शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पूर्ण भान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2018 09:54 IST

लक्ष देणे म्हणजेच अटेन्शन. आपल्या आयुष्यात त्याचे मोल खूप महत्त्वाचे. अटेन्शन दोन प्रकारचे.. ‘फोकस्ड अटेन्शन’ आणि ‘ओपन अटेन्शन’. दोन्हीचे परिणाम वेगळे आणि फायदेही वेगळे. ते साधायला मात्र हवे..

- डॉ. यश वेलणकरमाइंडफुलनेसचा सराव हे आपल्या मेंदूला दिलेले अटेन्शन ट्रेनिंग आहे. अटेन्शन हा आपल्या मेंदूचा लीडर आहे, तो मेंदूला दिशा देतो. मेंदूतील सर्व रिसोर्सेस, वेगवेगळे भाग त्या दिशेने काम करू लागतात. हा लीडर शहाणा असेल तर आपला मेंदू योग्य पद्धतीने काम करतो, तसे नसेल तर मेंदू सैरभैर होतो. म्हणजेच काही मानसिक आजारांचा शिकार होतो. अटेन्शनला मेंदूचा लीडर का म्हणायचे? मेंदू सतत माहिती घेत असतो. आपण वाचतो, पाहतो, ऐकतो त्याचा अर्थ लावतो, मनात विचार येत असतात. ही सर्व माहिती एकाचवेळी हाताळणे मेंदूला अशक्य असते. मग त्यातील ठरावीक माहितीवरच तो काम करतो. यातील कोणत्या माहितीवर काम करायचे ते अटेन्शन ठरवते. त्यानुसार कोणती माहिती ग्रहण करायची ते ठरवले जाते. अटेन्शन म्हणजे लक्ष देणे, ते दिले तरच समोरील माणसाचे बोलणे आपल्याला समजते. ते आपण ऐकत असतो तेवढ्यात आपल्याला उद्या काय करायचे आहे ते आठवते. मग आपले अटेन्शन उद्याच्या विचारावर असते. अटेन्शन डेफिसिट हायपरअ‍ॅक्टिव्ह सिण्ड्रोम या विकृतीमध्ये हे अटेन्शन इतके चंचल असते की, पाच सेकंददेखील एका ठिकाणी टिकत नाही. इतके चंचल नसले तरी आपले सर्वांचेच मन खूप चंचल असते. एका ठिकाणी फार काळ राहत नाही. सजगतेच्या सरावाचा एक भाग म्हणजे आपण आपल्या अटेन्शनवर काम करायचे, हा काळ थोडा थोडा वाढवायचा.आपले अटेन्शन दोन प्रकारचे असते. पहिल्या प्रकारात आपण एका छोट्या गोष्टीवर लक्ष एकाग्र करीत असतो. याला एकाग्रता, ध्यान किंवा फोकस्ड अटेन्शन म्हणतात. दुसºया प्रकारचे अटेन्शन म्हणजे ओपन अटेन्शन किंवा समग्रता ध्यान. या अटेन्शनच्या अभ्यासाचा उद्देश ठरावीक गोष्टींवर आपल्या इच्छेने काही काळ लक्ष ठेवणे हा आहे. विल्यम जेम्स हा गेल्या शतकातील थोर मानसशास्त्रज्ञ असे म्हणतो की, आपल्या इच्छेने ठरावीक ठिकाणी लक्ष ठेवता येणे हे सर्वात महत्त्वाचे कौशल्य आहे, ते आत्मसात झाले की अन्य सर्व शिक्षण सोपे आहे. दुर्दैवाने आजच्या शिक्षणव्यवस्थेत हे कौशल्य वाढवण्यासाठी फारसे काही केले जात नाही. माइंडफुलनेस ट्रेनिंगमध्ये हेच कौशल्य वाढवले जाते.त्यासाठी अनेक प्रकारे सराव करता येतो. डोळ्यांनी एका बिंदूवर एकाग्र होणे हा फोकस्ड अटेन्शनचा व्यायाम झाला. यालाच त्राटक म्हणतात. तसे करताना डोळे उघडे ठेवायचे आणि समोरील भिंतीवरील एका छोट्या बिंदूवर किंवा दिव्याच्या ज्योतीकडे दोन मिनिटे एकटक पाहात राहायचे. त्यावेळी आवाज कानावर पडतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे. मनात अन्य विचार येत आहेत हे जाणवले की मन पुन्हा दृश्यावर आणायचे. हा डोळ्यांच्या सहाय्याने केलेला एकाग्रतेचा व्यायाम झाला.असाच डोळ्यांनी समग्रतेचा व्यायामही करता येतो. तो करताना कोणत्याही एका बिंदूकडे न पाहता आपण शून्यात पाहात असतो त्यावेळी जशी नजर असते तशी नजर ठेवायची. बोट वर करून आपला हात डोळ्यांसमोर धरायचा आणि तो हात उजव्या बाजूला न्यायचा. डोळ्यांतील बुबुळे न हालवता हाताचे बोट कुठपर्यंत दिसते ते पाहायचे. असाच हात विरुद्ध दिशेला न्यायचा. आणि या अर्धवर्तुळापेक्षा मोठ्या क्षेत्रात एकाचवेळी काय दिसते आहे ते पाहात राहायचे. असे करताना एक मोठा पट नजरेच्या टप्प्यात येत असतो, त्यामुळे आपला व्हिज्युअल अँगल विस्तारला जातो.असा एकाग्रतेचा आणि समग्रतेचा व्यायाम सर्व इंद्रियांनी शक्य आहे. आवाजावर ध्यान करताना एखादे संगीत लावून त्यावर मन एकाग्र करणे हे फोकस्ड अटेन्शन झाले, तर कोणत्याही एका आवाजावर मन एकाग्र न करता कानावर पडतील ते सर्व आवाज ऐकत राहणे हे ध्वनीचे ओपन अटेन्शन झाले. नाकापाशी जाणवणारा श्वासाचा स्पर्श किंवा श्वासामुळे होणारी छाती-पोटाची हालचाल जाणत राहणे हे फोकस्ड अटेन्शन, तर कोणत्याही एका ठिकाणी मन एकाग्र न करता एकाचवेळी सर्व शरीरावर किंवा एका पूर्ण अवयवावर मन ठेवून तेथे ज्या संवेदना, स्पर्श जाणवत आहे तो जाणत राहणे हे ओपन अटेन्शन झाले. नामस्मरण किंवा एकाच विचारावर मन एकाग्र करणे हे मनाचे फोकस्ड अटेन्शन झाले आणि मन कोणत्याही एकाच विचारावर न ठेवता सजग राहून मनात त्याक्षणी असणाºया भावना आणि विचार हे त्यात गुंतून न जाता जाणत राहणे हे ओपन अटेन्शन होय.या दोन्ही प्रकारच्या अटेन्शनचे मेंदूत दिसणारे परिणाम आणि फायदे वेगवेगळे आहेत. कोणत्याही ज्ञानेंद्रियावर मन एकाग्र करीत असतो, त्यावेळी मेंदूतील त्याच्याशी संबंधित भाग सक्रि य होत असतोच आणि मेंदूतील विचार करताना सक्रि य असणारा डिफॉल्ट मोड नेटवर्कचा भाग शांत होतो. मेंदूतील विचार करणाºया भागाला विश्रांती देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे फोकस्ड अटेन्शन उपयोगी आहे. त्याचप्रमाणे मेंदूतील अटेन्शन सेंटरला व्यायाम देण्यासाठी, त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठीही हे उपयुक्त आहे; पण वेगवेगळ्या रिसर्चमध्ये असे जाणवते आहे की, असे अटेन्शन सर्जनशीलतेला मारक आहे. सतत अशा फोकस्ड अटेन्शनचा सराव केला तर नवीन विचार, नवीन कल्पना सूचत नाहीत. असे होणे स्वाभाविक आहे; कारण अशा फोकस्ड अटेन्शनचा सराव करताना आपण मनात येणारे अन्य विचार कमी करण्याचाच प्रयत्न करीत असतो.ओपन अटेन्शनच्या सरावाने मात्र सर्जनशीलता वाढू शकते. आपण ओपन अटेन्शन ठेवीत असतो त्यावेळी मेंदूतील वेगवेगळ्या भागांना एकाच वेळी सक्रि य करीत असतो. न्यूरोन्स फायर टुगेदर, गेट वायर्ड टुगेदर म्हणजे मेंदूतील जेवढ्या पेशी एकाचवेळी सक्रि य होतात, त्या सर्व एकमेकांना जोडल्या जातात असे न्यूरोसायन्सच्या संशोधनात दिसून येते. ओपन अटेन्शनमध्ये आपण एकाचवेळी वेगवेगळ्या भागातील न्यूरोन्सना सक्रि य करून त्यांच्या जोडण्या व्हायला मदत करीत असतो. मेंदूतील वेगवेगळ्या भागांचे आपण असे इंटिग्रेशन करीत असतो. असे इंटिग्रेशन, वेगवेगळ्या गोष्टींचा समन्वय हे सर्जनशीलता वाढवणारे असतेच; पण सर्वांगीण आरोग्यासाठीदेखील ते आवश्यक आहे.असे इंटिग्रेशन होत नाही, समन्वय साधला जात नाही त्यावेळी लवचिकता आणि संघटन हरवले जाते. सर्व शारीरिक-मानसिक अस्वास्थ्याचे कारण टोकाची रीजीडीटी किंवा केओस हे आहे असे आजचे सायन्स सांगते. रीजीडीटी म्हणजे ठोकळेबाज पुनरावृत्ती अणि केओस म्हणजे गोंधळ हा टाळायचा असेल तर समन्वय, इंटिग्रेशन आवश्यक आहे, तेच माइंडफुलनेसमधील ओपन अटेन्शनच्या अभ्यासाने साधते. असे ओपन अटेन्शन आपण एकाचवेळी सर्व इंद्रियांनी मिळणारी माहिती, त्याचवेळी मनात येणाºया भावना, विचार आणि शरीरावर जाणवणाºया संवेदना जाणत राहून साधू शकतो. यालाच पूर्ण भान म्हणतात. संत एकनाथांनी त्यांच्या ‘काया ही पंढरी’ या अभंगात हेच सांगितले आहे..दश इंद्रियांचा एक मेळा केलाऐसा गोपाळकाला होत असे..अटेन्शनचे इंटिग्रेशन ते हेच..(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे अभ्यासक आहेत. yashwel@gmail.com)