शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मैरा पायबी

By admin | Updated: January 16, 2016 13:02 IST

यंदा महापुराचा भीषण तडाखा सहन करून पुन्हा जगणं नव्यानं बांधण्यासाठी कामाला जुंपलेल्या मणिपूर राज्यानं गेल्या आठवडय़ात दुसरा कहर अनुभवला.

- सुधारक ओलवे
 
यंदा महापुराचा भीषण तडाखा सहन करून पुन्हा जगणं नव्यानं बांधण्यासाठी कामाला जुंपलेल्या मणिपूर राज्यानं गेल्या आठवडय़ात दुसरा कहर अनुभवला. भूकंपानं जबरदस्त हादरा दिला आणि पुरानं आधीच मोडून पडलेले संसार या धरणीकंपात आणखीनच दुभंगले. भारतातल्या ईशान्य कोप:यातल्या या भूकंपाच्या हाद:याच्या तुरळक बातम्या ऐकताना माङया डोळ्यासमोर उभी राहिली मणिपुरातली सुबक, देखणी, खंबीर आणि तरीही संवेदनशील माणसं. 
 
मणिपूरमध्ये फोटोग्राफी करत होतो तेव्हाचे हे काही चेहरे आजही डोळ्यासमोर उभे राहतात. मैरा पायबी इथेच भेटल्या. एकमेकींसाठी आधार आणि भक्कम साथ बनत ‘मशालजी’ बनलेल्या या महिला. घरात दारुडा, नशेत बेभान झालेला नवरा किंवा वडील, त्यांचा भयानक जाच आणि बाहेर दारात उभ्या लष्कराची दहशत. जगणं असं अंधारात गारठून टाकत असताना या बायकांनी स्वत:च आपापला प्रकाश बनत रोजची लढाई लढायचं ठरवलं. 
त्या चळवळीचंच नाव मैरा पायबी. संकटाची चाहूल लागल्यावर एकटीदुकटी बाई घाबरून जाते. असहाय होते. या चळवळीनं ते असहायपण संपवलं. घरात नवरा-बायकोचा कज्जा असो, रोजची मारहाण असो किंवा लैंगिक अत्याचारासाठी टपून बसलेला एखादा नराधम, आपल्यावर संकट आलंय आणि मदत हवी आहे असं वाटलं तर ती बाई जवळच्याच टेलिफोनच्या खांबावर मोठा दगड जोरजोरात आपटत टण-टण-टण करत राही. तो आवाज ऐकला की बाकीच्या आसपासच्या सा:याजणी हातातली कामं टाकून धावत मदतीला येत, जमा होत आणि तिच्या सोबत उभं राहत. मग ते तिचं घर असो नाहीतर पोलीस स्टेशनात तक्रार नोंदवणं असो. रात्रीच्या मिट्ट काळोखातही या बायका हातात मशाली घेऊन मदतीला धावत. त्यावरूनच त्यांना नाव मिळालं- मैरा पायबी!
 
अजूनही त्यांची लढाई संपलेली नाही
केंद्र सरकारनं मणिपूरमधून ‘अॅफ्स्पा’ अर्थात सैन्याला असलेला विशेषअधिकार काढून घ्यावा म्हणून इरॉम शर्मिला आजही उपोषण करते आहे. अॅफ्स्पामुळे सैन्य दल कधीही कुणाच्याही घरात शिरून त्यांना अटक करू शकते, शूटही करू शकते आणि त्याविरुद्ध कुठंही तक्रार करता येत नाही. 
मैरा पायबीच असलेली इरॉम शर्मिला या कायद्याविरोधात प्राणांतिक लढाई लढतेय. आणि बाकीही मणिपुरी बायका आपापली लढाई रोज जगताहेत. जगणं कठीण आहे तरीही इम्फाळमधला इमा बाजार (ज्याला पूर्वी नूपी कैथेल म्हणत) तो या लढवय्या बायकांच्या हस:या आवाजानं रोज गजबजतो आणि संसाराची सारी सूत्रं हातात घेत या बायका आपापलं जगणं उमेदीनं पुढं नेतात. 
जगण्याला हरवायला टपलेल्या इथल्या भयाण परिस्थितीतही या मैरा पायबी आपल्यापुरता प्रकाश निर्माण करत राहतात. त्या लढवय्या मशालजींचे हे काही चेहरे..
 
शब्दांकन - मेघना ढोके