शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
3
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
4
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
5
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
6
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदिपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
7
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
8
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
9
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
10
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
11
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
12
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं
13
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
14
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
15
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
16
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
17
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
18
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
19
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
20
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."

पाण्यासाठी ‘रात्रीस खेळ चाले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:41 IST

विक्रोळीतील वर्षानगरमधील नागरिक त्रस्त : १५ मिनिटांच्या पाण्यासाठी १०० रूपये

मुंबई : अवघ्या १५ मिनिटाच्या पाण्यासाठी १०० रुपये मोजायचे. आणि पाण्याच्या प्रतीक्षेत रात्र काढायची. पाण्याने भरलेले हंडे, बादल्या कडेवर घेत निसरड्या वाटेतून घर गाठायचा. पाण्यासाठीचा असा जीवघेणा खेळ विक्रोळीच्या वर्षानगर परिसरात सुरु आहे.विक्रोळी पश्चिमेकडील सुर्यानगर, शिवाजी नगर, रायगड झोन वर्षा नगर परिसरात नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत आहेत. यात, डोंगरात वसलेल्या वर्षा नगर परिसरात ८ ते १० हजार रहिवासी पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागते. या परिसरात पाण्याची टाकी उभारली. मात्र याची देखरेख खासगी मंडळाकडून होते. त्यात येथील रहिवाशांनाकडून १५ मिनिटाच्या पाण्यासाठी महिनाकाठी १०० रुपये आकारण्यात येत आहे.

सायंकाळी साडे सात वाजल्यापासून येथील विविध प्रभागांमध्ये पाणी सोडण्यात येत आहे. त्यातही टेकडीवर असलेल्यांना पाण्यासाठी तळाशी असलेल्या नळावर रांगा लावाव्या लागतात. ३० मिनिटाची वेळ असली तरी, फक्त १५ ते २० मिनिटे पाणी रहिवाशांच्या नशीबी पडते. ते घेण्यासाठी सर्वांचीच धडपड असते. त्यामुळे अनेकदा ’कोणी पाणी देत का पाणी म्हणत’ ही मंडळी पाण्याच्या टाकी जवळ असलेल्या नळाकडील रहिवांशाकडे विनवणी करताना दिसतात. एका नळावर अनेकदा १५ ते २० कुटुंब रांग लावून असतात.अशात, अनधिकतपणे नळजोडणी वाढल्याने, येथील पाण्याचा दबाव आणखीन कमी झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. रस्त्यावर पाणी सांडल्याने रस्ताही निसरडा होतो. त्यामुळे अपघाताच्याही छोट्या मोठ्या घटना येथील रहिवाशांसाठी नवीन नाही.पाण्यासाठीच मरण...पाण्यासाठीची वेळ ठरलेली. त्यातही कमी दाबामुळे एक हंडा भरण्यासाठी ४ ते ५ मिनिटे लागतात. त्यात, एका नळावर दोन कुटुंबे अवलंबून असली तरी, वरच्या रहिवाशांचीही त्याच ठिकाणी गर्दी असते. त्यामुळे आमच मरण हे नेहमीच बनले आहे. अशा अवस्थेत कोणीही मदतीला फिरकत नाही. नुकताच याच समस्येमुळे दुसरीकडे भाड्याने राहतो आहे.- मनोज पांडे, स्थानिक रहिवासीकमी वेळ, त्यात कमी दाब यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. लाखो रुपये खर्च कनेक्शन मिळते. कनेक्शन मिळाले की सुरुवातीचे १५ दिवस पाणी येणार व्यवस्थित, मात्र नंतर परिस्थिती जैसे थेच आहे. त्यात, अनधिकत पाणी धारकांना ७० ते ७५ हजार रुपयांत जोडणी मिळते. जे अधिकत आहेत. त्यांच्याच नळाच्या पाईपमध्ये टब मारुन त्यांना पाणी दिले जाते.- रवी तिवारी, शिवाजी नगर रहिवासीमुंबईसारख्या ठिकाणी पाण्यासाठी अशी जीवघेणी अवस्था होते याच दुख आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.- सुनील विश्वकर्मा, वर्षानगर रहिवासीआजही रात्रीच्या अंधारात मोबाईलच्या प्रकाशात पाण्याच्या बादल्या, हंड्या घेवून चढउतार करत आहोत. आधीच कमी वेळ त्यात, दबावही कमी झाल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.- ज्ञानेश्वर अण्णा बोलकडे, वर्षानगर रहिवासी