शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

ग्लोब थिएटर, शेक्सपिअरच्या 400 व्या स्मृतिदिनानिमित्त

By admin | Updated: April 16, 2016 18:56 IST

लंडनमधे शेक्सपिअरच्या काळातले एक थिएटर आहे. 1599 मध्ये बांधलेले. 1613 मध्ये ते आगीत भस्मसात झाले. 1997 मध्ये ते पुन्हा उभारण्यात आले. याच थिएटरची तात्पुरती, पण मूळ थिएटरसारखी प्रतिकृती ऑकलंडमधे नुकतीच उभारण्यात आली आहे. शेक्सपिअरच्या नाटकांचे प्रयोग सध्या तिथे सुरू आहेत. नंतर हे थिएटर चक्क गुंडाळून ठेवले जाईल!

- कल्याणी गाडगीळ

विल्यम शेक्सपिअर या जगप्रसिद्ध नाटककाराच्या मृत्यूला 2016 साली 400 वर्षे पूर्ण झाली. इतका कालावधी लोटला तरी त्याच्या नाटकांची पकड अजूनही रसिक मनांवर कायम आहे. शेक्सपिअरच्या लेखनाचा अभ्यास करणा:यांची तर गणतीच नाही. 

ऑकलंडमधील एन्थनी हार्पर यांनी ही पुण्यतिथी साजरी करण्यासाठी चक्क लंडनमधील शेक्सपिअरच्या काळी (सन 1597 ते 1599 साली) बांधलेले व सन 1613 साली आगीमुळे पूर्णत: भस्मसात झालेले, नंतर 1642 साली प्युरिटन्सनी पूर्ण बंद पाडलेले व 1997 मध्ये पुन्हा उभारण्यात आलेले व सध्या लंडनमधे अस्तित्वात असलेल्या शेक्सपिअरच्या ग्लोब थिएटरची तात्पुरती पण मूळ थिएटरसारखी प्रतिकृती ऑकलंडमधे फेब्रुवारी 2क्16 मध्ये उभारली. त्यात शेक्सपिअरच्या प्रसिद्ध नाटकांचे प्रयोग फेब्रुवारी 2क्16 ते एप्रिल 2क्16 च्या शेवटच्या आठवडय़ार्पयत होतील व नंतर चक्क हे थिएटर गुंडाळून ठेवले जाईल.
हे थिएटर प्रत्यक्ष पाहणो व तिथे शेक्सपिअरच्या नाटकाचा प्रयोग पाहणो हा सुंदर दैवयोग! हे थिएटर ऑकलंडमधील मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आले आहे. लोखंडी फ्रेमवर्क व प्लायवूडच्या फळ्यांपासून जिने, स्टेज, बसण्याच्या जागा या थिएटरमधे बनविलेल्या असून, 36क् अंशात उभारलेले हे थिएटर आहे. प्रेक्षकांना बसण्यासाठी तीन मजली व्यवस्था असून, स्टेजच्या सर्व बाजूने प्रेक्षक बसतात. अगदी मोक्याची जागा तर स्टेजच्या मागे बांधलेल्या गॅलरीत असून, तिथून प्रेक्षकांना नाटक सर्वात जवळून पाहायला मिळते. यात एकावेळी 9क्क् प्रेक्षक बसू शकतात. 
शेक्सपिअरच्या काळी गरिबांना एका पेनीच्या मोबदल्यातही नाटके पाहायला मिळावीत म्हणून स्टेजच्या पायाशी असलेल्या मोकळ्या जागेत उभे राहून नाटके पाहायला मिळत. या जागेला ‘पिट’ म्हणत. ऑकलंडमधील थिएटरमधेही ‘पिट’ असून, फक्त 1क् डॉलरमधे उभ्याने नाटक पाहायची सोय आहे. ते तिकीटही प्रयोगाच्या एक तास आधी थिएटरवर जाऊन मिळविता येते. कोणताही प्रेक्षक स्टेजपासून जास्तीतजास्त 15 मीटर अंतरावर असल्याने सर्वानाच नाटक दिसणो सहज शक्य होते. शिवाय हे थिएटर ‘ओपन एअर’ म्हणजे स्टेज व तीन गॅल:यांवर फक्त छप्पर, बाकी मधल्या भागातून चक्क वरचे आकाश दिसते. फार गरम दिवस असेल तर आत उकाडा, थंडी असेल तर खूपच गारठय़ाने कुडकुडायला होणार व पाऊस आला तर चक्क ‘पिटा’तले प्रेक्षक रेनकोट घालून नाटक पाहणार!
नटांचे पोषाख जुन्या, शेक्सपिअरच्या काळचे. वाद्येही तशीच. नटांजवळ किंवा स्टेजवर कुठेही ध्वनिक्षेपक नाहीत आणि हे सगळे असूनही आम्ही पाहिलेला ‘ट्वेल्थ नाइट’चा प्रयोग अगदी मस्त रंगला.
नाटकात काम करणारे नट न्यूझीलंडमधील कलाकारांमधून निवडले गेले होते आणि आम्हाला त्यात एक सुखद धक्का बसला. त्यात भारतीय पंजाबी पती-पत्नीच्या पोटी, पण न्यूझीलंडमधे जन्मलेला व वाढलेला सिंग नावाचा एक नटही होता. त्याने ट्वेल्थ नाइटमधील एंटोनियाचे काम केले होते. शेक्सपिअरच्या काळी स्त्रीपात्रेही तरुण मुलगेच करीत. आता होणा:या ऑकलंडमधील नाटकांमध्ये मात्र स्त्रियांनीही कामे केली आहेत.
गरजेनुसार काही बाकडी किंवा फ्रेम वगैरे ठेवण्यासाठी असलेली उंच स्टुले, एखादे टेबल इतकाच मोजका संच. नट स्टेजवरून प्रेक्षकांशी थेट संवाद साधत. त्यांच्याशी हावभावांनी चक्क बोलत होते. एखाद्या प्रसंगी पिटातल्या प्रेक्षकांशी हातमिळवणी करून टाळीही मिळवीत होते. विनोदी वक्तव्यांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत होता. हशे उमटत होते आणि थोडय़ा वेळाने चक्क प्रेक्षक व नट हे या नाटय़ाचा एकजीव, जिवंत भाग असल्यासारखे वातावरण निर्माण झाले होते.
अनेक नट सर्रास पिटातल्या प्रेक्षकांमधून चालत बाहेर जात होते, आत येत होते. कधी कधी खास वातावरणनिर्मितीसाठी नट तिस:या मजल्यावरून प्रेक्षकांच्या गॅलरीमधून वाद्ये वाजवून प्रेक्षकांना दचकवीत होते.
या नाटकात ऑलिव्हिया, व्हियोला (सिझारिओ हे पुरुषाचे नाव घेऊन वावरणारी) व ऑर्सिनो यांच्या प्रेमाचा त्रिकोण आहे. व्हियोलाचा जुळा भाऊ सबेस्टियन, जो समुद्रात बुडून मरण पावला असा व्हियोलाचा समज असतो, तो जिवंत परत येतो. व्हियोला व सबेस्टियन एकसारखे दिसत असल्यामुळे होणारे गोंधळ, ऑलिव्हियाकडे असलेला एक विदूषक, असल्या गमतीशीर गोष्टी, गोंधळ, प्रेम वगैरेंनी नाटक उलगडत जाते व मजा मजा होत राहते. त्यात माल्व्होलिओ या ऑलिव्हियाच्या इमानदार नोकराला तळघरात दडपून ठेवण्याचे कुभांडही मारिया-ऑलिव्हियाची दासी रचते. माल्व्होलिओ स्टेजखाली असलेल्या तळघरात लपलेला व अधूनमधून त्याचे हात बाहेर काढून सर्वाना दचकवीत असतो. अशा त:हेने नट वेगवेगळ्या पातळ्यांवरून प्रेक्षकांना भिडत होते.
आम्ही ज्या दिवशी नाटक पाहायला गेलो त्या दिवशी जोरदार पाऊस होता. पिटातले प्रेक्षक रेनकोट घालून नाटक पाहायला उभे होते. आम्ही जरी गॅलरीतली तिकिटे काढली होती तरी वरून कोसळणा:या पावसाचा व पन्हाळीतून पाइपातून खाली पडणा:या पाण्याचा आवाज येत होताच.
ध्वनिक्षेपक नसल्याने संवादांची फेक हा फारच महत्त्वाचा मुद्दा होता. सर्वाना संवाद ऐकायला तर गेले पाहिजेत, समजलेही पाहिजेत पण ते ओरडल्यासारखे वाटता उपयोगाचे नाहीत. यासाठी नटांना अतोनात श्रम घ्यावे लागले व रोजच प्रयोगाआधी त्याचा सरावही करावा लागला.
शेक्सपिअरची 400 वी पुण्यतिथी अशा त:हेने साजरी करण्याची नामी कल्पना न्यूझीलंडच्या जनतेने चांगलीच उचलून धरली. फेब्रुवारीपासून दर दिवसातील तीन व कधी कधी चारही प्रयोग हाऊसफुल्ल झाले. 
कालिदास व भवभूतीची नाटके अशा पद्धतीने सादर करण्याची कल्पना कुणी उचलून धरली तर काय मजा येईल!
 
(लेखिका न्यूझिलंडस्थित कला-संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)
kalyani1894@gmail.com