शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

स्वर्गसृष्टी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 06:05 IST

आधुनिक महानगरातील उद्याने म्हणजे  माणसाची बुद्धी, कला, कौशल्य आणि  निसर्गातील सौंदर्य यांच्या संगमातून साकारलेली  आणि सर्वांना उपलब्ध असलेली प्रतिसृष्टीच. न्यू यॉर्कचे सेन्ट्रल पार्क,सिंगापूरचे बोटॅनिकल गार्डन,  बार्सेलोनाचे पार्कगुएल आणि लंडनचे रीजंट किंवा हाइड पार्क. ही नंदनवने म्हणजे नागरिकांना मिळालेली अपूर्व देणगीच!

ठळक मुद्देसुकर भविष्यासाठी आजच ‘तयार’ होत असलेल्या जगभरातील शहरांमधल्या प्रयोगांची कहाणी

- सुलक्षणा महाजन

जगातल्या सर्वात प्रगत, सुप्रसिद्ध देशांमधील महानगरांमधील सर्वात आकर्षक जागा कोणत्या, असे कोणी मला विचारले तर क्षणाचाही विलंब न लावता मी सांगेन; तेथील नानाविध आकाराची, प्रकारची सार्वजनिक उद्याने. न्यू यॉर्कच्या सेन्ट्रल पार्कमध्ये मी कितीही वेळा न कंटाळता जाऊ शकेन. तीच गोष्ट सिंगापूरच्या मध्यवर्ती बोटॅनिकल गार्डनची, बार्सेलोनाच्या पार्क गुएलची आणि लंडनच्या रीजंट किंवा हाइड पार्कची. इंग्लंडमधील लंडन, स्पेनची राजधानी माद्रिद, भारतामधील दिल्ली, चीनमधील बीजिंग अशी अनेक शतकांपासून अस्तित्वात असलेली राजधानीची शहरे. राजा-महाराजांचे महाल आणि भव्य उद्याने उभारण्याची परंपरा जगात सर्वच राजधान्यांच्या शहरात दिसून येत असे. असे अनेक राजवाडे आणि तेथील भव्य उद्याने आता सार्वजनिक मालमत्ता म्हणून राखल्या जातात आणि त्यांचा आनंद सामन्य नागरिकही घेऊ शकतात. आधुनिक महानगरांची ही परंपरा म्हणजे सामान्य नागरिकांना मिळालेली अपूर्व देणगीच आहे.  अमेरिकेला तशा जुन्या परंपरा नाहीत. कारण तो देशच मुळी आधुनिक काळाने, व्यापारी आणि सामान्य नागरिकांनी घडविलेला लोकशाही असलेला देश आहे. त्यामुळे एकोणीसाव्या शतकात तेथे राजवाडेही नव्हते आणि भव्य उद्यानेही नव्हती. अमेरिकेतील फ्रेडरिक ओम्सबड युरोपमध्ये गेला असता त्याला आपल्या देशात, शहरांमध्ये उद्याने नाहीत ह्याची मोठी खंत वाटली. त्याने परत आल्यावर न्यू यॉर्कच्या नगरपालिकेला भव्य नागरी उद्यान उभारण्याचा एक प्रस्ताव दिला. त्यावेळी हे शहर अतिशय बकाल होते. बंदर, कारखाने आणि युरोपमधून स्थलांतर करणारे लोकांचे लोंढे यामुळे तेथे गरिबी, प्रदूषण, रोगराई यांचे साम्राज्य होते. मोकळा श्वास घेणेही अवघड असे. र्शीमंत लोकांचे काही भव्य वाडे सोडले तर गरीब लोकांच्या घरात दाटीवाटी, अंधार, गुंडगिरी, रोगराई यांचे साम्राज्य असे. त्यावेळी लोकांच्या आरोग्यासाठी मोकळ्या जागा, उद्याने यांची गरज आहे हे ओम्सबड याने जाणले तरी नगरपालिकेतील प्रतिष्ठित नगरसेवकांनी मोठय़ा खर्चाच्या ह्या प्रकल्पाला प्रथम विरोध केला. मात्न 1853 साली राज्य सरकारने कायदा करून मॅनहॅटन बेटावर 750 एकराहून मोठी जागा सार्वजनिक आरोग्य आणि नागरी समाज घडविण्यासाठी उपयुक्त ठरेल म्हणून उद्यानासाठी मुक्रर केली. उद्यानशास्र आणि शेतीशास्राचे ज्ञान असलेला फ्रेडरिक ओम्सबड आणि इंग्लंडमधील वास्तुतज्ज्ञ कल्व्हार्त व्होक्स यांनी सेन्ट्रल पार्कचा अभिकल्प तयार केला. मोठय़ा हिरवळीच्या जागा, झाडे, पायवाटा, पाण्याचे तलाव, कारंजी आणि विर्शांतीच्या-करमणुकीच्या इमारती, क्रीडांगणे यातून एक अथांग, हरित अनुभूती देणारी, देखणी, भव्य कालाकृतीसम असलेली त्यांची रचना लोकांना कमालीची आवडली. हे उद्यान परिपूर्ण होण्याला बराच काळ लागला तरी सुरु वातीच्या लहान जागेतील उद्यानाच्या अनुभवापासून अमेरिकेतील सर्वच शहरांमध्ये सार्वजनिक उद्याननिर्मितीची चळवळ सुरू झाली. उद्यानकला विकसित झाली. मानवी संकल्पनेतून साकारलेल्या जागा हा आधुनिक नगररचनेमधील आवश्यक घटक बनला. शहरातली गडबड, धकाधकीचे आयुष्य आणि गरिबी यांनी गांजलेल्या सामान्य नागरिकांसाठी तर ही मोठीच देणगी ठरली. लहान-थोर, र्शीमंत-गरीब, स्री-पुरु ष अशी नागरी विभागणी तेथे गळून पडली. लोकशाहीला अभिप्रेत असलेली नागरी समता, विविध वंशाच्या नागरिकांची सरमिसळ येथे सहज अनुभवाला येऊ लागली. शंभर वर्षे उलटून गेल्यावरही ह्या नंदनवनाचे स्वरूप आणि आकर्षण तिळमात्नही कमी झालेले नाही. जवळ जवळ आठशे एकरांवर पसरलेले हे मोठे उद्यान प्रत्येक ऋतूमध्ये नवनवीन साज घेऊन लोकांना आकर्षित करते. वसंत ऋतूमध्ये झाडे नव्या नवलाईने बहरतात; ग्रीष्म ऋतूची चाहूल लागताच अनेक झाडे आपला हिरवा गणवेश बदलून लाल, पिवळ्या, नारंगी रंगाने नटतात आणि हिमवर्षाव होताच तो साजच उतरवतात. सर्व झाडांच्या फांद्यांवर बर्फ जमतो. काही झाडे मात्न आपले वैभव सांभाळून राहतात, तर काही पर्णहीन होतात. बर्फावर स्केटिंग करायला लोकांची गर्दी होते. प्रत्येक ऋतूचा आस्वाद घ्यायलाही सतत लोक येतच असतात. प्रत्येक वेळी तेथे काही नवीनच अद्भुत सापडते. गेल्यावेळी मला भटकता भटकता एका पायवाटेने टेकडीच्या वर नेले. दाट जंगलात, फुलपाखरे, पक्षी, झाडावर सुरु सुरु  चढणार्‍या खारी यांचे अद्भुत जगच तेथे अवतरले. जवळच तळ्याच्या काठी असलेल्या मोठय़ा खडकावर बसल्यावर तर महानगराच्या मध्यावर असल्याचे भानही राहिले नाही. संपूर्ण उद्यानाच्या परिसरात वाहन नसतेच. चालणारे, पळणारे, सायकालणारे, बसणारे, बोलणारे आणि मनसोक्त फिरणारे नाना देशांचे-वंशाचे लोक बघून वसुधैव कुटुंबकम्ची जाणीव दृढ होते. कोणत्याही वेळेला तेथे गेले तर मनाला शांती आणि उभारी मिळते. त्या विश्वातून बाहेर पडायला पायांना आणि मनाला मात्न खूप जोर लावून ढकलावे लागते.  सिंगापूरच्या मध्यवर्ती भागातील उद्यानात भटकताना असेच झाले होते. दाट जंगलात पायवाटेवरून जावे की प्रशस्त रस्त्यावरून रमत-गमत चालावे असा प्रश्न पडला. तेथील नानाविध ऑर्किड फुलांचे उद्यान म्हणजे रंगांची मनसोक्त उधळण होती. निसर्गवैभवाचा संपूर्ण खजिनाच तेथे मांडलेला होता. आजूबाजूच्या गजबजलेल्या, उत्तुंग इमारतींचे टोकही तेथे दिसत नव्हते. सिंगापूरसारख्या लहानशा बेटावर वसलेल्या महानगराला अशी उद्याने करायला जागा तरी कशी सापडत असेल असे मनात आले. उद्यानांच्या निर्मितीच्या कथा वाचल्यावर मात्न त्याचे उत्तर सापडले. आपले महानगर, नागरिक आणि निसर्ग ह्या तिन्हीवर जर उत्कट प्रेम असेल तर शहरातल्या नेत्यांना नियोजनकारांच्या मदतीने अशा सार्वजनिक बागांसाठी जागा शोधणे अजिबात अवघड नसते. मात्न पैसा आणि सत्ता ह्या दोन्हीची नशा असली तर मात्न असे नंदनवन निर्माण करण्यात अनेक अडचणी येतात. बहुतेक महानगरांमध्ये मोठी भव्य उद्याने असतात त्याचबरोबर जागोजागी लहान लहान उद्याने, संपूर्ण शहरभर विखुरलेली बघायला मिळातात. न्यू यॉर्कमध्ये तर एका प्रशासकाने आपल्या वीस वर्षांच्या कार्यकाळात मोठे भव्य प्रकल्प उभारलेच, पण त्याचबरोबर 750 अर्धा-एक एकरच्या बागाही जागोजागी निर्माण केल्या. त्यामुळे कोणत्याही भागात केवळ पाच-दहा मिनिटे चालले की हमखास एखादी तरी हरित उद्यानाची जागा सापडतेच. गर्दीच्या, उंच इमारतींच्या कार्यालयाच्या विभागातील लोक जेवणाचे डबे घेऊन हमखास तेथे येतात. मोकळी हवा आणि हिरवी झाडे माणसांना आवडतात आणि मानवतात.चीन, जपानला उद्यान निर्माण कलेची दीर्घ परंपरा आहे. त्यांच्या उद्यानशैली वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाचा नूर वेगळा, प्रत्येक उद्यानाची जागा लहान असली तरी सौंदर्य आणि मन:शांती यांची निर्मिती करणे हा त्यांचा महत्त्वाचा उद्देश असतो. अशा जागा सहसा उंच भिंतींनी सुरक्षित केलेल्या असतात. चीनमधील अनेक उद्यानांमध्ये मोठी मोठी खडकांची नैसर्गिक शिल्पे आणि पाणी यांच्याबरोबरच सुंदर लाकडी लहान उतरत्या छताच्या सुंदर मोकळ्या बैठकीच्या जागाही असतात. उद्यानरचनेमध्ये निसर्गातील निवडक घटकांच्या बरोबरच आकर्षक वास्तू, शिल्पे आणि कलाकृती यांचाही संगम बघायला मिळतो. पूर्वी अशी अनेक उद्याने र्शीमंत लोकांनी स्वत:च्या आनंदासाठी निर्माण केलेली होती. आता अशी असंख्य उद्याने सार्वजनिक स्वरूपाची झाल्यामुळे त्यांचा आनंद अनेकांना उपभोगता येतो. उद्याने शहरांची र्शीमंती, सौंदर्य आणि शान कित्येक पटीने वाढवतात. भारतामधील चंदिगढ शहर हे नगररचना आणि तेथील मंत्नालय, न्यायालय, विधानसभा अशा भव्य वास्तूरचनांसाठी प्रसिद्ध असले तरी, तेथील सामान्य नागरिकांना त्याचे काही फारसे कौतुक नसते. मात्न तेथील रॉक गार्डनचा विषय निघाला की लोक भरभरून बोलतात. एका अभियंत्याने वाया गेलेल्या बांधकाम साहित्यातून स्वत:च्या कल्पनेने उभारलेले हे उद्यान शिल्प अतिशय आश्चर्यकारक असेच आहे. दगड, विटा, गोण्यांमध्ये घट्ट झालेले सिमेंटचे ठोकळे, वाळू, खाडी, लाकडी ओंडके, फांद्या, रंगीत फरशांचे तुकडे आणि पाणी यांच्या माध्यमातून निर्माण केलेले धबधबे, पाण्याचे प्रवाह, कमानी, वाटा, गमती-जमतीने भरलेल्या शिल्पांच्या जागा मनाला भुरळ घालून जातात. अशा उद्यानांमध्ये जसा निसर्ग आकर्षक असतो तसेच माणसांच्या कलाकृतीही आपले लक्ष वेधून घेतात. लहान, तरुण मुले-मुली आणि वृद्ध लोक तेथे मजेत फिरत असतात. त्यांच्या चेहर्‍यावरचा निखळ आनंद बघणे हेसुद्धा एक मोठे मनोरंजनाचे साधन असते. अशी ही आधुनिक महानगरातील नंदनवने म्हणजे माणसाची बुद्धी, कला, कौशल्य आणि निसर्गातील सौंदर्य यांच्या संगमातून साकारलेली आणि सर्वांना उपलब्ध असलेली स्वर्गसृष्टीच.sulakshana.mahajan@gmail.com(लेखिका प्रख्यात नगर नियोजनतज्ज्ञ आहेत.)