- नितीन कुलकर्णी
कलेच्या उच्च शिक्षणात शिक्षक म्हणतात की, कला शिकवता येत नाही, कलेचं तंत्र शिकवता येतं. असं म्हणताना एक गृहीतक वापरलं आहे ते असं- केवळ दृश्याची प्रतिकृती तयार करण्यातून कला निर्माण होतेच असं नाही, म्हणजे
कलामूल्य म्हणजे काय आणि त्याचा स्त्रोत कुठे असतो? कलेचं मूल्य म्हणजे कलाकृतीत असलेलं सौंदर्य, असं ढोबळमानाने म्हणलं तर आपलं विवेचन थोडं सोपं होईल. सौंदर्य हे सौंदर्याचा अनुभव देण्यातूनच प्रकट होणारी गोष्ट. (सौंदर्य म्हणजे अनुभवण्याची गोष्ट असते.) म्हणजे कलानिर्मितीची प्रक्रिया ही अनुभवजन्य असते आणि अनुभवाच्या विविध पातळ्या इथे पादाक्रांत झालेल्या असतात. चित्र काढण्याआधी घेतलेल्या दृश्याचा अनुभव, चित्र काढताना घेतलेला माध्यमाच्या हाताळणीचा अनुभव व चित्र पूर्ण झाल्यानंतरचा बघण्याचा अनुभव. दर्शकांसाठी चित्र फक्त पाहण्याचाच अनुभव असतो; परंतु भूतकालीन स्मृतीच्या आधारे चित्रवलोकन व रसग्रहण समृद्ध होते. चित्रप्रक्रियेतील अनुभवांची प्रत जेवढी समृद्ध असेल तेवढेच कलामूल्य उच्च दर्जाचं ठरणार. दुस:या शब्दात सांगायचं तर विषयदृश्याचं सादरीकरण किती वेगळं, तरल तेवढंच ते कलानिर्मितीकडे घेऊन जाणारं. आता परत कलाशिक्षणाच्या प्रश्नाकडे येऊ, म्हणजे कला शिकवताना अनुभव घेण्यास शिकवावं लागणार, (म्हणजे का शिकवू नये?) नुसती रंगरंगोटी गिरवून चालणार नाही. नुसत्या तांत्रिक करामतीचे डेमोज् जरा संकुचितच होणार. अनुभव घ्यायला शिकवणार कसं? (आणि माध्यम हाताळणीचं शिक्षण हेही अनुभवप्रधान असू शकतं.) प्राचीन काळात गुरू-शिष्य परंपरेत ते शक्य होतंही. जिथे शिष्य गुरूच्या घरी राहून पूर्ण जीवनानुभवाला भिडत असे व त्यातूनच तंत्रशिक्षणाच्या जोडीने मूल्यशिक्षणही घेई. आजच्या संदर्भात कलामूल्य शिक्षणाचा विचार अध्यापनशास्त्रच्या (स्रींिॅॅ8) उपयोगानेच होऊ शकतो आणि या शास्त्रत अनुभवजन्य शिक्षणाचा अंतर्भाव अपरिहार्य आहे. असा अंतर्भाव करण्यासाठी दृश्यबोधनशास्त्रचा (5्र24ं’ ूॅल्ल्र3्रल्ल) अभ्यास करणो गरजेचे आहे. अशा प्रकारचा वेगळा अभ्यासक्रम आधी तमाम कला व डिझाइनच्या शिक्षकांसाठी करणो गरजेचे आहे. संधी मिळाल्यास या कामास दिशादर्शन देण्याचा मानस आहे.
रॉबर्ट मॅकिम या स्टॅण्डफोर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकाने ऐंशीच्या दशकात लिहिलेल्या एक्स्पिरिअन्स इन व्हिजुअल थिंकिंग या पुस्तकात केलेल्या विवेचनात प्रमुख विषय आहे तो दृश्यविचाराचा. दृश्यविचार हा दृश्यकला, स्थापत्य व डिझाइनच्या शाखांमध्ये असतो. हा आंतरविद्याशाखेचा विषय मानवी अनुभवांविषयी सैद्धांतिक पाया घालून देतो आणि अनुभव घ्यायला शिकवण्याच्या तंत्रची दिशा देतो. याच्या अंतर्भावाखेरीज कलाशिक्षण निरस आहे. आमचे जे. जे. तले प्राध्यापक प्रभाकर कोलते म्हणायचे, ‘मी एकवेळ माझा डोळा काढून तुम्हाला देऊ शकेल, पण दृष्टी नाही देऊ शकत’. यातल्या अतिशयोक्तीचा भाग सोडला तर असं म्हणायचं आहे की डोळा हे द्वितीय श्रेणीचे इंद्रिय आहे व प्रथम श्रेणी बुद्धीला द्यावी लागेल (पातंजली). कलाप्रक्रियेत खरी कसोटी, डोळ्याने (अथवा मनाने) बघितलेले दृश्य आपल्या अंत:करणाद्वारे विचारतरंगांमध्ये कसे प्रवाहित करतो यात असते. त्यामुळे अनुभवजन्य विचार करायला शिकवणो गरजेचे आहे. त्याचा अंतर्भाव कला शिक्षणशास्त्रत करायला हवा. यासाठी अनुभव घेण्यासाठी परिस्थिती निर्माण करणं, तो मांडण्याची संधी भाषा व दृश्यमाध्यमांच्या द्वारे देणं, समजलेल्या गुणाची योग्य रचना आपल्या कृतीत करायला लावणं असे तीन टप्पे या प्रणालीचे असू शकतात आणि प्रत्येक टप्प्याच्या परिणामांची नोंद करणो गरजेचे आहे. अनुभव-दृश्यविचार, सातत्य-मूल्यनिर्मिती अशी ही चक्राकार कडी आहे. या प्रणालीचा अंतर्भाव शिक्षणात करावाच लागणार.
मॅकिम विचारतो, विचार म्हणजे काय? आपण विचार करतो म्हणजे काय करतो? आपण कधीकधीच विचार करतो की नेहमीच? झोपले असताना आपण विचार करतो का? विचार आपल्या मेंदूत होतो की मज्जासंस्थेत? विचारांचा कच्चा माल म्हणजे आपल्या आत चाललेलं सततचं बोलणं, यातून काही प्रतिमा अवतरत असतात का? की असं बोलणं प्रतिमाविहीन असतं? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील किंवा नाही ते माहीत नाही; परंतु एक मात्र खरं की, विचार हे आपल्या अस्तित्वाचे द्योतक असतात. विचारप्रक्रि या ही जागृतावस्थेची खूण असते. थोडा वेळ आपले डोळे बंद करून बसा व आपल्या मनातले विचार थांबवण्याचा प्रयत्न करा. असं आपण ध्यान करताना अथवा शवासन घालताना करतो आणि आपला अनुभव सांगतो की असं करणं अत्यंत कठीण आहे. विचार थांबवायचा प्रयत्न केला की एकापाठोपाठ एक विचार येत जातात, जे शाब्दिक स्वरूपाचे असतात. ङोन ध्यानाच्या प्रकारात असं सांगतात की, जाणीवपूर्वक विचार थांबवायचा प्रयत्न करू नका. याउलट एक विचार आला की स्वत:ला सांगा की अमुक अमुक विचार आला. पुढचा विचार आला तर पुन्हा तेच करायचं. आपला विचारदेखील बघायचा. यातूनच मन शांत होत जातं व ही प्रक्रि याच ध्यान ठरते. मनाच्या अशा अवस्थेत आपण दृश्यमय होऊ लागतो आणि मग एकामागोमाग एक दृश्य येत जातात, निर्मम भावातून आपण ती दृश्य बघत जातो. डोळे उघडल्यानंतरही प्रत्यक्षातली दृश्य संयतपणो दिसायला लागतात आणि रूढ अर्थविचारापेक्षा वेगळे विचार मनात येतात हीच म्हणायची दृश्यविचाराची पहिली पायरी.
‘चित्र काढायला शिकणो म्हणजे बघायला शिकणो-निट बघणो- म्हणजे डोळ्यांना दिसते त्यापेक्षा अधिक बघणो’ (किमॉन निकोलैडेस, 1941)
दृश्यविचार हा मन:चक्षूंना जागृत करण्यातून चांगला करता येतो व चित्र काढण्याचा भाग हा दृश्यविचारांचाच भाग असतो हे वरील वाक्याआधारे म्हणता येते. दृश्यबोधनाच्या प्रक्रियेत समज (स्री1ूीस्र3्रल्ल) व विचार हे वेगळे करता येत नाहीत. कलेसाठी वास्तवातला अनुभव व त्यातून येणारी प्रेरणा महत्त्वाची असते. यातूनच हा दृश्यविचार चित्र काढण्यातून प्रवाहित होतो. रिकोयूर या अभ्यासकाच्या प्रणालीप्रमाणो दृश्यानुभवातून प्रतिमेची निर्मिती होणो हे दृश्यविचारांची परिणती असते. याचे तीन टप्पे असतात.
1) दिसलेली प्रतिमा, 2) मनात प्रतिबिंबित झालेली प्रतिमा आणि 3) बाह्यरूप घेतलेली प्रतिमा. या प्रक्रि येचे टप्पे क्रमवार असले पाहिजेत असं नाही. दृश्यविचारांमध्ये दर्शविण्याचं महत्त्व विषद करणारा अभ्यास बघणं रंजक ठरतं. एक उदाहरण बघू, आपल्याला एक कृती करायची आहे. ती करताना आपल्या मनातल्या प्रक्रि येकडे लक्ष द्या. एक माणूस व मुलगी बरोबर चालत आहेत आणि दोघांनीही डावे पाऊल पुढे टाकण्यातून चालणं सुरू केलं. माणसाने तीन पावलं टाकली, तर मुलीने दोन. आता तुम्हाला सांगायचं आहे की दोघांनी त्यांचा उजवा पाय एकाचवेळी कधी उचलला? आता आपल्याला कल्पनाशक्तीच्या जोरावर हे दृश्य आपल्या मन:चक्षूंसमोर आणायचं आहे आणि त्याचवेळी त्या दृश्यातील बारकाव्यांचं विश्लेषण करायचं आहे. ही कृती करताना घालमेल होते व बाह्य दर्शनाची गरज निर्माण होते. उदाहरणार्थ आपल्या दोन्ही हातांच्या बोटांचा पाय म्हणून वापर करून पाऊलं मोजावी लागतील किंवा चित्र काढून बघावं लागेल ज्यात केवळ पावलांचे ठसे काढलेले असतील. चित्र काढण्याच्या संदर्भातही असंच होत असतं. मन:चक्षूंनी बघितलेलं दृश्य रेखाटताना तेच दृश्य परत बघावं लागतं किंवा बाह्य वस्तूच्या आधारे प्रतिकृती बनवून परत बघावं लागतं.
मानवी संवेदनेचं जग आपल्या पाचही संवेदनांच्या अनुभवांनी असतं आणि त्यात प्रधान असतो तो दृश्यानुभव. असं म्हणताना दृश्याचा अनेकपदरी असलेला अर्थ गृहीत धरला आहे. दृश्याच्या प्रत्यक्ष अनुभवात रममाण होणो, कल्पनेच्या आधारे मानसचित्रे चितारणो, मन:चक्षूंनी स्मृतीच्या आधारे तयार केलेल्या प्रतिमेचा वापर इत्यादि अनेक प्रकारच्या उपशाखांच्या समन्वयाने आपली पूर्ण दृश्यशक्ती बनते. या शक्तीचा वापर जसा अनेक क्षेत्रंत होत असतो तसा तो चित्रकला शिक्षणातही होऊ शकतो. परंतु दुर्दैवाने कलाशिक्षणात असा विचार केला जात नाही. एका बाजूला केवळ हाताचा सराव व तंत्र शिकण्याची करामत, तर दुसरीकडे आंतरिक ऊर्मी व काल्पनिक प्रतिमानिर्मितीला उत्तेजन दिले जाते. यातून दोन प्रमुख शैलींना प्राधान्य दिले जाते. वास्तववादी व अमूर्त दृश्यबोधनाच्या संदर्भात बघितले तर वास्तव हे पूर्ण वास्तव आणि अमूर्त हे पूर्ण अमूर्त कधीच नसते. या दोन्ही प्रणालींचा मेळ बोधनवादी विचारसरणीमध्ये असतो. दृश्यप्रतिमाच्या संदर्भातले दोन प्रमुख भाग बाह्य व अंतस्थ व आपल्या अभ्यासक्रमात फक्त बाह्य प्रतिमांना जरुरीपेक्षा जास्त महत्त्व दिले जाते. त्या बरोबरीनेच अंतस्थ प्रतिमानुभवाला जर महत्त्व दिले तर हे शिक्षण बहुआयामी होईल व त्याचे उपयोजन केवळ कलेतच राहणार नाही. व्हिसेंट व्हॅन गॉग या जगप्रसिद्ध चित्रकाराचे द मॅन इज अॅट सी हे चित्र व मोझीला फायरफॉक्स या सर्च इंजिनचा लोगो हे दोन्ही पूरक रंगातले दृश्यनमुने इथे याचसाठी देत आहे.
एक वेगळा अनुभव म्हणून.
(लेखक नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेत डिझाइन या विषयाचे प्राध्यापक आहेत)
nitindrak@gmail.com