शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
2
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
3
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
6
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
7
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
8
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
9
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
10
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
11
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
12
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
13
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
14
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
15
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी
16
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
17
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
18
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
19
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
20
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार

अखेर मैदान मारलेच...

By admin | Updated: September 6, 2014 14:53 IST

क्रिकेटज्वरापुढे भारतीय मैदानी खेळांची पुरती दमछाक होत असताना पहिल्याच कबड्डी लीगला मिळालेले यश या खेळांना संजीवनी देईल, अशी आशा जागवणारे आहे. त्याची दिशा मात्र योग्य राहायला हवी.

 विनय नायडू

भारतीय क्रीडा क्षेत्रावर दूरगामी परिणाम करू शकणारी एक घटना नुकतीच घडली. ही घटना म्हणजे प्रो कबड्डी लीग (पीकेएल) या भारतातील पहिल्या प्रोफेशनल कबड्डी लीगला लाभलेले प्रचंड यश!  
 या अस्सल देशी खेळाने साहेबांच्या देशातील निर्मिती असलेल्या क्रिकेटच्या लोकप्रियतेला धक्का दिला आहे. भारताने १९८३मध्ये वन-डे वर्ल्डकप जिंकल्यापासून येथील क्रीडाप्रेमींच्या मनावर क्रिकेटने अधिराज्य गाजवले. इतके की त्याच्या छायेखाली इतर खेळांची वाढच खुंटली. आपल्याकडे कबड्डीला ग्रामीण किंवा फार तर निमशहरी खेळ म्हणून ओळख. यामुळेच मशाल स्पोर्ट्सचे एमडी चारू शर्मा आणि आनंद महिंद्रा यांच्यासारख्या दिग्गज उद्योगपतींनी पीकेएलची कल्पना उचलून धरल्यावर त्याच्या यशाकडे अनेकांनी संशयाने पाहिले. मात्र, या दोघांनी या अस्सल गावरान खेळावर दाखवलेला विश्‍वास किती सार्थ होता, हे पीकेएलच्या पहिल्या सत्राच्या यशानंतर दिसून आले.  
पीकेएलला प्रारंभ झाल्यावरही या लीगला लोक प्रतिसाद देणार नाहीत, असेच म्हटले जात होते. मात्र, ३७ दिवसांच्या या कबड्डी महोत्सवाने मिळवलेले यश पाहून टीकाकारांचेही डोळे दिपले. ‘‘लोकांनी प्रारंभापासून आमच्यावर प्रश्नांचा भडिमार केला आणि शंका उपस्थित करण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतच होते..’’ जयपूर पिंक पँथर्स आणि यू मुंबा यांच्यामध्ये मुंबईत रंगलेल्या फायनलला प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल गर्दी केली होती. त्या वेळी चारू त्याच्या नेहमीच्या शैलीत मला अनुभव सांगत होता.. ‘‘या ग्रामीण खेळाचे सामने तुम्ही मोठय़ा शहरांत का घेता? हे सामने तुम्ही खेड्यात किंवा छोट्या शहरांत घ्यायला हवे होते. येथे तुम्हाला यश मिळणार नाही, असे अनेकांनी आम्हाला सुनावले. आमची संकल्पना नेमकी काय आहे, हे ऐकून घ्यायलाही लोक तयार नसायचे. पण आम्ही आणि आमच्या पाठीमागे उभे असलेले लोक ठाम राहिलो. पहिल्या काही दिवसांतच कबड्डीला लोकांनी डोक्यावर घेतल्यानंतर आधी आम्हाला टाळणारे लोक स्वत: कार्यालयात येऊन स्पर्धेशी जुळण्यात रस दाखवू लागले. या खेळावरील विश्‍वास आम्हाला कुठे घेऊन आलाय, हे आज जगाला दिसलंय..’’
आनंद महिंद्रा कमी पण नेमकं बोलण्यासाठी ओळखले जातात. पीकेएलबद्दल ते जे बोलले ते ‘सौ सोनार की एक लोहार की’ या सदरात फिट बसणारं होतं.. ‘‘आम्हाला कबड्डीला दुर्लक्षाच्या काळोखातून बाहेर काढून शक्यतांच्या प्रकाशात आणायचे होते.’’ या विषयावरील संवाद चारूच्या वाक्याने पूर्ण केला.. ‘‘यशाचा सूर्य किती तेजाने तळपत आहे, हे तुम्ही बघतच आहात!’’ या यशानंतर आयोजकांनी २0१५मध्ये होणारे पीकेएलचे दुसरे यापेक्षाही भव्य असेल, याची ग्वाही दिली आहे. इतकेच नव्हे तर पुढील वर्षी महिलांची कबड्डी लीगदेखील प्रत्यक्षात उतरवण्याचा शब्द त्यांनी दिलाय. कबड्डीचा वारू चौफेर उधळायला सज्ज झालाय, ही  क्रीडाप्रेमींसाठी खचितच आनंदाची बाब आहे.
पीकेएल क्रीडा क्षेत्रात अनेक अर्थाने क्रांतीकारी ठरलीय. टेलिव्हिजनवर या खेळाला जबरदस्त लोकप्रियता लाभलीय. प्रत्यक्ष स्टेडियमवरही प्रेक्षकांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली. हा प्रतिसाद सामन्यागणिक वाढतच गेला. फायनलची मजा लुटण्यासाठी आलेली गायत्री म्हणाली, ‘‘खूप झाले क्रिकेट, क्रिकेट.. यापेक्षा तर कबड्डीत जास्त थ्रिल आहे. आनेवाला कल कबड्डी का है.’’
स्टार इंडियाचे सीईओ उदय शंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीकेएलला पहिल्या १५ दिवसांत सुमारे २८.८ कोटी प्रेक्षक लाभले. या काळात भारतामध्ये क्रिकेटनंतर कबड्डीला सर्वाधिक प्रेक्षक लाभले. विशेष म्हणजे, हा खेळ कुंटुंबाने एन्जॉय केला. २८.८ कोटी प्रेक्षकांमध्ये ३८ टक्के महिला तर २१ टक्के छोट्या मुलांचा समावेश होता.
पीकेएलमधील खेळाडूंना क्रिकेटपटूंप्रमाणे कोट्यवधी रुपये मिळाले नाहीत. आमची तशी अपेक्षाही नव्हती. या स्पर्धेमुळे आमच्या जीवनात बदल घडलाय.. मोठा पॉझिटिव्ह बदल..’’ ही मनमोकळी कबुली दिलीय ती यंदाचा चॅम्पियन जयपूर पिंक पँथर्सचा कर्णधार नवनीत गौतमने. त्याच्या संघाला ५0 लाखाचे पारितोषिक मिळाले. पीकेएलमुळे देशवासियांना कबड्डी हा खेळ खर्‍या अर्थाने माहित झाला. याआधी भारताने आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकले, विश्‍वचषक जिंकला. पण त्या यशाने जे झाले नाही, ते या लीगने करून दाखवले, ही बोलकी प्रतिक्रिया आहे पाटना पायरेट्सचा कर्णधार राकेशकुमारची.
 या खेळात वेग, ताकद, लवचिकता, थरार, प्रचंड ऊर्जा आहे! कुस्ती-जिम्नॅस्टिक-मार्शल आर्ट्स अशा खेळांचा संगम पीकेएलच्या निमित्ताने आपल्याला कबड्डीत दिसला. आता यापुढे तुम्हाला आवडो वा न आवडो, ‘बोल कबड्डी.. खेल कबड्डी’ या शब्दांची आपल्या कानाला सवय करून घ्यावी लागणार , हे नक्की!.
(लेखक लोकमत समूहाचे क्रीडा संपादक आहेत.)