शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भीषण! मुंबईत पेट्रोल पंपावर भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं, लोक अडकले; पार्किंग टॉवरही जमीनदोस्त 
2
2029 मध्ये कोण असेल भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार? अमित शाहंनी नावही सांगितलं...
3
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
4
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
5
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
6
शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट?; वळसे पाटलांनी दिलेल्या उत्तराने राजकीय चर्चांना उधाण
7
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
8
IRE vs PAK : Babar Azam चा ट्वेंटी-२० मध्ये विश्वविक्रम; रोहित-धोनीलाही टाकलं मागं
9
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
10
आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अफगाणिस्तानला पुराचा तडाखा; 300हून अधिक लोकांचा मृत्यू
11
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
12
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
13
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात
14
VIDEO : हे कोण... आपण कोण...? महिलांचे हिजाब वर करून बघू लागल्या माधवी लता! FIR दाखल
15
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
16
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
17
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
18
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला
19
Share Market मध्ये रिकव्हरी; फार्मा, आयटी, बँक इंडेक्समुळे तेजी; TATA Motors आपटला
20
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती

रझा: चित्रकाराचे प्रदेश ओलांडून जाणे नेमके काय असते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 3:00 AM

मुंबईतील पिरामल म्युझियम ऑफ आर्ट येथे ‘एस.एच. रझा : ट्रॅव्हर्सिग टेरेन्स’ या शीर्षकाने रझा यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन सुरू झाले आहे. एका महान चित्रकाराच्या आयुष्यामध्ये डोकावण्याची संधी देणारे हे प्रदर्शन 28 ऑक्टोबर्पयत सुरू असेल. त्यानिमित्ताने..

ठळक मुद्देसय्यद हैदर रझा. रझा 1950 सालात भारत सोडून फ्रान्समध्ये पॅरिसला गेले आणि मग पुढची सहा दशके ते तिथेच राहिले. चित्रकाराचे प्रदेश ओलांडून जाणे नेमके काय असते? नवे प्रदेश पहाण्याच्या, जुन्या प्रदेशाशी नाळ जोडलेलीच राहाण्याच्या माणसाच्या रक्तातल्या आदिम प्रेर

शर्मिला फडके

सय्यद हैदर रझा. अमूर्त चित्रकलेतील एक महत्त्वाचे नाव.  रंगांचा अतिशय सुंदर वापर,  चित्रातली  काव्यात्मक संवेदनशीलता, वैचारिकता यामुळे निखळ सौंदर्यानुभवासोबतच आध्यात्मिक चिंतनशीलतेचाही अनुभव देणारी रझांची चित्रे  विविध चित्रशैलीतल्या प्रयोगांकरता प्रसिद्ध आहेत. भारतीय चित्रकलाविश्वाला क्रांतिकारी कलाटणी देणार्‍या, अमूर्त चित्रकारितेची वाट खुली करून देणार्‍या प्रोग्रेसिव्ह कला-चळवळीचे संस्थापक शिलेदार म्हणूनही रझांचे नाव भारतीय चित्रकला  इतिहासात अजरामर झालेले. रझा 1950 सालात भारत सोडून फ्रान्समध्ये पॅरिसला गेले आणि मग पुढची सहा दशके ते तिथेच राहिले. ‘‘माझ्या चित्रकलेला नव्या भूमीची गरज आहे’’, असे वाटल्याने त्यांनी हा निर्णय घेतला होता. तो योग्यच ठरला आणि फ्रान्समध्ये रझांच्या चित्रकलेचा विस्तार झाला, नव्या भूमीत नव्या बिजांची अंकुरणे झाली, कलेचा वृक्ष बहरत गेला. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकात रझा पुन्हा भारतात परतले.सत्तर वर्षाच्या प्रदीर्घ चित्र-कालावधीत रझा सातत्याने, अगदी दोन वर्षापूर्वी निधन होईर्पयत, वयाच्या नव्वदीतही चित्रे रंगवत राहिले. निसर्गचित्रपासून अ‍ॅबस्ट्रॅक्ट एक्स्प्रेशनिझमर्पयत अनेक चित्रशैलींचे वैविध्यपूर्ण प्रयोग करणार्‍या रझांचे नाव घेतल्यावर सर्वसामान्य चित्ररसिकाच्या नजरेसमोर येतात ती  आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी रंगवलेली काळ्या बिंदूला सामावून घेतलेली चित्रेच .जवळपास पन्नास दशके रझा भारताबाहेर असल्यानेही हे होत असेल कदाचित. आणि म्हणूनच ‘‘रझा- प्रदेश ओलांडून जाताना’’ हे मुंबईतल्या पिरामल आर्ट म्युझियममध्ये भरलेले रझांच्या साठ वर्षाच्या चित्र-कारकिर्दीचे सिंहावलोकन करणारे चित्र-प्रदर्शन आत्यंतिक महत्त्वाचे आहे.

चित्रकाराचे प्रदेश ओलांडून जाणे नेमके काय असते? नवे प्रदेश पहाण्याच्या, जुन्या प्रदेशाशी नाळ जोडलेलीच राहाण्याच्या माणसाच्या रक्तातल्या आदिम प्रेरणेशी याचा नेमका काय आणि कसा संबंध येतो?चित्रकाराचा किंवा कोणत्याही कलाकाराचा प्रवास हा त्याच्या सर्जनशीलतेला, प्रेरणेला विकसित करणारा असतो या विधानाला रझांचे प्रदेश ओलांडून जाणे आणि मग पुन्हा परतून येणे कितपत पूरक ठरते हे तपासून पहायला हे प्रदर्शन खर्‍या अर्थाने मदत करते.मध्य प्रदेशातल्या एका लहानशा गावात जन्मलेल्या रझांचे मुंबईत येणे, जे.जे. स्कूल ऑफआर्टमध्ये स्कॉलरशिपवर शिकणे, चित्नकार म्हणून नावारूपाला येत असताना सुझा, आरा, गाडे, अंबादास यांच्यासोबत प्रोग्रेसिव्ह कला-चळवळ उभारणे, मग अचानक पॅरिसला कलाशिक्षणाकरता जाणे, फ्रान्सला स्थायिक होणे, जग फिरणे आणि मग उत्तरार्धात पुन्हा भारतात परतून येणे. रझांच्या आयुष्याचा हा घटनाक्र म हा फक्त त्यांच्या भौतिक प्रवासाचा निदर्शक नाही, रझांच्या वैचारिकतेचा प्रवास, कलेत उत्क्र ांत होत जाणे, चित्रकलेतले वेगवेगळे प्रयोग याला समांतर आहेत.पिरामल आर्टच्या या प्रदर्शनात एकूण 35 चित्रे आहेत. त्यात अनेक लॅण्डस्केप्स आहेत. रझांनी अ‍ॅबस्ट्रॅक्ट एक्स्प्रेशनिझम शैलीत चितारलेल्या या लॅण्डस्केप्सचा अर्थ एरवी आपण आपापल्या समजुतीनुसार, कुवतीनुसारच लावू शकतो. पण या प्रदर्शनामध्ये आपले हे काम सोपे होते. रझांनी नेमके काय, कधी, कशाकरता हे चितारले आहे, त्यातून ते कुठे जाऊन पोहचले, मागे परतून आले ते नेमके का, त्यांचे रु जणे, फुलणे, विस्तारित होणे, चित्रशैलीतले बदल आणि मग पुन्हा एका लहानशा बिंदूकडे, संरचनात्मक चौकटीत सामावून जाणे हे कशाकरता. याचा एक सुस्पष्ट अर्थ आपल्याला हे प्रदर्शन पहाताना समजू शकतो.- कारण इथे रझांची फक्त चित्रेच नाहीत. त्यांनी लिहिलेली पत्रे , डायरीतल्या नोंदी, त्यांचे प्रवास, प्रदर्शने, पॅरिसमधल्या कलाविश्वाचे व्यवहार, वैयक्तिक जीवन, मित्नपरिवार, मुंबईतल्या रामकुमार, पदमसीसारख्या कला-सहकार्‍यांसोबत कायम राहिलेले दृढ संबंध, प्रोग्रेसिव्ह चळवळीसंदर्भातले विचार, लेख. रझा आपल्याला समजत जातात आणि मग त्यातून त्यांच्या चित्रांचा  अर्थही.प्रदर्शनामध्ये अगदी सुरुवातीलाच रझांचे ‘ग्रे लॅण्डस्केप’ लावलेले आहे. साठच्या दशकात रझांनी पॅरिसला काढलेले हे राखाडी, भेगाळलेल्या जमिनीच्या तुकडय़ांसारखे दिसणारे अमूर्त निसर्गचित्न. अधेमधे शेवाळलेल्या हिरवट आणि सेपियातल्या मळकट चौकोनांचे गोधडीसारखे सांधलेले, मधल्या भेगांमुळे जास्त दुरावणारे तुकडे. कसले असतील हे तुकडे?.. कदाचित रझा रहात असलेल्या, बर्फाळलेल्या जमिनीचे हे असू शकतात किंवा ते जो प्रदेश मागे सोडून आले आहेत तिथल्या दुष्काळी, पावसाच्या प्रतीक्षेतल्या भेगाळ जमिनीचेही! ही माती आहे की आकाश याचा संभ्रमही होऊ शकतो.ही कदाचित मुंबई असू शकेल जिथे रझांनी आपली पहिली लॅण्डस्केप्स चितारली, किंवा त्याही आधीचा, मध्य प्रदेशातल्या जंगलांमधल्या शेवाळलेल्या तुकडय़ांचा, मुळं उसवलेल्या, स्मृतींच्या थराआड मावळत गेलेल्या भूमीचा, भेगाळलेल्या आठवणींचाही हा प्रदेश असू शकेल कदाचित !!दोन वर्षापूर्वी रझांचे निधन झाले, त्यानंतर भरलेले हे पहिलेच महत्त्वाचे चित्र-प्रदर्शन आहे. आधी फार पहाता न आलेली यातली चित्र बरीचशी पिरामल आर्ट म्युझियमच्या संग्रहातली, काही रझा फाउण्डेशनमधली आहेत. क्रि शन खन्नांसारख्या मित्नाच्या संग्रहातले फोटोग्राफ्स, , पॅरिसच्या लारा विन्सी आर्ट गॅलरीच्या अर्काइव्हमधला पत्नसंग्रह, डायरी इत्यादीही इथे आहेत. पॅरिसच्या या आर्ट गॅलरीशी रझा चाळीसहून अधिक वर्षे जोडलेले राहिले. श्रीमती लारा विन्सी आणि त्यांची मुलगी लिलियन हिच्यासोबत त्यांचे घनिष्ट व्यावहारिक तसेच मैत्नीचे, आपुलकीचे संबंध होते. त्यांचा पत्र व्यवहार अतिशय बोलका आहे. त्यातून रझांचा सुरु वातीचा स्ट्रगल, स्वतर्‍ला सिद्ध करण्याकरता त्यांनी घेतलेले परिश्रम, आर्थिक अडचणी, प्रदर्शनांना मिळणारा प्रतिसाद याबद्दल खूप गोष्टी लक्षात येतात. रझांची जगभरातली भटकंती, नवे शिकणे, कला-व्यवहार समजून घेणे, प्रेमात पडणे, मित्र  जोडणे, मायभूमीच्या सादेला आसुसून प्रतिसाद देणे, मुळांचा शोध घेणे, त्यातून स्वतर्‍ला पुन्हा नव्याने घडवणे. वेळोवेळी त्यांनी केलेले, स्वीकारलेले स्वतर्‍च्या चित्र कलेतले धाडसी बदल. अशा अनेक गोष्टी रझांच्या पत्र व्यवहारातून, खासगी छायाचित्रमधून जाणून घेता येतात.

पॅरिसमधल्या आपल्या नव्या स्टुडिओत डोळ्यात स्वप्ने घेऊन बसलेले तरु ण, उत्साही रझा, पॅरिसच्या स्कायलाइनला दुर्बिणीतून न्याहाळणारे रझा, जेनिन मोंगिलातशी विवाहबद्ध झालेले देखणे, रोमॅण्टिक वृत्तीचे रझा, चित्नांची विक्र ी किती झाली, आपली चित्रे कोणी घेतली याच्या काळजीपूर्वक नोंदी ठेवणारे व्यवहारी रझा, इझलसमोर विचारात मग्न असणारे शांत रझा, हेन्री कार्तिएर ब्रेसांच्या कॅमेर्‍यातील लेन्सलाही ज्यांच्या सर्जनशील व्यक्तिमत्त्वाचा मोह पडला असे रझा. चित्रकाराच्या चित्नांना जाणून घेण्यात त्याचे माणूसपण, त्याचे व्यक्तिमत्त्व, पाश्र्वभूमी इत्यादींचा किती महत्त्वाचा, अपरिहार्य वाटा असतो, आणि ते किती इंटरेस्टिंग असते हे पिरामलच्या या प्रदर्शनातून पुन्हा एकदा लक्षात येते. रझांनी फ्रान्समध्ये भरपूर प्रवास केला, निसर्गचित्रे काढली, जी इथे पहाता येतात. आपण ज्या भूमीवर आहोत तिच्याशी नातं जोडण्याची संवेदनशीलता या निसर्गाचित्रांमधून जाणवते. इथेच विकसित झालेल्या चित्र भाषेतून या भूमीशी संवाद साधण्याची, तिला जाणून घेण्याची त्यांची तीव्र इच्छा यातून प्रतित होते. 

अशा विविध कला-अनुभवांतून आलेल्या परिपक्वतेमुळे स्वतर्‍ला नव्याने शोधण्याची ओढ निर्माण झाली. रझा भारतात जास्त वेळा येऊ लागले, भारतीय कलेशी, तत्त्वज्ञानाशी नव्याने जोडले गेले. पॅरिसमध्ये रहात असतानाही आपली मुळे भारतातच रु जलेली आहेत, तिथले साहित्य, काव्य, माणसे यांच्याशी आपण अजूनही, कदाचित कायमचे जोडलेलो आहोत हे एकदा समजल्यावर आणि स्वीकारल्यावर रझांनी त्यानुसार आपल्या चित्नकलेची पुन्हा एकदा नव्याने संरचना केली. बेतलेल्या रचनांमधून ते मुक्त छंदाकडे वळले, आकारबद्ध रचनांमधून आकारविरहित चित्र कलेकडे वळले. याच काळात रझांच्या चित्रमध्ये रंगांना जास्त महत्त्व येत गेले. काव्यात्मक संवेदनशीलता जाणवायला लागली. या बदलांचा गाभा होता त्यांचा निसर्गचित्रांकडे पहायचा नवा दृष्टिकोन. भेट दिलेल्या जागेची ठरावीक, भौगोलिक वैशिष्टय़े रंगवण्यापेक्षा रझा तिथला निसर्ग, जागेच्या नैसर्गिकतेला रंगवायला लागले, ‘प्रकृती’ची संकल्पना र्‍ आत्म्याला जाणवलेला निसर्ग ही त्यांच्या विचारांची बैठक बनली. भारतीयत्वाशी खोलवर जोडल्या गेलेल्या, फ्रेंच संस्कृतीमध्ये पूर्ण मुरलेल्या रझांनी यातूनच अतिशय सहजतेने आपले नाते वैश्विकतेशी जोडले.1940 ते 90 या पाच दशकांमधल्या रझांच्या कामात सुरु वातीची एक्स्प्रेशनिस्ट लॅण्डस्केप्स, प्रोग्रेसिव्हच्या काळातली अ‍ॅबस्ट्रॅक्ट चित्र , पॅरिसला गेल्यावर पडलेला फ्रेंच चित्र शैलीचा प्रभाव, अमेरिकेतल्या प्रवासानंतर चित्रांत  आलेल्या वेस्टर्न मॉडर्निझमच्या, क्युबिझमच्या छटा इथे ओळखता येतात. शेवटच्या दोन दशकांमध्ये रझांनी भारतीय लघुचित्नशैलीतल्या रचनांचा, रंगांचा, प्रतिमांचा आपल्या चित्र कलेत केलेला जाणीवपूर्वक वापर, मग या सगळ्याचे काळ्या बिंदूत सामावणे, त्यांना गवसलेला सर्जनशीलतेचा मध्यबिंदू, चित्नाची बदललेली संरचना, चौकटी, त्यातले झळाळते रंग, आध्यात्मिक एलेमेन्ट्स.. रझांचा हा संपूर्ण प्रवास पिरामल आर्ट म्युझियममध्ये पहायला मिळतो. रझांच्या चित्नकलेच्या शैलीत जे बदल घडत गेले ते अचानक एका रात्रीत  झालेले नाहीत, किंवा आधीची सगळी मुळे उखडून टाकून, त्यात नवीन बीज रु जवल्यासारखी त्यांची पेंटिंग्ज नव्याने जन्मली नाहीत. त्यांच्या चित्र शैलीत घडत गेलेले बदल, चित्रांमध्ये बिंदूचे आगमन हे टप्प्याटप्प्यांनी, जाणीवपूर्वक, आंतरिक चिंतनातून घडत गेले आहेत. प्रदर्शनाची रचना त्यानुसारच, वेगवेगळ्या पाच विभागांमध्ये केली आहे. नवा प्रदेश सर्वार्थाने सुपीक असताना, बहराचे रोज नवे ऋतू अनुभवत असताना मुळांना जुन्या मातीची, मागे सोडून आलेल्या प्रदेशाची आस सतत का लागलेली असावी? निर्मितीच्या समृद्ध पसार्‍याला पुन्हा बिंदूमध्ये सामावून जाण्याची ओढ का वाटत राहावी? - रझांच्या चित्रकलेचा प्रवास कदाचित याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरता होता. तो कितपत सुफल झाला हे या प्रदर्शनातून आपल्यालाही शोधता येऊ शकेल. कलाकाराला कायमच प्रवासाची निकड असते, असावी, स्वतर्‍चा शोध घेण्याकरता प्रदेश ओलांडून पुढे जाणे हे एक अनिवार्य भागधेय असते त्याचे. आज हा शोध घेणे जास्तच तीव्र, निकडीचे झाले आहे. एका बाजूला नव्या-जुन्याचे, परिचित-अपरिचिताचे उंबरठे पुसले जाऊन सपाट झालेल्या प्रदेशांना ओलांडणे आज सोपे झाले आहे; मात्र  त्यात स्वतर्‍ची ओळख टिकवून ठेवणे, स्वतर्‍च्या चित्रां मध्ये ‘स्व’ची ओळख निर्माण करणे तितकेच कठीण आहे. अशा वेळी रझांसारख्या कलाकाराने या अशाच मार्गाने कित्येक दशके आधी केलेला प्रवास निरखून पहाणे, त्यांचे मुक्काम, वळणे, पाऊलखुणा अभ्यासणे हे दिशादायक ठरू शकते. असे प्रवास शक्य आहेत, नव्या प्रदेशात जाणे म्हणजे स्वतर्‍च्या ओळखीला हरवून टाकणे, मागचा रस्ता पुसून टाकणे नाही, स्वतर्‍ला नव्याने घडवणे आहे, परतून स्वतर्‍कडेच परत यायला भाग पाडणारे आहे अशी खातरी  पटवणारा हा रझांचा प्रवास. भौतिक, शारीरिक आणि मानसिक अंतरे पार करणारा, प्रदेश ओलांडताना पायाखालच्या मातीशी प्रामाणिक राहाणारा..

 

(लेखिका ख्यातनाम कला समीक्षक आहेत)