शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

रानवाटांची माहेरओढ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 07:57 IST

प्राणी, पक्ष्यांना जो निसर्ग समजतो, तो आधुनिक विज्ञानालाही कळत नाही. दुर्दैवानं त्या अभ्यासात कोणाला रस नाही. तिथलं ज्ञान मला मात्र सारखं हाकारत असतं.

मारुती चितमपल्ली

माझं अवघं आयुष्य गेलं ते जंगलातच...माणसांच्या जंगलापेक्षा मी रमलो खºया खुºया जंगलातच...तिथलं जगणं अस्सल.. खरंखुरं.. पारदर्शी..या जीवनानं मला भरभरून दिलं.. समृद्ध केलं.. आजवरच्या जीवनाविषयी मी कमालीचा समाधानी आहे.. तरीही अजून खूप काही करण्यासारखं आहे.खूप करायचं राहिलंय... वयाच्या ८६व्या वर्षीदेखील मत्स्यकोश, प्राणिकोश, वृक्षकोश सात नव्या प्रकल्पांवर मी काम करतोय...एका आयुष्यात करण्यासारखं खूप काही असतं.. माझ्या ४० वर्षांच्या डायºया हे माझं सर्वांत मोठं संचित आहे. किती बारीकसारीक नोंदी मी त्यात केलेल्या आहेत याची मोजदादच नाही... प्राणी, पशुपक्षी, कीटक, झाडं यांच्याविषयी आहेच; पण आदिवासींचे जगणे, त्यांचे शब्द हे सारं त्यात आहे. हा मौलिक ठेवा आहे... तो जगासमोर यायला हवा.. म्हणून मी काम करतोय त्यावरसुद्धा...भरभरून दिलं हो निसर्गाने मला.. पुन्हा आयुष्य कधी मिळालंच ना तर असं वाटतं ते पुन्हा निसर्गाच्या जवळ जाणारं मिळावं... आदिवासींचं मिळावं.. खरं सांगतो, ते अडाणी, मागासलेले अजिबात नाहीत. त्यांच्याकडे भरभरून ज्ञान आहे. त्यांच्याकडे जे आहे ते आपल्याकडेही नाही.. ते म्हणजे अंगभूत शहाणपण आणि निसर्गाने भरभरून दिलेलं खरंखुरं ज्ञान. ते अनेक बाबतीत आपल्यापुढे आहेत. आपण शिकायला हवं त्यांच्याकडून. त्यांच्यात राहून.. सगळ्या निसर्गाचा भाग बनून...!सगळ्यांनाच वाटतं की, छान शिक्षण घ्यावं आणि शहराकडे जावं; पण माझं जरा उलट होतं. लहानपणापासून मला निसर्गाची कमालीची ओढ होती. तो वारसा आला आईकडून.. माझ्या आईला ‘रानवाटांची माहेरओढ’ होती.. माझे मामा रानावनांत भटकंती करणारे होते. त्यामुळे मीही जंगलात फिरायचो. निसर्गाची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती.वनविभाग हा पर्याय दिसला. नोकरीच करायची आहे तर जंगलाच्या जवळ नेईल अशी करावी. माझी पहिली पोस्टिंग झाली पुणे जिल्ह्यात वडगाव मावळला. जवळच तळेगावला प्रख्यात मराठी साहित्यिक गो. नि. दांडेकर राहत होते. त्यांना जंगलातलं वातावरण खूप आवडलं. ‘दिवाळी अंकांचं लेखन इथं राहून केलं तर चालेल का?’ असं त्यांनी मला विचारलं. मी आनंदाने होकार भरला. लेखक कसा लेखन करतो, तो काय वाचतो हे मी टिपायचो. काय वाचलं पाहिजे, साधंसोपं कसं लिहिलं पाहिजे याविषयी त्यांच्याशी चर्चा केली. त्यातून अनेक गोष्टी उलगडल्या. अभ्यासातून झाड कोणतं आहे हे शिकता येईल; पण झाडाचं सौंदर्य पाहण्याची दृष्टी गो. नि. दांडेकर यांनी दिली. त्यांनी ज्ञानेश्वरी, सातवाहनाची गाथासप्तशती मला वाचायला लावली. सुमारे ७०० गाथा आहेत त्या. साºया निसर्गाविषयी! लेखन आस्वाद्य कसे करायचे हे गोनिदांनी सांगितले. लेखनात माणूस कसा यायला हवा, रूक्षतेपेक्षा लालित्यातून वाचनीयता कशी वाढू शकते हे समजावले. त्यातून माझं लेखन सुधारत गेलं.फॉरेस्ट कॉलेजमध्ये असताना आठ महिने कॉलेज आणि चार महिने जंगलात राहुटी बांधून राहायचे. त्यावेळी मी चेकॉव्हची एक कथा रात्रभर वाचत होतो. त्या कथेने ‘जीवनाचा मार्ग’ मला सापडला. जंगलातल्या एकाकी जीवनाला पुस्तके आणि लेखन हा सर्वात मोठा सांगाती होऊ शकतो हा नवाच साक्षात्कार मला तिथे झाला. माझ्या साधनेचा प्रवास सुरू झाला. त्यातून जी ऊर्जा मला मिळाली ती आजपर्यंत पुरते आहे!आपले ऋषिमुनी जंगलातच तर राहत होते. ते माझे प्रेरणास्रोत! मी वेदांपासून वाचन सुरू केले. उपनिषदे, नाट्य, पुराणे सारे काही वाचले. मला संस्कृत येत नव्हते मी सुरुवातीला भाषांतर मिळवून वाचले. पण मूळ संस्कृतचे अध्ययन करायला हवे म्हणून संस्कृत भाषाही आत्मसात केली. केवळ पुस्तकांसाठी मी माझ्या प्रॉव्हिडंट फंडातून पैसे कर्जाने काढले..! व्यासंगाची आंतरिक ओढच जबरदस्त होती...पुढे पुढे जेव्हा जंगलाशी माझा अधिक निकटचा संबंध आला तेव्हा मी त्यात रमू लागलो. माधवराव पाटील यांच्या रूपाने ‘अरण्यवाचना’तील पहिला गुरु लाभला. त्यांच्यामुळे जनावरांची पावले, त्यांचे वास, त्यांची ‘ओळखण’, त्यांना मिळालेले शब्द, आदिवासींकडे वन्यप्राण्यांविषयीचे सारे शब्द मला ‘अरण्यवाचना’तून जमवता आले.माझ्या लेखनप्रवासात साधं, सोपं, सरळ लेखन व्हावं याचा मी मनापासून प्रयत्न केलाय. राम पटवर्धन यांनी मला लेखनसाधनेचा मार्ग सांगितला होता, तो मी अनुसरला, तो म्हणजे, लर्न द मास्टर्स! त्यानुसार मी सगळ्या दिग्गजांचं वाचत गेलो आणि माझं लेखन सुधारत गेलो. त्यामुळे माझ्या लेखनात जोडाक्षर अभावानेच येतं! प्रतिभा प्रत्येकाकडेच असते; पण शैली फुलवायची असेल तर त्याचे मूळ संतवाङ्मयात आहे. त्याचा सखोल अभ्यास मी केला. कबीर, मीरा, संत वाङ्मय सारे काही वाचले. मी मूळचा तेलगू, तरी मराठीतून साहित्यसंपदा लिहिली. संस्कृतचा गाढा अभ्यास केला. कारण मराठीवर माझे नितांत प्रेम आहे. त्यानंतर जंगल आणि माझं नातं अधिक गहिरं झालं. ते होतच गेलं. किर्र घनदाट जंगलात मी एकट्याने राहण्याचा थरारक अनुभवही घेतलेला आहे. जंगलात मी ४० वर्षं राहिलोय आणि त्यातून मी कमालीचा समृद्ध झालोय.प्राणी, पक्ष्यांना जो निसर्ग समजतो तो आपल्याला इतक्या प्रगत विज्ञानानंतरही नीट समजत नाही, असं मला वाटतं. कारण ते निसर्गाशी तादात्म्य पावलेले असतात. पक्षी अंडी कोणत्या दिशेला घालतात, किती घालतात यावरसुद्धा पावसाचा अंदाज असतो. सूक्ष्म अभ्यास केला तर अनेक गोष्टी उलगडतात. पण आपल्याकडे अनेकदा जे आडाखे बांधले जातात ते चुकीचे असतात. निसर्गाचे व निसर्गाचा एकरूप भाग असलेल्या प्राणी, पशु आणि झाडांचे आडाखे अधिक अचूक असतात. ते आपल्याला नीट समजत नाहीत व त्याचा तसा अभ्यासही होत नाही याची मात्र खंत वाटते.साधं कावळ्याचं उदाहरण घ्या, कावळ्याने निसर्गाशी स्वत:ला जुळवून घेतलेले असते. पाऊस जर चांगला होणार असेल तर कावळीण चार पिल्लांनादेखील जन्म देते अन्यथा दुष्काळी स्थितीचा अदमास आला तर एकच अंड घालते. हे जे निसर्गदत्त ‘फॅमिली प्लॅनिंग’ त्यांना कळलंय ते समजून घेण्यासाठी प्रदीर्घ निरीक्षणच करावं लागतं. आज निसर्ग पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी असंख्य साधने, कितीतरी मार्ग, अत्याधुनिक गोष्टी आहेत. पण सृष्टीचे मनापासून निरीक्षण करण्याची आत्मीयता बाहेरून आणता येत नाही.माझ्या डायरीत केलेल्या नोंदी हाच चाळीस वर्षांतला मोठा ऐवज आहे. जनावरांबद्दल, पक्ष्यांबद्दल, आदिवासींबद्दल त्यात नोंदी आहेत. मत्स्यकोश, वृक्षकोश यांसारख्या विषयांचे सारे मुद्दे माझ्याजवळ आहेत. मी हे केलं नाही तर इतर कुणी करेल असे वाटत नाही म्हणून मलाच ते करायला हवंय. आजवरच्या माझ्या वाटचालीत निसर्गाच्या सहवासाने मला भरभरून समृद्ध केलंय. रानवाटांची माहेरओढ लहानपणापासून आत्तापर्यंतच्या सर्व प्रवासात मला साथ देत आहे. याचं कृतज्ञ समाधान माझ्या अंतरात आहे.

लेखन स्वातंत्र्यासाठी झगडल्यादुर्गाबाई भागवतपनवेलला कर्नाळा अभयारण्यात मी नोकरीला होतो. तेव्हा मी लेखनही करायचो. तेव्हा मी काम न करता केवळ लेखन करतो असा त्यांचा ग्रह झाला. त्यांनी मला लिहिण्याची परवानगी नाकारली. एकदा सहज बोलताना मी ज्येष्ठ साहित्यिका दुर्गाबाई भागवतांजवळ हे बोललो. तेव्हा त्या कमालीच्या चिडल्या. त्यांनी वनविभागाच्या अधिकाºयांना व मंत्र्यांना पत्र लिहून तुम्ही लेखनस्वातंत्र्य रोखू शकत नाही हे कळवले. तेव्हापासून मला पुन्हा मुक्तपणे लिहिण्याचे स्वातंत्र्य मिळाले.

उंटांनी घालवलं हत्तींना!कोईमतूरला असताना वूड्स नावाच्या वनाधिकाºयाची समाधी होती. त्याच्या तरुणपणी तो येथे आलेला होता. या वनात सागवानाची लागवड अद्याप झालेली नव्हती. त्याने खूप प्रयत्न केले; पण हत्तींचा कळप सारी झाडे तोडून जायचा. त्या जिद्दी ब्रिटिश अधिकाºयाने तिथल्याच आदिवासी मुलीशी लग्न केले. तिने त्याला उपाय सांगितला, हत्ती उंटाला भितो. मग त्याने दोन उंट आणले. ते अगडबंब उंट पाहून हत्तीचा कळप बिचकला. त्यानंतर ३० वर्षे हत्ती तिथे फिरकले नाही. आज त्याला राष्ट्रीय उद्यान म्हणून महत्त्व आले आहे. त्यामागे वूड्सने जीव ओतून केलेले काम महत्त्वाचे आहे. हे पाहिल्यावर वाटले, की बाहेरचा एक अधिकारी येतो आणि इतके काम करून जातो तसं काहीतरी आयुष्यात करावं. हाच माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट!

शब्दांकन : पराग पोतदार

(लेखक वन्यजीव अभ्यासक असून, मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)