शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
3
काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
4
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
5
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
6
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
7
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
8
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
9
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
10
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
11
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
12
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
13
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
14
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
15
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
16
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
17
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
18
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
19
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
20
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

मॅचिंग

By admin | Updated: October 31, 2015 14:19 IST

मॅचिंग ब्लाऊज नाही म्हणून आईच्या, बायकोच्या पुष्कळ नव्या साडय़ा घडी न मोडताच कपाटात पडून असतात, कॅरिबॅगसहित! कारण : लक्ष्मीरोडला जायचा कंटाळा!

 चंद्रमोहन कुलकर्णी

 
मॅचिंग ब्लाऊज नाही म्हणून आईच्या, बायकोच्या पुष्कळ नव्या साडय़ा घडी न मोडताच कपाटात पडून असतात, कॅरिबॅगसहित! कारण : लक्ष्मीरोडला जायचा कंटाळा! 
अखेर एके दिवशी निर्णय होतोच, लक्ष्मीरोडला जायचंच! मॅचिंगच्या दुकानात.
मुख्य प्रश्न उभा राहतो : पार्किगचं काय?
लक्ष्मीरोडला जायचं असतं, त्यामुळे स्कूटरव्यतिरिक्त इतर कोणत्याच वाहनाचा विचारसुद्धा मनात येत नाही. घडी न मोडलेल्या साडय़ांच्या एकदोन कॅरिबॅग उचलून तुम्ही आणि तुमची बायको मनाचा हिय्या करून निघता. बाजीरावरोडवरनं जाताना स्कूटरच्या पार्किंगसाठी दोनचार जागा तुम्हाला दिसलेल्या असतात. पण, ‘पुढे मिळेल’ अशी मनाची सोयिस्कर समजूत घालून तुम्ही तिकडे दुर्लक्ष करता. खरं तर त्या जागा तुमच्याआधी तुमच्या बायकोला दिसलेल्या असतात. तिथं स्कूटर पार्ककरण्याची बायकोची आयडिया तुम्ही धुडकावून लावता. लक्ष्मीरोडला येता. पार्किंगला जागा शोधण्यासाठी गरागरा फिरता. जागा मिळत नाही. गल्लीबोळ पार करत करत तुम्ही फिरून पुन्हा बाजीरावरोडलाच येता. मघाशी दिसलेल्या पार्किंगच्या जागेच्या स्पॉटला तुम्ही परत आलेला असता. तुम्ही धुडकावलेली जागा अजूनही चक्क रिकामी असते. त्या जागेचं मोल तुम्हाला आता तुरीच्या डाळीपेक्षा जास्त वाटतं. आता मात्र अजिबात वेळ न घालवता, अत्यंत शिताफीनं तुम्ही ती जागा पटकावता आणि स्कूटर स्टँडला लावून डिकीतनं मॅचिंगच्या उद्देशानं आणलेल्या, साडय़ांनी भरलेल्या कॅरिबॅग बाहेर काढून लक्ष्मीरोडच्या दिशेनं चालू लागता. लक्ष्मीरोडवरच्या मॅचिंगच्या दुकानापर्यंतचं अंतर पायी चालायला फार नाही, असं बायकोनं मघाशी सांगितलेलं असतं ते तुम्हाला आता मनोमन पटतं. 
खुद्द लक्ष्मीरोडला आणि आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये मॅचिंगच्या दुकानांना तोटा नाही. सगळीकडे तोबा गर्दी. दुकानात, दुकानाच्या बाहेर, रस्त्यावर, फुटपाथवर सगळीकडे माणसंच माणसं आणि घटना तीनच घडत असतात : एक, माणसं कुठूनतरी कुठेतरी जात असतात, दुसरी घटना : खरेदी होत असते आणि तिसरी : विक्र ी होत असते. तुमच्याकडच्या दोन्ही कॅरिबॅग आणि पर्स असा लवाजमा सांभाळत तुम्हाला रस्त्यावरून दुकानात जायचं असतं. आता, रस्त्यावरून दुकानात जायचं, हीच एक मोठी अवघड गोष्ट असते. तुम्हाला ज्या दुकानात जायचं असतं, त्या दुकानाच्या बरोब्बर समोर, वाहत्या, भर रस्त्यावर मध्यभागी एका हातगाडीवर चपला-बूट-सँडल अशा वस्तू मांडून एक विक्रेता उभा असतो. त्याच्या पलीकडे तसल्याच वस्तूंचं पण रस्त्यावर खाली मांडलेलं एक दुकान. दोन्हीकडे भाव सारखाच. काहीही घ्या शंभर रु पये. होय, फक्त शंभर रु पये. हातगाडीवाला त्याच्याकडच्या मालाची तारस्वरात जाहिरात करत असतो, हातगाडीभोवती चारही बाजूंनी गराडा. हातगाडीला लागून असलेल्या जमिनीवरच्या दुकानाच्या बाबतीतही हीच परिस्थिती. त्याला लागून फुटपाथ. फुटपाथवर पुन्हा आणखी काही माणसं आणखी काहीतरी विकत बसलेली. तिथेही तुफान गर्दी. फुटपाथला लागून मुख्य दुकान. हे सगळं चक्रव्यूह भेदून तुम्ही कसेबसे दुकानाच्या दारापर्यंत पोहोचता. 
तुम्ही दुकानाच्या दारात एण्ट्री करता. ही एण्ट्री करताना एकेका उभ्या ‘सिंगल विक्रेत्यांनाही’ तुम्ही ओलांडून आलेले असता. या सिंगल प्रकारच्या विक्रेत्यांमध्येही पुष्कळ प्रकार असतात. काही जणांकडे एक उंच उभा स्टँड असतो, त्या स्टँडला विशिष्ट प्रकारचे हुक्स लावून त्याला निरनिराळ्या वस्तू लटकवलेल्या असतात. या वस्तू तो इसम दुकानाच्या ऐन दारातच उभा राहून विकत असतो. काही विक्रेत्यांच्या तर पँटलाच एक मोठ्ठा, रु ंद पट्टा असतो. त्या पट्टय़ालाही त्यानं विशिष्ट प्रकारचे हुक्स करून घेतलेले असतात; आणि त्या हुकांनाच आपला माल लटकवून तो तिथे उभा असतो. काही विक्रेत्यांनी तर आपापला माल आपापल्या अंगाखांद्यावरच बाळगलेला असतो. तो माणूस स्वत:च एक दुकान झालेला असतो. रुमाल, ब्रेसियर्स, चड्डय़ा, कपडे वाळत घालण्याचे चिमटे, घडय़ाळं, पट्टे, मोजे, नॅपकिन्स ते अगदी छत्र्यांपर्यंत कोणतीही वस्तू ही मंडळी आपापल्या अंगावर लेवून विकू शकतात. 
तर, अडथळ्यांचे तीनचार थर पार करून, तुम्ही मुख्य दुकानाच्या दारातनं आत एण्ट्री टाकता.
‘‘..या !’’
- चेह:यावर व्यावसायिक हसू ठेवून, दुकानाचे मॅनेजर वाटावेत अशा व्यक्तिमत्त्वाचे एक गृहस्थ तुमचं स्वागत करतात आणि क्षणाचाही वेळ न दवडता काउंटरमागच्या एका सेल्समनकडे निर्देश करत आपली रवानगी तिकडे करतात. 
आपल्या नकळत आपण त्या काउंटरकडे ढकलले जातो. दुकानात तर एकूणच ठेचाठेच गर्दी असतेच, पण ज्या काउंटरकडे आपल्याला पाठवलं गेलेलं असतं, त्या काउंटरवरही प्रचंड गर्दी असते. काउंटरवर कापडाचा ढीग पडलेला असतो. घडय़ा उलगडल्या जात असतात, घडय़ा घातल्या जात असतात, गि:हाइकांना माल दाखवण्यात सेल्समन गुंतलेले असतात. कापडांचे रंग न्याहाळण्यात, टेक्शचर बघण्यात, किमतीचे आकडे विचारण्यात लोक मग्न असतात. उत्तेजित करणा:या वातावरणावर सीलिंग फॅनचा उष्ण वारा फरफरत असतो. फ्लूरोसंट लाईटच्या प्रखर, भगभगीत प्रकाशात कापडांचे रंग झगझगत असतात. 
रंगच रंग. 
जगातले सगळे रंग एका दुकानात, त्या हजारपाचशे स्क्वेअर फुटात एकत्र गोळा झालेले असतात. मॅचिंगचंच दुकान ते! नुसते सगळे रंगच नव्हे, तर जगातल्या प्रत्येक रंगाच्या, अस्तित्वात असतील नसतील तेवढय़ा शेड्स! रंगांच्या असंख्य बारीकबारीक छटांच्या वस्त्रंनी काउंटरच्या मागचे खण ओसंडून वाहत असतात! अक्षरश: हजारो प्रकार नि तेवढेच पॅटर्न्‍स! क्षणार्धात तुमच्या नजरेचा प्रवास लोकप्रिय अशा ‘टू बाय टू’ पासून सुरू होऊन धारवाडी खण, सिल्क, रॉ सिल्क, साउथ कॉटन असा होत होत झगझगीत अशा सोनेरी-चंदेरी ब्रोकेडपर्यंत येतो. नव्या कापडाचा सुगंध माणसांच्या आवाजात मिसळतो. माणसांच्या घामाचा सूक्ष्म वास रंगांच्या हलक्या छटांमध्ये मिसळतो. बाहेरच्या ट्रॅफिकच्या आवाजाची पट्टी आतल्या गर्दीच्या आवाजात मिसळून वातावरणात एक प्रकारची गुंगी निर्माण झालेली असते. तिथल्या वातावरणाचा स्वत:चा असा एक वेगळाच आवाज तुमच्या भोवती रुंजी घालत असतो. तुमच्या नकळत एका काउंटरकडे तुम्ही ओढले जाता. इतका वेळ तिथल्या सेल्समनच्या समोर असलेलं गि:हाइक लुप्त होऊन त्याजागी तुम्ही कधी जाऊन उभे राहता, हे तुमच्या लक्षातही येत नाही.
 ‘‘काय देऊ मॅडम..?’’
- काउंटरवरनं आपल्या रोखानं येणा:या प्रश्नानं आपण भानावर येतो खरे, पण काउंटरमागच्या खणांमधून ओसंडून वाहणा:या रंगांपुढे आपले काहीच चालत नाही. रंग आपल्या मनावर गारुड करतात. मनातल्या मनात आपण रंगांवर उडय़ा मारू लागतो. या रंगावरून त्या रंगावर, एका रंगावरून दुस:या रंगावर. आपल्याकडे असलेल्या साडय़ांच्या रंगाशी मिळताजुळता रंग शोधताना आपली नजर भिरभिरते. रंग आपली मती गुंग करून टाकतात.
रंग. 
लाल, निळे, हिरवे, पिवळे, जांभळे, करडे, पांढरे, काळे, सोनेरी, चंदेरी, रु पेरी, गडद, फिकट, भडक, ठळक.
लाल, लाल, लाल, लाल, पिवळा, पिवळा, पिवळा.
निळा, निळा, निळा, निळा, हिरवा, हिरवा, हिरवा, पिंक, पिंक, पिंक, पिंक.
एका खणात पांढ:यापासून पांढ:यापर्यंत सगळे पांढरे. एक खण काळ्याचा. निळे सगळे वरच्या खणात, खालच्यात लाल. लाल ते लाल. ब्लड रेड ते पोस्ट ऑफिस रेड. चटणी (!) ग्रीन ते बॉटल ग्रीन! ऑलिव ग्रीन ते लीफ ग्रीन. पोपटी. अबोली. पिवळ्याचे दोन कप्पे. गोल्डनचे अनेक प्रकार. सिल्व्हरचे तसेच. मेटॅलिक, कॉपर, ब्रोकेड. रंगांमुळे तुम्ही भंजाळून गेलेले असता, तोवर तुमच्या मागून आलेलं आणखी एक गि:हाईक तुमची जागा पटकावतं. तुमचं लक्ष भलतीकडेच आहे, हे लक्षात येऊन काउंटरवरचा विक्रेता आता त्या नव्या गि:हाईकाच्या सेवेला धावतो. तुम्ही आता पूर्ण भानावर येता. काउंटरवरच्या एका वयस्कर विक्रेत्याचं तुमच्याकडे लक्ष जातं. त्याच्या शेजारच्या पोरगेल्याश्या मदतनीसाला बाजूला सरकायला सांगून तो वृद्ध विक्रेता तुमच्या मदतीला धावतो. तुम्ही आता चांगलेच भानावर आलेले असल्यामुळे तुमच्याकडे असलेल्या कॅरिबॅगमधून एखादी साडी बाहेर काढता आणि त्याच्या हाती ठेवता.
..‘‘याला मॅचिंग पाहिजे होतं..’’
तुम्हाला काय म्हणायचं आहे, हे विक्रेत्याच्या झटकन लक्षात येतं; नि साडीचा बोळा हातात घेऊन तो साडीच्या रंगाला मॅच होईल अशा रंगाच्या गठ्ठय़ाकडे वळतो. साडी काठापदराची आहे की कशी, यावर मॅचिंग ठरत असल्यानं साडीचा भाग कोणत्या कापडाच्या गठ्ठय़ाला चिकटवायचा, हे तो ठरवतो. दोनचार शेड्सना साडी चिकटवून झाल्यावर अतिशय परफेक्ट मॅच होईल असा एक पीस काढून त्यावर साडी पांघरून तुमच्या समोर काउंटरवर ठेवतो. खरं म्हणजे त्यानं निवडलेलं कापड शंभर टक्के बरोबर असतं. पण तुम्हाला गप्प बसवत नाही. तुम्ही त्याला अजून कापडं काढायला सांगता. तोही बिचारा त्याच्या सेवाधर्माला जागून तुम्ही सांगाल ते गठ्ठे तुमच्यासमोर ठेवतो. या साडीच्या मॅचिंगचा निर्णय व्हायच्या आधीच तुमची बायको कॅरिबॅगमधून आणखी एक साडी बाहेर काढते. ती त्याच्यासमोर ठेवते. तोही बिचारा काहीही न बोलता त्या साडीला मॅचिंग धुंडाळण्याच्या कामी लागतो. मग द्वंद्वयुद्ध सुरू होतं. कारण एव्हाना तिसरीही साडी कॅरिबॅगमधून बाहेर आलेली असते. काउंटरवर साडय़ा आणि ब्लाऊज पिसेस यांच्या रंगांची मोठी मनोहर कॉम्बिनेशन्स घडत राहतात. गठ्ठे वरखाली होतात. नव्वद की साठ सेंटीमीटर, स्लिव्हलेस की बाह्या की फुग्याच्या बाह्या असल्या चर्चा होतात, टेक्श्चरबद्दल बोलणी होतात. रंग, पोत, लांबी, रुंदी सगळं मनासारखं होऊन मॅचिंग अखेर तुमच्या मनासारखं होतं.
रंग जुळल्याचं सुख मोठं असतं. 
पण तुमच्याकडे असलेल्या सगळ्याच साडय़ांना मॅच होतील असे पिसेस मिळतातच असं नाही. एखादी साडी मॅचिंगविना तशीच राहते. रंग आवडला तर पोतच जुळत नाही. कधी काठच आवडत नाहीत, तर कधी उजेडातच नीट दिसत नाहीत. कधी दुकानातल्या लाइटमध्ये मॅचिंग जुळल्यासारखं वाटतं, पण बाहेरच्या उजेडात किंवा घरी गेल्यावर दुस:या दिवशी सकाळच्या उजेडात मॅचिंग नीट जुळलेलं नाही, असं वाटत राहतं. रंग न जुळल्याची मनाला रुखरुख लागून राहते. मग आठ-पंधरा दिवसांनी ते मॅचिंग बदलून घेण्यासाठी तुम्ही तुमची स्कूटर पुन्हा लक्ष्मीरोडच्या दिशेनं वळवता.
पुन्हा तोच बाजीरावरोड, तोच लक्ष्मीरोड, दुकान तेच, गर्दी तीच, पार्किंगचा घोळ तसाच. पुन्हा तेच सगळं, पुन्हापुन्हा तेच तेच!
(समाप्त)
 
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)
 
chandramohan.kulkarni@gmail.com