- मृण्मयी सावंत
गेल्या वर्षभरात जगाच्या कानाकोपर्यात काय घडलं हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल, पुन्हा प्रत्यक्ष ‘पहायचं’ असेल तर? तुमच्याकडे हवीत फक्त चार मिण्टं. २0१४मधे जगभरात घडलेल्या महत्वाच्या घटना, राजकीय उलथापालथी, गाजलेली माणसं, झालेले घोळ, पॉप्युलर कल्चर, इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झालेले व्हिडिओ, इबोला ते मलाला आणि तमाम दहशतवादी हल्ले ते अपघात हे सारं एकाच ठिकाणी पाहाता येईल, - ते ही फक्त ४ मिण्टात. जगभरात सध्या गाजत असलेल्या या व्हिडीओचं नावच आहे, ‘२0१४- इन फोर मिनिट्स’. सिनेमानिर्माते रायन जेम्स येझाक यांनी हा व्हिडिओ तयार केला आहे. चार मिण्टांचाच अनुभव, पण पाहताना वाटतं, हे ‘असं’ जग चालवलं ‘आपण’ गेल्या वर्षी.?
http://www.viralviralvideos.com/2015/01/01/2014-in-4-minutes-covers-everything-that-happened-over-the-past-year/