शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

नासाची पोटदुखी

By admin | Updated: October 11, 2015 20:05 IST

ज्यादिवशी भारतानं अॅस्ट्रोसॅट उपग्रह प्रक्षेपित केला, नेमक्या त्याच दिवशी अमेरिकेनं मंगळावर पाणी सापडल्याची घोषणा केली!

 
निरंजन घाटे 
 
ज्यादिवशी भारतानं अॅस्ट्रोसॅट उपग्रह प्रक्षेपित केला, नेमक्या त्याच दिवशी  अमेरिकेनं मंगळावर पाणी सापडल्याची घोषणा केली!  यात काडीचंही ‘नावीन्य’ नाही. भारताच्या प्रगतीत कोलदांडा घालण्याचा  आणि भारताच्या यशाकडून जगाचं लक्ष  दुसरीकडे वळवण्याचा हा जुनाच उद्योग आहे.
यावेळीही ते त्यात यशस्वी झाले.
--------------------
अनंत चतुर्दशीच्या दुस:या दिवशी म्हणजे 28 सप्टेंबर ह्या दिवशी भारताचा अॅस्ट्रोसॅट हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. हे प्रक्षेपण यशस्वी झालं. त्याचा जगभर उदोउदो झाला. त्याचं कारण ह्या प्रक्षेपणात अॅस्ट्रोसॅटच्या समवेत इतरही कृत्रिम उपग्रह सोडले गेले. त्यात एक अमेरिकेचा होता. जगात उपग्रह प्रक्षेपण करण्याची क्षमता असलेले जे इतर देश आहेत त्यापेक्षा भारतीय अग्निबाणाच्या साहाय्यानं उपग्रह प्रक्षेपण स्वस्त ठरते. ह्यामुळेच भारतीय अग्निबाणांद्वारे आपले उपग्रह प्रक्षेपित व्हावेत असे ब:याच विकसनशील देशांना वाटत असते, हा मुद्दा महत्त्वाचा.
भारताने जो अॅस्ट्रोसॅट म्हणजे अॅस्ट्रॉनॉमिकल सॅटेलाईट अवकाशगामी करण्यात यश मिळवले, तो खगोल निरीक्षण उपग्रह किंवा अवकाश निरीक्षक उपग्रह हा अनेकदृष्टय़ा महत्त्वाचा आहे. गॅलिलिओने दूरदर्शी बनवली त्या काळानंतर पूर्वी सहज न दिसणा:या अवकाशी घटना हळूहळू पृथ्वीवरून बघता येऊ लागल्या. गुरूचे उपग्रह, शनीची कडी ह्यांची निरीक्षणं शक्य झाली. हळूहळू जसजशी ह्या दूरदर्शीची निरीक्षण शक्ती वाढू लागली, त्यांचे वेगवेगळे प्रकार अस्तित्वात येऊ लागले तसतशा पृथ्वीवरून केल्या जाणा:या निरीक्षणातली वैगुण्ये खगोल शास्त्रज्ञांच्या लक्षात येऊ लागली. अवकाशातील वस्तूंकडून येणारी विविध उत्सजर्ने आणि पर्यायाने प्रारणो पृथ्वीच्या वातावरणात शिरली की त्यांच्यात बदल होतात. ब:याचवेळा त्यांचे वक्रीभवन होते. काही वेळा ती शोषून घेतली जातात.
पृथ्वीवरून निरीक्षण करताना अलीकडच्या काळातला एक महत्त्वाचा अडथळा म्हणजे मानवनिर्मित प्रकाश. पूर्वी जेव्हा विद्युतनिर्मित प्रकाश नसे त्या काळात अवकाश निरीक्षण पृथ्वीवरून करताना ह्या अडचणीला तोंड द्यावे लागत नव्हते पण दुस:या महायुद्धोत्तर काळात वीज वापरून प्रकाश निर्मिती अतोनात वाढली आणि त्यामुळे अवकाश निरीक्षणांमध्ये ह्या प्रकाशाचा अडथळा होऊ लागला. ज्यावेळी पहिला मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीभोवती फिरू लागला त्याचवेळी अशा त:हेनं जर अवकाशात एखादी दूरदर्शी सोडता आली तर. हा विचार खगोलशास्त्रत बळावला. त्या विचाराला दृश्य स्वरूप यायला नंतर काही काळ जावा लागला; पण इलेक्ट्रॉनिकी तंत्रज्ञानात ज्या झपाटय़ानं प्रगती झाली, त्या प्रगतीमुळं आधी आयरास इन्फ्रारेड अॅस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप आणि नंतर ‘हबल’ ही अवकाशी दूरदर्शी सोडून अमेरिकेने ह्या क्षेत्रत बाजी मारली. 
अवकाशात काय घडतंय, हे जाणून घेण्यासाठी केवळ दृश्य प्रकाशाचा वापर करून चालत नाही. दृश्य प्रकाश म्हणजे काही विशिष्ट वारंवारतेच्या (फ्रिक्वेन्सी) विद्युत चुंबकीय लहरी. पण ह्यांच्यापेक्षा कमी किंवा जास्त वारंवारतेच्या विद्युत चुंबकीय लहरी अवकाशात निर्माण होतात. आपल्याला परिचित अशा दोन प्रकारच्या लहरी म्हणजे अवरक्त (इन्फ्रारेड) आणि जंबुपार म्हणजे अल्ट्राव्हायोलेट पण ह्या पलीकडेही अशा प्रकारच्या लहरी असतात. ह्यातल्या काही महत्त्वाच्या लहरींचे वेध घेण्याचं काम अॅस्ट्रोसॅट करणार आहे. एकाच अवकाशी वेधशाळेमार्फत इतक्या विविध प्रकारच्या विद्युत चुंबकीय लहरींचे वेध घेऊन त्यांचा अन्वयार्थ लावणो, हे अमेरिकेला (म्हणजे अमेरिकेची संयुक्त संस्थाने ह्या देशाला) आजमितीस जमलेले नाही. एवढेच नव्हे तर यातली काही वेधयंत्रणा, उदा, स्कॅनिंग स्काय मॉनिटर सारखी यंत्रणा अजून अमेरिकेने अवकाशात सोडलेली नाही. ही यंत्रणा द्वैती ता:यांकडून येणारे प्रखर क्ष-किरण सातत्याने न्याहाळत राहते. एकाच उपग्रहामार्फत सौम्य क्ष-किरणांचा आणि प्रखर क्ष-किरणांचा मागोवा घेणो, हा उद्योग करणारा उपग्रह अवकाशगामी करणारा भारत हा पहिलाच देश आहे. ह्याशिवाय द्वैतीता:यांच्या चुंबकीय क्षेत्रचा अंदाज बांधणो, प्रखर क्ष-किरण प्रक्षेपित करणारे नवे ऊर्जास्रोत शोधणो आणि जांबुपार किरणांमार्फत विश्वाच्या पसा:याच्या मर्यादित भागाचे सव्रेक्षण करणो, हेही ह्या उपग्रहावरील यंत्रणांवर सोपविलेले काम आहे. असा उपग्रह अवकाशात पाठवणो आजमितीस अमेरिकेला जमलेले नाहीच; शिवाय ह्या उपग्रहाच्या निर्मितीत भारताने कशासाठीही अमेरिकेची मदत घेतलेली नाही. ह्या पाश्र्वभूमीवर अमेरिकेने नेमकी 28 सप्टेंबरलाच मंगळावर पाणी सापडल्याची घोषणा का करावी; हे तपासणो आवश्यक ठरते. भारतीय अवकाश प्रकल्पांना भारत सरकार नेहमीच सढळ हाताने मदत करीत आले आहे. त्यातच अमेरिकेपेक्षा कमी खर्चात आपण इतर देशांचे उपग्रह अवकाशात सोडतो. त्यामुळे बरेच देश भारतीय व्यवस्थेचा वापर करून त्यांचे राष्ट्रीय उपग्रह अवकाशात सोडतात. ह्यामुळे नासाचे उत्पन्न साहजिकच कमी झाले आहे. 
नासाला शासकीय अनुदान मिळविण्यासाठी छोटय़ा छोटय़ा घटनांचा खूप गाजावाजा करावा लागतो. त्यात जर दुस:या देशाने कमी खर्चात नासावर कुरघोडी केली तर त्याचा नासाला मिळणा:या अनुदानावर परिणाम हाऊ शकतो. ही पोटदुखी आजची नाही. पूर्वी रशियाच्या अंतराळवीरांना कसे अडचणीत राहावे लागते, सोयुझवर किती गैरसोयी असतात, अशा त:हेचा प्रचार अमेरिका सातत्याने करीत असे. भारतीय अवकाश संशोधनात अडथळे आणण्याचे अनेक उद्योग वेळोवेळी अमेरिकेने केले आहेत. भारताला क्रायोजेनिक यंत्रणा देण्यावर अमेरिकेने बंदी घातली होती. मात्र दहशतवादी कारवायांमध्ये पाकिस्तानचा हात असूनही पाकिस्तानला देण्यात येणारी मदत अमेरिकेने कधीही थांबवलेली नाही. ह्याला कारण भारताच्या विविध क्षेत्रतील प्रगतीत कोलदांडा घालणो हाच आहे. इतरही काही भूराजकीय कारणो आहेत पण हेही एक महत्त्वाचे कारण आहेच. 
उद्या अमेरिकी लोकप्रतिनिधी गृहामध्ये नासाच्या अनुदानाचा विषय चर्चेला येईल त्यावेळी ‘तुम्हाला एवढी मदत देतो, तिकडे भारतासारखा देश तुमच्यापेक्षा कितीतरी कमी खर्चात तुमच्यापेक्षा जास्त प्रगत असा उपग्रह अवकाशात सोडतो, तुम्ही काय करता?’ असा प्रश्न एखादा लोकप्रतिनिधी उपस्थित करण्याची शक्यता आहेच. तेव्हा भारताच्या ह्या यशाकडून जगाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी अमेरिकेने म्हणजे नासाने ‘मंगळावर पाणी सापडले’ ही घोषणा करण्यासाठी नेमकी 28 सप्टेंबरला (अमेरिकेतील) सकाळी ही वेळ निवडली असावी. त्यामुळे जागतिक माध्यमांचे आणि भारतीय माध्यमांचेही भारताच्या अॅस्ट्रोसॅटकडे दुर्लक्ष होईल, हा त्यांचा कयास खरा ठरला. 
खरं म्हणजे ‘ब्रेकिंग न्यूज’ करावी एवढी ही बातमी महत्त्वाची नव्हती. तशी ती महत्त्वाची असती तर हा शोधनिबंध ‘नेचर जिओसायन्स’कडे प्रकाशनार्थ पाठवला गेला आणि तो स्वीकारला गेला तेव्हाच करता आली असती. मंगळावर पाण्याचे अस्तित्व असणार ही एक सर्वमान्य गोष्ट आहे. आत्तासुद्धा जे पुरावे मिळाले आहेत, ते प्रत्यक्ष वाहत्या पाण्याचे नाहीतच तर नजीकच्या भूतकाळात मंगळावर पाणी वाहिले असावे, हे सांगणारे ते पुरावे आहेत. अमेरिकी शास्त्रज्ञ इ.स. 2क्क्1 नंतरच्या काळात वारंवार हा दावा करीत आले आहेत. चारएक महिन्यांपूर्वी मंगळात बर्फाचे भूमिगत साठे आहेत, असंही जाहीर झालं होतं. बरं, हे साठे प्रचंड मोठय़ा प्रमाणात म्हणजे साधारणपणो अमेरिकेच्या टेक्सस आणि अरायझोना ह्या राज्यांचं क्षेत्रफळ जेवढं आहे, तेवढे मोठे असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हे बर्फ  अधूनमधून वितळत असणार, त्या वितळलेल्या बर्फाचे पाझर भौमपृष्ठावर येत असणार, हे कुणीही सांगू शकेल. हेच गेली सुमारे पंधरा वर्षे वारंवार जाहीर केलं जातंय. मग नासाने पत्रकारांना उठवून पहाटे पहाटे (अमेरिकेतल्या) पत्रकार परिषद आयोजित करावी, तीही नेमकी अॅस्ट्रोसॅटची बातमी षट्कर्णी होत असताना करावी, ह्यातून नासाची पोटदुखी स्पष्ट होते. जोर्पयत प्रत्यक्ष वाहते पाणी, मग ते गढुळ का असेना, पाहायला मिळत नाही, तोर्पयत अशा दाव्यांना अर्थ नाही.
 
(लेखक ज्येष्ठ विज्ञान अभ्यासक आणि लेखक आहेत.)