शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

पुरुषांच्या वर्तमान काळात..

By admin | Published: April 12, 2015 6:33 PM

बायकांनी जरा ठणकावून सांगितलं की, हे माझं आयुष्य ते मी माझ्या मर्जीनं जगीन, तू गेलास उडत; तर कसे सगळे पुरुष चवताळून उठले.

बायकांनी जरा ठणकावून सांगितलं की, हे माझं आयुष्य ते मी माझ्या मर्जीनं जगीन, तू गेलास उडत; तर कसे सगळे पुरुष चवताळून उठले. स्वातंत्र्य-स्वैराचार आणि नीतिमत्तेचे दाखले देत कुटुंबव्यवस्थेच्या टिकण्याबिकण्याची चर्चा करायला लागले, बायकांना दुय्यम वागणूक देता तेव्हा कुठं जातं हे शहाणपण ?- असा सवाल करता येईलही; पण तो करून वाद घालण्यापेक्षा पुरुषांच्या मनात डोकावून पाहण्याची खिडकी म्हणून या व्हिडीओंकडे पाहता येईल का?एकामागून एक हे सगळे व्हिडीओ पाहत गेलं तर असं नक्की वाटतं की, यानिमित्तानं कळलं तरी, की पुरुषांच्या डोक्यात चालू वर्तमानकाळात काय चालू आहे ते!एरव्ही आपल्याकडे पुरुष बोलतच नाहीत, त्यांच्या मनात सलणारं चुकून काही सांगत नाहीत, भावनिक प्रश्न, मानसिक ताण याविषयी बायका चिक्कार बोलतात पण पुरुष बोलत नाहीत.पण ते बोलत नाहीत म्हणजे त्यांना काही छळतच नाही, असं कसं होईल!ते नेमकं काय छळतं याचा अंदाज गमतीगमतीत का होईना पण हे व्हिडीओ पाहून येऊ शकतो!‘माय चॉइस-मेल व्हर्जन’चे अनेक व्हिडीओ व्हायरल आहेत. त्यातलाच एका जाडगेल्या मुलानं स्वत: शूट करून टाकलेला व्हिडीओ आहे, त्याचं नावच आहे, ‘फॅट बॉय व्हर्जन’!तो म्हणतो, ‘माय चॉइस असं सांगतानाही या ‘बायका’ इतरांनी आपल्याशी कसं वागावं याचेच नियम घालून देतात. म्हणजे पुरुषांना आणि समाजाला सांगतात की, ‘आम्ही आमचा चॉइस म्हणून तुम्हाला जे निवडून देऊ, तेच आणि तसंच जगा, तोच तुमचाही चॉइस असला पाहिजे!’ हे असं का म्हणून?  मी तर म्हणतो, बाई गं, तुला जसं जगायचं तसं जग, खूप खा, खूप जाड हो, कपडे घाल नाहीतर घालू नको, कुणावर प्रेम कर नाही तर करू नको, पण बायो, इतरांनी तुङयाशी कसं वागावं हे तू लोकांना का सांगतेय? तुङयाशी कसं वागायचं हे ठरवायचा त्यांचा चॉइस शाबूत ठेव, मान्य कर ना!’- हा फॅटबॉय जे म्हणू पाहतो आहे, तोच खरंतर सरसकट तमाम पुरुषांचा आक्षेप आहे, आणि वेदनाही!या पुरुषांचं म्हणणंच आहे की, बायका त्यांना त्यांच्या पद्धतीनं जगूच देत नाहीत. सतत प्रेशर- चांगली नोकरी मिळवण्याचं, मिळाली की ती टिकवण्याचं, उत्तम पगार कमावण्याचं आणि बिछान्यातल्या परफॉर्मन्सचंही!व्यावसायिक आयुष्यातच नाही, तर व्यक्तिगत आयुष्यातही ते प्रेशर असतं, बिछान्यात परफॉर्म्स करण्यापासून ते सुटलेल्या पोटार्पयत! आम्हीतरी काय काय सहन करायचं असा या पुरुषांचा प्रश्न आहे. जीम लाव म्हणून भुणभुण, डाएट कर म्हणून तगादा, एवढाच वेळ संडासात का बसतो म्हणून सवाल.. सतत कसे तुला गॅसेस होतात, चारचौघात ‘आवाज’ कसले करतोस, मोठय़ानं ढेकरच का देतोस, रात्री एवढा का घोरतोस अशी सतत रोकटोक असतेच!क्षुल्लक वाटत असलं तरी अनेक पुरुषांना ते इरिटेटिंगच वाटतं, अपमानास्पदही वाटतं आणि आपल्या जगण्यावरचं आक्रमणही!म्हणून तर बहुसंख्य व्हिडीओंमधे पुरुष  सांगतात की, माङया मनासारखं जगण्याचं स्वातंत्र्य मलाही असलं पाहिजे ना!दुसरा मोठा आक्षेप दिसतो तो हाच की, मुलगा, भाऊ, प्रियकर, नवरा, मित्र, सहकारी म्हणून पुरुषांनी कसं वागायचं याचे नियम त्यांच्या आयुष्यातल्या बायकाच ठरवतात. हवं तेव्हा स्वतंत्र होतात, सोयीचं तेव्हा ‘टिपिकल’ बायकोच काय पण मैत्रीण, आई आणि बहिणीचं रूप घेऊन इमोशनल कचाटय़ात गाठतात.  बायकी वृत्तीनं टिपिकल रडून भेकून काम करवून घेणार!- हे दोन्ही डगरींवर पाय ठेवून येताजाता पुरुषांना चाबकानं फोडून काढणं कसं चालेल, असा या पुरुषांचा स्पष्ट सवाल आहे!नीट पाहिलं तर दिसतं की, आजच्या काळात जगताना पुरुषांच्याही काही कुचंबणा आहेत, प्रश्न आहेत,  घुसमट आहे आणि आपण अनेक आघाडय़ांवर कमी पडतो हा अपराधगंडही आहे! त्यांनाही स्पेस हवी आहे, सतत तुम्ही ‘शोषक’ आहात या आरोपाचा त्रस होऊन वैताग येतो आहे आणि आपल्या जगण्याचे दोर कुणा दुस:याच्या हातात आहेत अशी नकारात्मक, नकोशी भावनाही बळावते आहे.त्या भावनांचा भडका या व्हिडीओंमध्ये स्पष्ट दिसतो.हे पुरुष सांगताहेत, जगताना कुचंबणा आमच्याही आहेत, प्रश्न आमचेही आहेत, प्रश्न आमच्यावरही लादल्या जाणा:या जगण्याचे आहेत, केवळ आम्ही पुरुष आहोत हा आमचा गुन्हा नाही. इव्हन वी आर नॉट युवर (म्हणजे बायकांचे) प्रिव्हिलेज!1. सगळेच पुरुष ‘तसे’ नसतात.माङो डोळे आहेत, मी कुठंही पाहीन! तुङया छातीवरच्या उभारांकडे वखवखून पाहीन! मी एकच का अनेक बायका भोगीन, मी दारू पिईन, मी मुलांना मारीन, मी काय वाट्टेल ते करीन, माय चॉइस! - हे असं पुरुषांनी म्हटलं तर चालेल का? विचारहीन स्वातंत्र्य फक्त अराजकतेलाच जन्म देतं. त्यामुळेच प्लीज भानावर या. तुमच्याच अवतीभोवतीचे पुरुष आहोत आम्ही. त्यातलाच मी एक. मी बायकोला मारत नाही, मी बलात्कारी नाही, सगळे पुरुष बलात्कारी नसतात. ‘ती’ उशिरा घरी आली तरी मी संशय घेत नाही.  जशा मला मैत्रिणी आहेत, तसेच तिलाही मित्र आहेत. मला मान्यच आहे की, आदर-समजूतदारपणा आणि विश्वास या तीन गोष्टीतूनच समान नातं उभं राहू शकेल!2. आय अॅम जस्ट अ मॅन!मी सिक्स पॅक ठेवीन नाहीतर पोटाचा फॅमिली पॅक करीन. माय चॉइस! मी हवं ते खाईन, हवं तेव्हा क्रिकेट पाहीन, क्रिकेट पाहताना तुङयाकडे ढुंकूनही पाहणार नाही. माय चॉइस! कितीही वेळ टॉयलेटमधे बसेन, कमोडवरचं झाकण उघडंच ठेवीन. माय चॉइस! कुणाला मेसेज पाठवायचा, कुणाला नाही,  कुणाचा फोन घ्यायचा, कुणाचा नाही मी ठरवीन. माय चॉइस! मला वाटलं तर मी ऐकीन आणि पाहीन हनी सिंगची गाणी. माय चॉइस! तेव्हा प्लीज, स्टॉप द जनरायलङोशन, आय अॅम जस्ट अ मॅन!!3. आम्हाला कुठेय ‘चॉइस’?मी जरा डोळे वटारले की म्हणतेस, मुलांना फार धाकात ठेवतोस. प्रेमानं वागलं की म्हणतेस, फाजील लाड करतोस. मुलांना मारलं तर म्हणतेस, तू हुकूमशहा, नाहीच मारलं तर म्हणतेस, तुझं घरात लक्षच नाही! बायकोला नोकरी करू दिली नाही, तर मी बुरसटलेला. तिला घरात डांबणारा. ती स्वत:हून नोकरी करत असली, तर मग माङयात धमक नाही, तिची केवढी फरफट होते. बायकोचं ऐकलं तर तिचा गुलाम, नाही ऐकलं तर हुकूमशहा.!! खरं सांगतो, पुरुष म्हणून मला काही चॉइसच नाही! मेन डोण्ट हॅव चॉइस!