शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

मॉँटुकले दिवस

By admin | Updated: March 5, 2016 14:40 IST

संदेश कुलकर्णीचा शेजारी. मॉँटी. तीन वर्षाचा. मोठं असण्याच्या ओङयाने झुकलेल्या संदेशच्या आयुष्यात मॉँटी डोकावतो आणि मॉँटीच्या जगण्यात संदेश. त्यातूनच साकारतं.

 ‘मॉँटुकले दिवस’ आणि ‘शर्वरीच्या कविता’ ही नवी पुस्तकं  लहान मुलामुलींच्या भावविश्वाविषयी किंवा लहान मुलांमुळे घडलेल्या भावविश्वाविषयी काही सांगू पाहतात.  लेखक, दिग्दर्शक संदेश कुलकर्णी आणि  कवी अरुण शेवते यांच्या या पुस्तकांच्या निमित्तानं लहान मुलामुलींचं भावविश्व, त्यांचा भवताल, त्यांच्यासाठी निर्माण होणारं साहित्य, त्यांचा विचार याविषयी त्यांच्याशी मारलेल्या या गप्पा.
 
शर्वरी ही अरुण शेवतेंची एकुलती एक मुलगी. तिच्या अवतीभवती असताना जगण्यात जो हळुवारपणा आला, तो टिपण्याचा प्रयत्न म्हणजेच. शर्वरीच्या कविता
 
 
- सोनाली नवांगुळ
 
 
आपल्या आसपास लहान मुलं असतातच, पण त्यांना न्याहाळायची युक्ती बहुधा नसते हातात. ती तुमच्या हातात कशी आली?
संदेश- मला रिकामटेकडेपणा आवडतो. त्यातून गंमत करण्याची सवड मिळते. एखाद्या आईच्या खांद्यावरून मूल दिसत असेल तर त्याची नजर खेचून त्याला तोंड वेडंवाकडं करून दाखवण्याचा मोह रोखता येत नाही. मुळात समोरच्याशी इंटरॅक्ट करताना आपण उपयोगमूल्य बघतो. मुलं ते आपल्यात बघत नाहीत. त्यांना चूक-बरोबर काही बघायचं नसतं. पटलं नाही तर ती कट्टी करून निघून जातात. आपणही उपयोगमूल्य बघू नये. माझी आई कधीकाळी पाळणाघर सांभाळायची. त्यामुळे लहान मुलांबरोबर वावरण्याचं, रेंगाळण्याचं घरगुतीपण माङयाकडे अगोदरपासून होतं.
लहान मुलं काही फक्त गोडच नसतात, ती कर्कश होतात, कपडे बरबटवतात, उपद्व्याप करतात. मग?
संदेश- त्यांचा हा व्यावहारिक भाग सांभाळण्यात मला काही अडचण नाही, पण ती माझी नित्यनैमित्तिक जबाबदारी नव्हती. खूप झालं की मीही चिडचिडायचोच. समोरच्या लहानग्याला मी ओरडून बोललो आहे, पण लाइन क्रॉस झाल्याचं कळल्यावर शांत व्हायचो. मी मुळात खेळगडी म्हणून मुलांकडे पाहतो. लहान मुलं अननुभवी असतात. त्यांच्यातलं सव्र्हायवल इन्स्टिंक्ट, दांडगं आणि रॉ! महत्त्वाचं म्हणजे भूतकाळाचं ओझं पाठीवर नसल्यामुळं ती केवळ वर्तमानात राहू शकतात. प्रत्येक गोष्टीचं त्यांना निखळ कुतूहल असतं. त्यांची शक्ती कमी असते, दुखवायच्या गोष्टी त्यांनी शिकलेल्या नसतात. सव्र्हायवलच्या नियमानुसार ते मॅन्यूप्यूलेट करतं आपल्याला.
‘बाळपणां’मध्ये काय फरक पडलाय इतक्या वर्षात?
संदेश- सुखसोयींचा फरक आणि निसर्गाचा अभाव! माङया लहानपणी माझं पेरूच्या झाडावर घर होतं. घरात गजगजाट झाला की मी तिथं जाऊन बसायचो. आज निसर्ग मुलांच्या रोजच्या जीवनाचा भाग नाही. बरेचदा मुलं एकटी गॅजेट्सवर गेम खेळतात. मुलं आडनिडय़ा वयात गेली, शरीरस्पर्शाच्या सवयीतून बाहेर आली की हे किडे चालू होतात. रोजचे संबंध फॉर्मल होतात, नव्या गुंतवणुकी सुरू होतात. त्यांच्या पाठीवरची मोठाली दप्तरं, या क्लासमधून त्या क्लासमध्ये उडय़ा पाहिल्या की जाच वाटतो. मी लहानपणी क्लासेस करत नव्हतो तेव्हा काय करायचो? तर विशेष काहीच नाही! निसर्गाचा सहभाग जगण्यातून जितका कमी होत जाईल व त्याचा भाग व भान असणं रोडावत जाईल तितकं जगणं हेल्पफूल राहणार नाही असं वाटतं. काळ ठरवेलच!
 
शर्वरीच्या कविता’ मधून तुम्ही मुलीचं भावविश्व निरखलंय का?
शेवते- नाही. तशा कविता नव्हेत या. त्या उत्स्फूर्तपणो सुचल्या. ती लहान असताना एकदा मी नाटकाला चाललो होतो. ती हाताला विळखा घालत म्हणाली, ‘आज फादर्स डे आहे. लौकर या. मग आपण गप्पा मारू.’ त्यावेळी तिच्या आर्जवातून मला काही सुचलं व लिहित गेलो. नंतर पाच सहा दिवस जे आत आहे ते कवितेतून बाहेर येत गेलं. मुळात ‘मुलगी झाली’ याचाच आनंद मला जास्त होता, आहे. घरात स्त्रीत्व येतं ते मला मोलाचं वाटतं.
मुलं वाढवताना विचार हवा ना डोक्यात?
शेवते- झरा वाहतो त्याप्रमाणो वाहू द्यावं जगणं. ठरवू नये. झ:याच्या सहज खळखळण्यात समृद्धता आहे. लहान मुलाच्या हातून एखादी कपबशी फुटली की आपली प्रतिक्रि या काय असते? - ‘काही अक्कल आहे की नाही? लक्ष कुठेय तुझं?’ हेच जर मोठय़ा माणसानं केलं तर काय म्हणू आपण? तत्काळ प्रतिक्रि या चुकीची असू शकते. मुलांना कळतं, आपलं स्वतंत्र अस्तित्व त्यांना जाणवतं. त्याला बाधा पोहोचेल तर प्रश्न कठीण होईल. संवाद झाल्यावर प्रश्न सुटतात हे जाणवलं तर मूल अधिक मोकळं होईल. विचार हवा तो प्रतिक्रि येचाच! आपण चुकल्याचं कळलं, की मी लगेच म्हणतो, ‘बच्चा, सॉरी!’ - सोपं आणि संवादी आहे हे.
मुलांचे शिक्षणाचे निर्णय आणि बाकी आवडीनिवडी.. सगळं समजून घेता येतं?
शेवते- मुलांच्या शिक्षणात आपण मदत करावी, पण छोटीमोठी मतं व निर्णय त्यांना घेऊ द्यावेत. त्यांचा कल काय ते पाहावं. आपली माया असते मुलांवर, पण ती दाखवण्याची भाषा सुधारायला हवी. मुलांशी बोलावं, गुणअवगुण सांगावेत, पण अधोरेखित करू नयेत. संवादातून प्रश्न खरंच सुटतात. आपलं मूल सर्कशीतला प्राणी नव्हे. त्यानं सिंहाच्या आयाळीत हात घालावा, वाघाच्या पाठीवर बसावं, विदुषकासारखे विनोद करावेत. अशा अपेक्षा गैरच. त्यांचं व्यक्तिमत्त्व ओळखून त्यांच्या वाढीला जागा पुरवणं हे पालक म्हणून आपलं काम. बस, एवढंच.
वाचत नाहीत मुलं! इंग्रजी माध्यमामुळे मातृभाषा वाचता येत नाही..
शेवते- मुलांवर अनेक गोष्टी लादल्या जातात, त्यापैकी एक वाचनही. एखाद्याला वाचायची आवड नसते. कदाचित गप्पा करायची, खेळायची, चित्रंची असेल. माझी मुलगी दहावीपर्यंत मराठी माध्यमात शिकली. नंतर म्हणाली, इंग्रजी माध्यम घेणार. का? विचारलं तर म्हणाली, मला इंग्रजी भाषा आवडते. आधी ती मराठी वाचायची, नंतर इंग्रजी वा्मय वाचायला लागली. भाषा कुठली का वाचेना, वाचताना आनंद मिळतो आणि भाषेशी संबंध आहे हे महत्त्वाचं नाही का?