शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

मराठीसाठी लोकनागरी

By admin | Updated: May 8, 2016 00:20 IST

‘भाषा ही शुद्ध तूप खाणा:यांची असते तशी कोरडे जेवण जेवणा:यांचीही असते’. मराठी भाषेबद्दल ही सर्वसमावेशक भूमिका घेऊन लिहिलेलं ‘मराठीसाठी

- विश्राम गुप्ते
 
‘तूप खाणारे जसे असतात,
तसेच कोरडे जेवण जेवणारेही.’
व्याकरणाचे लोकशाहीकरण आणि
मराठी भाषेविषयी सर्वसमावेशक 
भूमिका घेऊन लिहिलेले
‘मराठीसाठी लोकनागरी’ हे पुस्तक.
एकीकडे प्रमाण मराठीचा आग्रह तर
दुसरीकडे व्याकरणाच्या नियमांकडे
साफ दुर्लक्ष करण्याच्या मतांचा रेटा.
ही दोन्ही टोके टाळून भाषेबद्दल
सुवर्णमध्य साधणारा विचार
लेखिका पुष्पा फडके मांडतात.
अनावश्यक गोष्टींना फाटा देण्यासाठी साडेसात नियमांचा पर्यायही त्या सुचवतात.
त्यावर सखोल चर्चा अपेक्षित आहे. 
 
‘भाषा ही शुद्ध तूप खाणा:यांची असते तशी कोरडे जेवण जेवणा:यांचीही असते’. मराठी भाषेबद्दल ही सर्वसमावेशक भूमिका घेऊन लिहिलेलं ‘मराठीसाठी लोकनागरी’ हे गोवास्थित पुष्पा फडके यांचं सुमारे 480 पानांचं पुस्तक म्हणजे अलीकडल्या काळातलं अभ्यासपूर्ण; पण रसाळ भाषेतलं अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. याला अधिक भारदस्त शब्द वापरून ‘ग्रंथ’ म्हणायचा मोह होतो.
हा ग्रंथ गोव्यातील सुप्रसिद्ध विचारवंत श्री. डी. डी. कोसंबी किंवा अ. का. प्रियोळकर यांचा स्वयंप्रज्ञ बौद्धिक वारसा पुढे नेणारा आहे. खरं तर हे पुस्तक चार वर्षापूर्वी म्हणजे 2012 साली प्रकाशित झालं आहे. पण त्याकडे सुबुद्ध वाचकांचं जावं तितकं लक्ष गेलं नाही. उत्सवप्रिय आणि हौशी वा्मयीन पर्यावरणात तसंही स्वतंत्र (ओरिजनल) विचारांकडे कोणी गंभीरपणो बघत नाही. पण व्याकरणाच्या सोपेकरणाचा ध्यास घेतलेल्या पुष्पा फडकेसारख्या विदुषी निष्ठेने काम करतात. त्यामुळे समाजाचं बौद्धिक स्वास्थ्य टिकून राहतं. या ग्रंथाचा आवाका मोठा आहे. व्याकरणाचं लोकशाहीकरण हा त्याचा उद्देश आहे. नव्या काळात चैन, ज्ञान आणि अभिव्यक्तीच्या लोकशाहीकरणाची प्रक्रिया स्थिर होऊ बघतेय. हा लोकशाहीवादी जागतिक ट्रेंड बघितला तर व्याकरणाचंही लोकशाहीकरण होऊन ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात यावं हे स्वाभाविकच आहे. त्यामुळे या पुस्तकाचं औचित्य आहे.
लोकशिक्षणाचा वेग वाढल्यानंतर संस्कृतप्रचूर अभिजनवादी मराठी भाषा इतिहासजमा होऊन मराठी मायबोली किंवा लोकभाषा म्हणून विकसित झाली. पुष्पा फडक्यांच्या नव्या पुस्तकाने या  लोकभाषेसाठी देवनागरी लिपीला पूरक अशा ‘लोकनागरी’ लिपीचा सूतोवाच केलं आहे. त्याचसोबत मराठी भाषेला लोकाभिमुख आणि विवेकशील व्याकरणाचं अधिष्ठान पुरवलं आहे. हे करताना मराठी व्याकरणाच्या पारंपरिक अठरा नियमांमध्ये कालानुरूप सुधारणा करून लेखिकेने नवे साडेसात नियम रुजू केलेले आहेत. त्याचं प्रासादिक भाषेतलं निवेदन हे या पुस्तकाचं मोठं वैशिष्टय़ आहे. नव्या वेगवान काळाला शोभेल असं नवं व्याकरण आणि त्याचे नियम या पुस्तकाचा गाभा आहे. पण या गाभ्यात शिरण्यापूर्वी लेखिका ज्या सविस्तर रीतीने मानवी भाषा, तिची उत्पत्ती, तिचा इतिहास, शब्दांची निर्मिती, शब्दोचार, शब्दार्थ इत्यादी मूलभूत विषयांचं आधुनिक भाषा शास्त्रनुसार विवेचन करते ते प्रस्तुत पुस्तकाला तात्त्विक आणि ऐतिहासिक पाश्र्वभूमी पुरवतं. हे प्रकरण ज्यांना साहित्य-संस्कृतीत रस आहे त्यांच्यासाठी मेजवानी आहे.
त्यानंतरच्या दीर्घ प्रकरणात आर्य आणि आर्येतर भाषांचा इतिहास, संस्कृत-प्राकृत भाषांचा विकास आणि मराठी भाषेचा सर्वागीण विकास, तिचे व्याकरण इत्यादीबद्दल अभ्यासपूर्ण आणि वैज्ञानिक चर्चा आहे; पण पुष्पा फडक्यांच्या प्रवाही भाषेचं वैशिष्टय़ म्हणजे एरवी बौद्धिक स्वरूपाची वाटू शकणारी ही तात्त्विक चर्चा थेट लेखन शैलीमुळे अत्यंत रोचक उतरली आहे. लोकशाही, स्वातंत्र्य, समता आणि बहुजनांचे सशक्तीकरण या मूल्यांची नव्या जगात सरशी सुरूआहे. त्यामुळे अभिजनांची शिक्षणातली सोवळी मक्तेदारी संपून लोकभाषेचं नवं पर्व उदयास येऊ घातलंय. या संक्रमण प्रक्रियेत दोन अतिरेकी विचार प्रवाह रुजू लागले. पैकी पहिला प्रवाह प्रमाण भाषेचं अस्त्र वापरून बहुजनांच्या अभिव्यक्तीला हीन लेखणारा, तर दुसरा प्रवाह जोर्पयत भाषेचा अर्थ लागतो तोर्पयत :हस्व, दीर्घ इत्यादी व्याकरणाच्या नियमांकडे साफ दुर्लक्ष करावं या मताचा होता. पुष्पा फडके ही दोन्ही टोकं टाळून भाषेबद्दल सुवर्णमध्य साधणारा विचार मांडतात. त्यावर भाषाप्रेमींनी सखोल चर्चा करणं अपेक्षित आहे. ‘कोणतीही भाषा प्रथमत: बोली म्हणूनच वापरात येते आणि कालांतराने ती साहित्यिक भाषा होते. या मार्गाने भाषा प्रतिष्ठित झाली की तिचे बोलीरूप कमी होते आणि गंमत म्हणजे त्यातून पुढे वेगळेच बोलीरूप निर्माण होते. ते विकसित होताना प्रतिष्ठित भाषेपेक्षा वेगळे होऊ लागते’ अशी रोचक निरीक्षणं मराठीची उत्पत्ती कशी झाली हे सांगताना लेखिका नोंदवते. धर्मक्रांती, राज्यक्रांती, लोकक्रांती अशा प्रकारचे धक्के समाजाला बसल्यानंतर भाषेमध्येसुद्धा बदल होतात. क्रांतीमुळे भिन्न वंश व संस्कृतीचे लोक एकमेकांच्या संपर्कात येतात आणि या मिश्रणाने भाषांमध्ये बदल घडतात हे भाषातज्ज्ञ डॉ. गुण्यांचं मत आधुनिक काळात सुद्धा कसं चपखलपणो लागू होतं हे लेखिका सांगते. 
मुक्त अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरणानंतर झालेला ¨पट्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचा उदय, टेलिव्हिजनसारख्या करमणूकप्रधान माध्यमाची मानवी मनावर स्थापन झालेली अधिसत्ता, त्यामुळे पारंपरिक भारतीय समाजात सुरू झालेला सांस्कृतिक आणि भाषिक संकर, मराठीत वारंवार होणारा ¨हदी किंवा इंग्रजी मिश्रित शब्दांचा वापर, सोशल नेटवर्किग साइट्स वर होणारा भाषेचा खेळकर आणि लवचिक वापर इत्यादी आपण अनुभवत आहोत. मीडियाच्या रक्तविहीन क्रांतीमुळे आपलं भाषिक पर्यावरण कसं झरझर बदलत चाललं आहे हे आपण बघतोच. प्रमाण भाषेला विविध बोलींचे पर्याय मिळू लागले आहेत. टेलिव्हिजन किंवा रविवारच्या वृत्तपत्र पुरवण्यांच्या माध्यमातून या विविध बोली आपल्या परिचयाच्या झाल्या आहेत. एकूणच शाब्दिक अभिव्यक्तीला आलेला महापूर, त्यामुळे निर्माण होणारे नवे शब्द आणि नव्या भावना भाषेच्या माध्यमातून व्यक्त होत असताना भाषेचे किंवा शुद्ध लेखनाचे प्रमाण भाषेतले पारंपरिक नियम कालबाह्य ठरले तर त्यात नवल नाही. नव्या भाषिक पर्यावरणात नवे व्याकरणाचे नियम लागू व्हावेत असं लेखिकेला कळकळीने वाटतं. ‘पाणी’ हा प्रमाण भाषेतला शब्द जर आपण स्वीकारतो तर ‘पानी’ या पर्यायशब्दाला नाक मुरडण्याचं कारण नाही. जर शब्दांचा अर्थ संदर्भाने कळत असेल तर वेगळ्या रूपांचा पर्यायी शब्द म्हणून स्वीकार झाला पाहिजे अशी लेखिकेची सर्वसमावेशक भूमिका आहे.
पुस्तकातलं भारतीय लिप्यांबद्दलचं प्रकरण असंच रोचक आहे. भारतात अनेक प्रकारच्या लिप्या म्हणजे लेखनविद्या कशा अस्तित्वात होत्या हे सांगताना विविध ऐतिहासिक पुराव्यांचा दाखला वाचकाला समृद्ध करतो. उच्चरांना तंतोतंत व्यक्त करणारी लिपी मराठीत नाही हे सांगताना ‘चार’ मधला च आणि ‘चारा’ मधला च याचा गोंधळ आपल्याला कळतो. या प्रकरणात विविध लिपी सुधारणांचा आढावा लेखिका घेते. 
1972 मध्ये मराठी साहित्य महामंडळाने लेखनविषयक एकूण 18 नियम प्रसिद्ध केले होते. पण ह्या नियमांमध्ये कालानुरूप बदल व्हावेत असं पुष्पा फडके म्हणतात. लोकनागरीसाठी सूचवलेल्या ‘साडेसात नियमां’मुळे अनावश्यक गोष्टींना फाटा मिळेल आणि लेखनात उच्चरांना महत्त्व मिळेल असा लेखिकेचा दावा आहे.
या साडेसात नियमांमध्ये अनुस्वाराचा मूळ नियम बदलून स्पष्ट उच्चराच्या न् ण् म् या अनुनासिकांचे लेखन शिरो¨बदूनेच करावे, संवाद, संयम असं लिहिण्याऐवजी संय्यम, संव्वाद लिहावे, अनेकवचनांचा अनुस्वार अनुच्चरित असल्याने तो देऊ नये, अनुच्चरित अनुस्वार देऊ नये, ‘त्यानं असं म्हटलं’ ऐवजी ‘त्यान अस म्हटल’ लिहावं, लेखनात एकच इकार आणि उकार ठेवावा अशा नव्या सूचना आहेत. त्या उच्चरांना महत्त्व देणा:या आहेत. या संबंधीचं अत्यंत विस्तृत आणि विश्लेषक विवेचन पुस्तकात भेटतं. ते मुळातूनच वाचायला हवं. इथे त्याचा त्रोटक उल्लेख केला आहे.
या पुस्तकाचा प्रतिपाद्य विषय मराठी भाषा, व्याकरण, देवनागरी लिपी ऐवजी लोकनागरीचा विकल्प असा बहुआयामी आणि महत्त्वाकांक्षी आहे. सुशिक्षितांच्या नव्या पिढीने लेखन करताना अधिकाधिक उच्चरानुसार लिहावे आणि अनावश्यक वर्णाचं ओझं बाळगू नये हा सुटसुटीत विचार या मागे दिसतो. तो कितपत अंमलात येईल हे मराठी लिहिणा:या नव्या पिढीच्या स्वागतशीलतेवर अवलंबून असेल. मात्र सवयखोर मानवी स्वभाव बघता, पुष्पा फडक्यांचा लोकनागरीचा युक्तिवाद केवळ बौद्धिक पातळीवर राहील, की तो प्रत्यक्ष कृतीत उतरेल हे काळच ठरवेल. मात्र इतक्या मूलभूत विषयावरचं त्यांचं चिंतन भाषेवर प्रेम करणा:यांना प्रेरणादायी ठरेल याबद्दल शंका नाही. 
पुष्पा फडके या गोव्याच्या शिक्षण खात्यात शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. ‘प्राथमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमाचे नूतनीकरण’ या यूनिसेफ प्रकल्पावर त्यांनी काम केलं आहे. प्राथमिक विद्याथ्र्याच्या पाठपुस्तक निर्मितीत त्यांनी महत्त्वाची भूमिका वठवली आहे. पुस्तकातल्या अनोख्या वाटणा:या त्यांच्या सूचनांना प्रत्यक्ष अनुभवाचं अधिष्ठान लाभलं आहे. एकूणच हे पुस्तक अनुभव, चिंतन, विश्लेषक शैली आणि सुबोध विवेचन याचा उत्कृष्ट नमुना आहे.
 
देवनागरी लिपीला लोकनागरीचा पर्याय सुचवताना लेखिका आदर्श लिपीचे चार निकष सांगतात. जी उच्चरांना अचूकपणो व्यक्त करते, लेखन करताना सुलभ वाटते, टंकलेखनात सहज साध्य होते आणि नेटकी दिसते ती लिपी सोपी असं सांगून ऋ, लृ सारखे अडगळीचे वर्ण गाळावेत, ऐ आणि औ हे दोन स्वर गाळून त्या ‘अईवजी’ अई, अऊ असे लिहावे, अं व अ: हे दोन वर्ण वर्णमालेतून गाळावेत, ष ऐवजी श हाच वर्ण वापरावा आणि ष हा नव्या लोकनागरीतून गाळून टाकावा अशा अनोख्या सूचना या पुस्तकात आहेत. त्यांची सविस्तर कारणमीमांसासुद्धा लेखिका करते. लिपी सुटसुटीत करणो हा लोकनागरीचा प्रमुख उद्देश आहे. या नव्या लिप्यांतरणाला विरोध होईल याची लेखिकेला कल्पना दिसते तरीसुद्धा त्यामुळे लेखनक्रिया सोपी, सुलभ आणि सहजसाध्य होईल याची त्यांना खात्री आहे. 
 
(लेखक गोवास्थित ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)