शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

आहे मेलोड्रामा तरीही

By admin | Updated: June 7, 2014 18:48 IST

शोकात्मता ही एक अटळ मानवी भावना आहे; मात्र नाटक- चित्रपटवाल्यांच्या अतिरेकी वापरामुळे ती काही काळ हास्यास्पद झाली होती. संयमाने वापर केला, तर या भावनेतूनही उत्कट असे काही निर्माण होऊ शकते. कान महोत्सवात दाखवण्यात आलेल्या अशा तीन चित्रपटांविषयी...

-अशोक राणे

समुद्राला उधाण आलेलं. उंच-उंच उसळणार्‍या लाटा किनार्‍यावर येऊन खडकांवर आदळतायत. निसर्गाचं हे रौद्र रूप एकीकडे भयावह वाटणारं आणि तितकंच विलक्षण आकर्षकदेखील! उसळणार्‍या लाटांच्या पार्श्‍वभूमीवर किनार्‍या-किनार्‍याने चाललेला एक मुलगा. अलीकडे एक वृद्ध. जणू काळपुरुष. खडकांच्या घळीत त्या पोराला दिसणारं एका पुरुषाचं प्रेत. अंगभर गोंदण असलेला नग्न देह. थेट समुद्रकिनार्‍याला भिडलेल्या घनदाट जंगलातील शेकडो वर्षं वयाचा अस्ताव्यस्त पसरलेला वड. सहजपणे दिसत जाणार्‍या प्रतिमा आणि त्यातून उलगडत जाणारं माणूस आणि निसर्ग यांतलं अविरत नातं. जपानची नावोमी  कावासेचा ‘स्टिल द वॉटर’ची सुरुवात ही अशी होते. मानवाला निसर्गसौंदर्याची असलेली अनावर ओढ आणि ते अलगद टिपण्याचं कॅमेर्‍याचं विलक्षण सार्मथ्य यातून बहुधा निसर्गाचं सौंदर्य तेवढंच पडद्यावर उलगडतं. त्याचं सुंदर तितकंच गूढरम्य अवघं व्यक्तिमत्त्व क्वचितच चित्रपटात दिसतं. ‘स्टिल द वॉटर’ हा असाच एक चित्रपट आहे. निसर्ग ही या चित्रपटातील एक प्रमुख व्यक्तिरेखा आहे आणि ती सतत चित्रपटभर वावरते आहे.
जपानच्या अमामी ओशिमा बेटावर ही गोष्ट घडते आहे. पौगंडावस्थेतून नुकताच बाहेर आलेला केटो आणि त्याची त्याच्याच वयाची मैत्रीण क्योको सतत एकमेकांच्या सहवासात वावरत असतात. या दोघांमध्ये त्यांच्या नकळत सहजपणे पहिल्या प्रेमाचं बीज पडलं आहे. आईला आणि त्याला एकटं टाकून टोकियोत नवा संसार थाटणार्‍या बापाविषयीचा राग मनात साठवूनच केटो मोठा झाला आहे. वयाच्या या अडनिड टप्प्यावर बापाविषयीचा तो संताप त्याचं सारं व्यक्तिमत्त्व व्यापून आहे. गावातल्या खानावळीत रोजंदारी करणार्‍या आईचा सहवास त्याला फारसा लाभलेला नाही.  
क्योकोची आई आजारी आहे आणि दिवसेंदिवस तिचा आजार वाढतोच आहे. तिचे वडील घरगुती पद्धतीचं कॅफे चालवत कुटुंबाची नीट काळजी घेत आहेत. केटो आणि क्योकोच्या मैत्रीच्या बदलत्या स्वरूपाकडे पाहण्याची त्यांची नजर निखळ आहे. त्यातली स्वाभाविकता समजून घेणारी आहे.. आणि या तमाम गोष्टींना पारंपरिक निसर्ग उत्सवाची आणि क्योकोच्या आईच्या मृत्यूच्या दिशेने चाललेल्या प्रवासाची पार्श्‍वभूमी आहे. ‘स्टिल द वॉटर’मध्ये ज्या जाणीवपूर्वकतेने सभोवतालचा निसर्ग एक व्यक्तिरेखा म्हणून वावरतो, त्याच प्रकारे मृत्यूही एक पात्र म्हणूनच आपली भूमिका निभावतो आहे. 
केटो आणि क्योकोला होणारं जीवनदर्शन जितकं गूढ, अनाकलनीय वाटतं, तितकंच ते सुंदरही वाटतं. मृत्यू हा अटळ आहे, हे वास्तव मृत्युशय्येवर असलेल्या व्यक्तीनं आणि त्याच्या वा तिच्या आप्तस्वकीयांनी स्वीकारलं, की तो दुखरा प्रसंगही सुंदर होऊन जातो. ही सहजी घडणारी गोष्ट नव्हे आणि म्हणूनच इथं ते नजरेत भरतं. जेव्हा तो अखेरचा क्षण अगदी जवळ येऊन ठेपतो, तेव्हा क्योकोची आई शांत, शीतल, प्रसन्न दिसत जाते. तिच्याकडे पाहणार्‍या क्योकोला ती म्हणते, ‘‘मी देव आणि माणूस यांच्यातल्या मध्यबिंदूवर उभी आहे.’’ मग ती सभोवती जमलेल्यांना निसर्ग उत्सवाची गाणी म्हणायला सांगते. ते गाणं ऐकता-ऐकता ती पार वेदनाहीन होत अधिकाधिक प्रसन्न दिसत जाते. त्या गाण्यातून मृत्यू ही भयकारी घटना नसून, तो एक नवा प्रवास आहे.. ज्याच्याविषयी कमालीचं आणि कायमचं गूढ आहे.. आणि ते गूढ हीच या प्रवासामागची प्रेरणा आहे. गाणं ऐकता-ऐकता क्योकोची आई त्या अखेरच्या प्रवासाला निघते. मृत्यूचा हा अभूतपूर्व तितकाच विलक्षण उत्सवच म्हणायचा! केटो आणि क्योकोला एका अपरिहार्यपणे घडणारं जीवनाचं दर्शन आणि त्यांच्या क्षमतेनुसार होणारं आकलन, असा कथाशय असलेल्या त्या चित्रपटात मृत्यूचं अटळ असणं आणि त्यातलंही सौंदर्य जोखणं या टप्प्यावर चित्रपट जातो, समुद्रकिनार्‍याशी जणू युगानयुगे वास्तव्याला असलेला तो वृद्ध, चित्रपटाच्या अखेरीस आरंभी जसा दिसला, तशाच उधाणणार्‍या समुद्राच्या पार्श्‍वभागी दिसणार्‍या केटो आणि क्योकोला पाहून स्वत:शीच पुटपुटल्यासारखा बोलतो,
 ‘‘या मुलांना माहीत नाही, या समुद्रात काय आणि केवढं दडलंय ते.!’’
केटोच्या बापानं त्याला आणि त्याच्या आईला बेवारशी करून निघून जाणं आणि क्योकोच्या आजारी आईचा मृत्यूच्या दिशेनं चाललेला प्रवास म्हणजे केवढा मेलोड्रामॅटिक ऐवज! भरल्या डोळ्यांनीच प्रेक्षकांनी चित्रपट पाहावा, याची केवढी मोठी सोय! परंतु, ‘स्टिल द वॉटर’मध्ये तसे घडत नाही. दिग्दर्शिका नावोमी कावासे कसलाच फायदा उठवत नाही. तिच्या कथावस्तूचा ज्या अन्वयार्थाच्या दिशेनं प्रवास होणं अपेक्षित, तसाच तो होतो आणि म्हणूनच एक वर-वर मेलोड्रामॅटिक वाटणारं कथानक भिडतं. आजवर असंख्य चित्रपटांत निसर्ग पाहिला; परंतु इथं जसं त्याचं दर्शन घडलं, तसं ते क्वचितच घडलं.. आणि तो मृत्यूचा उत्सव तर केवळ अपवादात्मक आणि तितकाच अभूतपूर्वक! कधीही विसरू शकणार नाही असा.!
साऊथ कोरियाच्या जुली जुंग दिग्दर्शित ‘अ गर्ल अँट माय डोअर’मधल्या योंग - नामला कोरडं आणि अलिप्त वागताच येत नाही. सेऊलमधून बदली होऊन समुद्रकिनारच्या एका गावात आलेल्या पोलीस इन्स्पेक्टर योंगला गावात येता-येताच डोही दिसते. 
चौदा वर्षांची ही पोरं, अस्ताव्यस्त म्हणावी अशी, केसांच्या जटा झालेल्या, अंगावर माराच्या खुणा आणि सतत भितिग्रस्त अवस्थेत वावरणारी. योंगला तिच्या या अवस्थेचं कारण कळतं. तीच शोध घेते. आरंभी दोही तिलाही जवळ येऊ देत नाही. तिचा दारूडा सावत्र बाप आणि आजी तिला सतत निर्दयपणे झोडपून काढतात. रात्री-बेरात्री ती घरातून पळुन कुठे-कुठे जाते; परंतु बाप तिला हुडकून काढतो आणि वाट्टेल तसं मारत सुटतो. योंगला हे कळत जातं, तसं ती दोहीच्या बापाला आपला पोलिसी खाक्या दाखवते. तसा दोहीला तिच्याविषयी विश्‍वास वाटू लागतो.. आणि मग रात्री घरून पळून जाणारी दोही एकदा थेट योंगच्याच दाराशी येते. रात्रीपुरता ती तिला आश्रय देते; पण मग दोही घरी जायचं नावचं घेत नाही. तिचा बाप तिला जबरदस्ती करून घेऊन जातो आणि दुसर्‍या दिवशी आजीचा मृतदेह समुद्रकिनारी सापडतो. त्याचं गूढ जरी उलगडत नाही, तरी योंग समजायचं ते समजते आणि आता अधिकच बिथरलेल्या दोहीच्या बापापासून दोहीचं संरक्षण करण्यासाठी तिला आपल्या घरातच ठेवून घेते. आता ती तिची नीट काळजी घेते. तिचं रूपचं बदलून टाकते. तिला जे-जे हवं, ते सारं देते.
अशातच योंगची मैत्रीण शहरातून येते. दोघींत लेस्बियन संबंध असतात. मैत्रिणीच्या येण्यानं एव्हाना नॉर्मल झालेली दोही बिथरते. योंग आपल्या मैत्रिणीला परत पाठवते. योंग दोहीला जपते. इकडे बिथरलेला तिचा बाप योंग आपल्या मुलीबरोबर लेस्बियन संबंध ठेवते, असा आरोप करतो. 
तिच्याविरुद्ध चौकशी सुरू होते. या चौकशीदरम्यान महिला पोलीस अधिकारी कोवळ्या दोहीला ज्या तथाकथित मोकळेपणाने प्रश्न विचारतात, त्यातून व्यवस्थेतील असंवेदनशीलताच दिसून येते. अखेर शिक्षा म्हणून योंगची त्या गावातून हकालपट्टी होते. तिला घेऊन जाणार्‍या गाडीमागून दोही धावत सुटते. योंग फक्त तिच्याकडे पाहत राहते.
दोहीच्या आयुष्यात इतकं खोलवर शिरणार्‍या योंगची काही मजबुरी आहे का? या असल्या कारणांमध्ये दिग्दर्शिका शिरत नाही. ती सतत दारू पीत असते; परंतु त्यामागच्या कारणांचा शोध ना दिग्दर्शिका घेत, ना मागचं कुतूहल प्रेक्षकाच्या मनात पेरत. एखाद्या पात्रामध्ये दुसर्‍या पात्राला विशेष रस असतो, त्यामागे पहिल्या पात्राची काही तरी गोष्ट असते, असं साधारणपणे असतं. दिग्दर्शिकेला त्याची इथं गरज भासलेली नाही. वर वर्णन केलेल्या अवस्थेत ही कोवळी पोर वेळी-अवेळी कुठं-कुठं का भटकत असते आणि तिचं व्यक्तिमत्त्व का असं विचित्र म्हणावं असं झालंय, याचा योंग शोध घेते आणि एका सहजतेनं तिच्या जगण्याशी जोडली जाते. त्यासाठी तिला तिच्या जगण्यातला दुखरा कोपरा प्रेरणा देण्यासाठी नको असतो. ‘अ गर्ल अँट माय डोअर’मधला हा कथाभाग म्हणूनच विशेष आणि महत्त्वाचा वाटतो. 
चीनच्या वांग चाओ या दिग्दर्शकाचा ‘फँटासिया’ हादेखील असाच एक मेलोड्रामॅटिक कथानक असलेला; परंतु मेलोड्रामा न झालेला चित्रपट! शाळकरी लीनच्या वडिलांना कॅन्सर आहे. उत्तरोत्तर तो वाढतच चालला आहे. कामावर जाणं शक्य नाही. त्यातच हॉस्पिटलचा आणि औषधांचा खर्च वाढत चाललेला आहे. कामगारकपातीत आईची नोकरी गेलीय. ती उधारउसनवार करीत संसाराचा गाडा कसाबसा रेटते आहे. पहाटे उठून घरोघर दुधाच्या बाटल्या पुरवून सकाळी पेपर स्टॉल चालवते आहे. मित्रमैत्रिणींबरोबर पबमध्ये जाणारी तरुण बहीण कॉलगर्ल बनत चालली आहे.. आणि हे सारं पाहत अस्वस्थ होत जाणारा लीन शाळा बुडवून समुद्रकिनारी भटकतो आहे. तिथं नांगर टाकून असलेल्या बोटीवरच्या बाप-लेकींशी दोस्ती करीत तो त्यांच्या चोरीच्या कामात रोजंदार म्हणून सामील होतो.. पुन्हा एक जोरकस मेलोड्रामॅटिक ऐवज.!  आणि तरीही डोळ्यांच्या कडाही ओल्या न करता प्रेक्षक या श्रमजीवी वर्गातील कुटुंबाची ही  करुण कहाणी पाहतो.. संयमित मेलोड्रामाचा हा आणखी एक उत्कृष्ट नमुना.! 
वडिलांचं वाढतं आजारपण, बिकट होत जाणारी घरची परिस्थिती आणि त्याच्या कुटुंबाविषयी सहानुभूती दाखविणार्‍या त्याच्या शाळामास्तराला आणि आईला एकत्र पाहणं, यांमुळे अस्वस्थ होत जाणारा लीन एका क्षणी फँटसीचा- कल्पनारम्यतेचा आधार घेत या भयाण, अतक्र्य वास्तवातून बाहेर पडतो. तो हॉस्पिटलमध्ये जातो आणि वडिलांना रक्तपुरवठा करणारी नलिकाच काढून टाकतो. समुद्रावर जातो. बोट नसते जागेवर.. आणि तो भानावर येतो.
या तिन्ही चित्रपटांवर संयमित मेलोड्रामाचे उत्कृष्ट नमुने म्हणून खूप काही लिहिता-बोलता येऊ शकेल. जाता-जाता एक उदाहरण द्यावेसे वाटते. लीनची बहीण जेव्हा पहाटे घरी परतते, तेव्हा तिचं नटलेलं रूप आणि चेहर्‍यावरची अगतिकता पाहून आईला कळायचं ते कळतं. जे घडलं, त्याविषयीचा आकांत मुकेपणानं व्यक्त होतो.. आणि म्हणूनच तो मनात कालवाकालव करतो.. आणि तितक्याच सहजपणानं एका अपरिहार्यतेचं दर्शन घडवतो. 
आपल्या ऋत्विक घटक यांनी एक महत्त्वाचं भाष्य केलंय.. मेलोड्रामा वाईट नसतो, तो तुम्ही कसा करता त्यावर त्याचं बरेवाईटपण ठरतं..! 
(लेखक भारतीय व जागतिक चित्रपटांचे व्यासंगी अभ्यासक, दिग्दर्शक व परीक्षक आहेत.)