शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

कायाकल्प योजनेच्या माध्यमातून मालेगावी नागरी आरोग्य केंद्रांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2023 13:53 IST

कायाकल्प योजनेच्या माध्यमातून मनपा क्षेत्रातील १४ आरोग्य नागरी केंद्रांची गुणांकन तपासणी प्रक्रिया राबविण्यात आली.

अतुल शेवाळेमालेगाव : कायाकल्प योजनेच्या माध्यमातून मनपा क्षेत्रातील १४ आरोग्य नागरी केंद्रांची गुणांकन तपासणी प्रक्रिया राबविण्यात आली. ही योजना मनपा आरोग्य अधिकारी सायका अन्सारी यांच्या मार्गदशनाखाली गेल्या तीन दिवसांपासून गट पद्धतीने भेट देत तपासणी सुरू आहे. शहरातील नागरी आरोग्य केंद्रामध्ये असलेल्या सोयीसुविधांचा आढावा व तपासणी केली जाते.

या केंद्रामध्ये असलेल्या आरोग्यविषयक सुविधांची तपासणी प्रक्रियेत नागरी आरोग्य केंद्रातील रजिस्टर, आरोग्यविषयक तक्ते, डिफ्रीजर आयएलआर, स्वछता, हँड वॉश, लॅब, इन्फेक्शन कॅट्रोल रजिस्टर, परिसरातील स्वच्छता आदी गोष्टी तपासून त्यांचे गुणांकन सिद्ध करून ज्या आरोग्य केंद्रात सुखसुविधा चांगल्याप्रकारे उपलब्ध आहेत, अशा केंद्रांना आरोग्य विभागामार्फत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे बक्षीस व रोख रक्कम देत गौरविण्यात येणार आहे. या बक्षिसासाठी नागरी केंद्रामध्ये चढाओढ निर्माण झालेली पाहायला मिळाली. सजावट करणे, रांगोळी काढणे, रजिस्टर टापटीप असणे या गोष्टी नागरी केंद्रामध्ये प्रत्यक्ष दिसून आल्या.

यामध्ये प्रथम बक्षीस दोन लाख रुपये, द्वितीय दीड लाख रुपये, तृतीय पन्नास हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. यामध्ये मालेगावातील तीन दिवसांत सर्व नागरी आरोग्य तपासणी करीत शेवटी आयेशानगर नागरी आरोग्य केंद्राची तपासणी करून कायाकल्प योजनेचा समारोप करण्यात आला. शहरातील नागरी आरोग्य केंद्रांची प्रतवारी व कामाचा दर्जा ठरविता येणार आहे. या गुणांकन तपासणीचे प्रमुख अधिकारी सिटी प्रोग्राम मॅनेजर, नाशिक डॉ. शैलेश लोंढे, राकेश थेटे, जयश्री आहेर, वैद्यकीय अधिकारी खालदा रफत आदी उपस्थित होते. योजनेला यशस्वी करण्यासाठी सर्व नागरी आरोग्य केंद्रांच्या सर्व वैद्यकीय अधिकारी, जीएनएम, एएनएम फार्मसिस्ट, शिपाई या सर्वांनी सहकार्य दाखवत गुणांकन तपासणी प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.

टॅग्स :Nashikनाशिक