शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
2
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
3
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
5
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
6
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
7
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
8
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
9
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
10
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
11
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
12
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
13
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
14
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
15
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
16
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
17
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
18
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
19
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
20
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?

देशोदेशींचे गुरूजी

By admin | Updated: August 30, 2014 14:23 IST

‘तव स्मरण सदा स्फूर्तिदायी ठरो’ असं म्हटलं जातं. भारतातील ऋषिपरंपरा आपल्याला प्रेरणादायी आहेच; परंतु तरीसुद्धा जगभरचे हे देशोदेशींचे गुरुजीसुद्धा जगाला मार्गदर्शक आहेत. कोणत्याही देशातले शिक्षक भाषा, सीमांच्या रेषा ओलांडून प्रेरणा द्यायला सर्मथ आहेत. म्हणूनच शिक्षक दिनानिमित्त (५ सप्टेंबर) त्यांचे स्मरण.

 हेरंब कुलकर्णी

 
लहानपणी पाठय़पुस्तकात श्री. म. माटेंचा ‘देशोदेशींचे ज्ञानेश्‍वर’ नावाचा जगभरच्या प्रतिभावंतांवरचा आम्हाला धडा होता. त्या शीर्षकाच्या धर्तीवरच नेहमी वाटते, की जगात देशोदेशी होऊन गेलेल्या सर्मपित आणि प्रतिभावंत शिक्षकांचे स्मरण शिक्षकदिनाच्या दिवशी करायला हवे. पूर्वी जगातल्या इतर देशांतल्या शिक्षकांची फारशी माहिती नसायची पण गेल्या काही वर्षांत शिक्षणविषयक पुस्तके अरविंद गुप्ता यांच्या प्रयत्नाने मोठय़ा संख्येने मराठीत आली. आज केवळ मराठीत १00 पेक्षा जास्त शिक्षणविषयक पुस्तके आहेत आणि अनुवादित पुस्तकांमधून जगभरच्या सर्मपित शिक्षकांचे योगदान आपल्याला माहीत झाले. त्यातल्या काहींचे स्मरण करायलाच हवे. त्यातून प्रेरणा मिळू शकेल.
जपानमधील कोबायशी हा शिक्षक. नवृत्तीनंतर मुलांशिवाय करमेना. शाळा सुरू करायला पैसा नव्हता. रेल्वे स्टेशनवरच्या रेल्वेच्या डब्यात तोमोई ही शाळा सुरू झाली. बॉम्बहल्ल्यात ही शाळा नष्ट झाल्यावर हा प्रयोग ७ वर्षांत थांबला. जपानमधील सारे कलावंत अधिकारी एकमेकांचे मित्र होते. याचे कारण ते सर्वजण त्या डब्यातील शाळेचे विद्यार्थी होते. ते सर्व विद्यार्थी एकत्र आले आणि आपल्या त्या शिक्षकाच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांनी त्या आठवणी संकलित केल्या.. तेच पुस्तक म्हणजे तोत्ताेचान. पहिल्याच वर्षी या पुस्तकाच्या ३५ लाख प्रती खपल्या. जगातल्या अनेक भाषेत तोत्ताेचानचा अनुवाद झाला. शिक्षकाच्या प्रेमाची ताकद जगाला कळाली.
सन १९६0च्या दशकात डॅनियल ग्रीनबर्ग हा अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व अमेरिकेतल्या समविचारी पालकांनी एकत्र येऊन सडबरी व्हॅली स्कूल ही शाळा सुरू केली. मुलं शाळेत येतात आणि त्यांच्या पद्धतीने त्यांना जे आवडेल ते काम सुरू करतात. कुणी दिवसभर खेळतच राहतो. कुणी मासेच धरत राहतो. कुणी संगणकावर काम सुरू करतो. काही मुले एकच कृती ६ महिनेही करत राहतात. त्यांना कुणीच रोखत नाही. त्यांना जेव्हा एखादा विषय शिकायचा असेल तेव्हाच ते शिक्षकाकडे येतात. मग शिक्षक त्यांना शिकवतात; पण असे असूनसुद्धा मुले सर्व अभ्यास व्यवस्थित शिकतात, असा वेगळा प्रयोग आपल्या शिक्षकांना अंतर्मुख करू शकतो.
झोपडपट्टी विभागात शाळा असलेले शिक्षक विद्यार्थ्यांची कौटुंबिक पार्श्‍वभूमी, शिस्तीच्या कल्पना आणि आपल्या मध्यमवर्गीय परिघाला बसणारे हादरे बघून अस्वस्थ होतात आणि त्याविषयी सतत तक्रार करत राहतात. अशा शाळांमध्ये काम करताना मुलांच्या वास्तवाला समजावून घेऊन मुलांना कसे प्रवाही बनविता येईल ही ब्रेथवेट या इंग्लंडमधील शिक्षकाची कहाणी इतकी उत्कट आहे, की नकळत आपण त्या शाळेचा भाग बनून जातो. निग्रो असलेल्या या शिक्षकाला सुसंस्कृततेची शेखी मिरवणार्‍या इंग्लंडसारख्या देशात वर्णद्वेषाचे जे अनुभव येतात ते आपल्यालाही हेलावून टाकतात. तरीही न हारता हा शिक्षक त्या मुलांना बदलवण्यात यशस्वी ठरतो. शेवटी त्याचे विद्यार्थी शाळा सोडताना, तुम्ही आम्हाला मोठी माणसे म्हणूनच वागविले अशी कृतज्ञता व्यक्त करून ‘टू सर विथ लव्ह’ असे ग्रीटिंग देतात. वंचितांच्या शिक्षणाचा एक महत्त्वाचा अध्याय आहे.
न्यूझीलंडमधील मावरी या आदिवासी जातीच्या मुलांमध्ये सिल्व्हिया वॉरन शाळा चालवते. ते प्रयोग यशस्वी ठरतात. पण देशात त्या प्रयोगांचे कौतुक होत नाही. २४ वर्षे खपून तिने काढलेली चित्रे जाळली जातात. पुस्तक प्रसिद्ध केले जात नाही. अखेरीस या प्रयोगांची कहाणी तिच्या मृत्यूनंतर अमेरिकेतून प्रकाशित होते. अशाप्रकारे एकाकीपण वाट्याला आलेली प्रतिभावंत सिल्हिया उपेक्षा होणार्‍या शिक्षकांना प्रेरणा देते. तिने विकसित केलेली सहज वाचनपद्धती ही खूपच महत्त्वपूर्ण व उपयुक्त आहे. पहिले शब्द हे मुलांच्या जीवनातील जवळीक असणारे शब्द हवेत. मुलांच्या खळाळत्या जीवनातून उगम पावलेले जिवंत शब्द हवेत. सिल्व्हियाच्या या संशोधनाने जगभर साक्षरता चळवळ व आदिवासींच्या शिक्षण अभ्यासक्रमाला दिशा दिली.
नील नावाचा इंग्लंडमधला शिक्षक अवघ्या ४५ मुलांना घेऊन राहतो. मानसशास्त्राच्या अभ्यासाच्या आधारे अनुभवातून मुलांना स्वातंत्र्य देतो. न आवडणार्‍या तासांना न बसायचे मुलांना स्वातंत्र्य असे. प्रत्येक शिक्षकाला मुले पहिल्या नावानेच हाका मारत असत. शिक्षक व विद्यार्थी समान पातळीवर असत. शाळेचे नियम मुले ठरवत. मुलांना मनाप्रमाणे काहीही करण्याचे स्वातंत्र्य या शाळेत आहे; पण त्यामुळे जर दुसर्‍या मुलाला त्रास होत असेल तर असे स्वातंत्र्य नाकारले जाते. मुलांना जेव्हा शिकावेसे वाटेल तेव्हा मुले नक्की शिकतात असा नीलचा विश्‍वास आहे त्यामुळे शिकण्याची सक्ती अजिबातच नाही. मुलांना मुक्त वातावरणात शिकवलं तरच त्यांच्या मुक्ततेसाठी जास्तीतजास्त नेणिवेचा भाग हा जाणिवेच्या कक्षेत येण्याची संधी मिळते असे नीलचे प्रतिपादन आहे. मानवी वर्तनाचा नील सतत शोध घेत राहतो. मोठय़ांची ढवळाढवळ व मार्गदर्शन यंत्रमानवांची पिढी निर्माण करते. मुलांना सक्तीने शिकायला लावल्यामुळे त्यांच्यावर प्रेरणाहीन प्रौढत्व लादले जाते. त्यातून ते ‘जैसे थे’ वृत्तीचे बनतात. असा समाज चाकोरीबद्ध खर्‍या व्यक्तींच्या खांद्यावर उभा असतो. मुलांवर मालकीहक्क गाजविणार्‍या माणसांनी कधीही शिक्षक होऊ नये असे नील बजावतो. मुलांचा पोरकटपणा, गैरवर्तणूक म्हणजे मुलांना दिलेल्या चुकीच्या वागणुकीचा पुरावाच असतो. साखळी घातली की चांगल्या कुत्र्याचा वाईट कुत्रा होतो अगदी तसंच शिस्तीनं मुलांचं होत असतं, असे तो शिक्षक आणि पालकांना बजावतो. सुमारे ८0 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या एका डोंगराळ भागातील एका शाळेत जुालिया वेबर गॉर्डन ही शिक्षिका ४ वर्षे काम करते. इतक्या छोट्या वस्तीत केलेलं तिचं काम खरं तर जगापुढं आलंही नसतं. पण त्या ४ वर्षांच्या काळात तिनं रोज डायरी लिहिली आणि ती डायरी जगापुढं आली, तेव्हा शिक्षणविश्‍वाला एक ऐवज मिळाला. एखादा सर्मपित शिक्षक किती सर्मपित काम करू शकतो ते समजले. हे पुस्तक  प्रत्येक शिक्षकाला प्रेरणा  देऊ शकते. ज्युलियाची डायरी हा शिक्षकाला आपल्या कामाच्या नोंदी ठेवून अंतर्मुख होण्याची प्रेरणा देते.
अमेरिकेत ज्या काळात हजारो विद्यार्थिसंख्या असलेल्या मोठय़ा शाळा उभ्या राहताना व तेथेच शिक्षण चांगले मिळेल अशी समजूत असताना, त्याच काळात ज्युलियाने अवघी २५ घरं असलेल्या वस्तीजवळच्या डोंगरात ही शाळा चालवून वाडी- वस्तीवर काम करणार्‍या जगातल्या तमाम शिक्षकांसाठी ती प्रेरणास्रोत झाली.
पहिले महायुद्ध संपल्यावर अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होतात. या युद्धात जखमी झालेला, अंगात र्छे घुसलेला एक सैनिक गावाकडे येतो. तर गनिमांना मदत केली म्हणून पत्नीला र्जमन सैनिकांनी लहान बाळासह पकडून नेलेले. गनिमांचे नाव सांगत नाही म्हणून तिच्यासमोर तिच्या बाळाला आपटून ठार मारलेले. तिलाही फाशी दिलेले. हा सैनिक सर्वस्व गमावलेला. मनात पत्नी आणि मुलाच्या क्रूर मूत्यूची अपरिमित सल. अशा दु:खी मन:स्थितीत हा सैनिक एक शाळा चालवतो आणि अवघ्या ५२ वर्षांच्या आयुष्यात २३ वर्षे या शाळेत अनेक प्रयोग करून युद्धातील जखमांमुळे लवकर जगाचा निरोप घेतो. अशा एका वेगळ्या शिक्षकाने लिहिलेली कहाणी आहे. त्या गावातील बहुतेक मुले ही युद्धाने होरपळलेली आहेत. कित्येकांनी आपले वडील या युद्धात गमावलेले आहेत. या मुलांच्या भकास नजरा लेखकाला शिक्षक म्हणून अस्वस्थ करतात. आपल्या कुटुंबात जे बालपणापासून वंचित झाले आहेत त्यांना बालपण परत मिळवून देणे हे माझ्यासमोरचे सर्वात मोठे काम आहे. शिक्षकाला जे एकूण परिश्रम करावे लागतात त्यामध्ये मुलांच्या मनाला झालेल्या जखमा बुजविण्यासाठी घ्यावे लागणारे परिश्रम अधिक बिकट असतात. यातून शिक्षक म्हणून मुलांविषयीची तीव्र संवेदना लक्षात येते. अर्थात शिक्षकांची ही महान परंपरा भारतातही मोठी आहे. रविंद्रनाथ टागोर आणि गुजरातचे गिजूभाई बधेका हे शिक्षक आंतरराष्ट्रीय स्तरावर माहीत आहेत. शांतिनिकेतन आणि गुजरातमधील गिजूभाईंचा शिक्षणप्रयोग जगभर दखलपात्र ठरला. महाराष्ट्रात तर साने गुरुजी यांच्या प्रेरणेने कितीतरी पिढय़ांतील अतिशय बुद्धिमान तरुण-तरुणीसुद्धा इतर कोणते करिअर करण्याऐवजी शिक्षक झाले.
‘तव स्मरण सदा स्फूर्तिदायी ठरो’ असे म्हटले जाते. भारतातील ऋषिपरंपरा आपल्याला प्रेरणादायी आहेच; परंतु तरीसुद्धा जगभरचे हे देशोदेशीचे गुरुजीसुद्धा जगाला मार्गदर्शक आहेत. कोणत्याही देशातल्या शिक्षकांना भाषा सीमांच्या रेषा ओलांडून, प्रेरणा द्यायला सर्मथ आहेत, म्हणूनच शिक्षकदिनानिमित्त त्यांचे स्मरण-शिक्षणविषयक पुस्तकांमधून आलेलं हे संचित शिक्षकांनी वाचलं तर या जगभरच्या महान सर्मपित गुरुकुलाचे आपल्या नकळत आपणही भाग होऊन जातो.
 
(लेखक शिक्षणक्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत.)