शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आवरा आधी मन, मग कपाट!

By admin | Updated: May 21, 2016 14:14 IST

‘अल्टिमेट मिनिमलिस्ट’ म्हणून गांधीजींचे नाव आजही मोठय़ा आदराने घेतले जाते. आपल्या बुद्ध-गांधी तत्त्वज्ञानाचा नव्या मिनिमलिझमशी मेळ सांधणारा एक तरुण भारतीय ब्लॉगर हार्दिक नागर. तो सांगतो, जाणीवपूर्वक आयुष्य जगायचे असेल तर मल्टीटास्किंग सोडून द्या आणि एका वेळी एकच गोष्ट करा. त्या क्षणामधे, त्या क्षणापुरतं पूर्णपणो जगा हा पुढचा टप्पा.

- शर्मिला फडके
भारतीय तत्त्वज्ञान-संस्कृतीत रुजलेली मिनिमलिझमची मुळं
 
you may have occasion to possess or use material things, but the secret of life lies in never missing them.” - Gandhi
बुद्ध आणि गांधी यांच्या विचारांशी परिचय असलेल्या कोणत्याही भारतीय व्यक्तीला कमीत कमी वस्तूंचा संचय, काटकसर, पुनर्वापर, साधी राहणी या मिनिमलिझमच्या मूलभूत संकल्पना जवळच्या वाटल्या तर नवल नाहीच. मात्र मिनिमलिझम हे हल्लीच्या काळातले एक पाश्चात्त्य, अति समृद्धतेमधून आलेले खूळ आहे आणि विशेषत: इथली बहुसंख्य जनता अजूनही अभावाच्या छायेखाली जगत असताना काही मोजक्या, शहरी नवसमृद्ध लोकांनी हे मिनिमलिझमचे खूळ डोक्यावर घेणो हा एक फार मोठा उपहास आहे असे वाटणारेही अनेक आहेत. त्यांच्याकरता मिनिमलिझमची भारतीय मुळे नेमकी काय आणि त्यांचा सामान्य, गरीब, मध्यमवर्गीय भारतीयांच्या जगण्याशी काय संबंध आहे हे जाणून घेणो महत्त्वाचे आहे. 
अति समृद्धता आणि अभाव यांच्या राहणीमानामधली दरी कधीच सांधली जाणार नाही हा भ्रम बुजवण्याचे सामथ्र्य काही अंशी असलेच तर फक्त मिनिमलिझम विचारसरणीमधेच आहे. हे ओळखूनच महात्मा गांधींनी साधेपणा आणि कमीत कमी जीवनावश्यक वस्तूंच्या राहणीतून केवळ भौतिकच नाही तर मानसिक, वैचारिक मिनिमलिझमचा जो पाया घालून दिला आहे तो आजच्या सर्व मिनिमलिझमचा आदर्श आहे. तणावमुक्त जगण्याची गुरु किल्ली साध्या, सोप्या जीवनशैलीमधे आहे हे त्यातूनच पहिल्यांदा जगापुढे आले. 
‘अल्टिमेट मिनिमलिस्ट’ म्हणून गांधींचे नाव आजचे अनेक आधुनिक मिनिमलिस्ट आदराने घेतात ते त्याकरताच. मृत्यूनंतर महात्मा गांधींच्या खासगी मालमत्तेमधे त्यांचे रोजच्या वापरातले घडय़ाळ, चष्मा, चपला आणि जेवणाचा वाडगा इतक्याच गोष्टींचा समावेश होता ही गोष्ट त्यांच्या वागणुकीतला आणि विचारांमधला साधेपणा, अल्टिमेट मिनिमलिझम सिद्ध करायला पुरेशी आहे. 
आपल्या आधुनिक जीवनशैलीला अनुसरून या तत्त्वांची मांडणी नव्याने करण्याचे श्रेय मात्र जोशुआ आणि लिओ बबुतासारख्या पाश्चात्त्य ब्लॉगर्सचे. त्यांनी सुरू केलेल्या या मिनिमलिझम ब्लॉगसाखळीत आपल्या पौर्वात्य, बुद्ध-गांधी तत्त्वज्ञानाच्या वारशातून आलेल्या विचारांचा नव्या मिनिमलिझमशी मेळ सांधणारा एक तरुण भारतीय ब्लॉगर आपल्या वेगळेपणामुळे उठून दिसतो.  
‘द इंडियन मिनिमलिस्ट’ अशा नावाचा हा ब्लॉग चालवतो हार्दिक नागर हा केवळ 19 वर्षे वयाचा, कॉमर्स कॉलेजात शिकणारा एक भारतीय तरु ण मुलगा. लिहिण्याची, तत्त्वज्ञानावरची पुस्तके वाचण्याची आवड असणारा हार्दिक आयुष्याचा नेमका अर्थ शोधण्याची धडपड करत असतो आणि त्याकरताच शिक्षण चालू असताना तिस:या  जगातल्या गरीब, दारिद्रय़रेषेखाली जगणा:या देशांमधे काम करणा:या एका आंतरराष्ट्रीय एनजीओसोबत काम करतो. 
मिनिमलिझमवरचे ब्लॉग्ज वाचत असताना हार्दिकला या संकल्पनेमागची भारतीय मुळे दिसायला लागली होती. त्यामुळेच कितीही कपाटे आवरली, नव्या वस्तूंच्या खरेदीवर संयम ठेवला, अडगळ दूर करण्याचे सर्व उपाय योजले तरी मुळात जोवर आतून हे विचार आपल्यात रुजत नाहीत तोवर डी-क्लटरिंगचे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. भारतीय तत्त्वज्ञानाला अनुसरून बदल आतून बाहेर व्हायला हवा. आधी बाहेरचे आणि मग आत असे शक्य होत नाही हे लक्षात आल्यावर त्याने आपले प्रयत्न त्या दिशेने सुरू केले आणि मग आपल्या अनुभवांवर लिहायला सुरुवात केली. 
मटेरिअलिझम आणि अति ग्राहकवादी वृत्ती जोपासणारी बाजारपेठ हे मानसिक शांतता नष्ट करण्याचे, तणाव वाढण्याचे, नैराश्यग्रस्ततेचे कारण आहे हे माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष करून आजची तरु ण पिढी नुसतीच ‘काहीतरी बदल हवा’ असे म्हणत आयुष्य समूळ बदलून टाकणारे बाह्य उपाय शोधत, अस्वस्थपणो, दिशाहीन फिरत राहतात, त्यांच्याकरता मी माझा हा ब्लॉग लिहितो, असे हार्दिक सांगतो. अशा अस्वस्थ, दिशाहीन तरुणांच्या मनात असंतोष, नाराजी, चीड, नैराश्य अशा नकारात्मक भावनांची अडगळ माजलेली असते. ती दूर करणो आधी महत्त्वाचे. या पायावरच त्यांना त्यांचे पुढचे आयुष्य मिनिमलिस्ट जीवनशैलीला अनुसरून उभारता येईल.  
मिनिमलिझमची सुरु वात आपल्या मनापासून करण्याचे हे तत्त्व अर्थातच अनुसरायला सर्वात कठीण. मात्र हार्दिकच्या मते काही साध्या वाटणा:या, पण महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आपण जर स्वत:ला दिली आणि त्या उत्तरांमागची कारणो, जी तुमच्या आसपासच आहेत ती शोधली तर ही सुरु वात सहज सोपी होऊ शकते. ते प्रश्न म्हणजे- तुमचे आयुष्य आनंदी आहे का? तुमच्या आयुष्यात असणारी माणसे तुम्हाला आनंद देतात का? कोणता बदल आयुष्यात होणो तुम्हाला तातडीने आवश्यक वाटते? तुमच्या विचारांमधे भावनांची इतकी गुंतागुंत का आहे? कोणती गोष्ट तुम्हाला दु:खी करते? सगळ्यात जास्त हसू तुम्हाला केव्हा येते? आनंदाने नाच-गाणी केव्हा केलीत तुम्ही शेवटी? कसले ओझे आहे तुमच्या मनावर? असमाधानी नेमके का वाटते? तुमचे करिअर मनाला आनंद देणारे आहे का? तुमचे मुक्त जगण्याचे स्वातंत्र्य ते हिरावून घेते आहे का? - असे तरुण मनालाच पडू शकणारे अनेक मूलभूत प्रश्न, मग त्यांचे उपप्रश्न हार्दिक एकामागोमाग एक विचारतो आणि त्यांची उत्तरे लिहून काढायला सांगतो. गरजा आणि इच्छा यामधला नेमका फरक काय इथवर येऊन ही प्रश्नमालिका संपते. या प्रश्नांची उत्तरे आणि त्यावरचे उपाय हे आनंदी, सुखी आणि यशस्वी म्हणजेच मिनिमलिस्ट आयुष्याचे गणित आहे असे हार्दिकचे मत. त्याच्या ब्लॉगवर येणारे अनेक भारतीय, अभारतीय तरु ण ही गणिते आपापल्यापरीने सोडवण्याचा प्रयत्न करत राहतात. उत्तरे मिळवायला अनेक दिवस, आठवडे, महिने लागू शकतात याचे भान त्यांना तो देतो. 
आधी मन आवरा आणि मग कपाट असे त्याच्या या ब्लॉगचे मुख्य सूत्र. प्रश्नांची उत्तरे शोधायला सातत्याने विचार करणो ही या आवरण्याची गरज असलेल्या कपाटाची किल्ली शोधण्याचा पहिला टप्पा. त्यानंतर मग शांतपणो, जाणीवपूर्वक आयुष्य जगायचे असेल तर मल्टीटास्किंग सोडून द्या आणि एका वेळी एकच गोष्ट करा. त्या क्षणामधे, त्या क्षणापुरते पूर्णपणो जगा हा पुढचा टप्पा. 
मिनिमलिझम संकल्पनेतली भारतीय परिमाणो शोधण्याचे प्रयत्न करणारा हार्दिक नागर एकटाच नाही. भारतीय तत्वज्ञान आणि संस्कृतीमधे खोलवर रुजलेल्या मिनिमलिझमच्या मुळांबद्दल अधिक पुढच्या वेळी.
 
उलटा पिरॅमिड!
हार्दिकच्या प्रयत्नांचा भर वस्तूंची अडगळ दूर करण्यापेक्षा मनातली वैचारिक अडगळ दूर करणो, तणावांची मुळे उपटून दूर करणो, ताणमुक्त, आनंदी आयुष्य उभारण्याचे टप्पे एक एक करून गाठणो यावर आहे. त्यामुळे मिनिमलिझमकडे जाण्याच्या त्याच्या प्रयत्नांचा पिरॅमिड पूर्ण उलटा आहे. जोशुवा किंवा लिओ बबुता यांच्या मिनिमलिझमच्या प्रयत्नांची अखेर जिथे, ज्या टप्प्यावर होते, तिथपासून आपल्या प्रयत्नांची सुरुवात करण्याचे आव्हान हार्दिकने पेलले. अर्थात त्याचीही अजून ही फक्त सुरु वात आहे.
 
(लेखिका ख्यातनाम कला समीक्षक आहेत)