शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

‘त्या’ शिक्षकाने विद्यार्थ्यांना दिले २२ भाषांचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 08:00 IST

 अनेक माणसं ध्येयवेडी असतात. शासनाच्या सेवेत असताना दिलेले कार्य आत्मीयतेने पूर्ण करण्याची जणू हौसच असते.

ठळक मुद्देया दोन्ही वर्गाचे अध्यापणाचे कार्य एकाच खोलीत चालते. त्यामुळे कोणत्या वर्गाला शिकविण्याची सुरूवात करावी याकरिता टॉस करून त्या - त्या वर्गाचे अध्यापन करण्याचे कार्य सुरू आहे. शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद वाळके यांचेही त्यांना सहकार्य आहे.

उदय गडकरीनागपूर: अनेक माणसं ध्येयवेडी असतात. शासनाच्या सेवेत असताना दिलेले कार्य आत्मीयतेने पूर्ण करण्याची जणू हौसच असते. देशात अशा ध्येयवेड्या माणसांची कमी नाही. मात्र त्यातूनही आपले वेगळेपण जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांची संख्या फारच विरळ. अशाच एका जि. प. प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने केलेले शासनाच्या उपक्रमाचे कार्य प्रशंसनीय तर आहेच, शिवाय दखलपात्रही आहे.‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या ‘भाषा संगम’ या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना २२ भाषांचे ज्ञान देण्याचे निर्देश जि. प. प्राथमिक शाळांना देण्यात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली पंचायत समिती अंतर्गत जि.प. प्राथमिक शाळा सिंदोळा येथील उपक्रमशील शिक्षक सुधीर मोहरकर यांनी विद्यार्थ्यांना २२ भाषांचे धडे देण्याचा निर्णय घेऊन अमलातही आणला आहे. भाषा संगम हा उपक्रम संपूर्ण भारतातच लागू केला असून यामुळे विद्यार्थ्यांना किमान देशातील विविध भाषांची ओळख होवून व्यक्तीसापेक्ष संवाद साधता यावा, हा त्यामागचा उदात्त हेतु. प्रत्येक भाषेतील किमान पाच वाक्ये विद्यार्थ्यांना मुखोद्गत व्हावे, ही भूमिका आहे. शासनाच्या अध्यादेशात त्याची विस्तृत माहिती आहे. मात्र अनेक शिक्षकांना त्याचे आकलन झाले नसल्याने हा विषय हाताळण्यापासून ते अलिप्तच असल्याचे चित्र आहे.सावली पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेच्या ९२ शाळा व ३८५ शिक्षक आहेत. त्यापैकी केवळ सुधीर मोहरकर या उपक्रमशील व हाडाच्या शिक्षकाने केंद्र शासनाच्या उपक्रमाची नेटाने सुरूवात केली. त्यांचे अनुकरण इतरही शिक्षक करीत असले तरी त्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच आहे. शासनाच्या अध्यादेशाचे वाचन करून, समजून घेऊन शिकविलेले व्हिडिओ त्यांनी यु-ट्युबच्या माध्यमातून अपलोड केले आहेत. याशिवाय ‘उपक्रम काही आगळे वेगळे, काही मनातील’ या आशयाचे फेसबुक पेज तयार केले आहे. त्यांच्या अध्यापणाची पद्धत विद्यार्थ्यांनाही जाम आवडली आहे.पूर्वी केळझरच्या शाळेत असताना त्या शाळेला एक लक्ष रूपयांचा मॉडेल स्कूल पुरस्कार मिळविण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. सहा महिन्यांपूर्वी ते सिंदोळा येथील शाळेत रुजू झाले. रोटरी क्लब चंद्रपूरच्या वतीने नेशन बील्डर अवॉर्ड, मराठीचे शिलेदार संस्थेकडून उपक्रमशील शिक्षक अवॉर्ड, यासारखे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.त्यांच्या शैक्षणिक कार्याची अनेक शिक्षकांनी प्रेरणा घेऊ न शालेय ग्रामीण विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचे कार्य करावे म्हणून सावली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी वैभव खांडरे यांच्याकडून प्रोत्साहित केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अध्ययन कार्य सुलभ होते. यात विद्यार्थ्यांची क्षमता तपासून त्यांचा गृहपाठही शाळेतच करवून घेतला जातो. यामुळे सर्व विषयांचे आकलन होण्यास विद्यार्थ्यांना सहज शक्य होत आहे. दोन शिक्षकी शाळा असलेल्या मोहरकर सरांकडे ३ रा व ४ था वर्ग आहे.या दोन्ही वर्गाचे अध्यापणाचे कार्य एकाच खोलीत चालते. त्यामुळे कोणत्या वर्गाला शिकविण्याची सुरूवात करावी याकरिता टॉस करून त्या - त्या वर्गाचे अध्यापन करण्याचे कार्य सुरू आहे. शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद वाळके यांचेही त्यांना सहकार्य आहे.भाषा संगम या उपक्रमातून शिकविण्यात येत असलेल्या भाषांचे व्हिडिओ तयार करून सुधीर मोहरकर यांनी त्यांच्या मित्र परिवार ग्रुपवर पाठविल्यामुळे अनेक शिक्षकांनी हा विषय शिकविण्याची सुरूवात केली आहे. वास्तविक, या उपक्रमाचा कालावधी २२ दिवसात २२ भाषा शिकविण्याचा असतानाही वर्षभर हा उपक्रम चालू ठेवणार असल्याचा त्यांचा माणस आहे. मोहरकरांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. रोटरी क्लब चंद्रपूरच्या वतीने नेशन बील्डर अवॉर्ड, मराठीचे शिलेदार संस्थेकडून उपक्रमशील शिक्षक अवॉर्ड यासारखे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांच्या शैक्षणिक कार्याची अनेक शिक्षकांनी प्रेरणा घेऊ न शालेय ग्रामीण विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचे कार्य करावे म्हणून सावली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी वैभव खांडरे यांच्याकडून प्रोत्साहित केले जात आहे.- , सावली

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र