शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

LMOTY 2020:...आम्ही माध्यमांच्या प्रतिनिधींना कधी अडवले? प्रकाश जावडेकरांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 17:32 IST

Lokmat Maharashtrian of the year award 2020: हे छापू नका, हे दाखवू नका?- असा दबाव या सरकारने कधी आणला का? वृत्तपत्र आणि टीव्ही वाहिन्यांना नियम लागू आहेत, चित्रपटांसाठी सेन्सारबोर्ड आहे. मग ओटीटी आणि डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म नियमांच्या कक्षेत का नकोत? - प्रकाश जावडेकर, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री 

टीटी आणि डिजिटल प्लॅटफॉर्मला कडक नियमांच्या कक्षेत आणण्याची आवश्यकता आहे का, यावर देशभरात सध्या चर्चा सुरू आहे. ओटीटी दर्शकांचा अनुभव आणखी सुखद करण्यासाठी ओटीटी मंच आणि केंद्र सरकार एकत्रितरीत्या काम करत आहे. वृत्तपत्र आणि टीव्ही वाहिन्यांना नियम लागू आहेत, त्यांची चूक झाली तर त्यांना शिक्षा भोगावी लागते. चित्रपटांसाठी सेन्सारबोर्ड आहे. मग ओटीटी आणि डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म नियमांच्या कक्षेत का नकोत? डिजिटल मीडियाला आम्ही प्रेस कौन्सिलचे नियमच लावले आहेत. आयटी कायद्यानुसारच ही नियमावली तयार करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने तर शिक्षेचे प्रावधान असले पाहिजे असे मत नोंदवले आहे. त्यादृष्टीने आम्ही विचार करीत आहोत. अलीकडेच नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम, हॉटस्टार आणि अल्ट बालाजी यांसारख्या ओटीटी मंचच्या प्रतिनिधींशी एक बैठक झाली. या बैठकीत केंद्र सरकारच्या नियमावलीवर चर्चा करण्यात आली. ओटीटी नियमावलीतील तरतुदी या प्रतिनिधींसमोर मांडण्यात आल्या आहेत. प्रतिनिधींनी त्याचे स्वागत केले आहे. 

ओटीटी उद्योगाच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मंत्रालयाची भूमिका नेहमी सहकार्याची असेल. हे सरकार माध्यमांच्या स्वातंत्र्याविरोधात असल्याचा आरोप विरोधी पक्ष करतात, पण आज ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर ’ पुरस्काराच्या या सोहळ्यात मी विचारतो,  एक सांगा, आम्ही माध्यमांच्या प्रतिनिधींना कधी अडवले, हे छापू नका, हे दाखवू नका?- असा दबाव कधी आणला का? माझे वडील एका वृत्तपत्रात उपसंपादक होते. २५ जूनला आणीबाणी लागली. २६ जूनला पोलीस त्या वृत्तपत्राच्या कार्यालयात आले आणि कोणत्या बातम्या पानांवर जात आहेत ते तपासत होते. वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य कायम असावे म्हणून आम्हीही सत्याग्रह केला. १६ महिन्यांचा तुरुंगवासही भोगला. आता  लोक आम्हाला माध्यमांचे विरोधी ठरवत असतील तर हे अक्षरश: हास्यास्पद आहे.

लाल किल्ला असो की एअर इंडिया; मोदींनी देश विकायला काढला, असले आरोप जे विरोधक करतात, त्यांना वस्तुस्थितीचे भान नाही असे म्हणावे लागेल. या देशात करदात्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसा येतो. जे उपक्रम अगदी डबघाईस आले होते त्यांना आता पुनरूज्जीवन मिळाले आहे. सरकारची गुंतवणूक कमी झाली तरी आधीच्या तुलनेत अधिक महसूल मिळायला लागला आहे. रोजगार वाढले आहेत. सरकार देश विकत नाही; तर देशाचे भले करीत आहे.

(एबीपी न्यूजचे वृत्त निवेदक  अखिलेश आनंद यांनी  घेतलेल्या मुलाखतीचे शब्दांकन)   

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2020Prakash Javadekarप्रकाश जावडेकर