शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मातीची साद.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 06:05 IST

आपलं घर, स्वत:चा देश सोडून, नव्या ठिकाणी घर वसवलं की, छोट्या छोट्या गोष्टींनीही हळवं व्हायला होतं.  स्टोअरमध्ये शेपूची जुडी पाहून आईच्या जेवणाची आठवण होते.  भारतीय हॉटेल नुसतं दिसलं तरी तिथे जाऊन जेवावंसं वाटतं.  हिंदी-मराठी गाणी रुंजी घालायला लागतात. मन आपोआपच भारतीय माणूस शोधायला लागतं..

ठळक मुद्दे मलाच का हजारो, लाखो देशांतरीत लोकांच्या मनात, दैनंदिन आयुष्यात हा nostalgia वळणावळणावर दबा धरून बसलेला असतो. हा एवढा Nostalgia येतो कुठून?  कशासाठी ? मला प्रश्न पडला, म्हणून थोडसं त्याच्या शोधात निघाले.

मायदेशापासून लांब, नवीन घर वसवून राहायला लागलं की अगदी शुल्लक गोष्टी आठवूनसुद्धा हळवं व्हायला होतं. Old is Gold ही म्हण मनोमन पटायला लागते. नवीन जगात सगळेच नवीन अनुभव, नवीन लोकं, परकी खाद्यसंस्कृती उपभोगताना भारतीय केबल चानेलचं स्बस्क्रीपशन घ्यावसं वाटतं, कुमार शानुची गाणी सुद्धा ऐकायला गोड वाटतात, कितीही का फालतू भारतीय रेस्तौरांत असो, तिथे जाऊन जेवावसं वाटतं.ग्रोसरी स्टोर मध्ये शेपूची जुडी पाहूनसुद्धा आईच्या जेवणाची आठवण होते.एक अख्खं  अनोखं विश्व साद घालत असतं पण मन इतर मराठी किंवा हिंदी किंवा कुणीही भारतीय माणूस शोधत असतं. खरं सांगते मी हे सगळं टाळण्याचा प्रयत्न केला,पण मला ते जमलं नाही. नवीन अनुभव आणि नवीन लोकांबद्दल लिहित असताना मला जाणवलं की माझ्या लिखाणावर "nostalgia' चा चांगलाच प्रभाव आहे. खूप लहानपणीचे, पुर्वायुष्याचे, भारतात राहण्याचे, शाळा- कॉलेजचे उल्लेख देत किंवा त्या विषयात रमून मला लिहायला आवडतं. मलाच का हजारो, लाखो देशांतरीत लोकांच्या मनात, दैनंदिन आयुष्यात हा nostalgia वळणावळणावर दबा धरून बसलेला असतो. हा एवढा Nostalgia येतो कुठून?  कशासाठी ? मला प्रश्न पडला, म्हणून थोडसं त्याच्या शोधात निघाले.

कधी एके काळी हा nostalgia म्हणजे आजार समजला जायचा. १७ व्या -१८ व्या शतकात ,फ्रांस आणि इटली मध्ये पाठवलेल्या स्विस सैनिकांना त्यांच्या fondue, raclette cheese आणि उंच पर्वत रागांची आठवण येऊन त्यांना हा 'nostalgia' आजार होत असे.  Johannes Hofer ( १६६९ -१७५२ )नावाच्या स्विस वैद्यकीय विद्यार्थ्याने-त्याच्या थिसीस करता  'nostalgia' ह्या शब्दाला जन्म दिला . ग्रीक शब्द nostos म्हणजे घरी परतणे आणि algia म्हणजे यातना /विरह /दुख; हे दोन ग्रीक शब्द जोडून जन्माला आला 'nostalgia' हा शब्द. ह्या शब्दातच घरापासून तुटल्याचा विरह, त्या घरी परत जाण्याची ओढ , सगळंच आलं. ह्या diagnosis च्या बळावर ह्या स्विस सैनिकांना घरी पाठवलं जायचं, पण हा कुठल्यातरी प्रकारचा मानसिक आजार आहे असं समजून, बिचाऱ्यांना बरीच मानहानी सोसावी लागायची, कधी कधी तर थेट मानसिक रुग्णांच्या इस्पितळात पाठवलं जायचं  ! त्यामुळे हा nostalgia नको आणि त्याहूनही तसं कुठल्या डॉक्टरचं आपल्या बद्दल निदान नको असं अनेक सैनिकांच्या मनात आलं असणार ! पण माणूस कधी आपला पिंड विसरू शकत नाही. मराठी माणसाला जगाच्या कुठल्याही कोपर्यात गेल्यावर जशी  सह्याद्री रांगा ,बटाटेवडा आणि पुरणपोळी आठवते तसच fondue आणि बर्फाच्छादित पर्वतरांगा विसरेल, तो कसला खरा स्विस? बिचारे अनेक स्विस सैनिक अनेक वर्ष परक्या देशात त्या मायभूमीसाठी  झुरत राहिले असणार ! 

आणि जे घरी परत पाठवले गेले ,त्यांना तरी ते घर परत गवसलं असेल का ? कारण घर म्हणजे फक्त राहतं घर, जागा , त्या जागेतली लोकं , मायदेश, फक्त ह्या गोष्टी नसून घर हे जिथे सुरक्षित वाटलं अशी जागा , ज्या नात्याने उमेद दिली ते नातं, निष्पाप -भाबडेपणा शाबूत असलेले दिवस, शेखचिल्ली स्वप्नांचे दिवस, असंही बरच काही ह्या ' घर' ह्या संकल्पनेत आहे असं मला वाटतं .त्या 'घरी' ,एकदा  तिथून निघून बाहेर पडल्यावर  परत कधीच जाता येणार नसतं..कदाचित म्हणूनच आपल्याला नेहमीचं आयुष्य जगताना ,त्या आता स्पर्शाबाहेर गेलेल्या , उलटलेल्या पानांची इतकी आठवण होत असावी.

मी पुणं, भरत सोडून आता जवळ जवळ दहा वर्ष झाली आहेत. आई होईपर्यंत माझ्या जगण्यात,लिखाणात, विचारात हा nostalgia काही सारखा डोकावत नव्हता. आमच्या छोट्या माणसामुळे स्वतःचं बालपण परत आठवायला लागलं. तिला जगाची ओळख करून देत असताना , आपण त्या जगात कोण आहोत, आपली जागा कुठे आहे, आपली Identity काय आहे? ह्याचा पुनर्विचार सुरु झाला आणि मग nostalgia हा एक नवीन मित्र माझ्याबरोबर वावरायला लागला.  जगात सगळीकडेच सध्या अस्थिरता, अशांतता, असहिष्णुता आहे. त्यामुळे स्वतः च्या पुनर्विचाराबरोबरच, त्या छोट्या माणसाला ह्या सगळ्याला सामोरं जायला, आपल्यालाच सज्ज करायला लागणार, ह्या विचारानेच पोटात गोळा आला. पुन्हा एकदा माझ्या पिंडाच्या सुरक्षित गुहा मी शोधायला लागले आणि जुन्यादिवसात रमले.

भविष्यबद्दल आकस्मात  भीती  छातीत धडधडायला लागली की एखादी जुन्या, तरल  आठवणीवर  मी स्वतःचे लक्ष केंदित करते. ह्याचा तात्पुरता तरी नक्कीच फायदा होतो. Nostalgia हा काही नेहमीच गोड गोड , हसऱ्या आठवणीचा नसतो - पण त्यात काहीही अनपेक्षित घडणार नसतं, जे काही बरं वाईट व्हायचं होतं ते होऊन गेलेलं असतं. त्याच्यावर मात करून आपण पुढे पाउल टाकलेलं असतं किंवा त्या जुन्या घटनेपाशी, आपलाच हरवलेला एक कवडसा पुन्हा येऊन आपल्या कवेत शिरतो ! आपल्या असण्यात अजून अजून भरच पडत असते..

हे nostalgia बद्दल छान छान वाटून घेणं, फक्त माझ्या बाबतीत घडतं असंच नाही.   November २०१३ च्या Personality and Social Psychology Bulletin च्या अंकात Wing-Yee Cheung, Tim Wildschut, Constantine Sedikides, Erica Hepper, Jamie Arndt, and Ad Vingerhoets ह्या अभ्यासकांचा एक संशोधन प्रबंध छापला आहे . त्यांच्या मते, nostalgia मुळे लोकांना भविष्याबद्दल  जास्त आशावादी वाटू शकतं. एका संशोधनात ,आयुष्यातल्या nostalgic घटनांबद्दल , आठवणीनबद्दल लिहितांना विद्यार्थ्यांनी जास्त सकारात्मक,आशावादी शब्द वापरले होते.   दुसऱ्या संशोधनात , त्यांनी वेगवेगळ्या वायोगटातल्या लोकांना nostalgia जागृत करण्यासाठी जुनी गाणी, जुन्या कविता किंवा गाण्याचे बोल ऐकवल्यावर, त्या लोकांनी दिलेली उत्तरं पण जास्त सकारात्मक होती. ह्याची दोन कारणं आहेत, nostalgia मुळे लोक्कांना इतर लोकांबरोबर जोडणारा एक सामाजिक दुआ सापडतो, ह्या छोट्याश्या connection मुळे लोकांना स्वतः बद्दल छान वाटतं , त्यामुळे आत्मविश्वास वाढतो, ह्यामुळे भविष्याबद्दल optimistic वाटायला लागतं. 

JK Rowling ने ह्या nostalgia चा एक शास्त्र म्हणून वापर केला आहे - किंबहुना आमच्या पिढीतल्या अनेकांना त्यांनी जपमंत्र दिलाय. Dementors शी लढायला, त्यांनी हल्ला केल्यावर, मनात पसरलेल्या अंधारावर, तळपायात , मस्तकात शिरणाऱ्या थंडीवर, मात करायला फक्त आणि फक्त पूर्वायुष्यातल्या मनोहर आठवणी ह्याच एकमेव शस्त्र आहेत. त्या आठवायला, त्यांचा हत्यार म्हणून वापर करायला इतर कुणाची मदत लागात नाही, स्वतः लाच ती भरारी घ्यावी लागते... ते भरारी घेण्यासाठी आत्मविश्वास गोळा करणं, त्या मनोहर जागी स्वतःला प्रवास करून घेऊन जाणं, हे कदाचित त्या शेवटच्या भारारीपेक्षा अवघड आहे!

Nostalgia आणि लिखाण दोन्हीही मला उमेद देतात, उर्जा देतात. म्हणूनच मी बेधडकपणे ह्या nostalgia बद्दल , nostalgic होऊन लिहित राहणार आहे ...  

(लेखिका अमेरिकास्थित रहिवासी आहेत.)amrutahardikar@gmail.com