शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

मंगळावरील वस्तीसाठी ‘नासा’चा रहिवासी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 06:00 IST

पृथ्वीवरची जागा कमी पडायला लागल्यानंतर मानवी वस्तीसाठी दुसऱ्या ग्रहांचा शोध माणसाने सुरू केला. त्याच प्रयत्नांत एक रहिवासी मंगळावर नुकताच दाखल झालाय. तो आहे नासाचा ‘इन्साइट’ रोव्हर. माणसाचं परग्रहावरचं स्वप्न आता फार दूर नाही !

ठळक मुद्देअवकाश स्पर्धेला जबरदस्त तोंड फुटलेलं असताना नासा म्हणजेच अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेनं ‘इन्साइट’ हे रोव्हर मंगळावर पाठवलंय. हे रोव्हर मंगळाच्या अंतर्भागाचा अभ्यास करणार आहे.

- शैलेश माळोदेभारताची मंगळ मोहीम प्रत्यक्षात येण्यासाठीचे प्रयत्न सुरू असतानाच मंगळ ग्रहावर एक नवा रहिवासी नुकताच म्हणजे २६ नोव्हेंबरला राहायला उतरलाय. जवळपास सात महिन्यांचा प्रवास आणि ४८५ दशलक्ष कि.मी.चा प्रवास आपल्या पृथ्वीवरून केल्यानंतर हा ‘प्रवासी’ याठिकाणी उतरला. हा कोणी आपल्यासारखा माणूस मात्र नाही हं ! तो आहे नासाचा ‘इन्साइट’ लॅण्डर नावाचा एक रोव्हर !अवकाश स्पर्धेला जबरदस्त तोंड फुटलेलं असताना नासा म्हणजेच अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेनं ‘इन्साइट’ या संक्षिप्त नावानं हे रोव्हर पाठवलंय. ‘इंटिरिअर एक्स्प्लोरेशन युझिंग सिस्मिक इन्व्हेस्टिगेशन्स, जिओडेसी अ‍ॅण्ड हीट ट्रान्सपोर्ट’ (इन्साइट) हे रोव्हर आपल्या दोन वर्षांच्या या मोहिमेअंतर्गत मंगळाच्या अंतर्भागाचा अभ्यास करणार आहे. ‘अवकाशस्थ वस्तू’ म्हणजे असे सेलेरियल बॉडिजच्या खडकाळ भूभागाची, त्यात पृथ्वी आणि चंद्र यांचादेखील समावेश असून, त्यांच्या निर्मितीची कहाणी समजण्यास त्याची मदत होईल.५ मे २०१८ला कॅलिफोर्नियातील वॅण्डेनबर्ग एअर फोर्स बेस इथून ‘इन्साइट’ प्रक्षेपित करण्यात आला. ते २६ मे रोजी इलिसियम प्लॅन्शिया या लावाच्या मोठ्या भूभागात मंगळ ग्रहाच्या विषुववृत्तानजीक उतरलं. मानवी इतिहासातील ही केवळ आठवी घटना आहे. नासाचे प्रशासक जिम ब्रिन्डेनस्टीन यांच्या मते, इन्साइटमुळे मंगळाच्या अंतर्भागाचं अध्ययन शक्य होईल. आपले अंतराळवीर चंद्र आणि नंतर मंगळावर पाठविण्यास उपयुक्त, मौल्यवान विज्ञान उमगेल. नासाचे दोन छोट्या प्रायोगिक मार्स क्यूब वन (मार्को) क्यूबसॅट्समार्फत नासाच्या पॅसाडेना येथील जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल)कडे हे लॅण्डिंग सिग्नल्स पोहचविण्यात आले. ‘इन्साइट’ रोव्हर ज्या यानामार्फत पाठविण्यात आलं होतं, त्याच यानाद्वारे हे दोन क्यूबसॅट्स मंगळावर पाठविण्यात आले होते आणि ते लॅण्डर नंतर मंगळावर उतरले. अंतराळात खोलवर पाठविण्यात आलेले हे पहिले छोटे उपग्रह आहेत. अनेक संचार आणि उड्डाणअंतर्गत नॅव्हिगेशन प्रयोग पार पाडल्यानंतर या टिष्ट्वन मार्कोजना इन्साइटचा प्रवेश आणि लॅण्डिंगविषयक प्रसारण प्राप्त करण्यासाठी योग्य ठिकाणी स्थापित करण्यात आलं. या संपूर्ण मोहिमेचे प्रकल्प व्यवस्थापक टॉम हॉफमन आहेत. ताशी सुमारे १९८०० कि.मी. या वेगाने मंगळाच्या वातावरणात प्रवेश केल्यावर अवघ्या सहा मिनिटांत ते भूभागावर लॅण्ड झालं. छोट्याशा अवधित इन्साइटने डझनावारी कामे अगदी सहजपणे करण्यास सुरुवात केली असून, ही अत्यंत आनंददायी बाब आहे.अर्थात याचा अर्थ असा नाही की यशस्वी लॅण्डिंग झाल्यावर या तांबड्या ग्रहावरील सर्व आव्हानं संपली! ‘टचडाउन’नंतर अवघ्या एका मिनिटात इन्साइटचं कार्य सुरू झालं. दोन दशकोनीय सौर अ‍ॅरेजद्वारे वीज प्राप्त करण्याचे काम प्रथम क्रमांकावर होतं. ही प्रक्रिया अवघ्या १६ मिनिटांत सुरू होऊन तितक्याच वेळेत पूर्ण झाली. अर्थात ही प्रक्रिया यशस्वी झाली की नाही हे ३ डिसेंबरला कन्फर्म होईल. नासाच्या ओडिसी अवकाश यानाद्वारे त्याचं व्हेरिफिकेशन होईल. हे यान सध्या मंगळाभावेती फेºया मारत आहे. हे संदेश इन्साइट मोहीम नियंत्रण कक्षाकडे लॅण्डिंगनंतर साडेपाच तासात पोहोचले. सौरशक्तीवरच संपूर्ण काम अवलंबून असल्यामुळे अ‍ॅरेजचं कार्यान्वयन महत्त्वाचं आहे. त्यावरच मंगळाच्या अंतर्भागाचं अन्वेक्षण प्रथमच करून विविध प्रकारचे ‘कुल’ वैज्ञानिक प्रयोग सुरू करता येतील.३ डिसेंबरपासून इन्साइट मंगळभूमीवरील कामावर लक्ष केंद्रित करून आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरू करील. यासाठी इन्साइटवरील विविध उपकरणं सुसज्ज आहेत. त्याच्या १०८ मी. लांबीच्या रोबोटिक हाताद्वारे इंजिनिअरिंग टीमने भूभागाचं चित्रीकरण करण्याचं काम २८ नोव्हेंबरपासून सुरू झालं. जेपीएलचे इन्साइट प्रमुख शास्रज्ञ ब्रुस बॅनरड्ट म्हणतात, ‘लॅण्डिंग थ्रिलिंग असलं तरी मला ड्रिलिंगमध्ये विशेष रस आहे. पहिल्या प्रतिमा प्राप्त झाल्यावर आमच्या अभियांत्रिकी आणि विज्ञान टिम्सनी आमचं उपकरण मांडण्याचं काम सुरू केलंय.’ पुढील दोन-तीन महिन्यात मोहिमेची मुख्य वैज्ञानिक उपकरणं मांडण्यात येणार आहेत. त्यात ‘सिस्मिक एक्स्परिमेंट फॉर इंटिरिअर स्ट्रक्चर’ (एसइआयएस) आणि ‘हीट फ्लो अ‍ॅण्ड फिजिकल प्रॉपर्टीज पॅकेज’ (एचपी ३) उपकरणं त्यात प्रमुख आहेत. २४ नोव्हेंबर २०२० पर्यंत इन्साइट मंगळावर काम करीत राहील. हा कालावधी एक मंगळ वर्ष आणि ४० मंगळ दिवस इतका आहे. दोन लहान मार्कोजद्वारे मोहिमेची मुख्य उद्दिष्ट इन्साइटच्या टेलिमेट्रीद्वारे रिले करण्यात येतात. ते मंगळाजवळून फिरताना हे घडतं. अवघ्या एका ब्रिफकेसच्या आकाराच्या रोबोटिक अन्वेषकासाठी ही एक ‘हनुमान उडीच’ म्हणायला हवी.मंगळ मोहीम तशी कठीणच असते. परंतु आता इन्साइट सुरक्षितपणे मंगळभूमीवर उतरल्यामुळे काम आता तसे सोपं झालंय. मार्को क्यूबसॅट्समुळे छोट्या ग्रहीय अवकाशयानासाठी नवीन दालनं खुली झाली आहेत. हे हजारो हुशार वैज्ञानिक आणि अभियंत्यांचं यशच मानायला हवं. त्यामुळे हा मोठा दिवस मोठ्या घटनेसहित अनुभवता येतोय. मार्को क्यूबसॅट्सची निर्मिती जेपीएलने केली असून, त्याचं व्यवस्थापनही तेच करत आहेत. नासाच्या वैज्ञानिक मोहीम संचालनासाठीचं व्यवस्थापन जेपीएल करते. या मोहिमेत फ्रान्सची सीएनइएस आणि जर्मनीची डीएलआरसहित स्वित्झर्लंड, पोलंडमधील अनेक अंतराळ संशोधन संस्था सहभागी आहेत.इन्साइटद्वारे मंगळाच्या खोल भागाचं अध्ययन करून ग्रहाची पल्स आणि तापमानविषयक माहिती मिळेल. त्याद्वारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी निर्मितीनंतर प्रथमच मंगळाचं चेकअप होणार आहे. पूर्वीच्या मोहिमेतून मंगळाच्या दºया, ज्वालामुखी खडक आणि मातीचा अभ्यास करण्यात आला होता. परंतु निर्मितीप्रक्रिया समजून घेण्यासाठी भूभागाच्या आतील स्थितीचं अध्ययन आवश्यक आहे.पृथ्वीप्रमाणेच मंगळ स्वत:च्या अक्षाभोवती फिरताना घरघरतो, ‘वॉबल’ होतो. त्याचा अभ्यास राईस या रोव्हरवरील उपकरणाच्या दोन अ‍ॅण्टेनाद्वारे केला जाणार आहे. त्यामुळे ग्रहाच्या रिफ्लेक्सेस समजून घेणं वैज्ञानिकांना शक्य होईल आणि त्यातून ग्रहांच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणावर अंतर्भागाचा नेमका कसा आणि किती प्रभाव पडतो हे लक्षात येईल. मंगळातून उष्णता कशी बाहेर फेकली जातेय, किती फेकली जातेय हे (एचपी ३) या उपकरणाद्वारे समजून पृथ्वी आणि मंगळ एकाच प्रकारच्या पदार्थाचे बनलेले आहेत का ते समजण्यास मदत होईल. त्यातून मंगळाची उत्क्रांती समजेल.असे अनेक वैज्ञानिक प्रयोग करणे नासाच्या इन्साइट रोव्हरमुळे शक्य होईल. त्यामुळे मंगळभूमीवर मानवी वस्ती करण्याविषयीची स्वप्नं केवळ दिवास्वप्न न ठरता प्रत्यक्षात येण्यासाठीची पावलं टाकली जातील. इन्साइट मोहिमेचं यश नासाच्या प्रयत्नांचा एक भाग असून, तो भारताला प्रेरक आहे.(लेखक विज्ञान पत्रकार आहेत.)

manthan@lokmat.com