शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

फायर अॅट सी.

By admin | Updated: February 27, 2016 14:21 IST

खचाखच प्रवासी वाहून नेणा:या बोटी, जिवावर उदार होऊन चाललेलं स्थलांतर. खडतर प्रवास, उपासमार, जडलेले रोग आणि ओसंडून वाहणारी प्रेतांची कचराकुंडी. दुसरीकडे या सा:याशी काहीही देणंघेणं नसलेले, आयुष्य पुढे रेटणारे बेटावरचे स्थानिक. दिग्दर्शक यावर कसलंही भाष्य करीत नाही. कॅमेरा फक्त हे जसंच्या तसं टिपत जातो. खरं तर हा माहितीपट, पण त्याला बíलन महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ‘गोल्डन बेअर’ पुरस्कार मिळाला!

- अशोक राणे
 
बर्लिन महोत्सवाच्या तिस:याच दिवशी एक सुन्न करणारा माहितीपट पाहून सगळे पलास्तच्या अतिभव्य आणि देखण्या चित्रपटगृहातून बाहेर पडले तेव्हा सर्वांनी एकमुखाने कौल देऊनच टाकला होता. यंदाचा ‘गोल्डन बेअर’ पुरस्कार याच कलाकृतीला मिळणार. आणि मिळालाही ! त्याचं नाव ‘फायर अॅट सी’! दिग्दर्शक.. गिआनप्रसाँको रोझी. 
एकापेक्षा एक सर्वांगसुंदर कथापटांना मागे टाकून पुढे जाणारी एक अभिजात डॉक्युमेंटरी! स्टार्सच्या झगमगाटात हरवलेल्या आपल्या प्रेक्षकाला अजूनही ‘डॉक्युमेंटरी’ या विलक्षण माध्यमाचं महत्त्व पटायचंय. 
 डॉक्युमेंटरी म्हटल्यानंतर आपल्यासमोर या माध्यमाचं जे एक चित्र उभं राहतं त्याला ‘फायर अॅट सी’ पूर्णत: छेद देतो. स्थलांतरितांचा विषय, त्यांचं जिवावर उदार होऊन चोरटय़ा मार्गाने युरोपात शिरू पाहणं, त्यांचा खडतर प्रवास, वाटेत अनेकांचे मृत्यू, जडलेले रोग, उपासमार याची आकडेवारी आणि सोबतीला त्या सा:यांच्या मुलाखती म्हणजे डॉक्युमेंटरीच्या पारंपरिक रुपडय़ाला केवढा तरी आयता ऐवज! शिवाय त्याला मग कॉमेंट्रीची जोड द्यायची. परंतु गिआनप्रसाँको रोझी या रूढ वाटेने जाणं नाकारतो आणि जे काही समोर ठेवतो त्यानं केवळ हादरून जायला होत नाही, तर जागतिक पातळीवरच्या या जटिल वास्तवाकडे नीट पाहता येतं. 
लघुपट सुरू होतो तेव्हा दिसतो एक बारा वर्षांचा गोड गुटगुटीत पोरगा. त्याची स्वच्छंद भटकंती चाललीय. तो उडी मारून एका झाडावर चढण्याचा प्रयत्न करतोय. तिस:या प्रयत्नात तो यशस्वी होतो. वरून एका फांदीचा तुकडा कापतो. सुरीने तासून वगैरे रबर जोडून तो बेचकी तयार करतो आणि नेमबाजीचा सराव करतो. त्याचं हे छोटेखानी गाव म्हणजे भूमध्य समुद्रातील लॅम्पेदुसा नावाचं बेट आहे. गेल्या कित्येक वर्षापासून युरोपात बेकायदेशीररीत्या घुसण्यासाठी आफ्रिकेतील गोरगरीब, अशिक्षित, अडाणी यांनी या बेटाचा वापर केलाय. हा पोरगा जेव्हा इथेतिथे बागडत असतो तेव्हा अशीच एक बोट त्या बेटाजवळ आल्याची बातमी तिथलं खासगी रेडिओ स्टेशन चालवणारा देतो आणि आपल्याला हे कळतं ते त्या पोराच्या घरच्या स्वयंपाकघरातील रेडिओवरून. या बातमीने त्याची आजी अजिबात विचलित न होता आपलं स्वयंपाकाचं काम करते आहे. काही अंतरावर समुद्रात असलेल्या बोटीत स्त्रिया, मुलं मेलेली आहेत. बाकीचे लोक उपासमारीने जवळपास मरायलाच टेकलेले आहेत. अशा भीषण अवस्थेत असलेल्या त्या लोकांविषयी आजीला आणि आजोबांनाही कसलं सोयरसुतक नाही. समुद्राच्या तळाशी जाऊन कसले कसले शोध घेणारा संशोधकही काही अंतरावरच्या या वास्तवाची दखल घेत नाही. जो तो आपापल्या कामात आणि जगण्यात मगA आहे. ‘मला काय त्याचं?’ ही भावना सार्वत्रिक आहे. सर्वदूर आहे. निरागसपणो आपलं बालसुलभ हुंदडणं मनसोक्त अनुभवणारा तो छोटा मुलगा ‘मला काय त्याचं?’ या भावनेचं प्रतिनिधित्व करतोय. तो जणू या वृत्तीचं प्रतीक!
या दुर्दैवी लोकांना मदत करायला हवी, असं बेटावरचा एकुलता एक डॉक्टर रोझीला सांगतो आणि तो ती करतोही. परंतु त्याची मदतदेखील किती अपुरी आहे हेच वास्तव त्यातून पुढे येतं. क्षमतेपेक्षा किती तरी जास्त प्रवासी वाहून नेणा:या या बोटीवरच्या चेंगराचेंगरीत किती तरी काळ अन्नपाण्यावाचून आणि तिथेच जडलेल्या आजारात खितपत पडून अक्षरश: प्रेतवत झालेत. त्यांच्यात हा डॉक्टर किती जीव फुंकणार? जे बोटीतच मेलेत ते सुटलेत म्हणावं तर त्यांची प्रेतं एखादी कचराकुंडी ओसंडून वहावी अशा अवस्थेत. रोझी यावर काही भाष्य करीत नाही. त्याचा कॅमेरा आणि रेकॉर्डिंग मशीन हे सारं टिपत जातात आणि आपल्या मनाशी येतं, का ही माणसं अशी जिवावर उदार होऊन, केवळ अकल्पित म्हणाव्यात अशा हालअपेष्टा सहन करत निघतात? जिथे असतात तिथली परिस्थिती इतकी भयानक असते की तीच त्यांना ही अशी दूरच्या देशा जायची प्रेरणा देते? बरं, तिथे तरी नीट पोहचू, सारं काही नीट पार पडेल आणि चार घास सुखाचे देणारं ते जग गाठता येईल याची तरी कुठे आहे शाश्वती? पण इथेही सडत सडत मरणंच आहे, तर मरणंच शिरावर घेऊन का तिथे पलीकडे जाऊ नये, असा निकराचा विचारच त्यांना ही प्रेरणा देतो आणि हा जनांचा प्रवाहो निघतो..
स्थलांतर करणा:यांच्या आयुष्यातील ही टोकाची अपरिहार्यताच ‘फायर अॅट सी’ सडेतोडपणो दाखवतो. सभोवतालच्या गरीब देशांतून युरोपात तसेच लॅटीन अमेरिकन देशांतून असंख्य लोक अमेरिकेत येत असतात. चार घास सुखाचे, एवढीच माफक अपेक्षा घेऊन निघालेल्यांचं जीणं किती भीषण आहे याची जाणीव हा चित्रपट देतो. 
गेल्या काही महिन्यात युरोप, विशेषत: जर्मनीमध्ये असंख्य लोक सिरियातून आले. येतच आहेत. स्थलांतरितांचा हा प्रश्न राजकीयदृष्टय़ा अतिशय गुंतागुंतीचा आणि जटिल आहे. त्यात काही दुर्दैवी जिवांच्या वाटय़ाला जे काही येतं ते अवघ्या माणूसपणालाच आव्हान देणारं असतं. ‘फायर अॅट सी’ त्याचीच जाणीव करून देतो. आणि विरोधाभास तरी केवढा! म्हणजे एकीकडे हा स्थलांतरितांचा ताफा आणि त्यांची विदिर्ण अवस्था, तर दुसरीकडे निवांतपणो आपलं जिणं जगणारं ते बेट. त्या बेटावरचा तो सॅम्युअल नावाचा मुलगा आणि त्याचं ते हुंदडणं दाखवत जणू एखादा कथापट सुरू करावा अशा प्रकारे रोझीची डॉक्युमेंटरी सुरू होते.. महत्त्वाचं म्हणजे तो सॅम्युअलला सतत टिपत राहतो. सॅम्युअलबरोबर मग त्याचा एक दोस्त दिसतो. सॅम्युअल त्याला बेचकी बनवायला आणि नेम धरायला शिकवतो. त्याला ते नीट जमत नाही. कारण तो रबर ताणल्या ताणल्या सोडतो. तेव्हा सॅम्युअल त्याला म्हणतो, ‘पेशन्स ठेव. घाई करू नको.’ 
 बेटावरचं शांत जीवन रोझी स्थलांतरितांच्या भीषण वास्तवाच्या पाश्र्वभूमीवर दाखवत राहतो. एका प्रसंगातील विदारकता तर विषण्ण करून टाकते. बोटीवरच्या आजारी लोकांना औषधपाणी करणारा डॉक्टर एका गरोदर बाईची सोनोग्राफी करीत तिच्या पोटातली जुळी त्याक्षणी कशी वाढत आहेत याचं तपशीलवार वर्णन करतो. अशावेळी बाईच्या चेह:यावर जो साधारणत: भाव असतो त्याचं नामोनिशाण या बाईवर दिसत नाही. तिच्या चेह:यावर एकच भाव. हे पोटातलं ओझं घेऊन कधी आपण त्या तिथे पोचणार?  अवघं जगणं वैराण झालेलं.. त्यात या नव्या बाळांच्या आगमनाचं काय कौतुक.?..आणि कुणाला?
 गिआनप्रसाँको रोझीनं ही सारी विदारकता अलिप्तपणो दृश्यबद्ध केलीय. तोच दिग्दर्शक, तोच छायाचित्रकार आणि तोच साउंड रेकॉर्डिस्ट.. आणि म्हणूनच त्याला अतिशय उत्तमरीत्या हे सारं वास्तव टिपता आलं.. आणि त्याने सहजपणाने पारंपरिक डॉक्युमेंटरीला एक नवा बाज दिला.
 
होणार होती शॉर्ट फिल्म, पण..
 
‘फायर अॅट सी’ ही पारंपरिक पद्धतीची डॉक्युमेंटरी नव्हे. भूमध्य समुद्रातील लॅम्पेदुसा या बेटावर पोहचून तिथून इटलीतील सिसिली गाठायचं आणि मग युरोपात हवं तिथे जात आपलं भविष्य घडवायचं असा साधा विचार मनाशी आखत या जीवघेण्या सागरी मोहिमेवर निघणा:या निर्वासितांवर गिआनप्रसाँको रोझी साताठ मिनिटांची एक शॉर्ट फिल्म करायला गेला होता. 
..परंतु तिथे त्याने जे पाहिलं त्यातून त्याचा विचार बदलला आणि या बेटावर एक वर्ष मुक्काम ठोकत त्याला जे दिसलं तसं ते त्यानं टिपलं. 
- तीच या माहितीपटाची ताकद आहे. 
 
(लेखक ज्येष्ठ चित्रपट समीक्षक आहेत.)
ashma1895@gmail.com