शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

शेवटचे 50 दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 10:43 IST

एका ‘हॉरर’ गेमच्या जाळ्यातला आत्मघातकी टास्क..

- पवन देशपांडे 

आहे तुमच्यात हिंमत? मग दाखवाच करून. चॅलेंज.. रात्री एकट्यानं हॉरर चित्रपट पाहून दाखवा. हातावर ब्लेडनं ब्लू व्हेलचं चित्र काढा. कापून दाखवा हाताच्या नसा. गालात आरपार पिन टोचा. ओठ कापून घ्या. सगळं जमलंय तुम्हाला? नक्की? मग मारा आता उंच इमारतीवरून उडी... - आपल्याला दिलेलं टास्क पूर्ण करण्यासाठी जगभरात अनेक तरुण तीही ‘हिंमत’ दाखवायला लागलेत. काय आहे हा प्रकार?

कमजोर, बुळ्या, कमकुवत लोकांना या जगात जगण्याचा काहीच अधिकार नाही. पृथ्वीवरचा ते बोज आहेत. तुम्हीच सांगा, काय उपयोग आहे या लोकांचा?जगलीत काय आणि मेलीत काय? ही लोकं म्हणजे एक प्रकारे भूलोकीचा जैविक कचरा आहेत़ कोणतीही मूल्ये नसलेलेकोणतेही ध्येय नसलेले़.असूनही नसल्यासारखेच. अंगात कुठलीही धमक, हिंमत नसलेला, बिनकामाचा धरतीचा हा बोज आपण सांभाळायचा तरी कशाला? कोणीच हे काम करत नाही, म्हणून मी हा कचरा साफ करतो आहे. एक-एक जण असाच गळत राहणाऱ समाज या जैविक कच-यापासून मुक्त होत राहणार..’- ‘विचारवंता’चा आव आणून कोण बोलतंय हे?..मुंबईत अंधेरी या उपनगरातील मनप्रीत या १४ वर्षांच्या मुलाने मोबाइलवरील ‘ब्लू व्हेल चॅलेंज’ पूर्ण करण्याच्या नादात शेवटचे पन्नासावे टास्क पूर्ण केले आणि आपल्या आयुष्याचाही शेवट केला..या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आणि चर्चा सुरू झाली त्या ‘ब्लू व्हेल’ गेमची. हा गेम कुठून आला, कसा आला, त्याचा निर्माता कोण याची.. ज्यानं हा ‘ब्लू व्हेल’ गेम निर्माण केला, त्याचंच हे मनोगत. तो म्हणतो, ‘जगातला हा सडका कचरा साफ करण्याचं काम मी हाती घेतलंय. काहींनी आपणहून आपलं आयुष्य संपवलं. खरंय. मीच हे करतोय़ पण आतापर्यंत झालेल्या सगळ्या १३० आत्महत्यांना मी कारणीभूत नाही़मी केवळ १७ जणांना तशा सूचना दिल्या होत्या. बाकीच्या लोकांनी त्यांचा त्यांनीच आत्महत्येचा टास्क पूर्ण केलाय. अजून तीसएक तरुण अशाच वाटेवर आहेत़.’‘ब्लू व्हेल’ गेमचा हा निर्माता़ फिलिप बुडाकीन त्याचं नाव. वय अवघे २२.२०१३ मध्ये त्याने एका गेमची निर्मिती केली़ तोच हा ‘ब्लू व्हेल चॅलेंजेस’. जगभरात सध्या किशोरवयीन मुलांच्या आत्महत्यांच्या घटनांनी जो धुमाकूळ घातला आहे, त्याला कारणीभूत असलेला विकृत मनोवृत्तीचा, मानसशास्त्राचं शिक्षण अर्धवट सोडलेला हा विद्यार्थी. त्यानं तयार केलेल्या या गेमच्या जाळ्यात सध्या जगभरातील असंख्य किशोरवयीन मुलं-मुली अडकत आहेत. नवनव्या टास्कच्या मोहापायी स्वत:चं आयुष्य स्वत:हून संपवित आहेत.मुंबईचा मनप्रीतही याच ‘ब्लू व्हेल चॅलेंजेस’चा बळी. शेवटचा पन्नासावा टास्क पूर्ण करण्याच्या नादात स्वत:चं आयुष्यही त्यानं संपवून टाकलं. पोलीस त्यासंबंधी अधिक चौकशी करताहेत.मनप्रीत हा खरंच या ‘ब्ल्यू व्हेल’चा बळी असो किंवा नसो, पण अनेक तरुण या गेमच्या मोहात अडकताहेत हे नक्की.त्यामुळेच या गेमवर बंदी आणावी यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेत चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी आपण केंद्र सरकारकडे विनंती करणार असल्याचे म्हटले आहे. ही बंदी कधी येईल, येईल की नाही हे माहीत नाही...पण या गेममुळे असंख्य ‘मनप्रीत’ हकनाक बळी पडत राहणार...नवनव्या टास्क-चॅलेंजेसच्या मोहापायी पन्नास दिवस आपल्याला रोज नवनव्या धोक्यात घालत राहणार आणि कदाचित शेवटच्या, पन्नासाव्या दिवशी या जगातून निघूनही जाणार...याबाबतीत साºयांनीच जागृत होण्याची गरज आहे. आपल्या घरात, आजूबाजूला या निळ्या देवमाशाच्या जाळ्यात तर ते अडकलेले नाहीत ना? सावध राहा या निळ्या देवमाशाच्या जाळ्यापासून..

‘ब्लू व्हेल’मधील काही भीतीदायक टास्क(या जाळ्यात तुम्ही कधीही अडकू नका. अशा टास्कच्या मागे पळूही नका!)- सोशल मीडियापासून दूर राहाणे.- मैदानी खेळ, एकत्रित सहल, गेट-टुगेदर अशा गोष्टींपासून दूर राहाणे़- मित्रमैत्रिणींशी कमी बोलणे- पेनने ब्लू व्हेलचे चित्र काढणे- तसेच चित्र हातावर ब्लेडने रेखाटणे- हाताच्या नसा कापणे- ओठांवर ब्लेडने कापणे- गालामध्ये आरपार पिन टोचून घेणे- पहाटे एखाद्या उंच ठिकाणी जाणे- पहाटे उठून हातावर वार करणे- लागोपाठ अनेक हॉरर चित्रपट पाहणे- गच्चीवरून उडी मारून स्वत:चे आयुष्य संपवणे आणि गेम जिंकणे.

काय आहे हे निळ्या देवमाशाचे जाळे?सुरुवात झाली ब्लू व्हेल चित्रापासून. नंतर पहाटे दोनला उठ. अंधारात बस.. एकदा सांगितलं, ‘गालात पिन खुपस.’ मी नकार दिला. मेसेज आला, ‘परिणाम वाईट होतील.’ नंतर पाठवलेल्या एका फोटोनं तर मी हादरलोच. माझाच झोपलेला फोटो. माझ्याच रूममधला. सोबत मेसेज.. ‘आम्ही पोहोचलोय तुझ्यापर्यंत.’ मी टास्क पूर्ण करायला सुरुवात केली. त्यानंतर रात्री रेल्वे ट्रॅकवर फिरायला जा.. उंच पुलावर उभा राहा.. - जॉनचं हे मनोगत. इथपर्यंतच. तो आता जिवंत आहे की नाही माहीत नाही..imready #iwanttoplay #curatorfindme #wakeupmeat420 #bluewhalechallenge #i_am_whale #f57 #f58

काय आहे हे?..कल्पना आलीच असेल तुम्हाला.हे आहेत गेम खेळण्याची विनंती करणारे हॅशटॅग.‘मला हा गेम खेळायचाय़ मला ब्लू व्हेल व्हायचंय़.’ अशी इच्छा व्यक्त करणारे हे हॅशटॅग टिष्ट्वटरवर सध्या ट्रेंडिंग आहेत. स्वत:च जीवघेण्या खेळात स्वत:ला ढकलून देण्यासाठी सध्या लाखो लोक मूर्खासारखे उतावळे असल्याचे दिसून येत आहे़हा गेम आहे ब्लू व्हेल चॅलेंज.निळ्या देवमाशाचं आव्हान.सध्या या गेमने जगभरात धुमाकूळ घातलाय़

कुठेही सहज उपलब्ध न होणारा हा गेम. कोणाला हा गेम खेळू द्यायचा याचा निर्णय गेमचा क्युरेटर किंवा अ‍ॅडमिनिस्ट्रेटर ठरवतो़ तो जगात कुठेतरी बसून ‘हँडल’ करतो आणि त्याच्याच इच्छेनुसार खेळता येतो़ थोडक्यात त्यांचे सावज ते स्वत: निवडतात़एकदा निवड झाली की हा जीवघेणा खेळ थ्रिल म्हणून खेळायला सुरुवात होते़ मग सुरू होतो एक-एक टास्क. आधी थोडे सोपे. काहीसे बावळटासारखेही. पण नंतर जीव घेण्यापर्यंत नेणारे एकूण ५० टास्क या गेममध्ये आहेत.इतके जण हा गेम खेळतात, इतक्या जणांनी आत्महत्या केल्यात, या गेममध्ये एवढं आहे तरी काय? आपणही हा गेम खेळून बघू म्हणून एकाने क्युरेटरला विनंती केली़ ती मान्य करताच गेमचं थ्रिल सुरू झालं, पहिल्या टास्कपासून ते आपल्या स्वत:लाच इजा करून घेण्यापर्यंतचा सर्व सवांद त्यानं सोशल मीडियावर टाकला आहे़त्यातील काही अंश असा..मला हा गेम खेळायचाय़, असं म्हणून ‘जॉन’ने (नाव बदललेले) विनंती केली. मग क्युरेटर/अ‍ॅडमिनिस्ट्रेटरने जॉनला सूचना केली़. ‘एकदा आत आल्यावर बाहेर पडता येणार नाही़’जॉनला वाटले गेम खेळायचा की नाही हे आपण ठरवणार... पण क्युरेटरने तंबी दिली़ पहिली धमकीच म्हणा हवे तर. एकदा खेळायला सुरुवात केल्यानंतर तुझी सगळी माहिती माझ्याकडे येते. तू कुठे राहतो़ कुठे खेळतो, कोणत्या शाळेत जातो अशी सगळी माहिती आमच्याकडे असते़ आम्ही काहीही करू शकतो.जॉनला सारे फोल वाटले. मी बाहेर पडून दाखवेन, असंही त्याने ठरविले़ म्हणून त्याने ‘हो’ म्हणून खेळायला सुरुवात केली़ मग सुरू झाला एका-एका टास्कचा खेळ. सुरुवात एक साधे ब्लू व्हेलचे चित्र काढण्यापासून. क्युरेटरने दिलेला हा पहिला सोपा टास्क़ नंतर रात्रीबेरात्री उठण्याचे टास्क. पहाटे २ ला उठा किंवा पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी उठा़ एकटेच अंधारात बसा़ हळूहळू त्यात वाढ होत गेली़ अधिक हिंस्र अन् अधिक नैराश्य आणणारे टास्क देण्यास सुरुवात झाली़ ज्या-ज्या सोप्या टास्क होत्या त्या-त्या जॉनने पूर्ण केल्या़ त्याचे व्हिडीओ-फोटोही क्युरेटरला पाठवले पुरावा म्हणूऩ जो कोणी हा गेम खेळतो त्या सर्वांनाच हा पुरावा द्यावा लागतो़ टास्क पूर्ण केल्याचा पुरावा.आता जॉनपुढे त्याने एक अवघड टास्क ठेवला़ एक सेफ्टी पिन गालातून आरपार घालायला सांगितली़ अर्थातच जॉनने नकार दिला़ ‘मी बाहेर पडणार या गेममधून’ असेही सांगितले़ दोन दिवस शांततेत गेले़ गेम खेळणे बंद झाले़ पण क्युरेटरचा पुन्हा मेसेज आला़ ‘टास्क पूर्ण केला नाही तर परिणाम वाइट होतील़’अचानक एकेदिवशी त्याला एका अंधाºया खोलीत काढलेला फोटो मोबाइलवर आला़ त्याने कम्प्युटरवर सॉफ्टवेअरच्या मदतीने तो फोटो थोडा ब्राइट करून पाहिला अन् त्याला धक्काच बसला़ तो त्याच्याच खोलीचा फोटो होता़ झोपलेल्या अवस्थेतला़ फोटोसोबत मेसेजही होता़. ‘आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचलोय़’जॉन हादरला़ त्याने टास्क पूर्ण करायला सुरुवात केली़ त्यानंतर त्याला एमपी३ फाइल म्हणून एक आॅडिओ फाइल पाठवली गेली़ त्यात होता श्वासांचा कसातरी आवाज़ भयावह़ जॉन सांगतो, अशा आवाजाने घाबरायला तर होतंच शिवाय नैराश्यही येतं़ तरीही ती आॅडिओ क्लिप त्याने ऐकली़ मग त्याला उंच इमारतीवर तासन्तास उभं राहायला सांगितलं गेलं़ उंच पुलांवर, रेल्वे ट्रॅकवर एकट्याने अंधाºया रात्री फिरायला सांगितले. मित्रांना कमी भेटायला सांगितले़ कमी बोलायला सांगितले़ मित्रांना ‘आय हेट यू’ सारखे मेसेजेस पाठवायला सांगितले. त्याचेही स्क्रिनशॉट पाठवणे सक्तीचे केले. सरते शेवटी जीव घेण्याचा खेळ सुरू झाला़ पुन्हा धमकी आली़. ‘तू हा टास्क पूर्ण केला नाही तर तुझ्या घरच्यांना आम्ही काहीही करू शकतो़’जॉनची पोस्ट इथंच संपली़..तो जिवंत आहे की नाही, माहीत नाही़ पण ब्लू व्हेल चॅलेंज हा गेम खेळणारा प्रत्येक जण असाच अडकत जात असणार. त्यामुळेच आतापर्यंत १३० हून अधिक ‘जॉन’ रशियामध्ये बळी गेले आहेत़रशियाच्या अवघ्या २२ वर्षांच्या फिलिप बुडाकीन याने तयार केलेल्या या आत्मघातकी गेममध्ये असंख्य तरुण सध्या अडकत आहेत़ या बुडाकीनला रशियात शिक्षाही झाली आहे़ त्याला तीन वर्षांचा कारावास झाला आहे. पण त्याच्यासाठी आणि या गेमसाठी काम करणारे विकृत मनोवृत्तीचे असंख्य ‘फिलिप बुडाकीन’ सध्या खुलेआम किशोरवयीन मुलांचे जीव घेत आहेत़सुरुवातीपासून खेळणाºयाची मानसिक स्थिती हळूहळू नैराश्याकडे न्यायची़ त्यांचा घरच्यांशी संवाद तोडायचा़ मित्रांसोबतचे नाते संपवायला लावायचे़ हॉरर चित्रपट पाहायला सांगायचे. हाताला-गालाला ब्लेडने, पिनांनी इजा करून घ्यायला भाग पाडायचे. हिंस्र बनवायचे़ प्राण्यांना मारायला लावायचे़ आॅडिओ क्लिप सतत सतत ऐकायला लावून संमोहित करायचे आणि मग सरते शेवटी आत्महत्या करण्यास भाग पाडायचे़ही या गेमची मोडस आॅपरेंडी़ हा गेम खेळावा की नाही हे आपल्या हाती आहे़ मात्र पालकांनीही याबाबत सजग राहणे गरजेचे आहे़मुंबईत झालेली एका किशोरवयीन मुलाची आत्महत्या ही या ब्लू व्हेल चॅलेंजचा भारतातील पहिला बळी म्हणून पाहिले जात आहे़ पण असे असंख्य भारतीय तरुण सध्या या ब्लू व्हेलच्या जाळ्यात कोणत्या ना कोणत्या स्टेजवर अडकलेले असणाऱ त्यांनाही धमक्या येत असणार आणि त्यांनाही बळजबरीने टास्क पूर्ण करायला भाग पाडले जात असणार, हे कोणीच नाकारू शकणार नाही़ त्यामुळे किमान आपण आपल्या कुटुंबातील तरुणांवर नजर ठेवणे गरजेचे आहे़ लेखाच्या सुरुवातीला दिलेले हॅशटॅग तुमच्या मुला-मुलींच्या सोशल मीडिया अकाउंटवर तर नाहीत ना, हेही तपासून पाहणे आवश्यक आहे. अन्यथा जे तरुण आतापर्यंत या ब्लू व्हेलच्या जाळ्यात ओढले गेले नाहीत, तेही अडकतील़‘देव मासा’ या नावाने सुरू झालेला ‘ब्लू व्हेल’ हा गेम ‘दैत्य’ बनून तुमच्या दाराशी येईल.काळजी घ्या. सावध राहा.. 

(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत. pavan.deshpande@lokmat.com)