शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांची फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 06:05 IST

आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या संसाराचा गाडा ओढणाºया त्यांच्या विधवा पत्नींच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणांहून आलेल्या या महिलांचा मोर्चा विधिमंडळ अधिवेशनावर धडकतो आहे. घरच्या कर्त्या पुरुषाच्या मागे राहिलेल्या कर्जाचा भार वाहणाऱ्या या दुर्दैवी स्रियांच्या संघर्षाचा वेध...

ठळक मुद्देकर्जाच्या तणावाखाली आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पत्नींचा संघर्ष म्हणजे वादळातला लुकलुकता दिवाच.

- सचिन जवळकोटेध्यानीमनी नसताना भरल्या संसाराकडं पाठ फिरवून घरचा कर्ता पुरुष निघून गेला. सुरुवातीला धाय मोकलून घरची धनीण रडली; परंतु गालावरचे अश्रू वाळल्यानंतर नवऱ्याच्या प्राक्तनातलं कर्ज तिच्या कोऱ्या ललाटी ठाण मांडून बसलेलं दिसलं.. तेव्हा ही माउली दचकली. भानावर आली. वास्तवाला तोंड देण्यासाठी तयार झाली.संकटाला तोंड देण्यासाठी अशा अनेक जणी पदर खोचून कामाला लागल्यात. मात्र काही जणी पुरत्या हतबल झाल्यात. कर्जाच्या तणावाखाली आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पत्नींचा हा संघर्ष म्हणजे वादळातला लुकलुकता दिवाच.नाव : उल्पा नंदकुमार गाजरे. राहणार शेळवे, ता. पंढरपूर.. पोटी तीन पोरं. दोन मुलं अन् एक मुलगी. तिन्ही पोरं अभ्यासात हुशार. घरची चार एकर शेती. पोट भागेल एवढं पिकायचं. बाकी निसर्गाच्या हवाली. काही वर्षांपूर्वी सासूबाईला कॅन्सर झाल्याचं निदान झालं. नवरा जिद्दीला पेटला. पिकासाठी शेतीवर कर्ज काढून आईला दवाखान्यात नेऊ लागला.. परंतु कॅन्सरची गाठ अन् कर्जाचं व्याज काही थांबेना. व्याजासाठी पुन्हा नवं कर्ज काढलं गेलं.अखेर एक दिवस सासू गेली. तिच्यासाठी बारा लाखांचं कर्ज डोक्यावर घेतलेलं, ते मागे उरलं. नवरा रोज तणावाखाली जगू लागला. शिवारात तर नुसती ढेकळं. इकडं वसुलीसाठी तगादे वाढले, तसं एक दिवस लेकीला सांगून नवरा रानात गेला आणि थेट फासावरच चढला... ‘गेले ते तिकडंच गेले. तीन पोरांची जबाबदारी हाय माज्यावर. आता कोन हाय ह्या पोरास्नी माज्याबिगर?’ अशी खंत व्यक्त करणाºया उल्पाचा सवाल काळीज पिळवटून टाकणारा होता.कर्जापोटी नवऱ्याने आत्महत्या केली म्हणून तिला शासनाकडून एक लाखाची मदत मिळाली. डोक्यावर कर्ज बारा लाखाचं. व्याज तर दिवसागणिक वाढतच चाललेलं. यावर्षी तिनं सासऱ्याच्या मदतीनं शेतात ऊस लावण्याची हिंमतही केली. मात्र, हुमणीनं दगा दिला. उभा फड आडवा झाला. तरीही उल्पा जिद्द सोडायला तयार नाही.नवरा हरला म्हणून काय झालं? तिन्ही पोरांना भरपूर शिकवायचंच ठरवून कामाला लागलीय. प्रत्येक वर्षाला नवं-जुनं करत काही वर्षे तशीच काढायची. नंतर टप्प्या-टप्प्यानं कर्ज फेडत राहायचं. ही उल्पाची मानसिकता असली तरी व्याज अन् चक्रवाढ व्याजाचा भस्मासुर कदाचित तिला माहिती नसावा.हीच अवस्था कुरनूरच्या मीराबाईची. अक्कलकोट तालुक्यातल्या श्रीशैल काळेंनी बोअर मारण्यासाठी काढलेल्या कर्जाच्या धास्तीतून विष पिऊन आत्महत्या केलेली. पोटी दोन पोरं. मोठा मुलगा संतोष पित्याच्या अकाली जाण्यामुळं गावात आईसोबतच राहू लागलाय. सध्या तो शेती करतोय.सध्या मीराबाई दुसऱ्याच्या शेतात जाऊन मोलमजुरी करते. लोकांच्या रानातलं तण काढताना तणनाशक औषधानंच आपल्या पतीचा घात केला, या आठवणीनं रोज रडते. तिला रोज मिळतातच किती? सव्वाशे रुपये ! त्यावर सोसायटीचं कर्ज फेडायची धडपड चालू आहे.नाव : विजयालक्ष्मी सूर्यकांत पाटील, रा. मुस्ती, ता. दक्षिण सोलापूर. सोसायटीचं कर्ज काढून नवऱ्यानं शेतात ऊस लावलेला. बारा महिने जिवापाड जपला. कशीतरी अखेर ऊसतोडीची चिठ्ठी आली. ऊस गेला; परंतु कारखान्याकडून पूर्ण बिल काही मिळालंच नाही. इकडं व्याजासोबत नवऱ्याची घालमेलही वाढू लागली. अखेर टेन्शन सहन न झाल्यानं त्यानं आत्महत्या केली.विष पिण्यापूर्वी ‘कारखान्यानं बिल थकविलं म्हणून मी जीव देतोय, अशी चिठ्ठीही लिहिली. परंतु, लालफितीचा कारभार नेहमीप्रमाणं चाकोरीबद्ध. केवळ ‘चिठ्ठीत कर्जाचा उल्लेख नाही,’ या कारणापायी या आत्महत्येची नोंद सरकारी यादीत झाली नाही. मदतही मिळाली नाही. तेव्हापासून विजयालक्ष्मी पुरती अंथरुणाला खिळलीय. घराबाहेर पडायलाच तयार नाही. नवरा गेला, याहीपेक्षा जास्त नवऱ्याचं कर्ज आता मी कसं फेडू, या विवंचनेनं तिचं जगणं मुश्कील झालंय...जगाच्या दृष्टीनं तिला शारीरिक आजार जडलाय. मात्र, तिच्या मनातल्या उद्वेगाची घालमेल कुणाला समजणार? अशा कितीतरी महिला रोज या तणावाचं वादळ उशाला घेऊन सांगताहेत नवऱ्याचं देणं आपण एकट्यानं कसं फेडायचं?‘जिवंत असतानाच जोडीदारानं आपल्याला त्याची सारी दु:खं आपल्या पदरात घातली असती तर हातात हात घालून जोडीनं साऱ्या संकटांशी सामना केला असता. का असा त्यानं आत्मघातकी निर्णय घेतला?’- हा सवाल त्यांच्या नजरेत दिसतो. तो उघड कुणी विचारत नाही एवढेच!सोपस्कारांचा विळखाआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी मदतीची सरकारी प्रक्रिया अतिशय किचकट आहे. मागे राहिलेल्या बहुतेक स्रिया अशिक्षित. त्यांच्या वाट्याला सगळे सोपस्कार पूर्ण करणे येते.शेतकऱ्यांच्या मृत्यूचा दाखला, पोलिसांचा पंचनामा, डॉक्टरांचा शवविच्छेदन अहवाल, उत्पन्नाचा दाखला अन् कर्जाची कागदपत्रं तिनं द्यायची. नवऱ्यानं कर्जापोटीच आत्महत्या केली, हे तिनंच सिद्ध करायचं. तसे पुरावे द्यायचे.या प्रक्रियेत मदत मिळणे दूरच, कागदपत्रांच्या जंजाळात फसवणूक वाट्याला येण्याचे अनुभवच अनेकींच्या गाठीशी आहेत.

(लेखक ‘लोकमत’च्या सोलापूर आवृत्तीचे निवासी संपादक आहेत.)Sachin.javalkote@lokamat.com