शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पेन्सिलचित्रांचा जादूगार

By admin | Updated: December 6, 2014 17:07 IST

दगड फोडणार्‍या हातोडीचे वजन पेलण्याबरोबरच त्याच्या हातांनी नाजूकशी पेन्सीलही लीलया पेलली. एवढंच नव्हे, तर त्यातून त्याने एक नवी चित्रसृष्टीच निर्माण केली. मोहवणारी, दिपवणारी. चित्रकलेचं कसलंही पारंपरिक शिक्षण नसताना कॅमेर्‍याने टिपलेली छायाचित्रंच वाटावी अशी हुबेहूब पेन्सीलचित्र काढणार्‍या एका युवकाची गोष्ट.

- राजा माने
 
दगड-पाषाणाशी नियतीनं जडविलेलं नातं अधिक घट्ट करीत जगण्यासाठी धडपडत राहणं.. या धडपडीला थोडंबहुत यश आलं की पोटभर खाऊन चांगलं जगण्याच्या स्वप्नांचा पाठलाग करीत दगड फोडत, अंगमेहनतीची कामं करीत पुन्हा दगड-पाषाणाशी असलेल्या नात्याशी इमान राखणं.. वडार समाजजीवनाची ही मळलेली अन् रुळलेली वहिवाट! याच वाटेवरील एक तरुण दगड-पाषाणाशी बंड करतो अन् चक्क याच वहिवाटेचं रूपांतर जीवनक्रांतीच्या महामार्गात करतो.. त्या तरुणाचं नाव आहे शशिकांत वामन धोत्रे!
दारिद्रय़ाचे मानगुटीवर बसलेले भूत वागवत दगड फोडून व अंगमेहनतीची कामे करून जगणे माहीत असलेल्या शिरापूर (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील धोत्रे कुटुंबात शशिकांत याचा १९८२ साली जन्म झाला. वडील वामन यांनी कष्टाला व्यसनाधीनतेची जोड दिल्याने कुटुंबाचे कष्ट पोटभर भाकरी देऊ शकत नव्हते. अशा वातावरणात जन्मलेल्या शशिकांत याला बालपणी केवळ दगड-पाषाणांची आणि व्याकूळ भुकेचीच ओळख झाली. ही ओळख जतन करीत असताना त्याच्यातील कलावंत आणि संवेदनशील मन मात्र त्याने जिवंत ठेवले. उपासमारीचा सामना करीत असताना शिरापूर शिवारात चक्क उंदीर-घुशी खाऊन पोटाचे खळगे भरण्याची वेळदेखील त्याच्यावर आली. पण फोडलेल्या दगडांची टोपली उचलताना तो आपल्या मित्रांना मात्र आपण कोट्यधीश होण्याची स्वप्नं दाखवायचा. स्वप्नांशी अतूट मैत्री करताना शशिकांतने वडिलांच्या खिशातील डायरीला लटकलेल्या तीन-चार रंगांच्या बॉलपेनलाच आपला गुरू बनविले. त्या बॉलपेननेच खर्‍या अर्थाने त्याची चित्रकला तपश्‍चर्या सुरू झाली. बॉलपेनने वेगवेगळी चित्रं काढण्याच्या त्याच्या वेडाने आपसूकच शाळेच्या अभ्यासाकडे पाठ फिरवायला भाग पाडले. एकीकडे स्वत:चा व कुटुंबाचा जगण्यासाठी चाललेला संघर्ष आणि दुसरीकडे चित्रांवर जडलेले प्रेम या कोंडीतून बाहेर पडण्याचा तो सतत प्रयत्न करीत होता. दगड फोडणे आणि बिगारी काम करणे हे मात्र त्याच्या पाचवीला पूजलेलेच! त्याच्या चित्रप्रेमाची कदर गावाकडच्या मित्रांनी केली. त्याच्या कलेला दिशा मिळावी यासाठी त्याला मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्ससारख्या संस्थेत शिक्षण मिळावे, असा प्रयत्न झाला. त्याला प्रवेश मिळाला; पण कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही मुश्कील असताना मुंबईत राहायला पैसा कुठून आणणार? तो अर्धवट अभ्यास सोडून पुन्हा गावाकडे परतला. चित्र काढणे आणि ती विकायचा प्रयत्न करणे त्यासाठी भटकंती करणे, त्याच भटकंतीतून तो काही वर्षे पुण्यात स्थिरावला. तेथे अँनिमेशन आर्टचे शिक्षण घेता घेता लहान मुलांच्या आपण काढलेल्या चित्रांना सजवीत चार पैसे मिळवू लागला. मिळतील तेवढय़ा पैशातून गावाकडच्या कुटुंबाचीही पैशाची गरज भागवू लागला. चित्रकला म्हटलं की, वॉटर पेंट किंवा ऑईल पेंट हा या क्षेत्राचा शिरस्ता! या शिरस्त्याला छेदून पेन्सिलने चित्र काढण्यावर शशिकांतने भर देण्याचा निर्णय घेतला. आपल्या कलेचे पेन्सिलचित्र हेच खास वैशिष्ट्य आणि वेगळेपण ठरावे यासाठी त्याने निष्ठेने पेन्सिलचित्र रेखाटण्यावर अभ्यास आणि चिंतन केले. ग्रामीण जीवनाशी असलेले नाते, संवेदनशील मन, जबरदस्त निरीक्षणक्षमता आणि या सर्व गुणांचा मिलाफ, चित्ररूपाने साकार करण्याची बोटांमध्ये लीलया आलेली उपजत कला, यामुळे त्याने पेन्सिलचित्राच्या पारंपरिक पद्धतींनाही बाजूला सारले. पांढर्‍या कागदावर पेन्सिलने चित्र काढण्याची पारंपरिक पद्धत शशिकांतने मात्र काळ्या कागदावर विविधरंगी पेन्सिलचा वापर करीत एखाद्या जादूगाराप्रमाणे पेन्सिलचित्रांची दुनिया सजवली!  
पेन्सिलचित्रांची त्याची जादू मुंबई महानगरीत कलाक्षेत्रात चर्चेचा विषय ठरू लागली. कॉर्पोरेट जगतातील अनेक कार्यालयांतील भिंतींची शान वाढविण्याचे काम त्याची चित्रे करू लागली. पन्नास रुपयांपासून सुरू झालेल्या त्याच्या चित्रांच्या किमतीचा प्रवास पाहता पाहता लाखोंपर्यंत पोहोचला. जहांगीर आर्ट गॅलरीपासून देशभरातील अनेक नामांकित गॅलरीजमध्ये त्याची चित्रे कौतुकाचा आणि गौरवाचा विषय बनू लागली. दगड-पाषाणाशी बंड करणारा पेन्सिलचित्रांचा हा जादूगार कलेबरोबरच प्रसिद्धी आणि पैशानेही संपन्न झाला. या संपन्नतेने त्याचे जमिनीवरील पाय मात्र कधीही हलू दिले नाहीत. त्याच कारणाने दगड फोडणारा आणि बिगारी काम करणारा शशिकांत व आजचा देशातील यशस्वी चित्रकार यांच्या स्वभावात तसूभरही फरक पडलेला दिसत नाही. कलाक्षेत्रात मानाचे समजले जाणारे आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, बॉम्बे आर्ट सोसायटी, आशादीप, इंडिया आर्ट फेस्टिव्हल, महाराष्ट्र स्टेट आर्ट एक्झिबिशन पुरस्कार त्याला मिळाले. आता तो देशभर आपल्या वीस चित्रांचा जागर घेऊन तब्बल दोन वर्षे ट्रॅव्हल शो करणार आहे. या शोची मुहूर्तमेढ मुंबईत रोवली गेली. आता हा शो देशभराची यात्रा करेल. पेन्सिलचित्रांच्या जादूगारास लोकमत परिवाराच्या शुभेच्छा!
(लेखक लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे 
संपादक आहेत.)