शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

‘इफ्फी’ची खिडकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 06:05 IST

सामान्यत: भारतीयांसाठी चित्रपट हे मनोरंजनाचं, विरंगुळ्याचं साधन आणि माध्यम ! समकालीन वास्तवाच्या रखरखत्या आणि अनेकदा चटका लावणाऱ्या खिडक्या उघडणारे चित्रपट भारतीयांना पहिल्यांदा भेटले ते फिल्म फेस्टिव्हल्समधून! - ही संस्कृती आता खोल झिरपू पाहते आहे !

ठळक मुद्देया महोत्सवांचं सर्वात महत्त्वाचं फलित काय असेल तर त्यांनी एक सुजाण प्रेक्षक घडवला.

- मनस्विनी प्रभुणे-नायकआठ दिवस फक्त सिनेमा आणि सिनेमा, डोक्यात दुसरं काहीच नसतं. इतकंच काय तर रात्री जी काही अपुरी झोप मिळते त्यातदेखील तुकड्या तुकड्यानं सिनेमाचीच स्वप्नं पडतात. सकाळ-दुपार-संध्याकाळ आणि रात्र असे दिवसाचे सगळे प्रहर फक्त सिनेमा बघण्याचा अनुभव विलक्षण वेगळा असतो. अर्थातच हे चित्रपटमहोत्सवात अनुभवायला मिळतं. आपल्या आजूबाजूला सिनेमा हेच उद्दिष्ट ठेवून आलेली मंडळी उठता-बसता, खाता-पिता फक्त सिनेमावर चर्चा करत असतात. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यामुळे इथे घडणाऱ्या चर्चा घमासान. एकाच कलाकृतीकडे वेगवेगळ्या बाजूनी पाहाणाऱ्या. त्याचा परिणाम विलक्षण असतो. एरवीही आपण आपापला सिनेमा बघतो, त्यावेळी त्या अनुभवाला ही अशी सार्वत्रिक झालर नसते. सहानुभवाची प्रचिती नसते. हे घडतं महोत्सवात ! म्हणून ती झिंग काही न्यारीच ! जगभरातून - देशभरातून आलेले असंख्य अपरिचित चेहरे भाषेचा अडसर न येता एकमेकांशी सहज संवाद करत असतात. त्या हवेत सगळ्यांचा श्वास जणू एकच असतो : चित्रपट !चित्रपटमहोत्सवाची एक वेगळी संस्कृती असते. अलिखित नियम असतात. जे वरचेवर महोत्सवांना जातात त्यांना इथलं वातावरण परिचित तर असतंच; पण प्रियदेखील असतं.पंधरा वर्षांपूर्वी भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच ‘इफ्फी’ गोव्यात आला आणि इथलाच होऊन गेला. दरवर्षी पाच ते सात हजारच्या संख्येनं चित्रपट रसिक या महोत्सवासाठी पदरचे पैसे खर्च करून येत असतात. गोव्यात गेली पंधरा वर्षं न चुकता येणारे अनेकजण आता परिचित स्नेही झाले आहेत. कोलकाता, दिल्लीपासून ते कन्याकुमारीपर्यंतचे वेगवेगळे ग्रुप ठरवून-नीट नियोजन करून येतात. हे सगळे वारकरीच ! डोक्यावर लावलेला गंधाचा टिळा, गळ्यात तुळशीमाळ ही खूण वारकरी म्हणून पुरेशी असते ! थंडीची चाहूल लागता लागता हातात महोत्सवाचा कॅटलॉग, खांद्यावर महोत्सवाची झोळी, गळ्यात महोत्सवाचं कार्ड घातलेलं कुणी गोव्यात दिसलं की ओळखावं, हा इफ्फीचा प्रेक्षक!**भारतात एकोणपन्नास वर्षांपूर्वी पहिला चित्रपटमहोत्सव भरवण्यात आला होता. भारताचा आंतराष्ट्रीय चित्रपटमहोत्सव तर होतोच, शिवाय कोलकाता, दिल्ली, पुणे, केरळ, त्रिवेंद्रम, बेंगलोर अशा वेगवेगळ्या शहरातदेखील आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सव भरवले जातात. यात कोलकाता आणि केरळच्या महोत्सवांचा बोलबाला आणि प्रतिष्ठा मोठी ! कोलकाता आणि एकूणच बंगालमधील सांस्कृतिक पार्श्वभूमीमुळे कोलकाताचा चित्रपटमहोत्सव दर्जेदार होतोच; पण गेल्या काही वर्षात केरळनेदेखील चित्रपटमहोत्सवावर स्वत:ची मोहर उमटवली आहे. गोव्यात भरणाºया महोत्सवाला येणाºया पाहुण्यांपैकी निम्मेतरीकेरळचे रसिक-चित्रपट अभ्यासक असतात.पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा गोव्यात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवाचा प्रारंभ झाला, तेव्हा स्थानिक लोकांना फारच आश्चर्य वाटलं होतं. स्वत:च्या खिशातले पैसे खर्च करून, स्वत: राहण्याची जागा शोधून जगभरातून -देशभरातून लोक चित्रपटाच्या वेडापायी येतात, रांगेत उभे राहून अधाशासारखे चित्रपट बघतात; हे सारं स्थानिकांसाठी खूपच वेगळं होतं. गोव्यात संगीतमहोत्सव, नाट्यमहोत्सव जोरात होतात; पण आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सव पहिल्यांदाच होत होता. त्यामुळे प्रत्येकाच्या नजरेत एकप्रकारची उत्सुकता दिसत होती. हे नवखेपण काहीकाळ टिकलं; पण आता मात्र स्थानिक गोवेकर रसिकही पाहुण्यांच्या गर्दीत मिसळून चित्रपटांच्या आस्वादासाठी रांगा लावण्यात आघाडीवर असतात. महोत्सवाचा कॅटलॉग घेऊन कोणते चित्रपट बघायचे याचं नियोजन करणारे, चित्रपटांवर चर्चा करणाºया आनंदी, उत्साही गटांनी आता कला अकादमीचं प्रांगण बहरून गेलेलं दिसतं.**चित्रपटमहोत्सवांची संस्कृती सामान्य चित्र-रसिकांपर्यंत झिरपण्याच्या वाटेतला सर्वात मोठा अडथळा म्हणजे चित्रपटांकडे पाहण्याचा साचेबंद दृष्टिकोन!सामान्यत: भारतीयांसाठी चित्रपट हे मनोरंजनाचं, विरंगुळ्याचं साधन आणि माध्यम आहे. समकालीन वास्तवाच्या रखरखत्या आणि अनेकदा चटका लावणाºया खिडक्या उघडणारे चित्रपट हे आजवर अभ्यासकांच्या वर्तुळापुरतेच मर्यादित राहात असत. (अर्थात, जगभरात भारताइतकी नसली, तरी याहून वेगळी परिस्थिती नसावीच)हे ‘असे’ चित्रपट पाहण्याची पर्वणी म्हणून तर दर्दी रसिक महोत्सवांच्या वाऱ्या करतात. महोत्सवांमधली चित्र-संस्कृती वेगळी असते. इथे सगळं कसं छान, चकचकीत, साच्यातलं नसतं. खरखरीत-जळजळीत वास्तवाच्या जवळ नेणारे हे चित्रपट तुमचा जगाकडेकडे बघायचा दृष्टिकोनच बदलून टाकतात. यातल्या चित्रपटांचा वेगळा पोत लगेच जाणवतो. आपल्याला नवं काहीतरी गवसल्यासारखं वाटू लागतं. जगभरातली बदलती राजकीय-सामाजिक रचना, त्यातले नवे-जुने पेच, धार्मिक कट्टरता, मानवी नातेसंबंध, त्यातील गुंतागुंत आणि पर्यायानं येणारा संघर्ष याचं जगातल्या वेगवेगळ्या देशातील वेगवेगळं चित्र बघायला मिळतं.नवख्या भारतीय रसिकांना महोत्सवांकडे पुन्हा पुन्हा वळवण्यात ज्या ‘अनुभवांनी’ महत्त्वाची भूमिका बजावली, त्यातलं मोठं श्रेय इराणी चित्रपटांना जातं. या चित्रपटांनी रसिकांना नुसतं थक्कच केलं नाही तर असंही एक जग आहे याचा वेगळा प्रत्यय आणून दिला. ते नेहमीच्या पठडीतले चित्रपट नव्हते. अतिशय कठीण परिस्थितीशी सामना करणाºया लोकांचं खरंखुरं चित्रण बघताना अनेकजण अस्वस्थ झाले. अब्बास किरोत्सामी, मजीद माजिदी, मखमलबफ बंधू, असगर फरहदी यांच्या चित्रपटांनी नवं आयुष्य दाखवलं, नव्या संवेदना जागृत केल्या. हे चित्रपट बघायला मिळाले ते निव्वळ चित्रपटमहोत्सवांमुळे. इराण हे एक उदाहरण झालं. वेगवेगळ्या देशातल्या कलावंतांनी मांडलेलं आपापलं आयुष्य आणि त्यातले पेच या महोत्सवांमधून एकत्रितरीत्या सामोरे आले. ते बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी रसिक गर्दी करत गेले. ते बघण्यासाठी महोत्सवाची आतुरतेनं वाट बघत राहिले.- त्याचा परिणाम विलक्षण होता.**भारतामध्ये ‘फिल्म फेस्टिव्हल्स’ची संस्कृती रुजण्यात मोठा हातभार लावला, तो ठिकठिकाणच्या फिल्म क्लब्जनी. स्थानिक स्तरावर उभ्या राहिलेल्या या गटांनी आपापसात सहकार्याचे मार्ग तर शोधलेच; पण जागतिक स्तरावरची चित्र-संस्कृती आपल्या शहरात रुजावी म्हणूनही प्रयत्न केले.पुण्यासारख्या ठिकाणी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि आशय फिल्म क्लबने चित्रपट रसिकांना जगाकडे बघण्यासाठी एक नवी खिडकी उघडून दिली. या दोन्ही संस्थांनी नुसतेच जागतिक चित्रपट दाखवले नाहीत तर चित्रपटांबाबत असलेली भारतीय मानसिकता बदलावण्याचा मोठा प्रयत्न केला. चित्रपट साक्षर असा नवा प्रेक्षक घडवला.**या महोत्सवांचं सर्वात महत्त्वाचं फलित काय असेल तर त्यांनी एक सुजाण प्रेक्षक घडवला. केवळ मनोरंजनाचं साधन म्हणून किंवा आवडत्या कलाकारांच्या भेटीची संधी म्हणून चित्रपटांकडे पाहणाऱ्या पारंपरिक वळणाच्या प्रेक्षकांना विचार करण्याची सवय लावली.गोव्यानंतर आता केरळ, पुणे, धरमशाला, दिल्ली या ठिकाणी आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सव भरतील. गोव्याहून परतलेले अनेक चित्रपट वारकरी तिथेही आवर्जून जातील. वर्षभराचं एक वर्तुळ पूर्ण करतील....कोणाही विचारी मनासाठी हे चित्रपटमहोत्सव मोठी ऊर्जा घेऊन येतात, आणि जगाच्या खिडक्या उघडतात, हे खरंच !(गोवास्थित लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

manthan@lokmat.com