शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

चुकले, आणि हुकले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:05 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट झाली, त्याच रात्री  भाजपच्या एका बड्या नेत्याशी  फोनवर बोलणे झाले.  ते म्हणाले, ‘भाजप-राष्ट्रवादी अशी सत्ता बसतेय,  आमचा प्लॅन बी यशस्वी होतोय !’  - झाले मात्र भलतेच!!

ठळक मुद्देभाजपच्या रणनीतीचे तीनतेरा वाजले. अजित पवार तर टिकलेच नाहीत, उलट सिंचन, बँक घोटाळ्यात ज्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात इतकी वर्षे बसविले त्यांना सोबत घेऊन सरकार बनविले म्हणून भाजपवाले टीकेचे धनी बनले.

- यदु जोशी

शिवसेनेला आपल्याशिवाय पर्याय नाही, कमीअधिक खळखळ करतील; पण शेवटी उपमुख्यमंत्रिपद आणि वाढीव मंत्रिपदांवर समाधानी होत आपल्यासोबतच राहतील, असे  भाजपला निकालाच्या दिवसापासून वाटत होते; पण मुख्यमंत्रिपदावर कोणतीही तडजोड स्वीकारायची नाही, यावर उद्धव ठाकरे ठाम राहिले आणि शेवटपर्यंत झुकले नाहीत. आपले संख्याबळ शिवसेनेपेक्षा दुप्पट आहे मग आपण का नमायचं, अशी भाजपची भावना होती.काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि मुस्लीम व दलित व्होट बँकेवर मुख्यत्वे या पक्षाची मदार आहे, सध्या अ.भा. काँग्रेसमध्ये ए.के. अँटनींपासून दाक्षिणात्य नेत्यांचा प्रभाव आहे, राहुल गांधी हे केरळमधील मुस्लीमबहुल मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर कट्टर हिंदुत्ववादी शिवसेनेबरोबर काँग्रेस जाणार नाही हा भाजप नेत्यांचा ठोकताळा होता, तो सपशेल चुकला. 134 वर्षांच्या या   ‘ग्रँड ओल्ड लेडी’ने शिवसेनेला हिंदुत्ववादाऐवजी किमान समान कार्यक्रमात ‘सेक्युलॅरिझम’ स्वीकारायला लावला. पक्षाच्या एकूणएक आमदारांच्या दबावाखाली काँग्रेसचे नेतृत्व झुकले आणि त्यांनी शिवसेनेची पाठराखण केली. काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला पाठिंबा देणार नाही याची ‘व्यवस्था’ भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने केली असल्याचे भाजपचे राज्यातील काही नेते खासगीत सांगत होते. प्रत्यक्षात मात्र महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार सत्तारूढ झालेच पाहिजे यासाठी भाजपर्शेष्ठी प्रचंड आग्रही असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व खेळी निकराने खेळत असल्याचे शेवटपयर्ंत दिसलेच नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट झाली, त्याच रात्री भाजपच्या एका बड्या नेत्याशी फोनवर बोलणे झाले. ते म्हणाले, ‘भाजप-राष्ट्रवादी अशी सत्ता बसतेय, आमचा प्लॅन बी यशस्वी होतोय !’ -  झाले मात्र भलतेच. पवार यांनी भाजपसोबत जाण्यास सपशेल नकार दिला. शिवसेनेने नकार दिला तरी राष्ट्रवादीच्या साथीने सत्तेचा सोपान गाठू हा भाजपचा होराही साफ चुकला. मग एक शेवटचा प्रयोग केला गेला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना गळाशी लावून 23 नोव्हेंबरला सकाळीच फडणवीस आणि पवार अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री झाले.- शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांना, तसेच या तीन पक्षांचे सरकार यावे यासाठी सर्वस्व पणाला लावलेले शरद पवार, उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना तो मोठाच धक्का होता. पवारांनी मग आपल्या विश्वासू सहकार्‍यांना तहाची बोलणी करण्यासाठी अजितदादांकडे पाठविले; पण दादा दाद देईनात. मग फॅमिली ड्रामा झाला. आणाभाकाही झाल्या. प्रतिभाताई आणि सुप्रियाताईंच्या अर्शूंची फुले झाली म्हणतात, पण ते तितकेसे खरे नाही. तसे असते आणि अजितदादांना नात्यागोत्यांची इतकी जाणीव असती तर ते फडणवीस यांच्याबरोबर आधीच गेले नसते. दादांच्या परतण्यात अर्शुबंधापेक्षा सर्वोच्च न्यायालयाचा दणका हेच कारण आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतील दोनतृतीयांश म्हणजे 36 आमदार नव्हते हे जेवढे खरे आहे, तेवढेच त्यांच्याबरोबर कोणीही नव्हते असे समजणेही मूर्खपणा आहे. भाजपला शिवून परत आलेल्या अजितदादांना उपमुख्यमंत्री कराच, असा प्रचंड दबाव राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार शरद पवार यांच्यावर आणत आहेत यावरून अजितदादांची ताकद लक्षात यावी.अजित पवार यांची मुख्य मदार ही अध्यक्षपदाच्या गुप्त मतदानावर होती कारण, त्या परिस्थितीत त्यांच्या सर्मथक आमदारांनी भाजपच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारास क्रॉसव्होटिंग केले असते. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने त्यांची पंचाईत झाली आणि त्यांना परतीचा निर्णय घ्यावा लागला. तो निर्णय घेण्यासाठी अर्शुबंध हे कारण बनले. सर्वोच्च न्यायालय असा काही निर्णय देईल याचा अंदाज भाजपच्या दिल्ली-मुंबईतील नेत्यांना नव्हता का? - अर्थ एकच ! इथेही भाजपच्या रणनीतीचे तीनतेरा वाजले. अजित पवार तर टिकलेच नाहीत, उलट सिंचन, बँक घोटाळ्यात ज्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात इतकी वर्षे बसविले त्यांना सोबत घेऊन सरकार बनविले म्हणून भाजपवाले टीकेचे धनी बनले. त्याऐवजी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्यावेळी अजितदादांकडून बंड करविले असते तर यश मिळाले असते. कारण, त्या परिस्थितीत तीन पक्ष सर्वोच्च न्यायालयातही गेले नसते आणि अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदानाने झाली असती.आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आली आहे. अत्यंत अभ्यासू, आक्रमक नेते असलेले फडणवीस हे त्यांचे सन्मित्र राहिलेले नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सामना करताना दिसतील.जाता जाता : गेल्या आठवड्यात याच ठिकाणी रणांगणात अफाट शौर्य गाजविणारा; पण विजयाविना धारातीर्थी पडलेला योद्धा असे खासदार संजय राऊत यांचे वर्णन केले होते. कारण फडणवीस-अजित पवार जोडी सत्तेत आली होती. नंतर घटनाक्रम बदलला. उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाले. संजय राऊत आता जिंकलेले योद्धा ठरले आहेत. त्यांच्याबाबतचा गेल्या आठवड्यातील माझाही ठोकताळा चुकलाच.yadulokmat@gmail.com(लेखक ‘लोकमत’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक आहेत.)