शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पौष्टिक खाऊचा ‘हसरा कोपरा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 06:05 IST

गरिबाघरच्या मुलांना पौष्टिक खाऊ मिळावा, या उद्देशाने जकातवाडीच्या अंगणवाडीत पौष्टिक खाऊचा ‘हसरा कोपरा’ तयार करण्यात आला आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांनी शेंगदाणे, सोयाबीन, चुरमुर्‍याची पोती, भाजलेला हरभरा देऊन आपले कर्तव्य निभावले. परिणामी कुपोषण पहिल्या टप्प्यावरच रोखणं शक्य झाले.

डॉ. कैलास शिंदे (मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषद)ठिकाण : सातारा जिल्हा

काय केले? सातारा जिल्ह्यात कुपोषणाचं प्रमाण अत्यल्पच; पण संपूर्ण कुपोषणमुक्तीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी विशेष मोहीम हाती घेतली. सातारा तालुक्यातील जकातवाडी हे गाव त्यांनी दत्तक घेतले आहे. गरिबाघरच्या मुलांना पौष्टिक खाऊ मिळावा, या उद्देशाने जकातवाडीच्या अंगणवाडीत पौष्टिक खाऊचा ‘हसरा कोपरा’ तयार करण्यात आला आहे.

काय घडले?गावातील प्रत्येक ग्रामस्थाने या हसरा कोपर्‍यात स्वयंस्फूर्तीने पौष्टिक घटक पुरवायला सुरुवात केली. ग्रामस्थांनी शेंगदाणे, सोयाबीन, चुरमुर्‍याची पोती, भाजलेला हरभरा देऊन आपले कर्तव्य निभावले. परिणामी कुपोषण पहिल्या टप्प्यावरच रोखणं शक्य झाले.डॉ. शिंदे यांच्या आग्रहाने ग्रामस्थांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने अंगणवाडीतील मुलांना पौष्टिक खाऊ वाटप करण्याचे निश्चित केले आहे.ग्रामस्थांच्या वाढदिवसांची यादी ग्रामपंचायतीने काढली आहे. त्यामुळे एक महिना आधी या हसरा कोपर्‍यात खाऊ देण्याची जबाबदारी कोणावर असेल हे निश्चित करण्यात आल्याने पौष्टिक खाऊची रसद विद्यार्थ्यांना विनाखंड मिळत राहणार आहे. या संकल्पासाठी ज्येष्ठांसह तरुण ग्रामस्थांची संख्या लक्षणीय आहे.

मार्गदर्शक उपक्रमजकातवाडी हे गाव मी दत्तक घेतले आहे. शासनाच्या अनेक उपक्रमांमध्ये गावाचा सहभाग कौतुकास्पदपणे वाढलेला दिसतो. हा खाऊचा हसरा कोपरा संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल. - डॉ. कैलास शिंदे

(मुलाखत आणि शब्दांकन : प्रगती जाधव-पाटील, लोकमत, सातारा)

टॅग्स :Poshan Parikramaपोषण परिक्रमा