शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
6
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
7
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
8
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
9
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
10
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
11
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
12
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
13
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
14
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
15
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
16
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
17
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
18
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
19
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
20
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गूढरम्यतेची चाहूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 15:00 IST

प्रेक्षकांना गूढ रहस्य असणाºया मालिका सध्या छोटया पडदयावर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता याच गूढ रहस्य असणाºया मालिकांचे ...

प्रेक्षकांना गूढ रहस्य असणाºया मालिका सध्या छोटया पडदयावर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता याच गूढ रहस्य असणाºया मालिकांचे प्रमाण मराठीमध्येदेखील पाहायला मिळत आहे. कलर्स मराठी वाहिनी वर चाहूल ही नवीन मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  ही मालिका १२ डिसेंबर पासून बघायला मिळणार आहे. प्रत्येकाला जाणीवे पलीकडच्या गूढरम्यतेचं आकर्षण असतं आणि त्याविषयी भीतीही असते. याच भयाच्या भावनेला चाहूल या मालिकेतून साद घालण्यात येणार आहे. एखाद्यावर जीवापाड प्रेम केल्यानंतर त्याला विसरणं अशक्य असतं आणि ती व्यक्ती आपली न होता कोणा दुसºयाची होणार आहे, ही भावना तर असह्य असते. मग सुरू होतो खेळ, एक अधुरी प्रेमकहाणी जन्मजन्मान्तरी पूर्ण करण्याचा... आयुष्यसंपलं तरी प्रेम संपत नाही, या न्यायाने रहस्याच्या आधारे भीती आणि प्रीतीच्या प्रवासाचा... हीच चित्तथरारक प्रेमकहाणी चाहूल मालिकेत साकार होणार आहे. चांगल्या कमार्चं फळ हे चांगलंच मिळतं आणि दुष्कृत्याचं फळ हे वाईटच असतं, या सर्वमान्य कर्मसिद्धांतावर ही मालिका आधारित आहे. गूढ-रहस्य, अतृप्त इच्छा आणि अपुरं प्रेम या सगळ्यांचे नातेसंबंधांवर, कुटुंबावर उमटणारे पडसाद म्हणजे चाहूल ही मालिका. चाहूल या मालिकेचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लीझान ही परदेशी युवती या मालिकेत जेनिफरची व्यक्तिरेखा रेखाटत आहे. एका परदेशी युवतीने नायिकेची भूमिका करणं, हे मराठी दैनंदिन मालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे.याखेरीज कमला मालिकेत अभिनयाची छाप उमटवलेला अभिनेता अक्षर कोठारी सजेर्रावची भूमिका साकारणार आहे. तसेच शाश्वती पिंपळकर, माधव अभ्यंकर, उमा गोखले, विजय मिश्रा, प्रज्ञा जाधव हे कलाकारही या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.