शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्यांड दाखवणारी दुर्बिण... एकदा पाहाच आणि जाणून घ्या कशी असते?,,,

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 07:44 IST

जगातील सर्वांत मोठी अवकाश दुर्बीण असा नावलौकिक मिळवलेल्या जेम्स वेब टेलिस्कोपने आता अवकाशात चांगलाच जम बसविला आहे.

जगातील सर्वांत मोठी अवकाश दुर्बीण असा नावलौकिक मिळवलेल्या जेम्स वेब टेलिस्कोपने आता अवकाशात चांगलाच जम बसविला आहे. अवकाशातील अनेक प्राचीन आणि दुर्मीळ छायाचित्रे टेलिस्कोपने भूतलावर पाठवली. जाणून घेऊया जेम्स वेबविषयी अधिक माहिती... निर्मितीची प्रक्रियाजेम्स वेबच्या निर्मितीची प्रक्रिया दोन दशकांपासून सुरू होती. ०७ देशांतील १००० लोकांचा या निर्मिती प्रक्रियेत सहभाग. हबल दुर्बिणीला निवृत्त करून तिची जागा घेण्यासाठी जेम्स वेबची निर्मिती केली. अंतराळातील अगदी दुर्मिळातील दुर्मीळ प्रकाश-किरणांचा वेध घेण्याची जेम्स वेबची क्षमता आहे.

टेलिस्कोप उद्दिष्टे - विश्वाची निर्मिती एका महास्फोटातून झाल्याचे मानले जाते. या महास्फोटानंतर अंतराळात निर्माण झालेल्या आकाशगंगा, तारकापुंज यातून निघालेल्या प्रकाशाचा मूळ स्रोत शोधणे हे जेम्स वेब टेलिस्कोपचे मूळ उद्दिष्ट आहे.- आकाशगंगेची निर्मिती आणि रचना यांचा सखोल अभ्यास करणे.- अवकाशातील विविध ग्रहांची निर्मिती कशी झाली, त्यांची रचना आणि त्या ठिकाणी सजीवांचे अस्तित्व आहे किंवा कसे, याचा चिरंतन शोध घेणे.- अवकाशातील सर्व ग्रह-तारका मंडलांची छायाचित्रे पृथ्वीवर पाठवणे.

दुर्बिणीच्या बाह्य भागावर अंतराळातील वातावरणात टिकू शकतील असे धातू आणि रसायने आहेत.

वेब इन्फ्रारेड टेलिस्कोप आहे. इन्फ्रारेड रेडिएशनमुळे उष्णता निर्माण होते. त्यामुळे सूर्यकिरणांपासून टेलिस्कोपचा बचाव व्हावा यासाठी त्यावर टेनिस कोर्टाच्या आकाराएवढे एक आवरण चढविण्यात आले आहे.

एक अँटेना दुर्बिणीवर बसवलेला असून,  त्याची रेंज १५ लाख किमी अंतरापर्यंतची आहे.

आतील भागात दोन आरसे असून, त्यातील एक अंतर्वक्र आणि अन्य बहिर्वक्र आहे. हे आरसे भलेमोठे असून, मूळ प्रतिमेच्या १५ पट आकार त्यात दिसू शकतो.

या आवरणाचे वैशिष्ट्य म्हणजे माणसाच्या केसाच्या आकाराएवढ्या प्लास्टिक कणांचे पाच थर त्यावर लावण्यात आले आहेत.

दुर्बिणीच्या सर्व यंत्रणेला नियंत्रित करण्यासाठी खालच्या भागाला स्पेसक्राफ्ट बस जोडली आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय