शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: कलांमध्ये भाजपाची 'एक नंबर' कामगिरी; NDA ची सत्ता राखण्याच्या दिशेनं घोडदौड
2
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
3
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
4
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
7
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
8
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
9
"माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...", अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
10
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
11
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
12
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
13
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
14
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
15
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
16
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
17
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
18
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
19
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
20
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चित्रकारांच्या प्रदेशात

By admin | Updated: December 31, 2016 13:20 IST

‘इझलसमोरचा चित्नकार हा बेटावरच्या एकाकी प्रवाशासारखा असतो’, असं रेम्ब्राचं एक विधान आहे. त्या बेटावरचा त्याचा दिनक्रम नेमका असतो तरी कसा?. काय असतं त्या निळ्या पक्ष्याचं नाव, जो स्टुडिओच्या खिडकीत बसून चित्नकाराला स्फूर्ती पुरवतो?

- स्टुडिओ
 
- शर्मिला फडके
 
आर्ट गॅलरीमध्ये, पांढऱ्याशुभ्र भिंतीवर, देखण्या फ्रेम्समध्ये सजलेली, सुयोग्य प्रकाशयोजनेत झळाळून उठलेली पेंटिंग्ज पाहताना हे विसरणं इतकं सोपं असतं, की ही पेंटिंग्ज एका दीर्घ प्रक्रियेचा प्रवास पार करून इथवर पोचलेली आहेत. चित्रकाराच्या स्फूर्तीचा, सर्जनाचाच नव्हे तर परिश्रमाचा, नियोजनाचाही हा प्रवास असतो.
आणि हा प्रवास ज्या प्रदेशातून घडतो तो प्रदेश खास त्या चित्रकाराच्याच मालकीचा.
पेंटिंग्ज साऱ्या जगाकरता असतीलही, पण हा प्रदेश नाही. चित्रकाराचे खासगी क्षण, घाम, अश्रू, वैफल्य, ईर्ष्या, निराशा, आनंद, उत्साह.. सगळ्याचा उगम आणि अस्त केवळ या प्रदेशापुरताच मर्यादित. त्यातून जन्माला आलेलं पेंटिंग जग बघतं. पण त्या पेंटिंगच्या जन्मापूर्वीचा हा प्रवास बाहेरच्या जगाला अनभिज्ञच राहतो. चित्रनिर्मिती होत असताना, अपूर्ण रंगलेल्या इझलसमोर उभा असलेला चित्रकार नेमका कसा असतो? 
‘इझलसमोरचा चित्रकार हा बेटावरच्या एकाकी प्रवाशासारखा असतो’, असं रेम्ब्राचं एक विधान आहे.
त्या बेटावरचा त्याचा दिनक्रम नेमका असतो तरी कसा?.. काय असतं त्या निळ्या, सुंदर पक्ष्याचं नाव जो स्टुडिओच्या खिडकीत बसून चित्रकाराला स्फूर्ती पुरवतो? ते जाणून घ्यायचं एक कुतूहल.. ते मनात नेमकं केव्हा रुजलं सांगता यायचं नाही. तरी ते रुजलं याचं आश्चर्य अजिबात नाही. चित्रकार समजला तर चित्र समजणं जास्त सोपं असा एक विश्वास मनात नेहमीच होता.
बोस्टनच्या म्युझियम आॅफ फाईन आर्टमधे रेम्ब्राचं ‘द आर्टिस्ट इन हिज स्टुडिओ’ पाहताना त्याचं हे विधान आठवलं. लहानशा स्टुडिओतलं भव्य, पाठमोरं इझल.. स्टुडिओतला सर्व भौतिक अवकाश त्याने व्यापलेला आहे, चित्रकार जरा लांब उभा राहून इझलकडे पाहतो आहे, कदाचित तो रेम्ब्रा स्वत:च आहे. इझलवरचा कॅनव्हास कोरा आहे की चित्र काढून पूर्ण झालेलं आहे, काहीच माहीत नाही. पण चित्रकार विचार करतो आहे, त्याच्या हातात ब्रश आहे, तडा गेलेल्या भिंतीवर पॅलेट आहे. स्वत:च्या दुनियेत हरवलेला कलावंत, स्टुडिओतला बंदिस्त, बाहेरच्या जगापासून आयसोलेटेड असलेला अवकाश, चित्रकाराच्या चेहऱ्यावरचे पूर्ण काळे डोळे, आतमध्ये पाहणारे.. या अवकाशात आपल्याला इझलवरचं चित्र फक्त दिसत नाही, पण चित्रकार, त्याची वैचारिक क्षमता, कल्पनाशक्ती, शिस्त, कौशल्य.. सगळं स्पष्ट दिसतं, जाणवतं. चित्रकार आणि त्याच्या भोवतालचा अवकाश हे सगळं घेऊन येतो. त्यांच्या दरम्यान असतं त्याचं चित्र. 
आपल्याला या तीनही गोष्टींबद्दल सारखंच कुतूहल वाटतं आहे हे ठामपणे कळण्याचा तो क्षण होता. त्यानंतर मग मनात कुतूहल, चौकसपणा घेऊन चित्रकारांच्या स्टुडिओंची.. लहान, मोठे, जुने, नवे, नीटनेटके, अस्ताव्यस्त, कलात्मक, प्रॅक्टीकल, गुदामामधले, नदीकाठचे, पर्वतावरचे, समुद्रकाठचे.. चित्रकाराच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग असलेल्या या प्रदेशाची मी बिनदिक्कत सैर केली. 
हिमालयात मनालीच्या वाटेवरच्या देखण्या निसर्गचित्रांची उधळण असलेला चित्रकार रोरिकचा स्टुडिओ.. कोल्हापूरचा बाबूराव पेंटरांचा भव्य, अनेक कौशल्यपूर्ण करामती असलेला स्टुडिओ.. वयोवृद्ध चित्रकार रायबांच्या कापडाचे तागे पसरून ठेवलेल्या अंधाऱ्या स्टुडिओची आर्ट फेस्टिव्हलमध्ये पाहिलेली प्रतिकृती आणि सर्वात अस्वस्थ करून गेलेलं रविवर्माच्या गिरगावातल्या चंद्रमहाल इमारतीत आता अवशेषांची एकही खूण मागे न उरलेल्या स्टुडिओचं काळाच्या पोटात गडप झालेलं अस्तित्व... 
इझलच्या मागे पेटती फायरप्लेस असलेला, एका ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट चित्रात पाहिलेला अमृता शेरगिलचा स्टुडिओ.. व्हिन्सेण्टचा पिवळ्या सूर्यफुलांची फुलदाणी स्टुलावर ठेवलेला, सुहृदाची वाट पाहत राहिलेला यलो हाऊसमधला एकाकी स्टुडिओ.. मातिझने त्याच्या चित्रातूनच अजरामर करून ठेवलेला रेड स्टुडिओ.. गोगॅँचा ताहिती बेटावरचा बांबूच्या पडद्याची भिंत असलेला स्टुडिओ.. वाळकेश्वरचा सर्व्हण्ट्स क्वार्टरमधला आरांचा स्टुडिओ.. गायतोंडेंचा निजामगंजच्या बरसातीतला धुळीचे ठसे उमटवणारा स्टुडिओ.. ग्रेसच्या कवितांच्या ओळी ल्यायलेला शुभा गोखलेंचा गोंदणगाव नावाचा कलात्मक स्टुडिओ.. भानू अथैयांचा आलिशान इमारतीच्या तळमजल्यावर लहानशा गॅरेजमधला भिंतीवर मीनाकुमारीचं देखणं कृष्णधवल छायाचित्र आणि काचेच्या शोकेसमध्ये आॅस्करचा सुवर्णपुतळा मिरवणारा स्टुडिओ.. अतुल दोडियांचा सुरुवातीच्या काळातला बैठ्या चाळीतला, मोकळाढाकळा आणि मग आताचा आपल्या आत लहानसा कारखानाच वागवणारा स्टुडिओ.. देवदत्त पाडेकरचा परदेशातला एफिशियण्ट स्टुडिओ.. जमिनीवर रंगांच्या शिंतोड्यांची कलात्मक रांगोळी असलेला प्रभाकर कोलतेंचा हवेशीर, प्रसन्न स्टुडिओ.. बघायची तीव्र इच्छा असलेला जॉर्जिया ओकिफचा साण्टा फे मधला अडोब स्टुडिओ... अशा असंख्य पाहिलेल्या, न पाहिलेल्या, ऐकलेल्या स्टुडिओंच्या कथा आणि त्यातल्या चित्रकारांच्या कहाण्या मनात आहेत ज्या तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. स्वत:च्या मालकीचा स्टुडिओ हे प्रत्येक चित्रकाराचं स्वप्न असतं. ते तो नेमकं कधी बघायला सुरुवात करतो?
चित्रकाराचा खासगी प्रदेश स्टुडिओच्या चार भिंतींमध्ये सामावलेला असतो हे खरं, पण चित्रकार काही जन्माला येतानाच हा स्टुडिओ सोबत घेऊन येत नाही. तो मिळवण्याकरता त्याला तीव्र संघर्षाचा, अनुभवाचा एक निश्चित टप्पा पार करावा लागतो. प्रत्येक चित्रकाराची चित्रांची स्टाइल जशी वेगळी, खास त्याची, तशी त्याच्या स्टुडिओतल्या प्रदेशाची संकल्पनाही खास त्याचीच असणार. 
सुभाष अवचटांनी त्यांच्या ‘स्टुडिओ’ पुस्तकामध्ये चित्रकाराच्या मनातल्या आणि भोवतालच्या, अमूर्त आणि मूर्त दोन्ही अवकाशांचा वेध जाणतेपणाने घेतला आहे. आपल्या मनातल्या स्टुडिओच्या शोधाचा प्रवास वाईतल्या तर्कतीर्थांच्या वाड्यापासून खंडाळ्याच्या स्कॉटिश चॅपेलपर्यंत करत असताना चित्रकाराला त्याचा प्रदेश आणि अवकाश दोन्ही सापडणं किती कठीण हे त्यांनी नेमकेपणानं शब्दात उतरवलं आहे.
प्रत्येक कलाकाराची स्वत:ची अशी एक ओळख असते, जी त्याच्या कलाकृतीतून दिसते आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वातूनही. कलाकाराच्या जीवनखुणा कलेत उमटलेल्या असतात. त्याच्या वाचूनही कला असतेच. कारण कलेला स्वत:चं स्वयंभू व्यक्तिमत्त्व असतं. 
स्टुडिओमध्ये काम करत असताना बंदिस्त, एकाकी अवकाशात चित्रकार या स्वत:च्या ओळखीचा अखंड शोध घेत राहतो. अनेक चित्रकारांनी अगदी व्हर्मिए, पिकासोपासून फ्रिडा काहलो, अमृता शेरगिलपर्यंत अनेकांनी, स्टुडिओत काम करतानाचं, बहुतेकदा सेल्फ पोट्रेट रंगवलं, ते आपल्या शोधाच्या प्रवासातील एक स्थानक म्हणूनच कदाचित. चित्रकारांनी न लिहिलेल्या आत्मचरित्रातलं ते एक महत्त्वाचं प्रकरण. त्यात त्यांनी आपलं तांत्रिक कौशल्य, आपल्या सवयी, आपली मॉडेल, आवडीच्या, प्रेरणा देणाऱ्या गोष्टी यांची एक ठळक कालनोंद करून ठेवली. कला म्हणजे फक्त रंग, रेषा, आकार नाही.. त्या चितारणारे ब्रश, पॅलेट, ट्यूबा, अवजारे, इझल आणि त्यामागचा सदेह चित्रकारही. कलाकाराच्या व्यक्तिमत्त्व घडणीत जे असंख्य घटक सामावलेले असतात, त्यांचे अस्तित्व स्टुडिओत विखुरलेले असते. पाब्लो पिकासोच्या स्टुडिओमध्ये पाऊल ठेवल्यावर म्हणूनच व्हॅनेसा बेल ही कलासमीक्षक लिहिते : “The whole studio seemed to be bristling with Picassos. All the bits of wood and frames had become like his pictures...”
अर्थातच स्टुडिओच्या चार भिंतींमधलं इझल लावलेलं, रंग, ट्यूब्ज, पॅलेट-ब्रशचा पसारा मांडलेलं जग नुसतं बघून ना आपल्याला चित्रकाराच्या जाणिवांच्या प्रदेशात प्रवेश मिळतो, ना आपल्या मनातल्या असंख्य कलाविषयक प्रश्नांची उत्तरं मिळतात. त्याकरता त्या चित्रकारानेच बोलायला हवं. त्याला बोलतं करण्याकरताच हा खटाटोप. 
चित्रकाराच्या प्रत्यक्ष स्टुडिओत जाऊन त्याच्या चित्रनिर्मितीमागची स्फूर्ती, परिश्रम, नियोजन यासकट तो चित्रकार जाणून घेणं आणि ते तुमच्यापर्यंत पोचवणं आव्हानात्मक निश्चितच.. पण मजेदारही ठरेल.
 
(लेखिका ख्यातनाम कलासमीक्षक आहेत.) sharmilaphadke@gmail.com