शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
2
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
3
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
4
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
5
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
6
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
7
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
8
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
9
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
10
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
11
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
12
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
14
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
15
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
16
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
17
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
18
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
19
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
20
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे

नन्नाचा पाढा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 23:40 IST

महापुराने सांगली जिल्ह्यातील चार तालुके आणि १०४ गावांना विळखा घातला. अशा मोक्याच्या वेळीच यंत्रणांचा कस लागतो; पण तिथे ना समन्वय दिसला, ना तयारी, ना गांभीर्य !

ठळक मुद्देमहापुराचे धडे

श्रीनिवास नागेआॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, पलूस, मिरज पश्चिम या चार तालुक्यांत महापुराने हाहाकार उडाला. १०४ गावांना कृष्णा आणि वारणा नद्यांच्या महापुराने विळखा घातला. ५२ गावांना अंशत: फटका बसला. शासकीय आकडेवारीनुसार तीन लाखांवर लोक पूरबाधित झाले.

पावणेदोन लाख लोकांचे स्थलांतर करण्यात आले. मुसळधार पाऊस, कोयना-वारणा धरणांतून अचानक वाढलेला विसर्ग, पूरपट्ट्यातील अतिक्रमणे आणि जिल्हा प्रशासन, जलसंपदा (पाटबंधारे) विभाग, आपत्ती निवारण केंद्र, पोलीस मदत केंद्र, महापालिका मदत केंद्र यांच्या समन्वयात त्रुटी राहिल्याने आणि संपर्क यंत्रणा कोलमडल्यामुळे महापुराचे संकट गडद झाले.

समन्वयातील त्रुटीमहाबळेश्वरपासून नृसिंहवाडीपर्यंत कृष्णा नदीला २४ नद्या-उपनद्या मिळतात. त्यांना पोटात घेऊन ती पुढे जाते. चौदा वर्षांपूर्वी म्हणजे २००५ मध्ये आलेल्या महापुरापेक्षा आताचा महापूर मोठा होता. कृष्णा आणि तिला मिळणाऱ्या सर्वच नद्या-उपनद्यांच्या प्रवाहाची उंची पहिल्यांदाच इतक्या पातळीवर गेली. एकाच वेळी बहुतांश नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. यावर्षी धोक्याच्या पूररेषेने एकदम पाच मीटरने उसळी घेतली. धरण क्षेत्रासह नदीच्या प्रवाहक्षेत्रात जोरदार पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टी होत असताना कोयना आणि वारणा (चांदोली) ही धरणे ५ आॅगस्टला जवळपास शंभर टक्के भरली होती.

निम्मा पावसाळा शिल्लक असताना ती एवढी भरण्याची गरज नव्हती. शिवाय २५ जुलैलाच पन्नास टक्क्यावर भरलेल्या कोयना आणि वारणा धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात व्हायला हवी होती. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी धरण भरणार नाही, अशा भीतीने पाणी सोडण्याचे नियोजन झाले नाही. धरण आधीच भरत आलेले, त्यात सलग अतिवृष्टी झाली.

परिणामी ३ आॅगस्टपासून कोयनेतील विसर्ग दहा हजारावरून एकदम एक लाखावर नेण्यात आला. जलसंपदा, नगरविकास विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील समन्वयात त्रुटी राहिल्यानेच ऐनवेळी विसर्ग वाढवण्यात आला.कोयनेचा विसर्ग सुरू झाला की ते पाणी कृष्णा नदीत किती वेळात येते, किती वेळात कोठे येते याची इत्थंभूत गणितीय माहिती जलसंपदा विभागाकडे आहे. अद्ययावत पूरसंदेश यंत्रणेमुळे तासातासाला अपडेट मिळत होते, तरीही समन्वय झाला नाही.

इशा-याकडे मुख्य यंत्रणेचे दुर्लक्षआॅगस्टच्या सुरुवातीलाच महापूर येण्याचा अंदाज येत होता. काही पाटबंधारे अधिकाऱ्यांचेही तेच मत होते. मात्र याकडे प्रशासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केले. महापालिका, पाटबंधारे, महसूल विभागातील दोन डझनभर निवृत्त अधिकारी सांगली परिसरात राहतात. त्यांना मागील महापुराचा अनुभव आहे. नद्यांचे क्षेत्र, गावे-शहरांचे नकाशे त्यांना तोंडपाठ आहेत. महापूर येत असताना आणि आल्यावर त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेतला गेला नाही. 

बचावयंत्रणा अक्षमलोकवस्त्यांना महापुराच्या पाण्याने वेढले असताना, लोकांना बाहेर काढण्यासाठी शासकीय यंत्रणा पुरेशी आणि सक्षम नव्हती. बचाव पथकांना पाचारण करण्यास उशीर झाला. त्यातच ही पथके त्यांच्या केंद्रांपासून येण्यासही विलंब झाला. खराब हवामान, बंद मार्ग यामुळे काही पथके लोणावळ्यातून परत गेली. त्यांना सांगलीत पोहोचण्यासाठी पर्यायी व्यवस्थाच करण्यात आली नव्हती. एनडीआरएफची टीम आली; पण बचावकार्यासाठी कोठे जायचे याचा संदेशच सुरुवातीला त्यांना मिळत नव्हता. मोबाइल-दूरध्वनी बंद झाल्यानंतर आपत्ती निवारण केंद्राचे, अधिकाºयांचे मोबाइल क्रमांक देण्यात आले; मात्र यातील बहुतांश बंद होते. त्यांच्याशी संपर्क साधता आला नसल्याने पुरात अडकलेल्यांना परिस्थितीशी निमूटपणे सामना करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. काही बोटी नादुरुस्त झाल्या. नव्याने बोटी मागविण्यास ८ आॅगस्ट उजाडावा लागला. मोठ्या प्रमाणावर यांत्रिकी बोटी, हेलिकॉप्टर, लाईफ जॅकेट्सची गरज होती, मात्र तेवढी यंत्रणा व तत्परता दिसून आली नाही. महापालिकेची यंत्रणा गतिमान नसल्याचाही फटका बसला.

अपु-या बोटी, अप्रशिक्षित कर्मचारीमहापुराने गावे गिळंकृत केल्यानंतर बोटींची संख्या वाढवली गेली. १० आॅगस्ट दिवशी जिल्ह्यात असलेल्या आणि बाहेरून आलेल्या बोटींची संख्या ९५ झाली. तीच जर आधी वाढवली असती तर पुरात अडकलेल्यांना योग्य वेळी बाहेर काढणे शक्य झाले असते. कृष्णा-वारणा नद्यांच्या काठावर अत्याधुनिक, वेगवान आणि शक्तिमान बोटी उपलब्ध करून द्याव्यात, असे २००५ मध्ये ठरले होते. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींकडे अशा बोटी असाव्यात, महापुरात लोकांना वाचविण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाºयांची टीम असावी, असाही निर्णय झाला होता. सुसज्ज बोटी आणि प्रशिक्षित कर्मचाºयांऐवजी यंदा गळक्या-नादुरुस्त बोटी, लाकडाच्या जड होड्या आणि अप्रशिक्षित पथकांवर मदतकार्य सुरू होते. काही यांत्रिक बोटींना इंधन उपलब्ध नव्हते. 

फक्त पाच यांत्रिक बोटी!सांगलीसह कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या चार जिल्ह्यांसाठीचे विभागीय आपत्ती व्यवस्थापन केंद्र २००६ मध्ये सांगलीत स्थापन करण्यात आले. या केंद्राकडे केवळ पाच यांत्रिकी बोटी आणि ५० लाइफ जॅकेट्स आहेत. सांगली शहर परिसरात ५० हजारांवर लोक अडकले असताना, केवळ पाच यांत्रिकी बोटी मदतीसाठी धावत होत्या. आपत्ती व्यवस्थापन करताना या धड्यांचा अभ्यास व्हावा, हीच अपेक्षा!

shrinivas.nage@lokmat.com

(लेखक लोकमतच्या सांगली आवृत्तीचे प्रमुख आहेत.)

 

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरGovernmentसरकार