शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

वैदर्भीय महेश मानकरची चित्रकला थेट रशियात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 23:29 IST

सर्जनशील कलावंताची प्रतिभा ही त्याच्या कलाकृतीतून उमटते. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीसारख्या छोट्या गावातही ती उमलते, फुलते आणि सातासमुद्रापार पोहोचते. भद्रावतीचा ध्येयवेडा चित्रकार महेश महादेव मानकर हे त्याचे नाव. महेशने जलरंगातून साकारलेल्या निसर्गचित्रांची मोहिनी ‘रशिया एटलांटिस २०१९’ या कार्यशाळेत घातली गेली. जगभरातील प्रतिभावंत चित्रकारांसाठी महिनाभर चाललेल्या कार्यशाळेत देशाचे प्रतिनिधित्व करताना त्याने आपल्या निसर्गचित्रांची अमीट छाप उमटविली.

प्रा. सदानंद चौधरीचित्रनिर्मितीसोबतच विविध देशातून आलेल्या चित्रकार मंडळींनी आपापल्या देशातील चित्र संस्कृतीवर तेथे विचारांचे आदानप्रदान केले. विदर्भातील तरुण चित्रकारांमध्ये जलरंग माध्यमातील निसर्गचित्रकार म्हणून महेश सर्वांना परिचित आहे. आतापर्यंत त्याच्या निसर्गचित्रांची निवड, फ्रान्स, इटली, नेपाळ, बांगला देशसह विविध देशांमध्ये झाली आहे. निसर्गचित्रांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात त्याची निवड झाली असून, अनेक पारितोषिकेही प्राप्त केलेली आहेत. 

महाराष्ट्रातील ग्रामीण जीवन आणि अनेक निसर्गदृश्ये त्याने चित्रातून जिवंत साकारली. जलरंगातून पडकी गाडी, चहाची केटली, सायकलसारख्या वस्तूंना दिलेला आकार चित्रातून बोलका झाला. भारतात अनेक ठिकाणी त्याने जलरंगावर कार्यशाळाही घेतल्या. निसर्ग चित्रातील लाईट अ‍ॅन्ड शेड दाखविण्यावर त्याने विशेष भर दिला आहे. एका छोट्या गावातून मोठे होताना महेशने केलेला संघर्षही उमद्या, नवोदित चित्रकारांसाठी एक आदर्श ठरतो. मुळातच चित्रकला ही उपजीविकेचे साधन ठरत नाही, हे जाणूनही त्याने कलेचा ध्यास सोडला नाही. सातत्य आणि परिश्रमामुळे आज रशियासारख्या देशात त्याला आपली निसर्गचित्रे पोहोचवता आली. 
कॅनव्हासवरील चित्रशैलीतून त्याच्या प्रगल्भ शैलीचे दर्शन घडते. एखाद्या तरुण चित्रकाराची चित्रखोली कशी असावी आणि त्या रंगाशी जुळलेल्या त्याच्या नात्याचे दर्शन, या निसर्गचित्रांतून नक्कीच पाहायला मिळते. त्याने या चित्रांमधून अंतर्मनातील भावना प्रगट केल्या आहेत. थोडक्यात सुरेख, बांधेसूद व प्रमाणबद्ध अशा रंगलेपणामुळे त्याच्या चित्रकृती वेधक झाल्या आहेत. आजच्या या विज्ञानयुगात जगातील प्रत्येक चित्रकार आपल्या चित्रशैलीसाठी व रंगसंगतीसाठी इतक्या सुविधा असूनही धडपडत आहे. आजच्या चित्रकाराला एका क्लिकवर कुठल्याही वस्तूचा, चित्रांचा, शिल्पांचा म्हणजेच दृश्यकलेचा सहज अनुभव घेता येतो व त्याची मदतही मिळते. मात्र स्पर्धेत चित्रकाराला जिद्द, चिकाटी असल्याशिवाय यश मिळणे शक्य नाही. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर महेशने ही मजल गाठली आहे. तरुण वयात त्याने मिळविलेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. या यशाचे श्रेय तो आपले आई-वडील व परिवारासह गुरुजनांना देतो महेशला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

टॅग्स :painitingsपेंटिंगVidarbhaविदर्भ