शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

रतन भौमिक आणि इतर..

By admin | Updated: March 5, 2016 15:12 IST

प्राणहानी, हिंसेची भीषण दृश्यं पाहून आघात होणारं मन पत्रकारांनाही असतंच. समाजातल्या अभद्राचा साक्षी होणं हा पत्रकारांच्या कामाचा भाग. मग आत्ताच असं काय बदललं? काळ-काम-वेगाचं गणित. आपण जे पाहतो, अनुभवतो; ते जितकं भीषण तितकी त्याची न्यूज व्हॅल्यू अधिक. ते जितकं भयंकर तितक्या अधिक वेगाने ते ब्रेकिंग लाइव्ह ‘पोचवण्याची’ घाई महाभयंकर.

प्राणहानी, हिंसेची भीषण दृश्यं पाहून आघात होणारं मन पत्रकारांनाही असतंच. समाजातल्या अभद्राचा साक्षी होणं हा पत्रकारांच्या कामाचा भाग. मग आत्ताच असं काय बदललं? काळ-काम-वेगाचं गणित. आपण जे पाहतो, अनुभवतो; ते जितकं भीषण तितकी त्याची न्यूज व्हॅल्यू अधिक.  ते जितकं भयंकर तितक्या अधिक वेगाने ते ब्रेकिंग लाइव्ह ‘पोचवण्याची’ घाई महाभयंकर. आत्यंतिक वेदनेचा कल्लोळ सहन होण्यापलीकडे गेला की स्वत:ला सुन्न करण्याची क्षमता शरीरात असते. ही चैन मनाला मात्र नाही.  डेडलाइन गाठायला धावणं भाग असलेल्या पत्रकाराच्या मना-मेंदूला तर नाहीच नाही.
 
ठाण्यात हसनैन वरेकरच्या घरातला रक्तामांसाचा चिखल ‘रिपोर्ट’ करता करता काही तासांत आयुष्यच संपलेल्या एका छाया-पत्रकाराच्या माजी व्यवसायबंधूचं आत्मचिंतन.
 
योगेश दामले
 
रतन गेला. रतन भौमिक. ठाणो हत्त्याकांडाची बातमी कव्हर करता करता गेला. म्हणजे तो एका अर्थाने हसनैनचा पंधरावा बळी.
हसनैनचा की रतन जे काम करत होता, त्या कामाने ते काम करणा:यांच्या डोक्यात घुसवलेल्या असह्य ताणाचा बळी?
रतन तिशीतला होता. हे काही जाण्याचं वय नाही. हृदयविकाराने तर नाहीच, पण हृदयविकाराच्या दुस-या धक्क्याने तर त्याहूनही नाही. रतनचं हृदय किती आघात सहन करत होतं ते थांबल्यावरच कळलं. काही नोक-यांची मीठभाकर जीव जगवण्याच्या, अंगावर मांस वाढवण्याच्या मोबदल्यात रक्तही आटवते. विश्वास ठेवा वा ठेवू नका, पत्रकारिताही त्यात मोडते.
हल्ली काय काय घडतं आहे.
तसं ते पूर्वीही घडत असे. पण जे घडतं ते आता तत्काळ ‘दिसतं’, ‘दाखवलं जातं’ आहे. टीव्ही असो वा वर्तमानपत्र, ठाणो हत्त्याकांडासारख्या बातम्यांची भीषणता पाहून/ वाचून वाचक शहारतात. त्या बातमीला प्रत्यक्ष घडताना थेट पाहणा:यांच्या मनावर त्याचा आघात कितीतरी पटीने मोठा असतो. मन आणि मेंदू हादरवून टाकणा:या ह्या असल्या अकल्पित जाळात पहिली उडी घ्यावी लागते ती पोलिसांना. त्यांच्यामागोमाग, कधी त्यांच्या आधी ‘स्पॉट’वर पोचतात ते पत्रकार.
ठाण्यातले प्रत्यक्षदर्शी सांगतात की, घटनास्थळी चौदा लोकांच्या रक्ताचा सडा होता. घरात सगळीकडे रक्ताची थारोळी. इतका ओला, लिबलिबीत चिखल की आत पाऊल टाकायलाही जागा नाही. बातमी पसरल्यावर पहाटे पहाटे अशा स्थळी जाण्याचा धक्का, इतका रक्तपात न पाहिलेल्यांना कळणं शक्यच नाही. हृदयरोगी असलेल्या माणसाने अशा ठिकाणी जाणं जीवघेणं कुपथ्य ठरू शकतं. रतनचं तेच झालं. त्याच्या वाहिनीला सकाळी आठच्या बुलेटिनसाठी फोनवरून रतनने पहिली मुलाखत दिली.. त्यानंतर अस्वस्थ झालेल्या रतनने पाऊण तासात आयुष्याचंच स्क्रिप्ट संपवलं. रतनच्या ‘दि एण्ड’ने पत्रकारांच्या आयुष्याची ही न सांगितली जाणारी कहाणी उघडय़ावर आणली आहे.
पत्रकार कितीही मुरलेला असो, प्राणहानी, हिंसा, मोडतोडीची दृश्यं पाहून आघात होणारं मन त्याला/तिलाही असतंच. तसं म्हटलं तर ही भीषणता पाहणं, समाजातल्या सर्व त्या अभद्राचा साक्षी होणं हा पत्रकारांच्या कामाचा भाग. तो पूर्वीही होताच.
मग आत्ताच असं काय बदललं असावं?
 काळ-काम-वेगाचं गणित.
आपण जे पाहतो, अनुभवतो; ते जितकं भीषण तितकी त्याची न्यूज व्हॅल्यू अधिक. ते जितकं भयंकर तितक्या अधिक वेगाने ते ब्रेकिंग लाइव्ह ‘पोचवण्याची’ घाई महाभयंकर.
आत्यंतिक वेदनेचा कल्लोळ सहन होण्यापलीकडे गेला की स्वत:ला सुन्न करण्याची क्षमता शरीरात असते. ही चैन मनाला मात्र नाही. डेडलाइन गाठायला धावणं भाग असलेल्या पत्रकाराच्या मना-मेंदूला तर नाहीच नाही. क्षणभरही वाया न दवडता बातमी थेट प्रक्षेपित करण्याच्या तजविजीला लागायचं. माणूस मनातून कितीही हादरलेला असो, चेह:यावर आलबेल असल्याचं नाटक बेमालूम वठवायचं. मेंदूतली स्मृतीची सर्किट्स किळस येऊन करपलेली असोत, पण त्यातून नेमका तो तपशील बातमी सांगण्यासाठी आठवायचा आणि त्यातून अचूक संगती लावायची.
इतर सगळेही हे करत असतातच, म्हणून मग या सगळ्या कल्लोळात एक्स्ल्यूङिाव्हच्या धडपडीत राहायचं.
अशा अवस्थेत पोलिसांनाही घटनेची व्याप्ती कळलेली नसते. तीही माणसंच. त्यामुळे जे घडायचं ते घडून चुकलंय की अजून पुढे वाढून ठेवलंय याचा अंदाजही पुरेसा येत नाही. अशा अवस्थेत आपला वावर सुरक्षित नाही हे जाणवलं तरी बातमीसाठी खिंड लढवायची जिद्द पत्रकाराचा अहम सोडत नाही. वार्तांकन हेही कर्तव्यच आहे. मग त्यात मनाची कितीही सालटी निघेनात- पोलिसांप्रमाणोच पत्रकारांनाही झोकून द्यायची ऊर्मी वरचढ ठरते आणि ती ते निभावतातही.
प्रसंगाच्या गांभीर्याची पूर्वकल्पना मिळाल्यावर वार्तांकन करायला जाणं आणि प्रत्यक्षात घटनास्थळी पोचल्यावर घटनेच्या भीषणतेच्या जाणिवेने मेंदू सुन्न होणं याचा तणाव अजून वाईट असतो. 
26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या दिवशी गोळीबाराची बातमी ऐकून घटनास्थळी पोचलेल्या वार्ताहरांना सीएसटीवर झालेल्या रक्तपाताची कल्पना नव्हती. गोळीबार म्हणजे नव्वदच्या दशकात गँगवॉर होत तशातला प्रकार समजून पत्रकार फील्डवर गेले. पण सीएसटीच्या फलाटांवर गेल्यावर आपण मृत्यू तुडवत आल्याचं कळलं. त्या सुन्न अवस्थेत शेजारच्या इस्पितळात पोचेपर्यंत आपण पायाखाली पसरलेली रक्ताची किती थारोळी चुकवण्यात अपयशी ठरलो आहोत याचीही जाणीव कोणाला नव्हती. हॉस्पिटलात पोचल्यावर पन्नासएक छिन्नविच्छिन्न मृतदेह पाहिल्यावर मग कुठे गांभीर्य कळू लागलं होतं. दोघं बंदूकधारी फरार असल्याची बातमी कळली होती. त्या सुनसान रात्री दक्षिण मुंबईत फिरताना समोरच्या अंधारात कुठल्याही वाहनाचे दिवे श्वास मोजायला लावत होते. 
26-11 च्या रात्रीच्या वार्तांकनात प्रेतांचा खच, उमद्या पोलीस अधिका:यांचे मृतदेह पाहून खात्री करणं, अंधारात अतिरेक्यांचे भास होणं, मुंबईत लष्कराची वाहनं घुसताना दिसणं, ताजचा प्रासाद जळताना पाहणं, अतिरेकी हॉटेलांत कैद आहेत हे ऐकून सुटकेचा नि:श्वास सोडायच्या आधीच कुलाब्याच्या मध्यमवर्गीय वस्तीत एक इमारत त्यांनी धरल्याचं कळणं.
हे सगळं अनुभवणा:या पत्रकारांमध्ये मी होतो. जे चाललंय त्याने आपल्या शरीरा-मनात काय धुमसू घातलं आहे, हे कळेर्पयत दुस:या दिवसाची दुपार ढळली होती. 26चा दिवस नेहमीप्रमाणो घालवून रात्री हल्ल्यांचं वार्तांकन आणि घरीच न जाणं- असं 36 तासांचं जागरण, मानसिक ताण यांनी जुलाब आणि भोवळ येण्यास सुरुवात होऊन आडवा झालो तो 29 पर्यंत. 
अर्थात, दरम्यान दिल्लीहून मोठे निवेदक संपादक येईस्तोवर कडेकोट सुरक्षा आवळली गेली होती आणि पुढल्या फळीच्या वार्ताहरांना सुरक्षित अंतराची निश्चिंती होती.
पोलीस-पत्रकारांना अशावेळी तणाव देणारी दुसरी मोठी फळी असते बघ्यांची. 2011 साली मुंबई बॉम्बस्फोट मालिकेत कबुतरखाना, झवेरी बाजारसारख्या स्फोटांनंतर सुदैवाने सुरक्षित राहिलेल्या लोकांनी घरी जाणं अपेक्षित होतं, जेणोकरून बचावकर्मींना आपली वाहनं फिरवणं सोपं पडावं, गर्दीचा फायदा घेऊन अतिरेक्यांना निसटायला कमी संधी मिळाव्यात, जखमींना उपचारांसाठी हलवणं सोपं व्हावं. पण इथेही बघ्यांची गर्दी पोलीस, माध्यमांभोवती कोंडाळी करून गोंधळ वाढवते, तणाव वाढवते. चिडलेल्या पोलिसांना क्वचित गर्दीला दमदाटी करायची सोय असते, पत्रकारांना तीही नसते.
कबुतरखान्याला जेव्हा स्फोट झाला होता, एक संशयित गाडी शेजारीच उभी होती. तिच्यात अजून काही स्फोटकं असतील ही भीती वार्तांकन करताना खात होतीच. लोकांनी तिथून लांब जाणं अपेक्षित होतं. पण ही गर्दी कॅमेरे अडवत स्वत:च्या मोबाइलवर शूटिंग करायला पुढे सरसावत होती. हा तणाव कमी की काय म्हणून, सुरक्षिततेची काळजी, शूटिंग नासवल्याचा संताप, दिल्ली स्टुडिओचे फोन घेऊन घेऊन घशाला पडलेली कोरड, तितक्याच काकुळतीने वॉकीटॉकीवर बोलणारे पोलीस, आम्हा सर्वांना पळता पळता लागलेली धाप, पाचपाच किलोंचा कॅमेरा स्टॅण्ड घेऊन पळते पत्रकार, अवजड हत्त्यारं घेऊन चालते पोलीस- यातल्या किती अनाठायी ताणापासून आपण वाचू शकलो असतो. पण गर्दीत जगण्याचा एक भाग म्हणून हे वास्तवही स्वीकारावं लागतं.
हीच गर्दी किती भयानक ठरू शकते याचा प्रत्यय आझाद मैदान दंगलीत, नवी मुंबई आसारामच्या भक्तांनी पोलीस-पत्रकारांवर केलेल्या दगडफेकीत आला होता. कुठल्या न कुठल्या संतापाने धुमसता माणूस बिनचेह:याच्या गर्दीत अजून हिंसक होतो. अशा गर्दीचा मार आझाद मैदानात खाऊन हवालदार सोनप्पा हांडेंना आपला जीव गमवावा लागला होता. त्याच साली दुष्काळात पाणी नासवून होळी खेळणा:या आसारामभक्तांनी पत्रकारांना आसारामच्या प्रवचनानिमित्ताने बोलावून घेराव करून दगडफेक केली होती. गर्दीच्या उन्मादापासून वाचणं निव्वळ भाग्याचं लक्षण, पण असे कित्येक प्रसंग पोलीस आणि पत्रकारांच्या वाटय़ाला येतात. सोसावे लागतात.
अशा वेळी भीतीपुढे, तणावापुढे भूक, थकवा, आजारपण कशाकशाची जाणीवच राहत नाही. बंदोबस्ताला उभे पोलीस खाणं आणि पाणी सोडाच, शरीराच्या हाकेलाही ओ देऊ शकत नाहीत. पत्रकारांनाही दहा-दहा तास उपाशी राहणं तसंच सवयीचं आहे. दादर चैत्यभूमी, लालबागचा राजा, राजकीय मेळावे, स्फोट, पूर, विशेष शासकीय दौरे, उद्घाटनं यांच्या सुरक्षेचा आणि प्रसिद्धीचा खटाटोप पार पाडणा:या पोलीस-पत्रकारांना अपमानही कमी डाचतो? 
ओ मीडियावाले, आमच्या साहेबांचाही इंटरव्ह्यू घ्या! समजता कोण स्वत:ला?’ 
ओ मीडियावाले, पूज्य माताजी बोलल्या ना, बोलणार नाहीयेत! समजता कोण स्वत:ला? 
तो बघ रे पांडू चलान फाडतोय. करू का फोन साहेबांना! समजतो कोण स्वत:ला? 
- अशा वाक्यांनी पाणउतारा करणारे क्षुल्लक कार्यकर्ते कुठलं समाधान मिळवतात तेच जाणो, पण अनेक नकारात्मक भावनांच्या या गुंत्यात अपमानाचीही भर पडते. 
अपमान मनाला जखमा देतो, पण शशिकांत कालगुडेसारखे राजकीय गुंड सीसीटीव्हीच्या डोळ्याखाली महिला पोलिसांवर हात उगारतात, जेव्हा गर्दीतले अनोळखी चेहरे पत्रकारांच्या सामानाची मोडतोड, मारामारी करायला पुढे येतात, तेव्हा जिवापेक्षा नोकरी जास्त का असा हतबल सवाल उरलेली ऊर्जा काढून घेतो.
फील्डवरचे पोलीस किंवा वार्ताहर हे धोरणात्मक निर्णय घेणारे नसतात. ते हुकुमाचे ताबेदार. पण गर्दीतले सत्यवान येऊन आधीच वैतागलेल्या या दोन जिवांना हितोपदेश, टाकून बोलणं इत्यादि पराक्रम गाजवतात, तेव्हा कुणाचंही काम सोपं होत नाही. उलट अशा टोच्यांनी पत्रकार-पोलिसांची सवरेत्तम सेवा द्यायची ऊर्मी कमी होते. 
पाहा. रतनच्या निमित्ताने हे इतकं सगळं मांडताना  ‘तणाव’,  ‘भीती’,  ‘राग’,  ‘काळजी’,  ‘अस्वस्थता’,  ‘भूक’,  ‘तहान’,  ‘थकवा’,  ‘आजारपण’,  ‘अपमान’,  ‘हतबलता’ अशाच शब्दांची पखरण होत राहिलीय. अशा प्रसंगांना रोज सामोरे जाणारे पत्रकार असोत वा पोलीस, त्यांच्या मानसिक स्वास्थ्याच्या किती चिंध्या होत असतील?
पोलिसांसाठी जबाबदार साक्षीदार बनणारी, पत्रकारांशी सौहार्दपूर्ण संवाद साधणारी गर्दी भारतात विरळच का दिसावी? या विसंवादाला काही पोलीस अगर पत्रकार जबाबदार असतीलही, आहेतच; पण म्हणून त्या अपवादांनी नियम का ठरवावे?
आपल्या वाहिनीला 18 तास जाळायला सरपण पुरवण्याची जबाबदारी रिपोर्टरच्या खांद्यावर आहे. तो सुट्टे पैसे मागत नाहीये, खायला मागत नाहीये; तुमच्यासमोर जे घडलं त्यावर तुमच्याकडून तीस सेकंदांची एक प्रतिक्रिया एवढीच त्याची इच्छा आहे. तुमच्यासारखी तीन मतं त्याने रेकॉर्ड केली तरच दिल्ली-मुंबईतल्या स्टुडिओत बसलेल्या बॉससमोर त्याची धडगत आहे. अचानक तुमच्या तोंडासमोर एक माइक येऊन ‘आप का क्या ख्याल है?’ अशी थेट विचारणा करतो, तेव्हा तुमच्या डोक्यात तिडीक जाते. ‘कशाचा मागमूस नाही, आले रिकामटेकडे शूटिंग करायला!’ असं पुटपुटत तुम्ही चालू लागता. तुमच्या दिवसात याहून काही वाईट घडणार नसतं. पोलीस अधिका:याला गर्दीतून बघ्यांची जबानी हवी असते. पकडलेल्या आरोपीला ओळखू शकणारा साक्षीदार हवा असतो. पण बघे करमणूक झाली की घरचा रस्ता सुधरतात. हीच गर्दी घरी गेल्यावर पंख्याखाली वारा घेत टीव्हीसमोर बसून बातम्या पाहत अडकलेल्या तपासाबद्दल पोलिसांच्या निष्क्रियतेला, अशा बातम्या दाखवणा:या पत्रकारांच्या सनसनाटीपणाला लाखोली वाहते, तेव्हा भयाण विनोद घडत असतो.
घर चालवायला रोज हे सहन करणा:या पोलीस-पत्रकारांना घरची कर्तव्यं चुकत नसतात. कधी कुणाचं आजारपण, कुणाचं लग्न, पोरांचे दाखले, घरची कार्यं. नातेवाइक भेटल्यावर तिरकसपणो म्हणतात, ‘सगळ्यांना सांगतो तुम्ही टीव्हीवर असता म्हणून, पण नेमके आम्हालाच कधी दिसत नाहीत. चला, इथे भेटाल असं वाटलं नाही, पण चक्क भेटलात.’ 
नातेवाइकांमध्ये तुमचं नसणं गृहीत धरलं जातं. तुमच्याही आठवणींमध्ये घरचे प्रसंग तरळण्याऐवजी रेल्वे बजेट, मेक इन इंडियाचा जळता मंच, जेएनयू प्रकरणातल्या हाणामा:या, संजय दत्तची सुटका, शीना बोरा सुनावण्या, राधेमां प्रकरण, 26/11, मंत्रलयाची आग, मोटरमनचा संप, विश्वचषक सामना किंवा अजून वाट्टेल ती ब्रेकिंग न्यूज यांच्याच नोंदी असतात. पत्रकारांसाठी या बातम्याच अस्तित्वाचं कारण बनतात. या बातमीत मी वेगळं काय दिलं? या बातमीत सगळ्यात जलद अशी कुठली माहिती मी मिळवू शकलो का? या बातमीत मी कुठला अॅँगल जोडला जो इतर कुणालाही दिसला नाही? प्रश्न अस्मितेचा होतो. बातमीत काय घडलं ते सांगणारे इनपुट्स मिळाले नाहीत तर बातमी होणार कशी? बातमी नाही झाली तर चॅनलला सांगणार काय? रोज असंच होत गेलं तर वार्षिक मूल्यमापन कसं होईल? ते वाईट झालं तर कंपनीत होऊ घातलेल्या नारळीपौर्णिमेत आपल्याला नारळ मिळेल, अशी खोल खोल पाळमुळं घेतलेली ही भीती वार्ताहराच्या मनावर गारुड करत राहते. तो तर रोजचाच ताण.
इलाज नसतो. मास कम्युनिकेशनच्या पदवीला बोलघेवडेपणाची जोड आणि इथेतिथे घालवलेल्या वर्षांचं पूर्वानुभव नावाचं गाठोडं, यावरच त्याचा/तिचा पगार येतो. 
कॉलेजातले इतर मित्र इतर नोक:यांमध्ये स्थिरावलेले असतात. त्यांचे मल्टिनॅशनल पगार, त्यांच्या आटोपशीर वेळा, त्यांची सुरळीत आयुष्यं याचा कुठेतरी हेवा वाटत असला, तरी आपण जगावेगळं काहीतरी करत असल्याची ङिांग बाकी सगळ्या वाटा रोखते. आपल्या हस्तिदंती मनो:यातून हेच मित्र ‘तू काहीतरी वेगळं करशील माहीत होतं. तुझं नाव वाचतो, तू दिसतोस, मस्त वाटतं.’ असं सांगून जगाने नाकारलेलं महत्त्व देतात एवढंच काय ते!
वार्ताकनासाठी लागणारं शारीरिक बळ, टीव्हीच्या पडद्यावर लागणारा तजेला आणि काही जुन्या निवेदकांचा, वयस्कर संपादकांचा अपवाद वगळता वार्ताहरांची सरासरी शेल्फ लाइफ कमीच आहे.
एक टप्पा येतो, जेव्हा मिळणारा पगार, आपण संस्थेला दिलेला वेळ, घरच्या पातळीवर केलेल्या तडजोडींचा हिशेब लागत नाही. मग काही जनसंपर्काची कामं करणा:या कंपन्यांमध्ये मोठय़ा पगारावर निघून जातात. कमी होत जाणा:या शेल्फ लाइफसोबत पत्रकारांचं आयुष्यमानही कमी होतंय. ठाण्यातल्या कौटुंबिक हत्त्याकांडाचं वार्ताकन करताना हृदयविकाराने गेलेला कनिष्ठ वार्ताहर असो किंवा गुंडांच्या गोळ्यांना बळी पडलेला मुरब्बी पत्रकार - हा व्यवसाय तुमच्याकडून काय किंमत वसूल करू शकतो याची ही चुणूक आहे. जिथे वाहिन्यांकडून मदत येवो न येवो, आपसात वर्गणी गोळा करून शुश्रूषेसाठी किंवा मागे उरलेल्या आप्तांसाठी मदत करणारे व्यवसायबंधू आहेत, त्या पत्रकारितेमध्ये सामान्य लोकांना न दिसलेली माणुसकी आहे हे मानावंच लागेल.
- पण हे नक्की की काळ घात करू लागला आहे.
पोलिसी नोकरी कितीही नको झाली तरी सरकारी नोकरीचं स्थैर्य तिथे आहे. रतन भौमिकसारख्या कित्येक पत्रकारांना मृत्यूने गाठेपर्यंत सुटकेचे दुसरे मार्ग नाहीत. त्या व्यवसायात राहण्याची ज्यांची सहनशक्ती नाही, ते व्यवसाय सोडत आहेत. ज्यांचा इलाज नाही, ते धीराचं आयुष्य जगताना अकाली जाताना दिसत आहेत.
- हे मृत्यू ‘वैयक्तिक’ नाहीत, एवढंच मला नोंदवून ठेवायचं आहे.
 
(एका आघाडीच्या वृत्तवाहिनीत पत्रकारितेचा दीर्घ अनुभव असलेले लेखक सध्या कॉर्पोरेट कम्युनिकेशनच्या क्षेत्रत कार्यरत आहेत.)
damle.yogesh@gmail.com