शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

अमेरिकेतले कैदी

By admin | Updated: October 28, 2016 17:14 IST

तब्बल २१ लाख.. अख्ख्या जगात सर्वात जास्त कैदी अमेरिकेत आहेत. त्यातले दीड लाख कैदी खासगी तुरुंगात आहेत.

 - निळू दामले

तब्बल २१ लाख..अख्ख्या जगात सर्वात जास्त कैदी अमेरिकेत आहेत. त्यातले दीड लाख कैदी खासगी तुरुंगात आहेत.कैद्यांच्या या ‘धंद्यात’ बक्कळ नफा आहे हे कळल्यावर अनेक कंपन्या खासगी तुरुंग व्यवहारात उतरल्या आहेत. कैदी मेले तरी चालतील,नफा तेवढा मिळाला पाहिजे!म्हातारे कैदी कोणालाच नकोत.त्यांच्या आरोग्यावर खर्च करावा लागतो.शिवाय ते फार कटकटही करतात. तरुण आणि लहान मुलं हे अतिशय उत्तम कैदी. त्यांच्यावर खर्च कमी होतो आणि त्यांना बाहेर कामाला पाठवून भरपूर पैसेही मिळवता येतात! या धंद्यात कंपन्यांचा नफा ५०० टक्क्यांनी वाढला आहे! अख्ख्या जगात सर्वात जास्त कैदी. अमेरिकेत आहेत. २१ लाख.दक्षिण कॅरोलायनामधला तुरुंग. सकाळची नऊची वेळ. कैद्यांना बाहेर काढून बसमध्ये घालून एका फर्निचर निर्मिती कारखान्यात न्यायची वेळ. दररोज दिवसभर कैदी त्या कारखान्यात काम करतात आणि संध्याकाळी आपापल्या बराकीत परततात. कित्येक वर्षांपासून ही रहाटी चाललीय.डी या कैद्यानं आपल्या खोलीतून बाहेर पडायला नकार दिला. गाडर््स गोळा झाले. जबरदस्ती करू लागले. वादावादी आणि धक्काबुक्की झाली. शेजारच्या खोल्यातल्याही कैद्यांनी बाहेर पडायला नकार दिला, गार्डशी हुज्जत घातली. सगळा तुरुंग ओरडण्यानं आणि लोखंडी दरवाजांच्या सळ्यांच्या खणखणाटानं भरला.डी म्हणाला, ‘‘फर्निचरवाली कंपनी आमच्याकडून काम करून घेते. आम्हाला तासाला एक डॉलर देतात. बाजारात फर्निचर विकताना मात्र ताशी दहा डॉलरनं तयार केल्यासारखं विकतात. माझ्या प्रत्येक तासामागं नऊ डॉलर कंपनी चोरते. सरकारची त्याला संमती असते. सरकार आणि फर्निचरवाली कंपनी यांचं संगनमत आहे. सरकार त्या खासगी कंपनीचे धन करतेय. या शोषणाला आमचा विरोध आहे. आम्ही सत्याग्रह करतोय. आम्ही त्या फर्निचर कारखान्यात काम करायला नकार देतोय.’’डी आणि त्याचे शेकडो सहकारी कैदी ठाम राहिले. त्या दिवशी अलाबामा, टेक्सास इत्यादि २४ राज्यांतल्या हज्जारो कैद्यांनीही संप केला. तेच कारण.संपाचा हा दिवस महत्त्वाचा होता, कारण १९७१ साली न्यू यॉर्कमधल्या अट्टिका तुरुंगात कैद्यांनी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंड केलं होतं, दंगा केला होता.श्रीमती पूर, ओक्लाहोमा, आपली कहाणी सांगताहेत.‘‘मी ड्रगच्या विळख्यात होते. मला अटक करण्यात आली. ओक्लाहोमात टर्र्ली या गावात एक हाफ वे करेक्शन सेंटर आहे. तुरुंगात पाठवायच्या ऐवजी अशा सुधारगृहात कैद्यांना ठेवण्यात येतं. खासगी तुरुंग. अ‍ॅवलॉन ही खासगी कंपनी हा तुरुंग चालवते. दर कैद्यामागं अ‍ॅवलॉनला दर दिवशी ३० डॉलर मिळतात. मला सांगण्यात आलं की हे सुधारगृह कैद्यांना रोजगार देतं. सुधारगृहातून मला ‘क्विझनोस’ या एका सँडविच दुकानात पाठवण्यात आलं. दुकानदारानं गाडी पाठवली. सँडविचं करायची आणि त्या बदल्यात दर तासाला काही पैसे मिळणार होते. दुकानात पोचल्या पोचल्या मालकानं माझ्या छातीशी चाळे करायला सुरुवात केली. मी नकार दिला, विरोध केला. त्यानं मला धरलं, माझे कपडे फाडले. माझ्यावर बळजोरी केली. नंतर म्हणाला की रात्री उशिरापर्यंत थांबावं लागेल. मी म्हटलं की मी सुपरवायझरकडं तक्रार करेन. म्हणाला खुश्शाल तक्रार कर. मी फोन केला तर सुपरवायझर जागेवर नव्हता. मी म्हटलं मला सुधारगृहात परत पाठव. तो म्हणाला उद्या पाठवेन. दुसऱ्या दिवशी मी सुपरवायझरकडं तक्रार केली. तो हसला. त्यानं माझ्याशी चाळे करायला सुरुवात केली. मी विरोध केला. त्यानं मला पाठीमागून धरलं. माझे कपडे फाडले. माझ्यावर बळजोरी केली.मी म्हणाले की मी पोलिसांकडं तक्रार करेन. तो हसला. म्हणाला- तू गुन्हेगार आहेस. तुझ्यावर कोणाचा विश्वास बसणारे. सहन करण्यावाचून गत्यंतर नाही. अगदीच ऐकलं नाहीस तर तुझी मुख्य तुरुंगात रवानगी करावी लागेल. तिथं तर यापेक्षा वाईट स्थिती असेल. बघ बाई.माझी कोंडी होती. मी दररोज सँडविच दुकानात मालकाच्या वासनांचा बळी ठरत होते. एकदा मी माझ्या सेलफोनवरून सँडविचवाल्यांचं बोलणं रेकॉर्ड करायचा प्रयत्न केला. ते त्याच्या लक्षात आलं. त्यानं माझे ओठ फाडले, कानातले डूल ओरबाडून कानाच्या पाळ्या फाडल्या...’’अती झाल्यावर पूरनं पोलिसांत तक्रार केली. टर्ली सुधारगृहातल्या २४९ स्त्री कैद्यांपैकी अनेकांनी तक्रार अर्जावर सही केली. पोलिसांनी चौकशी केली. चौकशीच्या अहवालात सुधारगृहात घडलेल्या अनेक घटनांची नोंद झाली. पूरनं तिच्या जखमांचे फोटो तक्रारीत जोडले होते. अहवालात अ‍ॅवलॉन दोषी ठरलं. राज्याच्या अ‍ॅटर्नी जनरलनं पोलिसांचा अहवाल दाबून ठेवला. कोणावरही खटला झाला नाही. चौकशीची बातमी पोलिसांनीच अ‍ॅवलॉनला दिली. सँडविचवाला दुकान बंद करून पळून गेला. सुपरवायझर परागंदा झाला. सरकारनं ना त्यांना शोधून काढलं, ना त्यांच्यावर खटला भरला, ना अ‍ॅवलॉनला शिक्षा दिली.अ‍ॅवलॉन पुरुष कैद्यांसाठीही सुधारघर चालवते. सुधारघरातली एकही खोली रिकामी ठेवत नाहीत. सुधारघरातच मादकं पुरवण्याची व्यवस्था असते. कैदी मारामाऱ्या करतात, पळून जायचा प्रयत्न करतात. असा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणून मुख्य तुरुंगात पाठवायची पद्धत आहे. पण एक कैदी कमी झाला की अ‍ॅवलॉनला दर दिवशी ३६ डॉलरचं नुकसान होतं. म्हणून कैद्याला टिकवून ठेवण्याची खटपट अ‍ॅवलॉन करते. कैदी टिकवून ठेवण्याची एक वाट अशी. कैद्यांना गोळा करतात. आपसात मारामारी करायला सांगतात. मारामारी होते. कैदी रक्तबंबाळ होतात. मग त्यांना खासगी इस्पितळात नेलं जातं. तिथून तो वाचला तर पुन्हा सुधारघरात परत येतो. काहीही वावगं केलंत तर हीच शिक्षा असेल, यापेक्षा वाईट शिक्षा देण्यात येईल तेव्हा बऱ्या बोलानं सुधारघरात टिकून रहा, असा दम दिला जातो. टिकून राहावा यासाठी त्याला मादकं आणि दारू पुरवण्यात येते. पुरुष कैद्यांच्या टलसा सुधारघरात घडलेल्या घटनांवर स्थानिक पेपरांनी वृत्तांत छापले. चौकशी झाली. चौकशी गुंडाळली गेली. कोणालाही शिक्षा झाली नाही. अ‍ॅवलॉननं ओक्लाहोमाबरोबर वायोमिंग व इतर राज्यात आपल्या शाखा उघडल्या. फ्लोरिडा तुरुंग - सुधारगृह. डेरन रेनीला कोकेन बाळगल्याच्या आरोपाखाली शिक्षा झाली होती. तो स्किझोफ्रेनिक होता. एके दिवशी त्यानं आपल्या खोलीत घाण करून ठेवली. गार्डनी त्याला घाण साफ करायला सांगितलं. त्यानं नकार दिला. गार्ड म्हणाले त्याला अंघोळ घालून स्वच्छ केला की तो ठीक होईल. त्याला शॉवरसाठी घेऊन गेले. तो शॉवरखाली असतानाच कोसळला, मेला. जेलरचं म्हणणं की त्याचं हृदय बंद पडलं. चौकशीत आढळलं की त्याच्या अंगावर फोड आले होते. तो भाजून मेला होता. शॉवर खोलीच्या वर असलेल्या सेलमधल्या कैद्यानं सांगितलं- रेनी ओरडत होता, सहन होत नाहीये, पुरे करा असं म्हणत होता. त्यानं दरवाजावर धक्के मारले. शेवटी तो धाडकन कोसळल्याचा आवाज झाला. शॉवरमधून उकळतं पाणी सोडण्यात आलं होतं. शॉवर खोली अरुंद होती. पाणी पडू लागल्यावर त्यापासून वाचणं अशक्य. वायुविजन नाही. वाफ साठून राही, घुसमट. अशी अंघोळ हा नेहमीचाच प्रकार, डेरिल मेला एवढंच. घटनेची नोंद झाली नाही, कोणावरही आरोप नाही, कोणालाही शिक्षा नाही. त्यात रेनी मेला. या तुरुंगात अशा तऱ्हेनं अनेक कैदी मेले होते. आणखी एक घटना. एक बुटका कैदी. चारीबाजूनी गार्ड्स त्याला ठोकत होते. त्याच्या हातात हातकड्या होत्या. तो काही करू शकत नव्हता. आणखी एक नित्याची घटना. अनेक दिवस उपाशी ठेवलेल्या, अपुऱ्या आहारावर ठेवलेल्या कैद्यांना जेलर गोळा करतात. त्यांच्यात मारामारी लावतात. झुंज लावतात. झुंजीवर जेलर मंडळी पैजा लावतात. आणखी एक घटना. एका कैद्याला विवस्त्र केलं. कैद्याला सांगितलं की त्यानं आपल्या गुदद्वारात बोट घालायचं. तसं केलं तर बक्षीस म्हणून त्याला सिगारेट्स देणार. कैद्यानं नकार दिला. जेलरनी त्याला बडवलं, त्याचं डोकं भिंतीवर आदळलं. नंतर त्याच्यावर बलात्कार केला. कैदी तक्रार करू शकला नाही, कारण तक्रार केली तर पुन्हा बलात्कार होणार होता.या घटना बाहेर आल्या, कारण एका आत्महत्त्या केलेल्या कैद्याच्या अंडरवेअरमध्ये लपवलेले कागद मिळाले. त्या कागदावर घटनांची त्रोटक नोंद होती. वर्तमानपत्रांनी ती माहिती प्रसिद्ध केली. बोंब झाली. पण कारवाई झाली नाही. अमेरिकेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या तुरुंगात २१ लाख कैदी आहेत. (त्यातही काळ्यांची संख्या जास्त आहे.) त्यातले सुमारे १.५ लाख कैदी खासगी तुरुंगात आहेत. तुरुंगात (सुधारगृहात, अर्ध्या वाटेवरच्या सुधारगृहात) जास्तीत जास्त माणसं भरती करणं, तुरुंगातली एकही खोली शक्यतो रिकामी न ठेवणं, खर्च कमीत कमी ठेवून जास्तीत जास्त नफा मिळवणं हे खासगी तुरुंगांचं ध्येय असतं. म्हातारे कैदी नकोत, कारण त्यांच्या आरोग्यावर खर्च करावा लागतो, ते फार कटकट करतात. तरुण आणि लहान मुलं हे चांगले कैदी. त्यांच्यावर खर्च कमी होतो आणि त्यांना बाहेर कामाला पाठवून त्यातून स्वतंत्रपणे भरपूर पैसे मिळवता येतात. कैद्यांना शिक्षण दिलं जावं अशी तरतूद आहे. पण शिक्षित झाले तर ते पुन्हा तुरुंगात येत नाहीत. म्हणून शिक्षण द्यायचं नाही. तोही खर्च वाचतो. नफा मिळतो हे कळल्यावर वेल्स फार्गो, जनरल इलेक्ट्रिक, बँक आॅफ अमेरिका इत्यादि कंपन्या खासगी तुरुंग व्यवहारात उतरल्या आहेत. गेल्या वीसेक वर्षांत या कंपन्यांचा नफा ५०० टक्क्यांनी वाढला आहे. २०११ साली या तुरुंग कंपन्यांनी पाच अब्ज डॉलरचा नफा मिळवला होता.पेनसिल्वानियामध्ये लुझर्न काऊंटीत उ्रं५ं१ी’’ं नावाचे न्यायाधीश होते. ऊठसूट लहान मुलांना तुरुंगात पाठवत. एका मुलानं आईच्या गाडीची चावी पळवली आणि गाडी चालवली. पोलिसांनी पकडलं. न्यायाधीशानं त्याला दोन वर्षं तुरुंगवासाची शिक्षा दिली. एका मुलानं आपल्या शिक्षकाची नक्कल केली. त्याला दोन वर्षं तुरुंगात पाठवलं. तुरुंगात पाठवलेल्या प्रत्येक मुलामागं न्यायाधीशाला कमिशन मिळत असे. त्यानं चारेक हजार मुलांना विनाकारण तुरुंगात लोटलं. त्याबद्दल त्याला एक लाख डॉलरचं कमिशन मिळालं. डोक्यावरून पाणी गेल्यावर चौकशी झाली, न्यायाधीश महाराज दोषी ठरले, त्यांना २७ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली.कोरायझन ही कंपनी पाच राज्यात ४२९ सुधारगृह चालवते, ३.२० लाख कैद्यांना आरोग्य सेवा देते, त्यातून १.२९ अब्ज डॉलर मिळवते. कमी दर्जाची सेवा देणं, कमी दर्जाची औषधं देणं, आजारी कैद्यांकडं दुर्लक्ष करणे या आरोपाखाली वरील कंपनीवर खटले चालू आहेत.