शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

तुरुंग-सुधारणांच्या प्रारंभी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 06:45 IST

खुल्या तुरुंगांच्या प्रयोगाविषयीचा रवींद्र राऊळ यांच्या लेखावरची प्रतिक्रिया

- दत्ता सराफ, नाशिक

 

(मंथन, 16 सप्टेंबर) वाचला. या प्रयोगाचा प्रारंभ महाराष्ट्रात झाला, त्या कालखंडाचा मी प्रत्यक्ष साक्षी आहे. पत्रकारितेतील माझी कारकीर्द सुरू होण्याआधी जेमतेम अकरा महिने मी येरवडा मध्यवर्ती तुरुंगात जेलर म्हणून काम केले आहे. 1955-56 चा काळ. तुरुंग प्रशासनात नुक्ते सुधारणांचे वारे वाहू लागले होते. सुधारणावादी लोक  ‘करेक्टीव्ह अडमिनिस्ट्रेशन’ चा पाठपुरावा करीत. म्हणजे कैद्यांना नुस्ते दंडुके दाखवण्यापेक्षा त्यांच्यामधल्या वर्तनबदलासाठी प्रयत्न करणारे तुरुंग-प्रशासन. ज्यांच्या हातून भावनेच्या / क्षणिक संतापाच्या भरात गुन्हा घडून गेला आहे, ज्यांचे तुरुंगातले वर्तन चांगले आहे आणि ज्यांची शिक्षेची शेवटची काही वर्षे बाकी आहेत, अशा कैद्यांसाठी  ‘ओपन जेल’ सुरू करण्याची तयारी तुरुंग प्रशासनाने सुरू केली होती. येरवडा सेंट्रल प्रिझनपासून अवघ्या मैलभराच्या अंतरावर नवे  ‘जेल ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूल’ ( जेओटीएस) सुरू झाले होते. त्याचे प्राचार्य होते डी. जे. जाधव. मोठा तळमळीचा माणूस. कैद्यांचे अनावश्यक लाड करणारा हा पोरखेळ आहे, या परंपरावाद्यांच्या टीकेला पुरून उरलेल्या या माणसाने मोठ्या हिंमतीने जेओटीएसचे काम निष्ठापूर्वक चालवले होते.  पण प्रत्यक्ष तुरुंग प्रशासनामध्ये मात्र या प्रयोगशीलतेची खिल्ली उडवणारेच वातावरण तेव्हा होते. रेव्हेंन्यू खात्यातून थेट नियुक्तीवर येऊन तुरुंग प्रशासनाचे आयजी झालेले एम. के. देशपांडे यांनी मात्र जाधवांच्या पाठी आपली पूर्ण ताकद उभी केली होती.

येरवड्याच्या तुरुंगातला भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचाराला कंटाळून मी पहिल्या काही महिन्यातच राजीनामा दिला, तेव्हा जाधवांनी मला बोलावून घेतले. ते म्हणाले होते, आता परिस्थिती बदलेल. तुमच्यासारख्या तरुण जेलरची या कामाला गरज आहे. तुम्ही  विश्वास ठेवायला हवा बदलांवर! 

त्यांनी माझा राजीनामा फाडून टाकला आणि मला जेओटीएसच्या प्रशिक्षणासाठी भरती करून घेतले.खुल्या तुरुंगांच्या प्रयोगातला सुधारणावाद माझ्यासारख्या तरुणाला मोहवून टाकणाराच होता. व्यवस्थेत काहीतरी मुलभूत परिवर्तन होते आहे, आणि आपण ते घडवून आणू शकतो; अशा ध्येयवादाने भारून जाऊन मी  ‘जेओटीएस’च्या प्रशिक्षणातून बाहेर पडलो आणि पुन्हा येरवड्याला जेलर म्हणून रुजू झालो.. पण मैलभर अंतरावर रुजू घातलेल्या सुधारणांचा वाराही त्या तुरुंगांच्या भिंतींच्या आत पोचला नव्हता.  ‘शिकलात ते सगळे विसरा आणि आम्ही म्हणतो, करतो तसेच करत राहा’ असा आदेश मिळाला आणि तुरुंगातली जुनीच  ‘दंडा-बेडी’ पुन्हा चालू झाली.- मला ते मानवणे शक्य नव्हते. पुढल्या काही महिन्यातच मी राजीनामा देऊन बाहेर पडलो, आणि वाचलो!आज आपल्या देशात होऊ घातलेल्या तुरुंग-सुधारणांचा तपशीला वाचून ते जुने दिवस आठवले, एवढेच!

dattasaraph@rediffmail.com