शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

शांत आणि पुरेशी झोप लागत नाही? मग हे करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 03:00 IST

काहीजण झोप येत असूनही पुरेशी झोप घेत नाहीत तर काहीजणांना झोप लागतच नाही. झोप न लागणे याला निद्रानाश म्हणतात. हा एक आजार आहे. ध्यानाच्या अभ्यासाने हा त्रास आटोक्यात आणता येऊ शकतो.

ठळक मुद्देझोप न येण्याचे एक महत्त्वाचे कारण मानसिक तणाव हे असते. तणाव म्हणजे शरीरमनाची युद्ध स्थिती, त्यामुळे मन उत्तेजित राहते आणि झोप लागत नाही. सजगता ध्यानाने मानसिक तणावाचे प्रमाण कमी होते, त्यामुळे निद्रानाश दूर होऊ शकतो.चांगली झोप लागण्यासाठी सजगता ध्यान करायला हवेच; पण आणखी काही सवयी बदलायला हव्यात.झोपायला जाण्यापूर्वी टीव्ही-मोबाइलच्या स्क्रीनपासून दूर राहाणे, हा त्यातला महत्त्वाचा बदल !

डॉ. यश वेलणकर

आपले एकतृतीयांश आयुष्य झोपेत जात असते.  झोप ही तशी अतार्किक गोष्ट आहे.  मेंदूच्या विकासासाठी झोप आवश्यक असते. झोपेमध्ये मेंदूचे काम कमी होऊनही झोपेत मेंदूचा विकास होतो याचे कारण आपल्या झोपेचे दोन प्रकार.सर्वसाधारणपणे आपल्याला झोप लागल्यानंतर सुरुवातीला आपल्या डोळ्यातील बुबुळांची हालचाल थांबलेली असते. ही NREM झोप. यावेळी आपल्या मेंदूला खरी विश्रांती मिळत असते. मेंदूतील विद्युतधारेच्या लहरी संथ होतात. प्राणवायू कमी प्रमाणात वापरला जातो. थोडा वेळ अशी झोप झाल्यानंतर डोळ्यातील बुबुळांची हालचाल सुरू होते, ती वेगाने हलू लागतात त्यामुळे या झोपेला REM (rapid eye movement)  झोप असे म्हणतात. या काळात आपल्याला स्वप्ने दिसत असतात. यावेळी मेंदू काम करीत असतो; पण शरीराचे सर्व स्नायू पूर्णतर्‍ शिथिल झालेले असतात, ते हालचाल करू शकत नाहीत. त्यांना पूर्ण विश्रांती मिळत असते. मेंदूला मात्न या काळात विश्रांती नसते. मेंदू तज्ज्ञांच्या मते या काळात मेंदूतील तात्कालिक स्मृती ( शॉर्ट टर्म मेमरी)  मधील काही भाग दीर्घकालीन स्मृती ( सस्टेन्ड मेमरी)मध्ये साठवला जात असतो. संगणकातील एका फोल्डरमधील फाइल्स दुसर्‍या फोल्डरमध्ये हलवल्या जातात तसेच काहीसे मेंदूत घडत असते. त्यामुळेच आपल्याला स्वप्ने दिसत असतात. मात्न या स्वप्नामुळे शरीराच्या हालचाली होऊ नयेत, यासाठीच शरीराचे स्नायू पूर्णतर्‍ सैल, शिथिल झालेले असतात. एखाद्या माणसाचे असे स्नायू शिथिल झाले नाहीत तर तो झोपेत बोलतो किंवा चालतो. हे मानसिक तणाव अधिक असल्याचे एक लक्षण आहे.स्वप्ने पडणारी झोप थोडा वेळ झाली की पुन्हा शांत झोप थोडा वेळ लागते. असे चक्र  आपण झोपलेले असतो त्याकाळात सतत चालू असते. स्वप्नावस्थेची झोप मेंदूच्या विकासासाठी, शरीर-मनाच्या स्वास्थ्यासाठी अतिशय आवश्यक आहे. झोपेच्या एकूण काळावर स्वप्नावस्थेची झोप किती काळ लागणार ते ठरते. काहीजण झोप येत असूनही पुरेशी झोप घेत नाहीत तर काहीजणांना झोप लागतच नाही. झोप न लागणे याला निद्रानाश म्हणतात. हा एक आजार आहे. ध्यानाच्या अभ्यासाने निद्रानाश कमी होतो, काहीजणांना तर ध्यानाला बसले की लगेच झोप लागते. अशी झोप लागली तर कोणताही अपराधी भाव बाळगण्याचे कारण नाही. ध्यान करताना झोप येते आहे याचा अर्थ मेंदूला विश्रांतीची आवश्यकता आहे अशी चार - पाच मिनिटांची विश्रांती मिळाली तरी मेंदू पुन्हा ताजातवाना होतो. निद्रानाश दोन प्रकारचा असतो. काहीजणांना सुरुवातीलाच झोप लागत नाही, दुसर्‍या प्रकारात झोप लागते; पण टिकत नाही, लवकर जाग येते. या दोन्ही प्रकारात सजगता ध्यानाचा उपयोग होतो का याचे अभ्यास होत आहेत.प्रखर प्रकाश झोपेसाठी आवश्यक रसायने मेंदूत तयार होऊ देत नाही. त्यामुळे झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास अतिशय मंद प्रकाशात राहिले तर झोप चांगली लागते.  झोपेला आवश्यक रसायने शरीरात तयार होण्यासाठी दिवसा सूर्यप्रकाश शरीरावर पडणे आवश्यक असते, तसे होत नसेल, पूर्ण दिवस घरात किंवा बंद खोलीत जात असेल तर या रसायनांची निर्मिती नीट होत नाही, निद्रानाश असणार्‍या व्यक्तींनी काहीवेळ सूर्यप्रकाशात उघडय़ा अंगाने बसावे, शारीरिक व्यायाम करावा. एखादी गंभीर चर्चा किंवा एखाद्या समस्येवर विचार करणे हेसुद्धा रात्नी झोपताना करू नये, त्यामुळेही मेंदू उत्तेजित राहतो आणि झोप येत नाही.त्यामुळे झोपायला जाण्यापूर्वी अर्धा तास अंधारात किंवा मंद प्रकाशात ध्यानाला बसणे ही निद्रानाश दूर करण्यासाठी चांगली सवय आहे. त्यावेळी सर्व शरीरावर मन फिरवत राहून संवेदना जाणत राहण्याचे सजगता ध्यान किंवा सर्वाचे मंगल होवो असे भाव मनात धरून ठेवण्याचे करुणा ध्यान अधिक उपयुक्त ठरते. अंथरूणावर आडवे पडून झोप लागेर्पयत असे ध्यान केले तर झोपेची गुणवत्तादेखील सुधारते आणि झोप झाल्यानंतर उत्साह अनुभवता येतो.(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे अभ्यासक आहेत.)