शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

संगणकावर ‘मराठी’

By admin | Updated: April 4, 2015 18:40 IST

आठवा काही वर्षांपूर्वीची स्थिती. प्रमाणित असा मराठी कीबोर्ड नाही, कुठल्याही संगणकावर चालेल असा फॉँट नाही, कनव्हर्टर नाही, प्रमाणित व्याकरण नाही. ‘सी-डॅक’नं हे आव्हान पेललं. - संगणकावर मराठी सोपी होण्यासाठीच्या प्रयत्नांचा हा आढावा.

- पराग पोतदार
 
कोणतीही भाषा कशी रुजते? टिकते? वाढते? 
- एकतर सर्वसामान्य माणसांच्या दैनंदिन व्यवहारात ती अधिकाधिक आली पाहिजे, संवादाच्या विविध माध्यमांसाठी या भाषेचा सहजतेने वापर करता आला पाहिजे, त्यासाठी तिचं प्रमाणीकरण झालं पाहिजे आणि मुख्य म्हणजे आज सर्वसामान्यांच्या वापरात असलेल्या तंत्रज्ञानाशी तिची निकटची जानपहेचान असली पाहिजे. त्यासाठी ती संगणकावर, मोबाइलवर सहजतेनं; दुसर्‍या कुठल्या भाषेचा पांगुळगाडा न घेता स्वतंत्रपणे वापरता ( म्हणजे लिहिता-ईमेल/समाजमाध्यमांमधले संदेश आदि मार्गाने पाठवता-वाचता) आली पाहिजे. त्यासाठी भाषेच्या संगणकीय प्रमाणीकरणाचीही आत्यंतिक गरज असते.
याबाबतीत मराठीची परवड बरीच झाली.
आठवा काही वर्षांपूर्वीची स्थिती.
प्रमाणित असा मराठी कीबोर्ड नाही, कुठल्याही संगणकावर चालेल असा फॉँट नाही, कनव्हर्टर नाही, प्रमाणित व्याकरण नाही.
भाषा नुसती बोलली जाऊन उपयोगी नाही, तिचा संगणकीय वापर सहजतेनं झाला नाही तर ती ‘ग्लोबल’ होणार कशी?
शासनाच्या सहयोगानं ‘सी-डॅक’नं (सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अँडव्हान्स कॉम्प्युटिंग) त्यासाठी पुढाकार घेतला आणि खूप मोठं काम उभं राहिलं. भाषेच्या संगणकीय प्रमाणिकरणासाठी प्रयत्न करण्यात आले आणि त्याचा खूप मोठा सकारात्मक परिणाम दिसून आला. 
या भाषा प्रमाणीकरणाच्या तीन प्रमुख पध्दती असतात-
१) डेटा- मराठीतील डेटा कशारीतीने प्रविष्ट
    करायचा? अर्थात त्याचा कीबोर्ड कोणता
    असावा?
2) संकलन- मराठीतील हा डेटा संकलित (स्टोअर)
    कसा करायचा?
3) दृश्य स्वरूप- कोणता फॉँट वापरायचा? 
आजवरचा भारतीय भाषांचा संगणकीय प्रवास लक्षात घेतला तर १९८८ ला भारतीय भाषांचे प्रमाणिकीकरण पहिल्यांदा करण्यात आले. इंडियन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज (इस्की) या नावाने ते करण्यात आले. त्यातून सर्व भारतीय भाषांचे स्टोअरेज करता येईल अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली. 
महाराष्ट्र शासन, सी-डॅक व भाषाविषयक काम करणार्‍या विविध संस्था, त्यांचे तज्ज्ञ, भाषांचे जाणकार यांच्या मदतीतून भाषेच्या संगणकीय प्रमाणिकीकरणासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.  
कसे मिळते ‘युनिकोड स्टॅँडर्ड’? 
जगभरातील भाषांचे मानकीकरण करण्याची व्यवस्था अर्थात युनिकोड. युनिकोड ही एक जगन्मान्य संस्था असून, जगभरातील सुमारे ४00-५00 संस्था त्यांच्याशी संलग्न आहेत. मुख्यत: मराठी भाषेला त्याच्याशी जोडून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकदा युनिकोडची मान्यता मिळाली की ती भाषा खर्‍या अर्थाने प्रमाणित होत असते. सर्व प्रमाणित अशा २२ भारतीय भाषा युनिकोडशी संलग्न करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांचा संगणक, मोबाइलवर वापर आता सहजशक्य होत आहे. त्याचा फायदा हा झाला की, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, युनिक्स अशा जागतिक दर्जाच्या कंपन्यांमध्ये, त्यांच्या उत्पादनांमध्ये भारतीय भाषांचे सहकार्य घेण्यास सुरुवात झाली आहे. 
प्राचीन व सांस्कृतिक वारसा असलेल्या भाषा अर्थात मोडी, वैदिक संस्कृत, अवस्थन, ब्राrी यांसारख्या भाषांनाही युनिकोड स्टँडर्ड मिळावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अर्थात हे करण्याची प्रक्रिया इतकी साधीसोपी नसते. कमीत कमी दहा हजार लोक हे ती भाषा बोलतात हे युनिकोडला सिद्ध करावे लागते व त्याचा पाठपुरावा करावा लागतो. 
मराठी कीबोर्ड
या क्षेत्रातील दुसरा क्रांतिकारक टप्पा होता, स्वतंत्र मराठी कीबोर्डचा. सी-डॅकने ‘इनस्क्रिप्ट’ या नावाने नवा कीबोर्ड सादर केला. नव्या भाषांमध्ये त्याला विकसित करण्याचे काम सुरू आहे. हा कीबोर्ड २२ भारतीय भाषांना सपोर्ट करतो. 
ओपन टाइप फाँट
तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रमाणिकीकरणाचा भाग म्हणजे त्याचे दृश्य स्वरूप. त्याबाबतीत संगणकीय विश्‍वात ‘ओपन टाइप फाँट’ ही संकल्पना नव्याने रुजवण्यात आली. त्यामुळे जर डाटा युनिकोडमध्ये असेल तर त्याची परस्पर देवाणघेवाण शक्य झाली. पूर्वी फाँट सर्च करताना अडचणी यायच्या त्यावरही तंत्रज्ञानाने मात केली आहे. 
‘स्क्रीप्ट ग्रामर’ ते ‘फ्युएल’!
इतकंच काय, संगणकावर वापरल्या जाणार्‍या मराठी भाषेचेही योग्यरीत्या प्रमाणिकीकरण व्हावे म्हणून एक स्क्रीप्ट ग्रामर तयार करण्यात आले आहे. सी-डॅकने विविध संस्थांना एकत्र करून हे शिवधनुष्य पेलले. प्रत्येक शब्द विशिष्ट प्रकारे कसा लिहायचा याचे नियम व व्याकरण त्यात निश्‍चित करण्यात आले. संगणक आपल्याच भाषेत हवा यासाठी संगणकावरील तारखा, वेळा, बुलेट, मापनाची एकके, चलनव्यवहाराची परिमाणे हे सारं मराठीत असावं व ते प्रमाणित असावं म्हणून कॉमन लोकेट डाटा रिपॉझिटरी ही व्यवस्था तयार करण्यात आली. दैनंदिन वापरातील संकल्पना मराठीत आणता याव्यात यासाठी ‘फ्युएल’ अर्थात फ्रिक्वेंटली युज एंट्री लिस्ट ही यंत्रणा तयार करण्यात आली. त्यानुसार प्रिंट, प्रिंट प्रिव्ह्यू यांसारख्या शब्दांना पर्यायी मराठी शब्दांची एक सूची तयार करण्यात आली. असे ६00 शब्द तयार करून संगणकात त्यांचा प्रत्यक्ष वापर शक्य झालेला आहे. ऑपरेटिंग सिस्टीम्सचे भारतीयीकरण करण्याच्या दृष्टीने सीडॅकने भारत ऑपरेटिंग सिस्टीम्स अँड सोल्युशन्स (बॉस)ची निर्मिती केली आहे. त्यामुळे संगणक सुरू केल्यापासून बंद करेपर्यंत संपूर्णत: भारतीय भाषेमध्ये त्याचा वापर करणे शक्य झाले आहे. अशा अनेक गोष्टी. तंत्रज्ञानाच्या पातळीवर आपण आता कुठेही मागे नाही. त्यातील अडथळे आव्हानांवर आपण मात करत आहोत. गरज आहे, ती त्याचा सार्वत्रिक व व्यापक स्तरावर प्रसार आणि प्रचार होण्याची. मराठीचा हा ग्लोबल झेंडा सर्वदूर आणि सर्वत्र घेऊन जाण्यासाठी तंत्रज्ञान त्याचं योगदान देतंय. पुढची जबाबदारी अर्थातच आपली.
 
 
 
भाषिक प्रमाणिकीकरणाचे 
प्रयत्न
 
8  विश्‍वकोशाचे २0 खंड युनिकोडमध्ये
      आणण्याचे महत्त्वपूर्ण काम. 
8 साहित्य संस्कृती मंडळासमवेत काम करून
      २४0 पुस्तके महासाहित्यसंस्कृती या
      संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करून
      देण्यात आली आहेत. 
8 राज्य मराठी विकास संस्थेसमवेत एक       
      हजार दुर्मिळ ग्रंथांच्या डिजीटायझेशनचे
      काम सुरू. 
8 भाषा संचालनालयाच्या ४७ कोशांचे
      डिजिटायझेशन व अँड्रॉईड अँपदेखील.
 
 
उल्लेखनीय योगदान 
 
या सार्‍या भाषा व्यवहाराच्या संगणकीकरण व प्रमाणिकीकरणामध्ये गेल्या २२ वर्षांपासून योगदान देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संशोधक डॉ. महेश कुलकर्णी. सद्यस्थितीत त्यांच्याकडे १८0 संशोधकांची टीम आहे. तसेच मुक्तपणे काम करणारे २६0 हून अधिक भाषातज्ज्ञ त्यांच्याकडे आहेत. त्यांच्या बळावरच हा सारा डोलारा सांभाळला जात आहे. 
 
 
(लेखक लोकमतच्या पुणे आवृत्तीत वरिष्ठ 
उपसंपादक आहेत.)