही बोलू शकत नाही. निदान आमच्या आई वडिलांपेक्षा कमी संकोचाने आम्ही जगण्यातले रंगीत आणि अमान्य आनंद घेत राहतो. आम्हाला वर तोंड करून काही बोलायची सोय कुणाला आम्ही ठेवलेली नाही. 
स्वत: कष्ट करून कमावलेल्या पैशाने उपभोग घ्यायचा नाही आणि उपभोग घेतलाच तर कुणालाळी कळू न देता गुपचूप आपल्याआपल्यात दारे बंद करून तो घ्यायचा असे करण्यात आमच्या पिढीच्या बहुतांशी लोकांची बालपणो गेली. याचे कारण रीती आणि धर्म याचा समाजावर असलेला अनावश्यक पगडा. दुस:या बाजूला आनंद कसा घ्यायचा आणि किती प्रमाणात घ्यायचा याचे  भारतीय कुटुंबात मुलांना कधीही न दिले गेलेले शिक्षण. अजिबात एखादी गोष्ट करायची नाही, एखादी गोष्ट आपल्यात चालत नाही एवढेच सतत सांगितले जाते. असे नसेल करायचे तर काय करावे, आनंद कसा घ्यावा, बेहोष मस्ती कशी करावी याचे न घरी वातावरण असते न दारी. 
होकारार्थी संस्कारच नसतात. काय करू नये याची अगडबंब यादी. त्यातून एकाबाजूला मनातून  घाबरलेली आणि दुस:या बाजूला सुखांसाठी हपापलेली पिढी तयार होते. आणि ती सर्व पिढी प्लास्टिकच्या काळ्या पिशव्यांमध्ये चिकन आणून बायकोला भरपूर खोबरे वाटून बनवायला सांगते आणि  स्वत: भोक पडलेले बनियन घालून स्टीलच्या ग्लासमध्ये दारू पीत क्रि केट पाहत बसते. मराठी पांढरपेशा मध्यमवर्गाइतका घाबरट, दुटप्पी आणि दुतोंडी वर्ग मी जगात अनेक ठिकाणी फिरलो तरी कुठेही पाहिला नाही. ती आमच्या लहानपणी एक अद्वितीय जमात होती, ती नशिबाने काळासोबत अस्तंगत होत जात आहे. 
मला खोटी बंधने नुसती दाखवण्यासाठी पाळायला आवडत नाहीत. असे करणा:या लोकांचा मला मनस्वी कंटाळा येतो. 
घर, शहर, जात आणि माङो बालपणीचे वातावरण सोडून बाहेर पडल्यावर मला गेल्या पंचवीस वर्षाच्या आयुष्याने संकोचाशिवायचा आनंद उपभोगायला शिकवला. मला अनेक मनस्वी, रंगीत, मनाने स्वच्छ आणि प्रामाणिक माणसे भेटली. ‘नैतिक माज’ जो माङया पुणोरी मराठी बालपणात फोफावला होता तो विरघळून गेला. मला अनेक स्त्रीपुरु षांनी कसे, केव्हा, काय खायचे प्यायचे, काय ओढायचे, कुठे ताणायचे, काय सैल करायचे याचे मस्त शिक्षण देत देत लहानाचे मोठे केले. देशाबाहेर गेल्यावर पहिल्याच दिवशी समोर पानामध्ये ससा आला. गरम गरम लुसलुशीत. मी तेव्हापासून आपण कोणता प्राणी खात आहोत याविषयी घृणा बाळगणो सोडून दिले. चवीवर आवडी निवडी ठरवल्या. त्याचप्रमाणो मैत्री करताना, प्रेम करताना किंवा नुसते तात्पुरते शारीरिक संबंध मोकळेपणाने ठेवताना भीती, संकोच, शरम वाटणो कमी झाले. आपण काय करत आहोत याच्या जबादारीचे भान आले. समोरच्या व्यक्तीच्या मनाचा आणि शरीराचा आदर कसा ठेवायचा याचे ज्ञान जगण्यामधून मिळत गेले. भारतीय कुटुंबव्यवस्थेने हे जबाबदारीचे ज्ञान मला कधीही दिले नाही. इतर अनुभवांशी मिसळत, चुका करत, चार ठिकाणी थोबाडीत खात, रडतखडत जे काही मनाला आणि शरीराला सापडले तीच खरी मुंज होती. त्या ज्ञानाने एक अपार बेहोशी, अपार उन्माद आणि त्यानंतर येणारी थंड शांतता पेलायला हळूहळू शिकवले. 
आमचे सगळे घराणोच तसे रंगीत. त्यांचे औपचारिक आभार या सगळ्यात मानायलाच हवेत. मी लहानपणी अनेक वेळा हे पाहत असे की, आजोबांचे हात लुळे असताना त्यांना बिडी प्यायची हुक्की येई तेव्हा आई बिडी पेटवून त्यांच्या तोंडात धरत असे. ते मजेत झुरके घेत. आमच्या सबंध घराण्यात एकही म्हणजे एकही पुरु षाने एकपत्नीव्रत पाळले नव्हते. अजूनही आमच्यात ती पद्धत नाही. त्यामुळे आमच्या घरातील बायका फार सोशिक आणि शहाण्या आहेत. महा हुशार आहेत आणि सतत सावध असतात. आमची आई संपूर्ण कडक शाकाहारी, पण तिचा नियम हा होता की जी मौजमजा करायची ती घरात करा. हॉटेलात जाऊ नका. त्यासाठी ती चिकन, मटण, मासे सगळे शिकली. दहावीत तिने मला बजावले की मित्रंसोबत बाहेर जाऊन बियर वगैरे पिऊ नकोस, काय करायचे आहे ते घरात मोकळेपणाने कर. व्यसनी बनू नका. माङया नजरेसमोर मोकळेपणाने राहा. माझा भाऊ त्याच्या निर्णयाने शु्द्ध शाकाहारी राहिला, मला व वडिलांना तिने हवे ते करून खाऊ घातले. ‘जो जे वांछील तो ते लाहो’ अशा घरात मी वाढलो. पण ते आमच्या चौघांचे अतिशय खासगी जग होते. 
प्लास्टिकच्या काळ्या पिशवीतून पापलेट घरी येत असे. अचानक कोणी आजी-आजोबा छाप माणसे आली की आम्ही लगेच शुभंकरोती वगैरे म्हणत असू. मी तर लहानपणी सारखं दिसेल त्याच्या पायापण पडत असे. मला लहानपणी पाढे, आरत्या असला सगळा मालमसाला येई, ज्याने नातेवाईक मंडळी आणि शेजारपाजारचे गप्प होतात. 
उशिरा का होईना, पण मला माङो शहर सुटल्यावर मला जगण्याची तालीम मिळायला सुरुवात झाली. याचा संबंध नुसता खाणोपिणो आणि चंगळ करण्याशी नव्हता. ती मी पुष्कळ केली, पण त्यापेक्षा महत्त्वाचे मला असे वाटले की सतत आपण कुणीतरी विशेष, शुद्ध आणि महत्त्वाचे आहोत आणि जग सामान्य चुका करणारे आणि खोटे आहे, हा जो पुणोरी विश्वात खोटा माज होता तो प्रवास केल्याने आटोक्यात आला. मला नवे चार गुण शिकता आले. प्रमाणात साजरे केले तर किती सुंदरपणो बेहोष होता येते याचे शिक्षण मला मराठी लोकांच्या बाहेर राहून मिळाले. शरीराचे आणि मनाचे सर्व आनंद उपभोगणो याविषयी असणारा संकोच आणि भीती हळूहळू मनातून जायला मदत झाली. काळ्या प्लास्टिकच्या पिशवीची गरज भासेनाशी झाली. 
 
(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)
kundalkar@gmail.com