शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मीटूनं दिलेलं आपल्याल्या कळलं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 07:20 IST

वेळीच अन्यायाला विरोध करणं आणि विरोध करूनही तो थांबत नसेल तर कायद्याचा आधार घेणं या दोन गोष्टी महिलांना वेळीच जमणंही गरजेचं वाटतं.

- गोरक्ष काळे, नाशिक

समाजात घडणारी कोणतीही चळवळ ही समाजाला एक दृष्टी आणि भान देत असते. ‘मीटू’ चळवळीनेही हे भान प्रत्येकाला दिलंय असं वाटतं. ‘मंथन’मधील असीम सरोदे यांचा ‘मीटूनंतर काय?’ हा लेख वाचताना या गोष्टीची जाणीव प्रकर्षाने होत होती.

मीटूचं वादळ आलं. आरोप-प्रत्यारोपाचा धुराळा उडाला. पण आता वादळाचा जोर ओसरल्यावर पुढे काय, हा प्रश्न सध्या प्रत्येकाच्याच मनात आहे. असीम सरोदे यांनी त्याचं उत्तर लेखातून दिलंय. पण तरीही सामान्य माणूस त्याच्या त्याच्या पातळीवरही खूप काही करू शकतो. प्रत्येकानं (इथे पुरुषच म्हणायचं आहे.) आपल्या दृष्टिकोनावर काम करून बघितलं तर. हा दृष्टिकोन फक्त कामाच्याच ठिकाणी  बदलून चालणार नाही. तो घरातल्या महिलांच्या बाबतीतही बदलायला हवा. म्हणजे कामाच्या ठिकाणी पुरुषांना महिलांशी समानतेनं आणि आदरानं वागण्याचे विशेष प्रयत्न करावे लागणार नाहीत. महिलांच्या बाबतीत आदर बाळगणं ही पुरुषांच्या बाबतीत सवयीची गोष्ट होईल असं वाटतं. अर्थात स्त्री-पुरुष समानता याबद्दल खूप बोललं जातं. पण ही गोष्ट किती अवघड आहे हे मीटूने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट वाटते ती ही की स्त्रीनं घरीदारी आपल्यावर झालेल्या अन्यायाला त्वरित वाचा फोडणं गरजेचं आहे. पूर्वी आवाज उठवल्यावर काय होईल, अशी भीती स्त्रियांना होती; पण आता जर स्त्रीच्या म्हणण्यात तथ्यं असेल तर समाज, कायदा हे तिच्यापाठीमागे भक्कमपणे उभे राहू शकतात. म्हणूनच वेळीच अन्यायाला विरोध करणं आणि विरोध करूनही तो थांबत नसेल तर कायद्याचा आधार घेणं या दोन गोष्टी महिलांना वेळीच जमणंही गरजेचं वाटतं.

कुटुंब हा समाजाचा घटक. कुटुंबातूनच समाज घडतो. अवघा समाज बदलणं हे केवळ अशक्य. पण बदलाची ही सुरुवात कुटुंबातून नक्की होऊ शकते. मुलांची जडणघडण होत असताना त्यांचा मुलींविषयीचा दृष्टिकोन संवादातून तपासणं, त्यावर वेळोवेळी चर्चा होणं या छोट्या छोट्या गोष्टीही मोठा परिणाम करू शकतात असं वाटतं.  बदल आपोआप होत नसतो. तो कोणी त्रयस्थ व्यक्ती किंवा व्यवस्था करत नसते. त्या बदलाचे पाईक आपल्या प्रत्येकालाच व्हावं लागतं. मीटूनं याचं भान पुन्हा एकदा करून दिलं आहे.