शहरं
Join us  
Trending Stories
1
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
2
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
3
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
4
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
5
कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड
6
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
7
बाजारात तेजीचा डबल धमाका! सेन्सेक्सची ८६२ अंकांची उडी; गुंतवणूकदारांनी कमावले २.०९ लाख कोटी
8
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
9
आशिया कप स्पर्धेत कार जिंकली; आता स्फोटक बॅटर अभिषेक शर्माला ICC कडून मिळालं मोठं बक्षीस
10
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
11
Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
12
कष्टाचं फळ! ५० रुपये मजुरी, घरोघरी जाऊन विकली भाजी, शिक्षण सोडलं अन् आता RAS ऑफिसर
13
Raigad Crime: पतीच्या हत्येसाठी इन्स्टाग्रामवर अकाऊंट, कृष्णाला बस स्टॅण्डवर भेटायला बोलावलं अन् बॉयफ्रेंड, मैत्रिणीच्या मदतीने काढला काटा
14
इंडिया आघाडीत राज ठाकरेंच्या मनसेला सहभागी करून घेणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले...
15
Mumbai Crime: एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
16
Vasubaras 2025: रमा एकादशी आणि वसुबारस (गोवत्स द्वादशी) एकत्र; कशी करावी पूजा? वाचा लाभ!
17
Happy Diwali Stickers: एक नंबर! आपल्या माणसांना द्या खास शुभेच्छा; WhatsApp वर स्वत:च 'असे' बनवा 'दिवाळी स्टिकर्स'
18
'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक
19
“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले
20
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?

भारतीय जुगाड

By admin | Updated: June 4, 2016 23:34 IST

मिनिमलिझम संकल्पनेची मुळं भारतीय तत्त्वज्ञानात खोलवर रुजलेली असतानाही त्याकडे ‘फॅड’ म्हणूनच पाहिलं जातं

 - शर्मिला फडके

 
मिनिमलिझम संकल्पनेची मुळं 
भारतीय तत्त्वज्ञानात खोलवर 
रुजलेली असतानाही त्याकडे
‘फॅड’ म्हणूनच पाहिलं जातं
याचं कारण वस्तू वर्षानुवर्षे
जपून ठेवण्याची ‘माळा संस्कृती’,
बाजारपेठेचा ‘खरेदी करा’चा मारा,
आणि कोणतीही गोष्ट 
टाकून देण्याला 
भारतीयांचा असलेला विरोध.
शिवाय ‘जुगाड’ करून 
निरुपयोगी वस्तूंचं उपयोगी वस्तूत रूपांतर करण्याकडे भारतीयांचा 
असलेला कल!
 
अडगळ कितीही ‘समृद्ध’ मानली तरी शेवटी ती अडगळच. तिच्यावाचूनच आपलं आयुष्य मोकळं, ऐसपैस आणि सुखी होऊ शकतं. त्यात नव्या, आपल्या आवडीच्या, जास्त समृद्ध गोष्टींचा अंतर्भाव करणं शक्य होतं. आजच्या सर्वसाधारण शहरी, उच्चशिक्षित, उच्च मध्यमवर्गीय भारतीयाला हे तात्त्विकदृष्टय़ा कितीही पटलेलं असलं आणि पारंपरिकरीत्या भारतीय घरांमध्ये मिनिमलिझमच्या अनेक मूळ तत्त्वांचा अजूनही वापर होत असला, तरी बहुसंख्य भारतीय आज ‘मिनिमलिझम’कडे आधुनिक, पाश्चात्य जगातले एक फॅड याच दृष्टिकोनातून पाहतात. 
भारतात मिनिमलिझमच्या संकल्पनेकडे बघण्याची मानसिकता पूर्णपणो सकारात्मक नाही. मिनिमलिझम या संकल्पनेची मुळं भारतीय तत्त्वज्ञानात खोलवर रुजलेली असतानाही असे का व्हावे?
भारतातील आधुनिक शहरांमधून मुळातला भारतीय संकल्पनेतला मिनिमलिझम पूर्णपणो हद्दपार होण्याचे आणि नव्या स्वरूपातही स्वीकारला न जाण्याचं मुख्य कारण बाजारपेठेचा ‘खरेदी करा’ घोषणोचा चोवीस तास सर्व माध्यमांमधून पंचेंद्रियांवर होणारा आक्रमक मारा हे तर आहेच, याशिवाय अजूनही एक खास भारतीय कारण आहे ते म्हणजे ‘जास्तीत जास्त कमवा-खरेदी करा-टाकून द्या-नव्या गोष्टी खरेदी करा’ या चक्रातील ‘टाकून द्या’ या भागाला भारतीय मानसिकतेचा असलेला विरोध. 
सर्वसामान्य भारतीयांच्या मनावर अजूनही ‘माळा संस्कृती’ परंपरेतला ‘वस्तू जपून ठेवा, कधी ना कधी उपयोगात येईल’ या समजुतीचा घट्ट पगडा आहे. अभावातून वर आलेल्या मध्यमवर्गीयाला अडगळीचा कितीही कंटाळा आला तरी तो काही जवळचे चांगले, वापरू शकण्याच्या अवस्थेतले कपडे फेकून देणार नाही, घरातली भांडी-कुंडी, सामान अगदीच मोडकळीला आल्याशिवाय टाकून देणार नाही. फार तर मोड देईल, भंगारमधे विकेल, पण तेही क्वचितच. शहरी चिमुकल्या घरांमधूनही ‘माळा’ आजही गायब झालेला नाही. अडगळ, पसारा, अतिरिक्त, बिनकामाच्या वस्तूंकरता जास्तीत जास्त स्टोअरेज असलेली फर्निचर्स, कॅबिनेट्स तयार करण्यात भारतीय इंटेरियर डिझायनर्सच्या कल्पकतेचा कस लागतो. ‘जपून ठेवणो’ या प्रकारावर भारतीयांची अतोनात श्रद्धा आहे. 
मुळात कितीही कर्जाच्या सोयी असल्या, क्रेडिट कार्डाचा वापर वाढलेला असला तरी सर्वसाधारण मध्यमवर्गीय भारतीय स्वत:च्या डोक्यावर कर्जाचे ओङो गरज नसताना फार लादून घेत नाही. त्यामुळे पाश्चात्त्य जगात अनेकांचे मिनिमलिझमकडे वळण्याचे जे मुख्य कारण कर्जाच्या हप्त्यांनी बेजार होणो असते तसा प्रकार इथे नाही. मात्र क्रेडिट-डेबिट कार्ड्सच्या वापरावरचा वाढता विश्वास, सोपी कर्जे, परदेशवा:या, दरवाजात आलेली मॉल्स, डबल इन्कम, लहान कुटुंबे, आर्थिक जबाबदा:यांपासून झालेली सुटका अशा अनेक कारणांमुळे शहरी उच्च मध्यमवर्गीय भारतीयांना अतोनात खरेदीचा जो रोग जडला आहे त्यामुळे सगळीच समीकरणो बदलली. इंटरनेट, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सने व्यापलेले आयुष्य, स्पर्धा, व्यावसायिक ताणतणाव, नातेसंबंधांची तुटकता, वेगाने संकुचित होणारा वेळ, भोवतालची आणि मनातली अडगळ वाढत असल्याची, पसारा हाताबाहेर जात असल्याच्या अस्वस्थतेची जाणीव अशा अनेक गोष्टी नव्याने शहरी उच्च मध्यमवर्गीय लोकांच्या आयुष्यात निर्माण झाल्या. यातूनच मग काही मोजक्या जणांना चक्रातून बाहेर पडून जगण्यातला सोपेपणा, सहजपणा परत आणावासा वाटला आणि त्याकरता त्यांना मिनिमलिझम संकल्पनेमध्ये आधार शोधावासा वाटला. पण अशांची संख्या फारच नगण्य आहे. 
या सगळ्याला कारणीभूत आहे आपल्या आजच्या भारतीय समाजरचनेमध्ये असलेली आर्थिक असमानता. ज्यात एका बाजूला एकविसाव्या शतकातला शहरी, उच्च मध्यमवर्गीय, उच्चशिक्षित, आयटी, कॉर्पोरेट क्षेत्रत नोकरी करणारा, पाश्चात्त्य राहणीमानाला सरावलेला तरुण वर्ग आहे. 
दुस:या बाजूला आर्थिक अभावग्रस्त गट आहे. मात्र टीव्हीवरील जाहिराती, दाराशी पोचलेली ग्राहककेन्द्रित बाजारपेठ यामुळे भौतिकतेबद्दलचा हव्यास या दोन्ही वर्गांमध्ये समान आहे. समाजरचनेतल्या या ध्रुवीकरणामुळे एकंदरीतच मिनिमलिझम या नव्याने पुनरुज्जीवित झालेल्या संकल्पनेकडे बघण्याची भारतीयांची दृष्टी काहीशी गोंधळलेली, संभ्रमित आणि दुभंग आहे.
यासंदर्भात प्रीतम कौशिक या मूळच्या अर्थतज्ज्ञ असलेल्या लेखक पत्रकाराचा बिझनेस इनसायडर या ऑनलाइन नियतकालिकामधे एक लेख वाचण्यात आला. कौशिक यांच्या मते भारतीयांना मिनिमलिझमकडे वळावेसे वाटते त्यामागे एक जरासे वेगळे कारण आहे ते म्हणजे ‘गिल्ट’ किंवा ‘अपराध भावना’. विकत घेतलेल्या वस्तूंकरता आपण मोजलेले पैसे आणि त्याचा आपण करून घेत असलेला किंवा आपल्याला होत असलेला उपयोग याचे व्यस्त प्रमाण हा गिल्ट मनात रुजण्यामागचे मुख्य कारण. 
जर आपण लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा, महागडा स्मार्टफोन विकत घेतला आणि त्यातल्या एकाही अॅपचा, सोयीचा वापर न करता केवळ फोन करणो, घेणो याकरताच तो वापरला तर मनामध्ये जी अपराधभावना निर्माण होईल त्या जातकुळीची ही अपराधभावना. भरमसाठ खरेदी केलेले कपडे, दागिने, गॅजेट्स यांचा उपभोगही घ्यायला आपल्याजवळ वेळ नाही, संधी नाही. वाढत्या प्रमाणातले कामाचे प्रेशर, प्रवासाचा ताण, स्पर्धा यामुळे घरात आणून ठेवलेल्या चैनीच्या वस्तूंची मजाही लुटता येत नाही. याचाच अर्थ त्याकरता मोजलेले पैसे आपण फुकट घालवतो आहोत. या अपराधभावनेमधून निर्माण होणारी नि:संग वृत्ती अनेकांना ‘मिनिमलिझम’कडे वळवायला कारणीभूत ठरत आहे. एकेकाळी पारंपरिक भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानल्या गेलेल्या मिनिमलिझमचे आजच्या भारतीय समाजात ‘जुगाड-मिनिमलिझम’चे बनलेले हे एक मजेशीर, फ्यूजन रसायन. पारंपरिक भारतीय जीवनशैलीतले ‘साठवा, काटकसर करा, पुनर्वापर करा’ सूत्र आणि आधुनिक शहरी उच्च मध्यमवर्गीयांचे ‘खरेदी करा, सवलतींचा लाभ उठवा, एकावर एक फुकट मिळवा’ धोरण यांचा मेळ या जुगाड-मिनिमलिझममध्ये घातला गेला आहे. 
भारतीय उद्योग व्यवसायामध्येही हा मेळ घातला गेलेला अनेक उदाहरणांमधून दिसतो. अवाढव्य जागा व्यापणारा, खर्चिक, लहान गावांमधे लोडशेडिंगची समस्या मोठय़ा प्रमाणावर असताना निरुपयोगी ठरणारा रेफ्रिजरेटर या मिनिमलिझम-जुगाड संकल्पनेतून ‘मिट्टीकूल’ या मातीच्या शीतकपाटाच्या रूपात भारतीय घरांमध्ये येतो. अनेक लहान भारतीय घरांमध्ये पत्र्यांचा वापरही अशा विविध कारणांकरता केलेला आढळतो. 
75 टक्क्यांहून अधिक भारतीयांचे उत्पन्न आजही दिवसाला दीडशे रुपयांहूनही कमी असताना, भारतात मिनिमलिझम ही संकल्पना स्वीकारणो हा पर्याय नसून अपरिहार्यता आहे.  
महात्मा गांधींचे वाक्य अशावेळी आठवते- ‘साधेपणाने जगा. तुमचे असे जगणो इतर अनेकांना जगवायला साधने पुरवते.’ भारतीय मिनिमलिझमचे सार या वाक्यामधे सामावलेले आहे.
 
आर्थिक असमानतेचे ध्रुवीकरण झालेल्या भारतीय समाजात उच्च मध्यमवर्गीयाला काही प्रमाणात आकर्षित करणा:या या ‘मिनिमलिझम’ संकल्पना दुस:या कमी आर्थिक गटातील वर्गात एक वेगळे, खास भारतीय स्वरूप धारण करते- त्याचं नाव ‘जुगाड’. नको असलेली, निरुपयोगी झालेली वस्तू टाकून न देता, तिचं एका वेगळ्या, उपयोगाच्या वस्तूमध्ये रूपांतरण करून काम चालवून नेण्याचा हा ‘जुगाड’ मिनिमलिझम संकल्पनेला एका वेगळ्या, उपयुक्ततेच्या पातळीवर नेतो. कल्पकता, तंत्रज्ञान, उपयुक्तता, काटकसर, पुनर्वापर या सर्वांचा ‘जुगाड’मधे कस लागतो. 
 
(लेखिका ख्यातनाम कला समीक्षक आहेत)
sharmilaphadke@gmail.com