शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

हायटेक मोलकरणी -- अमेरिकन सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:54 IST

अमेरिकेतलं पर्यावरण स्वच्छ असल्याने तेथे स्वच्छतेचे काम फार कमीच असते. तसेच आधुनिक मशीनआणि आपल्या डीश स्वत:च धुण्याच्या सवयीमुळे तेथे मोलकरणी नावाचा प्रकार खूपच कमीच आहे.

ठळक मुद्दे अमेरिकेतलं पर्यावरण स्वच्छ असल्याने तेथे स्वच्छतेचे काम फार कमीच असते. तसेच आधुनिक मशीनआणि आपल्या डीश स्वत:च धुण्याच्या सवयीमुळे तेथे मोलकरणी नावाचा प्रकार खूपच कमीच आहे.

किरण कर्नाड, डेटन, न्यू जर्सीअमेरिकेतील हवामान जगात सर्वांत चांगले आहे. इथे थंडीचा सिझन सोडल्यास फेब्रुवारी ते आॅक्टोबर हा स्प्रिंग व समरचा काळ आल्हाददायक असतो. येथील वातावरण धूळ व प्रदूषणविरहित असते की धूळ नावाचा प्रकार इथे नजरेला पडत नाही. त्यामुळे दुचाकी, चारचाकी इथल्यासारखी रोज धुवावी वा पुसावी लागत नाहीत. यामुळेच इथे रोज केरवारे करावे लागत नाही की जाड कापडाने फरशीही पुसावी लागत नाहीत. घरातील फर्निचर व इतर गोष्टींवर अडकलेली धूळ झटकावी लागत नाही. शिवाय येथे घराघरांत असलेली व्हॅक्यूम क्लिनर्सही याची काळजी घेतात. केरकचरा दहा दिवसांनी, तर धुणे-पुसणे, घरची स्वच्छता पंधरा-वीस दिवसांनी केली तरी चालते. प्रत्येकाच्या घरात अत्याधुनिक वॉशिंग मशीन व त्यात कपडे धुण्यापासून ते थेट वाळविण्याची सुविधा असल्याने विशेष फरक पडत नाही.

भांडी घासण्याचे म्हणाल तर येथे प्रत्येकाच्या घरी डिश वॉशर्स असतात. अत्याधुनिक प्रकारच्या डिश वॉशर्सने भांडी स्वच्छ निघतात. अमेरिकेत प्रत्येकजण आपली प्लेट, ताट, वाटी स्वत: धुतो. मग प्रश्न पडतो घरात मोलकरणी हव्याच कशाला? इथे सामान्य माणसाकडे ‘मोलकरीण’ नावाचा प्रकारच नसतो. दोन-तीन महिन्यांतून एखादी मोलकरीण बोलवावी लागते. इथे अमेरिकेच्या अध्यक्षांकडेच मोलकरीण नावाचा प्रकार असतो, असेही गमतीने म्हटले जाते.

या मोलकरणींचा ‘पगार काय असतो?’ या प्रश्नाला माझ्या मुलीने दिलेले उत्तर चक्रावून टाकणारे होते. ही मोलकरीण दोन-तीन तासांसाठी चक्क १२० ते १४० अमेरिकन डॉलर्स घेते. याची भारतीय रुपयात किंमत केली असता ती जवळजवळ नऊ ते दहा हजार रुपये होते. म्हणजे महिन्याकाठी एक मोलकरीण तब्बल सहा ते सात लाख रुपये मिळविते. एका दिवसात या मोलकरणी किमान दोन ते तीन घरे करतात.

या मोलकरणींमध्येही विविध ग्रेड असतात, तसेच त्यांच्या वेतनाचा दर घराच्या एकूण क्षेत्रफळावर अवलंबून असतो. माझ्या मनात सहज विचार आला की, आपल्याकडील मोलकरणींना याची बित्तंबातमी लागल्यास विमाने भरून त्या अमेरिकन भूतलावर उतरतील.!! आज बऱ्याच दिवसांनी माझ्या मुलीने अशीच मोलकरीण ‘हायर’ केली होती. त्यामुळे तिला पाहण्यास आम्ही उत्सुक होतो.

मोलकरणींबद्दल हा विचार करीत असतानाच ती आलीच...! एखाद्या सुंदर राजकन्येसारखी... क्वीन एलिझाबेथसारखी... हळूवार.. दरवाजा उघडल्यानंतर तिचे ‘हॅलो गुड मॉर्निंग’ वगैरे झाले.. त्या स्वरूपसुंदर कन्येने फिक्कट निळसर तोकडी पँट, काऊबाय टी शर्ट.. मागे केसांची पोनी..... अतिउंच टाचेचे ब्राऊनीश बूटस् असा ड्रेस परिधान केला होता. ‘ओ हाय.. हाऊ आर यू’ असे काही म्हणतच परवानगी न घेता आत घुसली. येताना तिने एक मोठा व एक छोटा असे दोन व्हॅक्यूम क्लिनर्स, दोन डबे त्यात वूलन्सची फडकी, स्टेन रिमुअर्स, जेलीज, लांब झाडू, आदी साहित्य आणले होते. ‘कॅन आय प्लिज स्टार्ट माय वर्क?’ असे म्हणताच तिने विद्युतगतीने कामास सुरुवात केली.

सोबत आणलेल्या व्हॅक्यूम क्लिनरच्या मशीनवर असलेल्या कोल्ंिड्रकच्या बाटलीतून अधूनमधून ज्यूसचे घोट घेत मध्येच मोबाईलवर बोलत ती कामेही करीत होती आणिपुढचे प्लॅनिंगही करीत होती. तिने आमचे शयनगृह व स्वच्छतागृह चकाचक केले. तिने सर्व खोल्या, खुर्च्या, सोफा, आसने, स्वयंपाकघर, कुकिंग रेंज, फ्रीज, एक्झॉस्टफॅन, चिमणी, मायक्रोवेव्ह, टोस्टर, डीश वॉशर, आदी सर्व साफ केले. एखादी गोष्टसाफ करताना ती त्यावर अ‍ॅसीडचे चार थेंब शिंपडून त्यावर घासून घासून साफ करीत होती. तिचे प्रयत्न खरोखरीच प्रामाणिकपणाचे वाटत होते.

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारत