शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

शिक्षण सेवाव्रतींची नवी पिढी

By admin | Updated: June 28, 2014 18:28 IST

एक काळ होता, शिक्षणक्षेत्र पवित्र समजलं जायचं. पदरमोड करून, खस्ता काढून शिक्षण संस्था स्थापन केल्या जात. आता मात्र निव्वळ पैसे कमवण्याचं साधन म्हणून त्याकडे बघितलं जातं. संस्था चालवणारे ही तसेच आणि त्यांच्या संबंधांतील तिथे येणारेही तसलेच!ो

प्रा. डॉ. द. ता. भोसले
जिल्हा परिषदेच्या यशस्वी राजकारणाचे गणित चुकू लागल्यावर आणि त्याच बरोबर तीव्र स्पर्धा, प्रखर विरोध, वरचढ डावपेच व नेत्याच्या प्रोत्साहनाची उणीव या सार्‍यांचा विचार करून, रावसाहेबांनी राजकारणातून जवळजवळ अंग काढून घेतले; पण इतक्या दिवसांच्या पद नि पुण्याईच्या आधारे त्यांनी समाजसेवेच्या नावाखाली एक आश्रमशाळा, एक कनिष्ठ महाविद्यालय आणि दोन विद्यालये पदरात पाडून घेतली. याच्या जोडीला एक बालवाडी काढलेली आहे. सार्‍या शाखा आपापल्या परीने उत्तम चालतात. उत्तम कमाई ही मिळवून देतात, त्यामुळे ते आता ‘शिक्षणसम्राट’ झाले आहेत. थोर समाजसेवक झाले आहेत. विद्यार्थ्यांचा प्रवेश नवे वर्ग आणि वर्गखोल्यांचा विस्तार, शिक्षकांची नोकरभरती आणि इतर गोष्टींतून त्यांना मलईयुक्त चांगल्या दुधाची भरपूर कमाई लाभते आहे. इच्छा नसतानादेखील लोकांच्या आग्रहाखातर त्यांना ते स्वीकारावे लागते. नाहीतरी अशा गोष्टींशिवाय आजच्या काळात शिक्षणसंस्था चालविताच येत नाहीत, असे त्यांचे मत झाले आहे. जमानाच तसा आहे, त्याला ते तरी काय करणार?
बालवाडीच्या विद्यार्थी प्रवेशापासून ते कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशापर्यंत प्रत्येक पालकाकडून ते प्रेमळ सक्ती करून, इमारत निधी, ग्रंथालय विकास, प्रवेश शुल्क, खेळ व विविध कार्यक्रमांचे नियोजन यासाठी देणग्या मिळवितात. गेल्या वर्षी तर त्यांच्या विवाहाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली म्हणून देणगीचा आग्रह केला. लोकांना या विवाहाचा आनंद साजरा करावा लागला. उद्या आणखी कशा-कशाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली म्हणून ते देणगी घेतील सांगता येत नाही. पहिल्यांदा केलेल्या दाढीच्या कार्यक्रमाला पंचवीस वर्षे झाली म्हणूनही ते भव्य समारंभ साजरा करण्याची शक्यता आहे.
अशा प्रकारे रावसाहेबांची चार बोटे तुपात खोलवर बुडलेली असतानाच पाचव्या बोटाला तूप लागण्याची शक्यता निर्माण झाली. कनिष्ठ महाविद्यालयात एक प्राध्यापक नेमण्याची आणि आश्रमशाळेसाठी एक शिपाई घेण्याची मान्यता मिळाली. या नेमणुकीची जाहिरात येताच, पात्र उमेदवारांच्या अर्जांचा नुसता पाऊस पडला. काही अर्ज तर उत्तम शैक्षणिक पात्रता असलेले व दीर्घ अनुभव असलेले आले होते.
जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर, चार-पाच दिवसांत रावसाहेबांचे राजकीय मित्र आणि तालुक्याचे नेते एका व्यक्तीला घेऊन भेटायला आले. राजकारण-शेती-भातीच्या गप्पा झाल्यावर, मूळ विषयाकडे वळत ते म्हणाले, ‘‘रावसाहेब, आमच्या या गड्याला या नव्या जागेवर घ्या. हा तुमच्या शाळेला उपयोगी पडेल. तुमच्या राजकारणाला उपयोगी पडेल. शिवाय, तुमची जी काय ‘दक्षिणा’ वगैरे ठरलेली असेल, ती द्यायला तो तयार आहे.’’ असे म्हणताच रावसाहेबांनी त्या गड्याची माहिती घेतली. शिक्षण विचारले, अनुभव वगैरे विचारून घेतला आणि म्हणाले, ‘‘त्यापेक्षा अधिक पात्र असलेले खूप अर्ज आलेले आहेत. तरीही पाहतो मी.’’ ‘‘अंहं, पाहू नका. करूनच टाका. तुमची दक्षिणा किती हेही सांगून टाका.’’ नाराज झालेले रावसाहेब म्हणाले, ‘‘कांताराव, तुम्ही दक्षिणा शब्द वापरू नका. देणगी शब्द वापरा-दक्षिणा वेगळी आणि देणगी वेगळी. अहो, आम्ही जी देणगी घेतो, त्याला पन्नास वाटा-आडवाटा आहेत. अगदी खालपासून तो वरपर्यंत कसलीही हुज्जत न घालता प्रत्येकाच्या तळहातावर प्रसाद ठेवावा लागतो. मग मूळचा देव उपाशी राहिला तरी चालतो. तरीही मागच्यासाठी तळहात पसरलेला असतोच, खरंतर हे सारे तुम्हाला ठाऊक आहे. या सार्‍यातून तुम्ही गेला आहात. आणि दुसरी गोष्ट अशी, की इमारत बांधकाम, शास्त्रीय साहित्य, इमारतीची रंगरंगोटी, पुस्तक खरेदी, आल्या-गेल्याचा पाहुणचार, अधिकार्‍याची विलासी बडदास्त यासाठी लागणारा पैसा मी कुठून आणणार? तुम्ही दिलेली देणगीच मी वापरणार! लोकांमध्ये अमक्या-तमक्याने सात आकड्यात पैसा घेतला, अशी चर्चा असते; पण तळाला शेवटी काय उरते? तुम्हीच सांगा!’’ रावसाहेबांची सुपारी तोंडात टाकत कांताराव म्हणाले, ‘‘मला तुमचा बारीक-सारीक जमाखर्च जाणून घ्यायचा नाही. गरजही नाही; पण दर वर्षी दोन-तीन जागा निर्माण होतात. सात आकड्यांनं याला गुणा की! शिवाय पहिलीच्या मुलास प्रवेशावेळी देणगी घेता, ते शेवटच्या वर्गापर्यंत, दोन हजार विद्यार्थी दर वर्षी नव्यानं प्रवेश घेता न नि प्रत्येकाकडून तुम्ही देणगीचा टॅक्स वसूल करता. यातून मिळणारी रक्कम त्यात मिसळा की रावसाहेब. तुमच्या आश्रम शाळेत पोरं आहेत साठ. सरकारकडून पैसे घेता एकशे साठचे आणि दर महिन्याला तुमचे शिक्षक नावाचे ‘मजूर’ पगारातून हप्ता ठेवतात ते वेगळेच. इतराचं ठाऊक नाही; पण तुमच्या तळहातावर प्रसादाचा ढीग लागला की! तरीही माणसानं रडावं म्हणजे कमालच आहे! कांतारावचे प्रत्येक वाक्य र्ममावर घाव बसावा तसे झाल्याने रावसाहेब कमालीचे अस्वस्थ झाले. आणि म्हणाले, ‘‘तुम्हाला मिळालेली माहिती खोटी आहे. राजकारणातील माझ्या वैर्‍यानं तुमचे कान भरले आहेत. अहो, मी धंदा म्हणून यात पडलो नाही. एक धर्म म्हणून पडलोय. सेवाधर्म म्हणून उतरलोय.’’
‘‘खरं आहे रावसाहेब तुमचे, पूर्वीच्या समाज सेवकांनी घरा-दारावर निखारा ठेवून संस्था काढल्या, संस्था वाढवल्या, अनेकांनी जमिनी विकल्या, दागिने विकले. आयुष्यभर पगार म्हणून संस्थेचा एक पैसा घेतला नाही. काहींनी तर मुलांबरोबर आमटी-भाकरी खात संस्थेला मोठे केले. त्यात खरं तर तुमचा समावेश करायला हवा.  फक्त राजकारण सोडल्यापासून तुम्ही नदीकाठी तीस एकर शेती विकत घेतली. तीन ठिकाणी मोठे-फ्लॅट घेतले. इथे एक बंगला बांधला आणि मुलीच्या लग्नात सुमारे साठ-सत्तर लाख उधळले, या गोष्टी विसरायला हव्यात. रावसाहेब, तुम्हाला तुमच्या या थोर समाजकार्याबद्दल भारत सरकारने पद्मश्री द्यायला हवा बघा’’. कांतारावांच्या तिरकस दगडगोट्याचा मारा असह्य झाल्यावर निरोप देण्याच्या भावनेने ते म्हणाले, ‘‘तुमचे काम करतो. तुमच्या उमेदवाराला उद्या-परवा भेटायला सांगा. मग तर झाले.’’ आणि त्यांनी कांतारावांना निरोप दिला. आपली एका परीने सुटका करून घेतली.
दोन दिवसांनी कांतारावाचा उमेदवार रावसाहेबांना भेटला. त्याला ते स्पष्ट शब्दात म्हणाले, ‘‘ऑर्डर देताना एक ठराविक आकडा मी ठरविला नाही. जो उमेदवार मला सर्वाधिक देणगी देईल. त्याला मी घेणार; आपण चार वर्षे बेकार म्हणून घरी बसून आहोत, असा विचार कर आणि किती द्यायचे ते तू ठरव. उरलेल्या तीस वर्षांत तर रोज तीन-चार तास बडबडल्याबद्दल किती कोटी मिळणार आहेत, हे ही ध्यानात ठेव. शिवाय, पेन्शन वेगळीच आणि तुला म्हणून सांगतो. या रकमेला फार पळवाटा असतात. स्मशानभूमीत मृतात्म्याला गोड पदार्थाचा घास ठेवल्यावर, त्यावर जसे चारी दिशांनी वखवखलेले कावळे तुटून पडतात. तसं इथं घडतंय. त्या मृत माणसाला खरंच घासभर खावासा वाटला, तरी त्याच्या मुखात काही पडणार नाही. जा तू. विचार करून सांग. तुझ्यासारखे रोज मला तीन-चार उमेदवार भेटतात. हेही विसरू नकोस.’’ कांतारावच्या उमेदवारांनं आपल्या नशिबाला मनातल्या मनात एक शिवी हासडली आणि पाणावलेल्या डोळ्यांनी पायर्‍या उतरायला सुरुवात केली.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, 
मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व नवृत्त प्राचार्य आहेत.)