शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आईची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 07:00 IST

मुलांच्या सद्गुणांनी सर्वाधिक आनंद जिला होते ती आई. मुलांबद्दल कितीही सांगा आनंदानं सांगणाऱ्याला ऐकून घेणारी व्यक्ती म्हणजे आई.

आमीन चौहानबालकाचा पहिला गुरु, संस्काराचे केंद्र अन् सुधारणेची पहिली पायरी असते आई. बालकाला सर्वाधिक प्रेम आणि सहवास देणारी आई. मुलांच्या सद्गुणांनी सर्वाधिक आनंद जिला होते ती आई. मुलांबद्दल कितीही सांगा आनंदानं सांगणाऱ्याला ऐकून घेणारी व्यक्ती म्हणजे आई.लहान मुलांसाठी सबकुछ असते ती आई आणि मुलांबाबत सबकुछ माहीत असणारी कुटुंबातील व्यक्ती म्हणजे आई. बालक वडिलांपेक्षा आईच्या सहवासात अधिक असतो. व्यवसाय आणि इतर कार्यव्यस्ततेतून अनेक वेळा वडील मुलांसाठी वेळ काढत नाहीत. त्यामुळे शाळांमध्ये आयोजित पालकसभांना पुरुष पालकांकडून प्रतिसाद कमीच मिळतो.मुलांच्या गुणवत्ता विकासाबाबत कुणाशी बोलावे, असा प्रश्न शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांना पडतो. बालकांविषयी पालकांशी संवाद होणे आवश्यक असल्याने वडिलांऐवजी आईशी संवाद साधता आला तर? याच विचारातून आम्ही गेल्या काही वर्षांपासून आमच्या शाळेत 'आईची शाळा' आयोजित करतो. ही शाळा यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस तालुक्यातील निंबा या गावी असलेली जि.प. उच्च. प्रा. शाळा होय. मकरसंक्रांतीला महिला हळदी कुंकवासाठी सर्वत्र वेळ काढून जात असतात. तेव्हा आईचा वेळ तिच्या पाल्यासाठी मिळवायचा प्रयत्न म्हणून शाळेत असे हळदी कुंकवाचे कार्यक्रम आम्ही घेऊ लागलो. यासाठी शाळेतील महिला शिक्षकांचा पुढाकार आवश्यक आणि तेवढाच महत्त्वाचा असतो. संक्रांतीच्या काळात आयोजित या आईच्या शाळेसाठी ‘वाण’ आवश्यक असते. मग यालाही स्वच्छतेची जोड देत स्वच्छता साधने जसे पाणी घेण्याचे ओगराळे, पिण्याचे पाणी गाळण्याची चाळणी, छोटा अंघोळीचा साबण, छोटा हँडवॉश, झाडू, केरसुणी, नेलकटर, स्वच्छतेचं माहितीपत्रक असे साहित्य निवडले.आईच्या शाळेत महिलांना आधी बौद्धिक, वैचारिक मेजवानी द्यायची आणि नंतर वाण व इतर सोपस्कार पूर्ण करायचे. अशा आईच्या शाळेतून वर्गशिक्षक यांचा थेट माता पालकाशी संपर्क येऊन मुलांबाबत चर्चा होते. मातापालक आणि शिक्षकांचा परिचय होतो. मुलांची बलस्थानं आणि उणिवा थेट पालकांपर्यंत पोचविता येतात. आईशी बालक मनमोकळेपणाने बोलतात. तो आपल्या समस्या, अडचणी, कल्पना, मागण्या आईसमोर मांडतो. तेव्हा आई आणि बालकातील सहज होणाºया या संवादाचा उपयोग मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी करून घेण्यात आईची शाळा खूप उपयुक्त सिद्ध झाली आहे. शिवाय मुलांच्याही शाळेविषयी काही समस्या, अडचणी, तक्रारी असू शकतात. मुले या गोष्टी आईशी शेअर करीत असतात. तेव्हा या बाबी शाळेपर्यंत पोचविण्यासाठी आईजवळ ही नामी संधी असते.अनेक माता पालक या संधीचा उपयोग करुन घेतात. शिक्षक पालक असा संवाद होऊन बरेच समज गैरसमज यातून दूर होतात. शैक्षणिक विकासासाठी शाळांमध्ये वातावरणाची निर्मिती आवश्यक असते. शाळांमध्ये आजकाल अनेक सामाजिक सण, उत्सव साजरे केले जातात. तेव्हा सामाजिक सणांचा अशा वातावरण निर्मितीसाठी उपयोग करायला हवा.वातावरण निर्मितीचा हा अभिनव प्रयोग मुलांच्या, शाळांच्या व समाजाच्याही उपयोगाचा नक्कीच सिद्ध होईल. गरज आहे ती पुढाकार घेऊन या सणांना सकारात्मक वळण देण्याची.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र