शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

जलाशयांचे लख्ख दर्पण

By admin | Updated: May 8, 2016 00:16 IST

प्रत्येक तलावाचं, सरोवराचं काही ना काही वैशिष्टय़ आहे. जेव्हा तुम्ही या जलाशयाला भेट देता तेव्हा हे वैशिष्टय़ जाणून घ्यायचा प्रयत्न करावा. नैनितालच्या नैना

- मकरंद जोशी
 
कधी पहाडाच्या कुशीत,
कधी नदीशी सलगी करत, 
तर कुठे गर्द अरण्याचा जीवनाधार 
बनलेली सरोवरं.
पर्यटनाला गेल्यावर अशा सरोवरांसाठी 
आपण वेळ राखून ठेवतो? 
सहलीतली एखादी प्रसन्न सकाळ किंवा निवांत संध्याकाळ 
अशा एखाद्या सरोवराच्या 
काठावर घालवतो? 
उत्तर नकारार्थी असेल तर 
काही सोनेरी क्षणांना 
आपण मुकलो आहोत.
 
प्रत्येक तलावाचं, सरोवराचं काही ना काही वैशिष्टय़ आहे. जेव्हा तुम्ही या जलाशयाला भेट देता तेव्हा हे वैशिष्टय़ जाणून घ्यायचा प्रयत्न करावा. नैनितालच्या नैना लेकचा आकार खरोखरच मानवी डोळ्यासारखा आहे आणि याचं कारण सांगितलं जातं की त्या ठिकाणी सतीचा डोळा पडला होता म्हणून आकार तसा आहे. 
लोणारच्या सरोवराचं पाणी खारट आहे, कारण पुराणकथेनुसार या ठिकाणी विष्णूने लवणासुराचा वध केला होता, त्यामुळे पाणी खारट झालं. अशा पुराणकथांप्रमाणोच प्रत्येक सरोवराची नैसर्गिक जडण घडण वेगवेगळी आहे. ओरिसातला चिल्का लेक हा दया नदीच्या मुखावरचा जलाशय आहे. 11क्क् चौ. कि.मी. परिसरात पसरलेला हा जलाशय भारतामधील सर्वात मोठा कोस्टल लगून आहे. श्रीनगरमधला दल लेक हा झबरवन पर्वताच्या पाणलोट क्षेत्रतला तलाव असून, त्यातील फ्लोटिंग गार्डनसाठी प्रसिद्ध आहे.
 
आपल्या भारताचे वर्णन करताना, इथल्या नैसर्गिक वैविध्याबद्दल बोलताना नेहमी इथल्या पर्वतरांगांचा, नद्यांचा, सागरकिना:यांचा उल्लेख केला जातो. आपला देश कसा सुजलाम, सुफलाम आहे हे सांगताना गंगा, यमुना, ब्रrापुत्र, कावेरी, कृष्णा, ङोलम, रावी, चिनाब अशा भारतभरातल्या नद्यांची आठवण काढली जाते. पण भारताला लाभलेल्या एका नैसर्गिक जलस्रोताबद्दल मात्र क्वचितच बोललं जातं. हा स्रोत म्हणजेच हिमालयाच्या रांगेपासून ते राजस्थानच्या मरूभूमीपर्यंत भारताच्या विविध प्रांतांमध्ये असलेली सरोवरं. 
कधी एखाद्या पहाडाच्या कुशीत, तर कधी एखाद्या नदीशी सलगी करत, कुठे वालुकामय जमिनीवर ओलावा निर्माण करत, तर कुठे गर्द अरण्याचा जीवनाधार बनून ही सरोवरं भारताच्या भूमीवर पसरलेली आहेत. आपल्या लोककथांमध्ये, लोकगीतांमध्ये, परंपरांमध्ये या जलाशयांना महत्त्वाचे स्थान आहे. पण पर्यटनाचा विचार करताना मात्र अनेकदा या सरोवरांची दखलही घेतली जात नाही. तसं बघितलं तर भारतातल्या प्रत्येक राज्यात एक तरी लक्षणीय, आवर्जून पाहावा असा नैसर्गिक जलाशय आहे. उदाहरणोच द्यायची तर जम्मू आणि काश्मीरमधील दल, पॅन्गॉग, हिमाचलमधील चंद्रताल, खज्जीयार लेक, राजस्थानमधील पिचोला, पुष्कर, सांभर, ओरिसामधील चिल्का लेक, मणिपूरमधला लोकतक लेक, महाराष्ट्रातील रंकाळा, लोणार, गुजरातमधील नल सरोवर, थोल लेक, आंध्रमधील कोल्लेरू, तामिळनाडूमधील पुलिकत लेक अशी बरीच मोठी यादी देता येईल. 
यातले नैनितालचा नैना लेक, उदयपूरचा पिचोला लेक आणि फतेहसागर, श्रीनगरचा दल लेक, लडाखमधला पँगॉंग लेक असे मोजके तलाव वेगवेगळ्या कारणांमुळे प्रकाशझोतात आल्याने पर्यटकांना माहीत तरी असतात. पण आपल्या स्थलदर्शन कार्यक्र मात आपण आवर्जून अशा सरोवरांसाठी वेळ राखून ठेवतो का? सहलीतली एखादी प्रसन्न सकाळ किंवा एखादी निवांत संध्याकाळ अशा एखाद्या सरोवराच्या काठावर घालवण्याचा प्रयत्न करतो का? या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी असेल तर तुम्ही काही सोनेरी क्षणांना मुकला आहात. भारतातल्या सगळ्या सरोवरांमध्ये सर्वात वेगळा आणि अनेक कारणांसाठी महत्त्वाचा असलेला जलाशय म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर. सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी येथे साठ मीटर रु ंद आणि दहा लाख टनांपेक्षा जास्त वजन असलेली महाकाय उल्का कोसळली आणि त्यातून जमिनीत जे विवर तयार झाले, ते म्हणजे लोणारचे सरोवर. 
बेसॉल्ट रॉक म्हणजे अग्निजन्य खडकामध्ये हायपर वेलोसिटी इम्पॅक्टने तयार झालेलं हे  पृथ्वीवरचं एकमेव सरोवर आहे. लोणारच्या विवराचा परीघ 59क्क् फूट आहे. विवराच्या वरच्या कडेवरून खाली सुमारे साडेचारशे फूट उतरल्यानंतर आपण सरोवराच्या काठाशी पोहोचतो. लोणारच्या सरोवरातील हिरव्यागार रंगाचे पाणी खारट आणि अल्कलाइन आहे. मात्र सरोवराजवळच खड्डा खोदला तर लागणारे पाणी गोड असते. याचा फायदा घेऊनच सरोवराच्या काठालगत गावक:यांनी लागवडी केलेल्या आहेत आणि त्यामुळे सरोवराचे पाणी प्रदूषित झाले आहे. 
लोणारच्या सरोवराचे खास वैशिष्टय़ म्हणजे काठावरची प्राचीन शिल्पांनी नटलेली मंदिरे. विष्णू मंदिर, महादेव मंदिर, कमळजा मंदिर या देवळांमधून घडणारे कलाकौशल्याचे दर्शन थक्क करते. स्कंद पुराणापासून ते ऐने अकबरीपर्यंत अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये लोणार सरोवराचा उल्लेख आढळतो. महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने लोणार सरोवरालगत उत्तम निवास व्यवस्था केलेली आहे. अजिंठा-वेरूळसाठी औरंगाबादला जाणा:या  पर्यटकांना एका दिवसात लोणारला भेट देऊन येणो शक्य आहे. 
हिमालयाच्या कुशीत पहुडलेल्या अनेक तलावांची जादू पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते. मिनी स्वित्झर्लंड असलेल्या खज्जियारमधला तलाव असो किंवा आपल्या निळ्यागर्द रूपाने अवाक करणारा लडाखचा पँगॉंग लेक असो, हाय अल्टिटय़ूडवरच्या जलाशयांची बातच और असते. 
या सगळ्या पहाडी सरोवरांचा मुकुटमणी म्हणाल तर तो आहे हिमाचल प्रदेशातील स्पितीमध्ये 14,1क्क् फुटांवर विसावलेला चंद्रताल. भोवती बर्फाचे मुकुट मिरवणा:या पहाडांचा घेरा घेऊन, स्वच्छ आभाळाचे आणि भोवतालच्या परिसराचे प्रतिबिंब साठवत हा चंद्रकोरीच्या आकाराचा तलाव इतक्या शांतपणो पहुडलेला असतो की वाटतं कॅमे:याच्या शटरच्या आवाजानेही त्याची समाधी भंग पावेल. रस्त्यावर गाडी थांबवून सुमारे दीडएक किलोमीटर चालल्यानंतर तुम्हाला चंद्रतालचे दर्शन घडते, तेव्हा हाय अल्टीटय़ूडवर चालल्याने आधीच फुललेला श्वास समोरचा नजारा बघून आपोआप रोखला जातो. ‘मनावरची विचारांची धूळ जिथे हळूहळू निवळत जाते, अशा एखाद्या तळ्याकाठी मला बसून राहावेसे वाटते’ ही कवी अनिलांची ओळ चंद्रतालच्या काठावर थेट अनुभवता येते. मनालीहून चंद्रतालचा प्रवास थोडा खडतर असला, तरी मनालीला भेट देणा:यांनी एक रात्र चंद्रतालजवळ अवश्य काढावी.
.तेव्हा भारताच्या कोणत्याही पर्यटनस्थळाला भेट देताना, तिथल्या जलाशयांची माहिती घेऊन तुमच्या सहल कार्यक्र मात त्याचा अवश्य समावेश करा. जलाशयाच्या लख्ख दर्पणी दिसणारे भोवतालच्या निसर्गाचे रूप न्याहाळणो हा खरोखरच अनोखा आणि आवर्जून घ्यावा असा अनुभव आहे.