शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

ओमरान, अयलान, आणि...

By admin | Updated: August 26, 2016 17:30 IST

युद्धाच्या ज्वाळांमध्ये बेचिराख होणाऱ्या सिरियाच्या अलेप्पो शहरातला ओमरान दख्नीश हा चिमुरडा गेले काही दिवस जगाच्या काळजात रुतून बसला आहे. बॉम्बहल्ल्यात उद्ध्वस्त घराच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढल्यानंतर धूळ, राख, रक्ताने भरलेला त्याचा सुन्न चेहरा आणि भेदरलेली नजर

 - सतीश डोंगरे

युद्धाच्या ज्वाळांमध्ये बेचिराख होणाऱ्या सिरियाच्या अलेप्पो शहरातला ओमरान दख्नीश हा चिमुरडा गेले काही दिवस जगाच्या काळजात रुतून बसला आहे.बॉम्बहल्ल्यात उद्ध्वस्त घराच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढल्यानंतर धूळ, राख, रक्ताने भरलेला त्याचा सुन्न चेहरा आणि भेदरलेली नजरयुद्धखोर जगाला जणू बोचरे प्रश्न करते आहे.धर्म, वंश आणि सीमांच्या संघर्षात जळत असलेल्या,समाजमाध्यमांमधून थेट मनामनांत पोचलेल्या, अस्वस्थ करणाऱ्याचिमुरड्यांची कहाणी.. ओमरानसिरियामधील धगधगणारे वास्तव जगाच्या हृदयात खोलवर घुसेल असे पुढे आले आहे ते पाच वर्षीय ओमरान दख्नीश या चिमुरड्याच्या रक्तबंबाळ फोटोमधून!  रोजचेच बॉम्बहल्ले, मृतदेहांचा ढीग, किंचाळ्या, रडण्यातील करुण स्वर हे नित्याचेच झाले आहे. या अस्थिर आणि क्रौर्याच्या स्थितीला ओमरान व त्याचे कुटुंबीयही बळी पडले. विद्रोह्यांच्या परिसरात असलेल्या ओमरानच्या घरावर झालेल्या हवाई हल्ल्यात त्याचे कुटुंब उद्ध्वस्त झाले; मात्र ओमरान आणि त्याचा भाऊ असे दोघे या हल्ल्यात थोडक्यात बचावले. धूळ आणि रक्ताच्या थारोळ्यात जेव्हा ओमरानला अ‍ॅम्बुलन्समध्ये आणण्यात आले तेव्हा तो सुन्न होऊन भेदरलेल्या अवस्थेत खुर्चीवर बसून होता. त्याच्या कानावर फक्त किंचाळ्या अन् धमाक्यांचा आवाज येत होता. चेहऱ्याच्या एका बाजूला लागलेले रक्त पुसत ओमरान अ‍ॅम्बुलन्सच्या खिडकीबाहेर बिथरलेल्या नजरेने बघत होता. अश्रूंनी त्याच्या हृदयात गर्दी केली होती; मात्र भीतीपोटी जणू काही त्याचे अश्रूच गोठले गेले होते. आपल्या कुटुंबातील कोणीतरी येईल अन् मला कडेवर घेऊन धीर देईल, हा एकच विचार त्याच्या मनात घोंगावत असावा. भेदरून गेलेल्या लहानग्याची ही सुन्न चलबिचल अलेप्पो मीडिया सेंटरने कॅमेऱ्यात कैद केली. त्याचा फोटो अन् व्हिडीओ सोशल मीडियावर शेअरही केला. काही तासांमध्येच ओमरान जगभरात पोहोचला, आणि क्रौर्याचा बळी ठरलेल्या ओमरानसाठी अवघे जग हळहळले. तसेच त्याच्या या स्थितीला जबाबदार असलेल्यांप्रती संतापही व्यक्त केला गेला. ओमरान हा कुठल्या जाती-धर्माचा आहे, याचा विचार न करता प्रत्येकजण माणुसकीच्या भावनेतून त्याच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करीत आहे... त्याचा भाऊ मात्र दगावला.अयलानगेल्या काही महिन्यांपूर्वीच ओमरानप्रमाणे तीन वर्षाच्या अयलान कुर्दी या चिमुरड्याने अख्ख्या जगाला हादरवले होते. आजही अयलानचा व्हायरल झालेला फोटो जगाच्या डोळ्यासमोर हटलेला नाही. अस्थिर सिरियामधून ग्रीसमध्ये शरण घेण्यासाठी समुद्रमार्गे जात असताना तराफा उलटून अयलानचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अयलानचा मृतदेह समुद्राच्या लाटांवर तरंगत तुर्कीच्या किनाऱ्यावर लागला. लाल रंगाचा टी-शर्ट, निळ्या रंगाची पॅण्ट, पायात शूज असलेला अयलान शांतपणे किनाऱ्यावरच्या वाळूवर पडून होता. जणू काही समुद्राच्या लाटांचे तरंग त्याला गोंजारत होते. अशा स्थितीतील अयलानचा फोटो जगभरात व्हायरल झाला अन् अवघे जग सुन्न झाले. या दुर्घटनेत अयलानची आई व पाच वर्षीय भावाचाही मृत्यू झाला. अयलानच्या मृत्यूने संपूर्ण जग गहिवरले. ज्या अधिकाऱ्याने अशा भीषण स्थितीतले अयलानचे शव उचलले होते, तो अधिकारी कित्येक आठवडे या घटनेतून सावरला नव्हता. हुदेयाअतिरेकी दहशतवाद आणि जगाला जाळू निघालेल्या युद्धखोरीच्या क्रूरतेची परिसीमा दर्शविणारा आणखी एक फोटो सोशल मीडियावर असाच व्हायरल झाला होता. रोजच्या आयुष्याचा भागच बनलेल्या क्रौर्याला घाबरून इसिसच्या तावडीतून निसटून रेफ्यूजी कॅँपमध्ये निवारा शोधणाऱ्या चार वर्षीय हुदेया आणि तिच्या परिवाराची येथेदेखील भीतीने पाठ सोडली नव्हती. जेव्हा छायाचित्रकार उस्मान कॅम्पमधील काही फोटो काढत होते, तेव्हा त्यांना चिमुकली, गोंडस हुदेया खेळताना दिसली. तिचाही एखादा छानसा फोटो काढावा या भावनेतून उस्मानने तिच्याकडे कॅमेरा फिरवला; मात्र कॅमेऱ्याच्या क्लिकचा आवाज कानी पडताच निरागस हुदेया दोन्ही हात वर करून घाबरलेल्या स्थितीत उभी राहिली. इवलेसे हात वर करून निरागसतेने बघणाऱ्या हुदेयाची ही प्रतिक्रिया आश्चर्य व्यक्त करायला लावणारी होती. पुढल्या क्षणी उस्मानला कळले, हुदेयाने कॅमेऱ्यालाच बंदूक समजून हात वर केले होते.सिरियन अनामिकाआॅक्टोबर २०१५ च्या दरम्यान एका सिरियन निर्वासित मुलीचा फोटोही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. हा फोटो डेन्मार्कच्या सीमेवरचा आहे. ही चिमुकली डेनिश पोलिसांसोबत अतिशय मनमोकळ्या गप्पा मारताना दिसत आहे. शिवाय पोलीसवालादेखील वय आणि जबाबदाऱ्या विसरून तिच्या गप्पांमध्ये रंगून गेला आहे. फोटोंमधील दोघांचेही हावभाव बरेच काही सांगून जातात. हा फोटो व्हायरल झाला तेव्हा ‘शांतता आणि प्रेमभावनेचे’ प्रतीक म्हणून याकडे बघितले गेले. मात्र हिंसकवृत्तीला बळी पडत असलेल्या निरागसतेच्या सुरक्षिततेबाबत संयुक्त राष्ट्रसंघासह कोणाकडेही ठोस असे उपाय नाहीत.गीनाबंदुकीच्या गोळीने गंभीर जखमी झालेल्या सिरियामधील मदाया शहरात राहणाऱ्या दहा वर्षीय गीनाची कथादेखील काहीशी अशीच आहे. आजारी आईकरिता औषधे आणण्यासाठी घराबाहेर पडलेली गीना अचानक रस्त्यावरल्या चकमकीत सापडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गीनाला कसेबसे घरी आणण्यात आले; मात्र योग्य उपचार मिळत नसल्याने तिची प्रकृती अत्यवस्थ होत गेली. आतंकवाद्यांनी घराला वेढा दिल्याने ती असह्य वेदना सहन करीत होती. अखेर गीनासाठी ट्विटर या सोशल साइटवर ‘#रं५ी ॠँ्रल्लं' या नावाने मोहीम चालविली गेली. जगभरातील हजारो लोकांनी या मोहिमेला पाठिंबा दिला. त्यामुळे एमनेस्टी इंटरनॅशनल आणि संयुक्त राष्ट्रासारख्या मानवाधिकार संघटनांनीही या प्रकरणी व्यवस्थेवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. अखेर रेडक्रॉसने तिला दमिश्क येथे उपचारासाठी पाठविण्याची व्यवस्था केली.